Shuru
Apke Nagar Ki App…
फलटण-सातारा मार्गावरील तडवळे फाटा ते वाठार निंबाळकर रस्त्याचे काम गेल्या तीन ते साडेतीन वर्षांपासून अर्धवट अवस्थेत असल्याने अनेक अपघात होत आहेत. रस्त्याचे काम सुरू असतानाही अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यातच गेल्या १५ दिवसांपूर्वी कापशी आळजापूर येथील पुलाचे काम अर्धवट ठेवल्यामुळे एकाला आपला जीव गमवावा लागला आहे. या ठिकाणी जुना पूल पूर्ण न काढताच त्याच्या दोन्ही बाजूंनी वाढ करण्यात आली आहे. तसेच पुलावर कामाचा राडारोडा तसाच राहिल्याने मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. या रस्त्यावरील अर्धवट आणि धोकादायक कामे संबंधित ठेकेदाराने त्वरित पूर्ण करावीत, अशी जोरदार मागणी वाहनचालक व नागरिकांनी केली आहे.
LOKSHAKATI RAKASHAK
फलटण-सातारा मार्गावरील तडवळे फाटा ते वाठार निंबाळकर रस्त्याचे काम गेल्या तीन ते साडेतीन वर्षांपासून अर्धवट अवस्थेत असल्याने अनेक अपघात होत आहेत. रस्त्याचे काम सुरू असतानाही अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यातच गेल्या १५ दिवसांपूर्वी कापशी आळजापूर येथील पुलाचे काम अर्धवट ठेवल्यामुळे एकाला आपला जीव गमवावा लागला आहे. या ठिकाणी जुना पूल पूर्ण न काढताच त्याच्या दोन्ही बाजूंनी वाढ करण्यात आली आहे. तसेच पुलावर कामाचा राडारोडा तसाच राहिल्याने मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. या रस्त्यावरील अर्धवट आणि धोकादायक कामे संबंधित ठेकेदाराने त्वरित पूर्ण करावीत, अशी जोरदार मागणी वाहनचालक व नागरिकांनी केली आहे.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- फलटण-सातारा मार्गावरील तडवळे फाटा ते वाठार निंबाळकर रस्त्याचे काम गेल्या तीन ते साडेतीन वर्षांपासून अर्धवट अवस्थेत असल्याने अनेक अपघात होत आहेत. रस्त्याचे काम सुरू असतानाही अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यातच गेल्या १५ दिवसांपूर्वी कापशी आळजापूर येथील पुलाचे काम अर्धवट ठेवल्यामुळे एकाला आपला जीव गमवावा लागला आहे. या ठिकाणी जुना पूल पूर्ण न काढताच त्याच्या दोन्ही बाजूंनी वाढ करण्यात आली आहे. तसेच पुलावर कामाचा राडारोडा तसाच राहिल्याने मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. या रस्त्यावरील अर्धवट आणि धोकादायक कामे संबंधित ठेकेदाराने त्वरित पूर्ण करावीत, अशी जोरदार मागणी वाहनचालक व नागरिकांनी केली आहे.1
- दिल्लीतील जंतर-मंतरवर लोकशाही पद्धतीने आंदोलन करणाऱ्या मुलांवर पोलिसांकडून लाठीचार्ज, दगडफेक आणि मुलींची छेडछाड असे प्रकार घडल्याच्या निषेधार्थ राज्यातील आंबेडकरी पक्ष व संघटनांच्या नेत्यांनी २३ जुलै रोजी बंदची हाक दिली होती. या आवानाला प्रतिसाद देत ऐतिहासिक जावळीतील व्यापारी व व्यावसायिकांनी उत्स्फूर्त पाठिंबा दिल्याने जावळीत १००% बंद यशस्वी झाला. मात्र, दुसरीकडे मराठ्यांची राजधानी असलेले सातारा शहर भाजपच्या प्रभावाखाली असल्याने सर्व दुकाने सताड उघडी ठेवून बंदचे आवाहन करणाऱ्या कार्यकर्त्यांना दात विचकावून दाखवत होते. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे वाटोळे झाले तरी चालेल पण राज्यकर्ते जगले पाहिजेत, जणू असेच सांगत शिवरायांची राजधानी असलेला सातारा भाजपच्या प्रभावाखाली राहिल्याचे पाहायला मिळाले.1
- केंद्र सरकारच्या विरोधात आपला तीव्र रोष व्यक्त करण्यासाठी युवकांनी रॅप गाण्याचा मार्ग अवलंबला आहे. रॅपच्या माध्यमातून युवकांनी केंद्र सरकारचे वाभडे काढत सरकारविरोधातील आपला असंतोष आणि राग उघडपणे मांडला आहे.1
- राज्याचे जलसंपदा मंत्री मा. ना. श्री. राधाकृष्ण विखे पाटील साहेब हे शनिवार, दि. २५ जुलै रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून, या दौऱ्याची सुरुवात श्री क्षेत्र बिरोबा यांच्या पवित्र दर्शनाने होणार आहे. दर्शनानंतर टेंभू सिंचन योजनेअंतर्गत तासगाव व कवठेमहांकाळ तालुक्यातील सिंचनाशी संबंधित विविध प्रश्नांवर एक महत्त्वपूर्ण आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे. या आढावा बैठकीत सुरू असलेल्या कामांचा आढावा, प्रलंबित कामे, पाणी सोडण्यातील अडचणी, नवीन पाइपलाइनचे प्रस्ताव तसेच टेंभू योजनेशी संबंधित विविध विषयांवर सविस्तर चर्चा होणार आहे. लाभक्षेत्रातील सर्व गावांच्या समस्या मंत्रीमहोदयांसमोर मांडून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या जातील आणि त्यावर प्रभावी व तातडीने तोडगा काढण्यासाठी कार्यवाही करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी, सिंचन व्यवस्थेच्या बळकटीसाठी आणि टेंभू योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.1
- लोणंद कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये २३ जुलै रोजी गरवा कांद्याची आवक घटल्याने कांद्याचे दर कडाडले आहेत. आवक कमी झालेली असली तरी गरवा कांद्याच्या दरामध्ये मोठी वाढ पाहायला मिळत आहे. बाजार समितीत सध्या कांदा नंबर एकला २१०० ते २४०० रुपये, कांदा नंबर दोनला १४०० ते २१०० रुपये आणि कांदा नंबर तीनला ८०० ते १४०० रुपये असे दर मिळत आहेत. या वाढत्या दरांच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी कांदा चांगल्या प्रतीचा वाळवून आणि योग्य प्रतवारी करूनच विक्रीसाठी आणावा, असे आवाहन उपसभापती सुनील शेळके पाटील, सचिव भानुदास यादव आणि अमोद शेळके पाटील यांनी केले आहे.2
- राज ठाकरे यांनी आपल्या सडेतोड भाषणातून थेट मुख्यमंत्री फडणवीस यांना धारेवर धरले आहे. त्यांनी या भाषणात अत्यंत स्पष्ट आणि थेट भूमिकेतून मुख्यमंत्री फडणवीसांना चांगलेच लक्ष्य केले.1
- बारामतीमध्ये अजितदादा युथ फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात अजितदादांच्या AI आवाजातील एक विशेष व्हिडिओ सादर करण्यात आला. हा व्हिडिओ पाहताना कार्यक्रमात अत्यंत भावूक वातावरण निर्माण झाले. हा विशेष व्हिडिओ पाहताना जय पवार, आदिती तटकरे आणि सना मलिक यांच्यासह तेथे उपस्थित असलेले अनेक कार्यकर्ते भावूक झाले आणि हळहळले. या रक्तदान शिबिरासारख्या सामाजिक कार्यातून अजितदादांच्या विचारांना अभिवादन करण्यात आले.1
- बारामती-पाटस मार्गावर उंडवडी टोलनाक्यापुढे झालेल्या अपघातातील जखमीच्या मदतीसाठी युवा नेते जय पवार तात्काळ धावून आले. पुण्याकडे प्रवास करत असताना रस्त्यात अपघात झाल्याचे दिसताच त्यांनी कोणताही उशीर न करता आपला ताफा थांबवला. जय पवार यांनी अपघातग्रस्त जखमीची विचारपूस करत तातडीने मदतीची व्यवस्था केली. तसेच जखमीवर योग्य उपचारासाठी त्यांनी स्वतःच्या स्वीय सहाय्यकालाही जखमीसोबत पाठवले. संकटाच्या क्षणी त्यांनी दाखवलेली ही तत्परता आणि माणुसकी सर्वांच्या कौतुकाचा विषय ठरली आहे.1