logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

पुण्याच्या भोर शहरात आषाढ महिना सुरू झाल्यामुळे चिकन, मटण आणि माशांच्या विक्रीत मोठी वाढ झाली आहे. दुकानांमधील शिल्लक आणि विक्रीयोग्य नसलेले मांस उघड्यावर टाकले जात असल्याने सर्वत्र मोकाट कुत्र्यांचा वावर प्रचंड वाढला आहे. या भटक्या कुत्र्यांनी शहरात उच्छाद मांडला असून नागरिकांना चावा घेण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. नुकतीच चौपाटी परिसरात शिरवळ येथे कामासाठी दुचाकीवरून निघालेल्या गोपीचंद संपत म्हस्के यांच्यावर कुत्र्यांच्या टोळीने अचानक हल्ला करून त्यांना जखमी केले. कामानिमित्त दुचाकीवरून जाणारे नागरिक आणि सायकलवरून शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचाही कुत्र्यांचे हे कळप सतत पाठलाग करत आहेत. रात्री अपरात्री कुत्र्यांच्या भुंकण्याने आणि विव्हळण्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे चौपाटी परिसरासह संपूर्ण शहरातील भटक्या कुत्र्यांचा प्रशासनाने त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी आता नागरिकांमधून जोर धरू लागली आहे.

3 hrs ago
user_पत्रकार विक्रम शिंदे
पत्रकार विक्रम शिंदे
Reporter भोर, पुणे, महाराष्ट्र•
3 hrs ago

पुण्याच्या भोर शहरात आषाढ महिना सुरू झाल्यामुळे चिकन, मटण आणि माशांच्या विक्रीत मोठी वाढ झाली आहे. दुकानांमधील शिल्लक आणि विक्रीयोग्य नसलेले मांस उघड्यावर टाकले जात असल्याने सर्वत्र मोकाट कुत्र्यांचा वावर प्रचंड वाढला आहे. या भटक्या कुत्र्यांनी शहरात उच्छाद मांडला असून नागरिकांना चावा घेण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. नुकतीच चौपाटी परिसरात शिरवळ येथे कामासाठी दुचाकीवरून निघालेल्या गोपीचंद संपत म्हस्के यांच्यावर कुत्र्यांच्या टोळीने अचानक हल्ला करून त्यांना जखमी केले. कामानिमित्त दुचाकीवरून जाणारे नागरिक आणि सायकलवरून शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचाही कुत्र्यांचे हे कळप सतत पाठलाग करत आहेत. रात्री अपरात्री कुत्र्यांच्या भुंकण्याने आणि विव्हळण्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे चौपाटी परिसरासह संपूर्ण शहरातील भटक्या कुत्र्यांचा प्रशासनाने त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी आता नागरिकांमधून जोर धरू लागली आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • लोणावळ्यात अतिवृष्टीनंतर आलेल्या पुरामुळे अनेक कुटुंबांचे मोठे नुकसान झाले आहे. पूर्वसूचना न देता टाटा धरणातून पाणी सोडण्यात आल्यामुळेच परिस्थिती अधिक गंभीर झाल्याचा आरोप पूरग्रस्तांकडून केला जात आहे. यासोबतच लोणावळा नगरपरिषदेच्या नियोजनावरही गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. मदतीसाठी बैठका पार पडल्या असल्या तरी अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. त्यामुळे पूरग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी टाटा धरणावर लवकरच मोर्चा काढणार असल्याचा इशारा उपनगराध्यक्ष देविदास कडू यांनी दिला आहे.
    1
    लोणावळ्यात अतिवृष्टीनंतर आलेल्या पुरामुळे अनेक कुटुंबांचे मोठे नुकसान झाले आहे. पूर्वसूचना न देता टाटा धरणातून पाणी सोडण्यात आल्यामुळेच परिस्थिती अधिक गंभीर झाल्याचा आरोप पूरग्रस्तांकडून केला जात आहे. यासोबतच लोणावळा नगरपरिषदेच्या नियोजनावरही गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.

मदतीसाठी बैठका पार पडल्या असल्या तरी अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. त्यामुळे पूरग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी टाटा धरणावर लवकरच मोर्चा काढणार असल्याचा इशारा उपनगराध्यक्ष देविदास कडू यांनी दिला आहे.
    user_Thenayak
    Thenayak
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाला आता देशभरातून पाठिंबा मिळत आहे. या आंदोलनाला साथ देण्यासाठी थेट नागालँडहून जंतर-मंतरवर ₹64 हजारांचे पिझ्झा पाठवण्यात आले आहेत.
    1
    दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाला आता देशभरातून पाठिंबा मिळत आहे. या आंदोलनाला साथ देण्यासाठी थेट नागालँडहून जंतर-मंतरवर ₹64 हजारांचे पिझ्झा पाठवण्यात आले आहेत.
    user_विशेष तपास न्युज
    विशेष तपास न्युज
    पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • पिंपरीमध्ये झालेल्या आंदोलनादरम्यान एका आजींनी केलेले भाषण ऐकण्याचे आवाहन करण्यात येत आहे. कोक्रोज जनता पार्टीच्या या आंदोलनातील आजींचे भाषण नक्की ऐकावे असा संदेश दिला जात आहे.
    1
    पिंपरीमध्ये झालेल्या आंदोलनादरम्यान एका आजींनी केलेले भाषण ऐकण्याचे आवाहन करण्यात येत आहे. कोक्रोज जनता पार्टीच्या या आंदोलनातील आजींचे भाषण नक्की ऐकावे असा संदेश दिला जात आहे.
    user_Maharashtra 18 news
    Maharashtra 18 news
    पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • धाराशिवमध्ये कृषी साहित्य दिलेच नाही आणि एका अधिकाऱ्याने तब्बल १६ कोटी रुपये खाऊन टाकल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. कृषी साहित्याचे कोणतेही वाटप न करताच त्या अधिकाऱ्याने १६ कोटी रुपयांचा निधी खाऊन घेतला आहे.
    1
    धाराशिवमध्ये कृषी साहित्य दिलेच नाही आणि एका अधिकाऱ्याने तब्बल १६ कोटी रुपये खाऊन टाकल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. कृषी साहित्याचे कोणतेही वाटप न करताच त्या अधिकाऱ्याने १६ कोटी रुपयांचा निधी खाऊन घेतला आहे.
    user_NEWS 24 MAHARASHTRA
    NEWS 24 MAHARASHTRA
    Media house पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • फलटण-सातारा मार्गावरील तडवळे फाटा ते वाठार निंबाळकर रस्त्याचे काम गेल्या तीन ते साडेतीन वर्षांपासून अर्धवट अवस्थेत असल्याने अनेक अपघात होत आहेत. रस्त्याचे काम सुरू असतानाही अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यातच गेल्या १५ दिवसांपूर्वी कापशी आळजापूर येथील पुलाचे काम अर्धवट ठेवल्यामुळे एकाला आपला जीव गमवावा लागला आहे. या ठिकाणी जुना पूल पूर्ण न काढताच त्याच्या दोन्ही बाजूंनी वाढ करण्यात आली आहे. तसेच पुलावर कामाचा राडारोडा तसाच राहिल्याने मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. या रस्त्यावरील अर्धवट आणि धोकादायक कामे संबंधित ठेकेदाराने त्वरित पूर्ण करावीत, अशी जोरदार मागणी वाहनचालक व नागरिकांनी केली आहे.
    1
    फलटण-सातारा मार्गावरील तडवळे फाटा ते वाठार निंबाळकर रस्त्याचे काम गेल्या तीन ते साडेतीन वर्षांपासून अर्धवट अवस्थेत असल्याने अनेक अपघात होत आहेत. रस्त्याचे काम सुरू असतानाही अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यातच गेल्या १५ दिवसांपूर्वी कापशी आळजापूर येथील पुलाचे काम अर्धवट ठेवल्यामुळे एकाला आपला जीव गमवावा लागला आहे.

या ठिकाणी जुना पूल पूर्ण न काढताच त्याच्या दोन्ही बाजूंनी वाढ करण्यात आली आहे. तसेच पुलावर कामाचा राडारोडा तसाच राहिल्याने मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. या रस्त्यावरील अर्धवट आणि धोकादायक कामे संबंधित ठेकेदाराने त्वरित पूर्ण करावीत, अशी जोरदार मागणी वाहनचालक व नागरिकांनी केली आहे.
    user_LOKSHAKATI RAKASHAK
    LOKSHAKATI RAKASHAK
    Video Creator सातारा, सातारा, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • पुण्याच्या बारामतीमध्ये लोकनेते अजितदादांच्या स्मृतीस्थळावर साधू बल्लाळ व अनिता गायकवाड यांनी पणती लावत श्रद्धांजली वाहिली आहे.
    1
    पुण्याच्या बारामतीमध्ये लोकनेते अजितदादांच्या स्मृतीस्थळावर साधू बल्लाळ व अनिता गायकवाड यांनी पणती लावत श्रद्धांजली वाहिली आहे.
    user_Mansoor Shaikh
    Mansoor Shaikh
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • दिल्लीमध्ये सुरू असलेल्या आंदोलनातून अभिजित दीपके यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट शब्दांत निशाणा साधला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी पहिले आपले काम करावे, असे ठणकावून सांगत दीपके यांनी त्यांना खडे बोल सुनावले आहेत.
    1
    दिल्लीमध्ये सुरू असलेल्या आंदोलनातून अभिजित दीपके यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट शब्दांत निशाणा साधला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी पहिले आपले काम करावे, असे ठणकावून सांगत दीपके यांनी त्यांना खडे बोल सुनावले आहेत.
    user_Maharashtra 18 news
    Maharashtra 18 news
    पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • पोलिस कारवाईचा निषेध करण्यासाठी वकिलांनी जंतर-मंतरवर जोरदार एल्गार पुकारला आहे. या आंदोलनादरम्यान वकिलांनी एकत्र येत संविधानाच्या प्रस्तावनेचे सामूहिक वाचन केले आणि पोलिसांच्या कारवाईविरोधात आपला तीव्र विरोध नोंदवला.
    1
    पोलिस कारवाईचा निषेध करण्यासाठी वकिलांनी जंतर-मंतरवर जोरदार एल्गार पुकारला आहे. या आंदोलनादरम्यान वकिलांनी एकत्र येत संविधानाच्या प्रस्तावनेचे सामूहिक वाचन केले आणि पोलिसांच्या कारवाईविरोधात आपला तीव्र विरोध नोंदवला.
    user_विशेष तपास न्युज
    विशेष तपास न्युज
    पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • 'आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचं वाकून' ही प्रवृत्ती आता पूर्णपणे बंद करा, असा थेट आणि कडक इशारा देण्यात आला आहे. स्वतःच्या गोष्टी लपवून ठेवायच्या आणि इतरांच्या बाबतीत मात्र डोकावून पाहायचे, या वृत्तीवर तीव्र शब्दांत निशाणा साधत हा प्रकार तातडीने थांबवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
    1
    'आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचं वाकून' ही प्रवृत्ती आता पूर्णपणे बंद करा, असा थेट आणि कडक इशारा देण्यात आला आहे. स्वतःच्या गोष्टी लपवून ठेवायच्या आणि इतरांच्या बाबतीत मात्र डोकावून पाहायचे, या वृत्तीवर तीव्र शब्दांत निशाणा साधत हा प्रकार तातडीने थांबवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
    user_NEWS 24 MAHARASHTRA
    NEWS 24 MAHARASHTRA
    Media house पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    23 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.