प्रलंबित मागण्यांसाठी विमाशीचा एल्गार *माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन* मानोरा :--विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या (विमाशी) वतीने त्यांच्या प्रलंबित ४५ मागण्यांसाठी मंगळवार, १० मार्च रोजी माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. या आंदोलनात खासगी आणि स्थनिक स्वराज्य संस्था अंतर्गत संचालित प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे विविध प्रश्न मांडण्यात आले. खाजगी अनुदानित शाळा, विजा भज शाळा, आदिवासी आश्रम शाळा व इतर विभागातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित समस्यांकडे शिक्षण विभागाचे लक्ष वेधून त्या सोडविण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. यामध्ये टिईटी सक्ती रद्द करणे, जुनी पेन्शन योजना लागू करणे, शिक्षकेतर पदभरती करणे, जिल्ह्यातील काॅपीप्रकरणी शिक्षकांवरील प्रस्तावित कारवाई मागे घेणे, आंदोलन दुपारी ३ ते ५ वाजेदरम्यान करण्यात आले. या आंदोलनात विमाशीचे विभागीय कार्यवाह प्रा. बाळासाहेब गोटे, म.रा. माध्यमिक शिक्षक महामंडळाचे विनायक उज्जैनकर, जिल्हाध्यक्ष रामेश्वर अवचार, जिल्हा कार्यवाह कुलदिप बदर, कार्याध्यक्ष विजय भड, उपाध्यक्ष प्रा. मंगेश भोरे, गजानन वारकड, नंदकिशोर ढवळे, सहसचिव पी. टी. शिंदे, रघुनाथ चौधरी, अतुल मेहरे, रमेश घुगे, कोषाध्यक्ष गजानन इढोळे, गजानन गिते, प्रसिद्धी प्रमुख सुनिल कोंगे, जिल्हा संघटक, मंगेश आंबेकर, किशोर सदार, मनिकांत मिसाळ, न.चि. ढवळे, डी. एन. पाटिल, शेखर महाकाळ, संजय धामनकर, श्रावण किन्हीकर, मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष विनोद नरवाडे, सचिव विजय शिंदे, उपाध्यक्ष साहेबराव जाधव, मिलींद कवर, उच्च माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष अमोल काळे, सचिव गोपाल गावंडे, उच्च माध्यमिक कृती समितीने प्रशांत कवर, व्हिज्युक्टाचे राजा वामन, शिक्षकेतर संघाचे जिल्हाध्यक्ष कैलास ढवळे,सचिव रामराव, कायंदे,कार्याध्यक्ष प्रफुल्ल काळे, किशोर उंडाळ, प्रवेश राठोड,आदींसह एकूण १४१ शिक्षक सहभागी झाले होते. विमाशीच्या वतीने या संदर्भात माध्यमिक शिक्षणाधिकारी मंगल धुपे यांना निवेदनही सादर करण्यात आले. या निवेदनात पगारवाढ, नियुक्ती प्रक्रिया सुधारणा, कामाच्या अटी व शैक्षणिक सुविधांमध्ये सुधारणा आदि मुद्द्यांकडे माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांचे लक्ष वेधून शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करण्याची मागणी आंदोलनाद्वारे केली आहे.

- Post by Sharad Dayedar1
- हिंगोली: जिल्ह्यातील 'आर.डी.एस.एस.' (RDSS) योजनेअंतर्गत झालेली कामे आणि गावठाण फिडर सप्रेशनच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत, शिवसेना (शिंदे गट) सेनगाव तालुकाप्रमुख अमोल सीताराम खिल्लारे यांनी हिंगोली येथील महावितरण कार्यालयासमोर आजपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. वारंवार पाठपुरावा करूनही अधिकारी दाद देत नसल्याने अखेर आंदोलनाचे पाऊल उचलल्याचे त्यांनी सांगितले. २०२५ मध्ये कामे संपल्याचा दावा, तरीही कामे सुरूच? या प्रकरणातील मुख्य धक्कादायक बाब म्हणजे, कागदोपत्री २०२५ मध्येच जी कामे पूर्ण झाल्याचे दाखवण्यात आली आहेत, ती कामे आजही प्रत्यक्ष जमिनीवर सुरू आहेत. या विसंगतीबाबत जेव्हा महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी विचारणा केली जाते, तेव्हा सेनगाव, हिंगोली आणि संपूर्ण जिल्ह्यात नेमकी कोणती कामे सुरू आहेत, याची माहिती खुद्द अधिकाऱ्यांनाही नसल्याचे समोर आले आहे. अधांतरी चौकशी आणि अधिकाऱ्यांची टोलवाटोलवी दोन महिन्यांपूर्वी गोरेगाव येथे या प्रश्नावर 'रास्ता रोको' आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी सेनगावचे डी.वाय. (DY) आणि अभियंत्यांनी लेखी आश्वासन दिले होते की, या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल. मात्र, आजतागायत कोणतीही कारवाई झाली नाही. तत्कालीन अधीक्षक अभियंता हिंगोली यांच्याकडे दाद मागितली असता, त्यांनी 'डी.वाय.' कडे बोट दाखवून जबाबदारी झटकली. चौकशी पत्रात अनियमितता अमोल खिल्लारे यांनी असाही आरोप केला आहे की, यापूर्वी झालेल्या कथित चौकशी पत्रावर कसलीही तारीख नाही, तसेच त्यावर संबंधित लाईनमनच्या सह्याही नाहीत. नियमानुसार कोणतीही चौकशी करताना पंच, ग्रामसेवक, तलाठी, तंटामुक्ती अध्यक्ष किंवा पोलीस पाटील यांना सोबत घेणे आवश्यक असते. मात्र, महावितरणने कोणाशीही संपर्क न साधता केवळ कागदी घोडे नाचवून भ्रष्टाचार दडपण्याचा प्रयत्न केला आहे. शेतकरी न्यायापासून वंचित निकृष्ट दर्जा: सेनगाव तालुक्यातील कामांचा दर्जा अतिशय निकृष्ट असून शेतकऱ्यांच्या नावावर कामे झाली की नाही, याची माहिती अधिकारी देत नाहीत. भूगोल पिंपरीचा प्रश्न: येथील शेतकऱ्यांनी दोन वेळा उपोषण करूनही त्यांना अजूनही न्याय मिळालेला नाही. भ्रष्टाचाराचा विळखा: आर.डी.एस.एस. योजनेतील ए.बी. केबल आणि फिडरच्या कामात कोट्यवधींचा गैरव्यवहार झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच "महावितरणचे अधिकारी संगनमत करून शेतकऱ्यांची फसवणूक करत आहेत. जोपर्यंत हा भ्रष्टाचार उघडा पडत नाही आणि दोषींवर कठोर कारवाई होत नाही, तोपर्यंत शिवसेना शांत बसणार नाही," असा इशारा अमोल खिल्लारे यांनी दिला आहे. हिंगोली जिल्हा महावितरण कार्यालयासमोर सुरू असलेल्या या आंदोलनाकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.1
- Post by Shaikh irfan Shaikh isa1
- Post by Nandkumar Motiram Totewad1
- Post by Amravati News Update1
- घरकुल योजनेत गैरप्रकाराचा आरोप; आंदोलनाचा इशारा हिमायतनगर तालुक्यात पंचायत समिती अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या घरकुल योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरप्रकार होत असल्याचा आरोप समोर आला आहे. पात्र लाभार्थ्यांना देयके देण्यास टाळाटाळ करून आर्थिक पिळवणूक होत असल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वामनराव पाटील वडगावकर यांच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर त्यांनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी नारवटकर यांच्याशी संपर्क साधून तीव्र नाराजी व्यक्त केली. ज्या लाभार्थ्यांनी कर्ज काढून घरकुल पूर्ण केले, त्यांना देयके न देता अर्धवट काम करणाऱ्या लाभार्थ्यांना पैसे दिले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. “टेबलाखालून व्यवहार करणाऱ्यांनाच प्राधान्य दिले जात आहे,” असा गंभीर आरोपही करण्यात आला आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ सुधारणा करून पात्र लाभार्थ्यांना प्राधान्याने देयके द्यावीत, तसेच अभियंता स्तरावर होत असलेली लूट थांबवावी, अन्यथा पंचायत समितीसमोर आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा वडगावकर यांनी दिला आहे. तशी ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने घरकुल योजनेत मोठी अनियमितता असल्याची जोरदार चर्चा होते आहे. #Himayatnagar #Nanded #HousingScheme #Corruption #LocalNews MaharashtraNews BreakingNews PublicIssue1
- Post by दिपक हैबतराव चोरमले1
- Post by Sharad Dayedar1