‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ अभियानांतर्गत जनजागृती रॅली प्रतिनिधी स्वाती हडकर ‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ अभियानांतर्गत जनजागृती रॅली चिपळूण, दि. १६ : महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या ‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ या महत्त्वाकांक्षी अभियानाच्या प्रसारासाठी चिपळूण तालुका आरोग्य विभागातर्फे शहरात भव्य जनजागृती रॅली काढण्यात आली. आरोग्य कर्मचारी, आशा सेविका तसेच नर्सिंग विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे या उपक्रमाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला. रॅलीची सुरुवात इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र येथून श्रीफळ वाढवून करण्यात आली. शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत ही रॅली चिपळूण नगर परिषद परिसरात समाप्त झाली. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्योती यादव यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम पार पडला. अभियानाची उद्दिष्टे स्पष्ट रॅलीदरम्यान आयोजित कार्यक्रमात मान्यवरांनी अभियानामागील उद्दिष्टे स्पष्ट केली. डॉ. ज्योती यादव यांनी नागरिकांनी आरोग्याबाबत सजग राहून प्रतिबंधात्मक उपायांवर भर द्यावा, असे आवाहन केले. कामथे उपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ. कांचन मदर यांनी वेळेवर आरोग्य तपासणी करून घेणे किती आवश्यक आहे, याबाबत मार्गदर्शन केले. कॅन्सर तपासणी व्हॅनचे विशेष आकर्षण रॅलीत कॅन्सर तपासणीसाठीची विशेष व्हॅन सहभागी झाली होती. नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. या कार्यक्रमाला डॉ. अजय सानप, संजीवनी नर्सिंग कॉलेजचे जगदीश व हर्षा वाघुळदे, आरोग्य पर्यवेक्षक आर. के. पवार यांच्यासह अनेक आरोग्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. संजीवनी नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी आरोग्यविषयक फलक व घोषवाक्यांच्या माध्यमातून प्रभावी जनजागृती केली. या रॅलीच्या माध्यमातून शहरात आरोग्याविषयक जनजागृती करण्यात यश आले असून शासनाच्या आरोग्य सुविधा तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

- पिंपरी चिंचवड :- आकुर्डी येथील कै. फकीरभाई पानसरे उर्दू शाळेत आरटीई RTE प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्र पडताळणी प्रक्रियेदरम्यान प्रशासनाचा भोंगळ कारभार समोर आला आहे. शेकडो पालक आपल्या मुलांसह शाळेत जमा झाले असताना, कर्मचारी कोणतीही पूर्वसूचना न देता निघून गेल्याने पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे... आरटीई प्रवेशासाठी १५ ते २२ एप्रिल हा कालावधी अत्यंत मर्यादित आहे. या अल्प मुदतीत कागदपत्रे पडताळणे आवश्यक असताना, शाळेतील कर्मचारी पालकांना उन्हात ताटकळत ठेवून अचानक निघून गेले. यामुळे संतापलेल्या पालकांनी विचारणा केली की, जर वेळेत पडताळणी झाली नाही आणि मुलांचे वर्ष वाया गेले, तर याला जबाबदार कोण ? असा संतप्त सवाल पालकांनी उपस्थित केला आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन शिक्षण विभागाने आकुर्डीतील गैरसोयीची माहिती मिळताच जादा कर्मचारी पाठवले असून प्रक्रिया सुरळीत पार पडेल याची काळजी घेतली जात आहे. दरम्यान मुदत संपण्यापूर्वी आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित व्हावा, यासाठी पालकांची धावपळ सुरू असून प्रशासनाने अधिक संवेदनशीलतेने काम करण्याची मागणी होत आहे... #आकुर्डी #पिंपरीचिंचवड #आरटीईप्रवेश #शिक्षणविभाग #पालकांचा_संताप #प्रशासनाचा_गोंधळ #उन्हातहाल #शाळाप्रवेश #विद्यार्थीप्रश्न #RTEगोंधळ #Akurdi #PimpriChinchwad #RTEAdmission #EducationDepartment #ParentsProtest #AdministrativeFailure #SchoolAdmission #StudentIssues #RTEProcess #BreakingNews1
- पिंपरी चिंचवड वाकड, तपास पथकाची कामगिरी ४८ तासांत चेन स्नॅचर जेरबंद; ४.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त.1
- बारामती विधानसभा पोट निवडणुकीत सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी आ. रोहित पवार यांनी घोंगडी बैठका घेतल्या1
- #news #trending news1
- Lucknow mein Aag lagne ke Karan Bhari nuksan aur hua Hai1
- शिरूर (डेली न्यूज पोस्ट टीम 24}: श्री स्वामी समर्थ यांच्या पुण्यतिथीनिमित्त शहरातील प्रीतम प्रकाश नगर परिसरात भक्तिमय वातावरणात पालखी मिरवणूक काढण्यात आली. “स्वामी समर्थ महाराज की जय”च्या जयघोषात संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. प्रीतम प्रकाश नगरमधील विविध रस्त्यांवरून पालखी मिरवणूक पार पडली. ठिकठिकाणी भाविकांनी पालखीचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती. मंदिर परिसरासह संपूर्ण भाग आकर्षक विद्युत रोषणाईने उजळून निघाला होता. भक्तांच्या उपस्थितीमुळे परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. मिरवणुकीनंतर आरती व महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला. या वेळी मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहून प्रसादाचा लाभ घेतला. कार्यक्रमादरम्यान प्रसिद्ध गायक श्रीहरी विठ्ठल मेहंदरकर यांनी सादर केलेल्या भक्तीगीतांनी वातावरण अधिकच भक्तिमय झाले. यावेळी सादर झालेल्या भजन व भक्तीगीतांनी आध्यात्मिक अनुभूती दिली. कार्यक्रमाची सुरुवात “खेळ मांडियेला” या अभंगाने होत “रूपे सुंदर”, “ॐ ओंकार प्रधान” आणि “ग सारेगमप” यांसारख्या सादरीकरणांनी वातावरण भक्तिरसात न्हाऊन निघाले. त्यानंतर “रचिला ऋषीमुनींनी”, “विठू माऊली” व “सेवा धर्मी पुण्य आहे” या गीतांनी श्रद्धेची उंची वाढवली, तर “धाव पाव स्वामी” आणि “हरी म्हणा” या गजरांनी भक्तांचा उत्साह शिगेला पोहोचला. पुढे “मन लागो रे”, “स्वामी समर्था सदगुरु समर्था”, “कानडा राजा पंढरीचा” आणि “वृंदावनी वेणु” या सादरीकरणांनी कार्यक्रम रंगत गेला. “शाम तेरी बंसी” व “धरिला ला पंढरीचा चोर” यानंतर “माझी रेणुका माऊली” आणि “सौभाग्यदा लक्ष्मी बारम्मा” ही गीते सादर करण्यात आली “घागर घेऊन”, “भवरा भवरा” व “अबीर गुलाल” “तीर्थ विठ्ठल”, “अवघे गर्जे पंढरपूर” या गीतांनी वातावरण अधिकच भारावले . कार्यक्रमाची सांगता “निघालो घेऊन दत्ताची पालखी” या भक्तिगीताने होत उपस्थित भाविकांना आध्यात्मिक समाधानाचा अनुभव देत सोहळ्याचा समारोप करण्यात आला. या उपक्रमाचे आयोजन श्री स्वामी समर्थ सेवा संस्था, शिरूर यांच्या वतीने करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष योगेश वाळकीकर, उपाध्यक्ष अॅड. नारायण पवार, सचिव दीपक वर्मा, खजिनदार गणेश घाडगे यांच्यासह संपत लोखंडे, प्रमोद पवार, विष्णू वेताळ, मंगला बागमार, भूषण कडेकर, चंद्रकांत निघोजकर आदी पदाधिकारी आहेत. दरम्यान, संस्थेच्या वतीने प्रीतम प्रकाश नगर येथे स्वामी समर्थ मंदिराचे बांधकाम करण्यात आले असून येथे नियमित रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित केली जातात. तसेच गरजूंना वॉकर, वॉटर बेड आदी वैद्यकीय साहित्य उपलब्ध करून देण्याचे सामाजिक कार्यही सातत्याने राबविण्यात येत असल्याची माहिती अध्यक्ष योगेश वाळकीकर व श्यामसुंदर चिखलीकर यांनी दिली. गरजूंनी या बाबत संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे3
- पिंपरी चिंचवड :- पिंपरी चिंचवड शहरातील रावेत पोलीस स्टेशनच्या अगदी समोर आज एका भरधाव थार जीप आणि रुग्णवाहिकेचा भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये रुग्णवाहिकेचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. या घटनेत एक दुचाकीस्वार देखील गंभीर जखमी झाला असून वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.... मिळालेल्या माहितीनुसार, रावेत पोलीस स्टेशनसमोरील मुख्य रस्त्यावर रुग्णवाहिका आणि थार कारची जोरात धडक झाली. याच दरम्यान एक दुचाकीस्वारही या अपघाताच्या कचाट्यात सापडला. अपघाताचा आवाज ऐकताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. अपघातातील जखमींना पोलिसांनी तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. अपघातात रुग्णवाहिकेचा दर्शनी भाग पूर्णपणे चेपला गेला असून दुचाकीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान हा अपघात नेमका कोणाच्या चुकीमुळे झाला, याचा तपास रावेत पोलीस करत आहेत. सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींच्या जबाबावरून दोषींवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले आहे. या अपघातामुळे परिसरात काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती, मात्र पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करून रस्ता मोकळा केला आहे....2
- पिंपरी चिंचवड काळेवाडीत आंब्याचे आमिष दाखवून अडीच वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला अटक1
- महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती बारामतीत साजरी करण्यात आली भव्य असे मिरवणूक काढून बाबासाहेबांना मानवंदना देण्यात आल्या.1