पुर्णा-ताडकळस मार्गावर कार उलटली; चार तरुण गंभीर जखमी हटकरवाडी शिवारातील मध्यरात्रीची घटना पुर्णा (प्रतिनिधी):- पुर्णा-ताडकळस मार्गावर हटकरवाडी शिवारात भरधाव अज्ञात वाहनाने कट मारल्याने स्विफ्ट डिझायर कारचा भीषण अपघात होऊन चार तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी (दि. १८) रात्री सुमारे १०.३० वाजता घडली. याप्रकरणी पुर्णा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. या अपघातात श्रीनिवास केदार पाथरकर, अनिकेत अविनाश कदम, मो. गौस आणि कुणाल अनिल डिकोंडवार (सर्व रा. पुर्णा) हे गंभीर जखमी झाले. केदार मल्लिकार्जुन अप्पा पाथरकर हे आपल्या मुलगा श्रीनिवास व मित्रांसह (एमएच २९ बीसी ५८९४) क्रमांकाच्या स्विफ्ट डिझायर कारने ताडकळसहून पुर्णेकडे येत असताना समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात ट्रकने अचानक कट मारला. ट्रकवरील तीव्र एलईडी लाईटच्या झगमगाटामुळे चालकाला समोरील रस्ता स्पष्ट दिसेनासा झाला. गाडी नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करूनही कार रस्त्याच्या कडेला जाऊन उलटली. या अपघातात चालक वगळता इतर चार जणांच्या डोक्याला व शरीराला गंभीर दुखापती झाल्या. अपघाताचा आवाज ऐकून परिसरातील शेतकऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढून पुर्णा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. या अपघातात कारचे सुमारे ३ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक विलास गोबाडे, जमादार रमेश मुरमुरे व सुरेश चव्हाण यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून पुढील तपास जमादार रमेश मुरमुरे करीत आहेत.

- Post by Ramesh Mulgir1
- Skyline Builders & Developers “क्षितिज पुरम – जिथे तुमच्या स्वप्नांना मिळतो स्वतःचा पत्ता ” क्षितिज पुरम… जिथे आकाशातील स्वप्नं… जमिनीवर उतरतात!2
- Post by Anil Rathod1
- महात्मा बसेश्वर महाराजांची जयंती मंठा येथील उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी पारंपरिक पद्धतीने ढोल ताशाच्या गजरात महात्मा बसवेश्वर महाराजांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यासाठी.1
- लिलाव प्रक्रियेदरम्यान गोदामात तारण मालच नसल्याचे उघड झाले. तक्रारीनंतर गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध घेत आर्थिक गुन्हे शाखेने तांत्रिक विश्लेषणाद्वारे त्याला श्रीगोंदा (जि. अहिल्यानगर) येथून ताब्यात घेतले. न्यायालयाने आरोपीस 8 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.1
- Post by परळी वार्ता1
- पुष्कर घाटात भीषण अपघात ! १५० फूट खोल दरीत कोसळली ३१ प्रवाशांना घेऊन जाणारी बस कोसळली ! आज १9 एप्रिल रविवारी सदरील घटना घडली असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.1
- दरेगाव येथील वन विभागाच्या शिवारात असलेल्या जंगल परिसरात एका व्यक्तीचा खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. संबंधित व्यक्ती संशयास्पद अवस्थेत आढळून आल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही बाब स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास येताच त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू केली. दरम्यान, या घटनेमुळे तालुका पोलीस ठाण्यात नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, खुनामागील कारणांचा तपास तालुका पोलीस करत आहेत. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.1