डॉ. सतीश कोपूरवाड यांची सोलापूरला बदली; डॉ. संतोष सूर्यवंशी नांदेड जिल्हा आरोग्य अधिकारीपदी नियुक्त नांदेड : जिल्हा क्षयरोग अधिकारी म्हणून कार्यरत असलेले मा. डॉ. सतीश कोपूरवाड यांची जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद सोलापूर येथे नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच मा. डॉ. संतोष सूर्यवंशी यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद नांदेड येथे कार्यभार स्वीकारला आहे. या निमित्ताने नांदेड जिल्हा हिवताप कर्मचारी संघटनेच्या वतीने दोन्ही अधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले. संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा राज्य कोषाध्यक्ष सत्यजीत टिप्रेसवार, सरचिटणीस माणिक गित्ते, कार्याध्यक्ष व्यंकटेश पुलकंठवार, सहसरचिटणीस माधव कोल्हे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी माहूर तालुका आरोग्य अधिकारी मा. डॉ. राजेश्वर माचेवार, परमेश्वर मठदेवरु तसेच इतर अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दोन्ही अधिकाऱ्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. संघटनेच्या वतीने त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी यशस्वी वाटचालीच्या शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.
डॉ. सतीश कोपूरवाड यांची सोलापूरला बदली; डॉ. संतोष सूर्यवंशी नांदेड जिल्हा आरोग्य अधिकारीपदी नियुक्त नांदेड : जिल्हा क्षयरोग अधिकारी म्हणून कार्यरत असलेले मा. डॉ. सतीश कोपूरवाड यांची जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद सोलापूर येथे नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच मा. डॉ. संतोष सूर्यवंशी यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद नांदेड येथे कार्यभार स्वीकारला आहे. या निमित्ताने नांदेड जिल्हा हिवताप कर्मचारी संघटनेच्या वतीने दोन्ही अधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले. संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा राज्य कोषाध्यक्ष सत्यजीत टिप्रेसवार, सरचिटणीस माणिक गित्ते, कार्याध्यक्ष व्यंकटेश पुलकंठवार, सहसरचिटणीस माधव कोल्हे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी माहूर तालुका आरोग्य अधिकारी मा. डॉ. राजेश्वर माचेवार, परमेश्वर मठदेवरु तसेच इतर अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दोन्ही अधिकाऱ्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. संघटनेच्या वतीने त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी यशस्वी वाटचालीच्या शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.
- Post by M B B1
- Skyline Builders & Developers “क्षितिज पुरम – जिथे तुमच्या स्वप्नांना मिळतो स्वतःचा पत्ता ” क्षितिज पुरम… जिथे आकाशातील स्वप्नं… जमिनीवर उतरतात!2
- हिंगोली (प्रतिनिधी) : जिल्ह्यात वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर दुचाकीस्वारांसाठी हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळून अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी नागरिकांना आवाहन केले आहे. जिल्ह्यातील मुख्य रस्ते, शहर परिसर तसेच ग्रामीण भागातही वाहतूक पोलिसांकडून विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. हेल्मेट न वापरणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत असून, नागरिकांनी स्वतःच्या सुरक्षिततेसाठी हेल्मेटचा वापर करणे आवश्यक असल्याचे पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे. डॉ. नीलाभ रोहन यांनी सांगितले की, “रस्ते अपघातांमध्ये डोक्याला गंभीर दुखापत होण्याचे प्रमाण जास्त असते. हेल्मेट वापरल्यास जीवितहानी टाळता येऊ शकते. त्यामुळे प्रत्येक दुचाकीस्वाराने हेल्मेटचा वापर करणे ही केवळ कायदेशीर जबाबदारी नसून स्वतःच्या आणि कुटुंबाच्या सुरक्षेची हमी आहे.” यासोबतच, वेग मर्यादा पाळणे, सिग्नलचे पालन करणे, मोबाईलचा वापर टाळणे आणि मद्यप्राशन करून वाहन चालवू नये, असेही आवाहन करण्यात आले आहे. पोलीस प्रशासनाच्या या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये जनजागृती होऊन अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.1
- Post by Shaikh irfan Shaikh isa1
- माजी मंत्री आ. अमित देशमुख अवमान प्रकरणी उदगीरात निषेध.... उदगीर (प्रतिनिधी) लातूर येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळ्याजवळ आरक्षण वर्गीकरण संदर्भात आंदोलन झाले. आंदोलन करणे हा संविधानिक अधिकार आहे. पण सदरील आंदोलन भरकटले गेले असा आरोप मानवाधिकार संरक्षण समितीच्या वतीने राज्य समन्वयक नितीन एकुर्केकर यांच्या वतीने करण्यात आला. विषय आरक्षण वर्गीकरणाचा होता पण त्यात माजी मंत्री आ. अमित देशमुख यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये समाजाला प्रतिनिधित्व दिले नाही म्हणून त्यांच्या प्रतिमेला जोडे मारून विटंबना करण्यात आली , अर्वाच्य भाषा वापरण्यात आली. अपमानजनक भाषा वापरण्यात आली. पाय बांधण्यात येतील असेही यावेळी आंदोलनकर्ते म्हणाले. आरक्षण वर्गीकरण संदर्भात आंदोलन असताना दुसराच विषय मध्ये विनाकारण घुसवून लातूरचे माजी मंत्री आ. अमित देशमुख यांची बदनामी करण्यात आली. माजी मंत्री आ. यांचा कोणत्याही प्रकारचा संबंध नसताना वैयक्तिक आकासापोटी बदनामी करण्याच्या हेतूने सदरील प्रकार घडवून आणल्याची टीका यावेळी पॅंथर नेते गौतम दादा सोमवंशी यांनी केली . सदरील प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून माजी मंत्री आ. अमित देशमुख यांच्या बद्दल अपमान जनक वक्तव्य करणाऱ्या आंदोलकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात यावेत, याबाबतचे निवेदन उपजिल्हाधिकारी उदगीर व पोलीस निरीक्षक उदगीर शहर यांना देण्यात आले. सदरील असंविधानिक भाषा वापरणाऱ्यांनी तात्काळ दिलगिरी व्यक्त करावी. पोलीस प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी, अन्यथा जशास तसे उत्तर मिळेल आणि आंदोलन तीव्र करण्यात येईल असा इशारा यावेळी निवेदनाद्वारे देण्यात आला. यावेळी मानवाधिकार संरक्षण समितीचे राज्य समन्वयक नितीन एकुर्केकर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवक जिल्हाध्यक्ष सुशील कुमार शिंदे, भारतीय दलित पॅंथरचे युवक प्रदेशाध्यक्ष गौतम दादा सोमवंशी, राहुल चौधरी, राम काळे, श्रीआनंद उपाध्ये, आकाश दयानंद माने, कृष्णा मोगले,अक्षय सावंत इत्यादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.3
- लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यात धक्कादायक घटना व नात्याला काळीबा पासणारे घटना घडली आहे सख्या चुलतीनेच सात वर्षीय पुतण्याचा केला गळा आवळून त्याला खून घडलेल्या या धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर सुन्न झाला आहे. सकाळी दोन अल्पवयीन मुले बेपत्ता झाल्यानंतर सुरू झालेल्या शोधमोहीमेत 7 वर्षीय देवांश स्वामी याचा मृतदेह पडक्या घराजवळ आढळून आला. 👉 दुसरा मुलगा साईचरण स्वामी सुखरूप सापडला, ही एक दिलासादायक बाब. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, शेतजमिनीच्या वादातून हा प्रकार घडल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून, या प्रकरणी मृत बालकाची चुलती असलेल्या महिलेला ताब्यात घेण्यात आले आहे. तपासात बेपत्ता नाट्य रचल्याचाही आरोप समोर येत असून, या घटनेमुळे नात्यांवरच प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.1
- Post by Laxman Ugile1
- लातूर जिल्ह्यातील अहमदपूर ते आंबेजोगाई हायवे रोडवर चालत्या कारणे घेतला पेट. वाहन चालकासह कार जळून खाक. सूरु ॲप इन मराठी न्यूज लातूर. सोमवार दिनांक 20 एप्रिल 2026. लातूर जिल्ह्यात उन्हाचा पारा चढला असून सध्या 41 अंश ते 43 अंश पारा असून मोठ्या प्रमाणात उन्हाचा कडाका लागत आहे दुपारी बारा ते चार च्या दरम्यान बाहेर निघणे खूप कठीण झाले आहे. यातच लातूर जिल्ह्यातील अहमदपूर ते आंबेजोगाई हायवे रोडवर कार जात असताना या कारणे अचानक पेट घेतला वाहन चालकास छातीत दुखत असल्याने तो घराकडे जात होता अचानक पेट घेतल्याने वाहन चालकास बाहेर पडण्याचाही आगीने वेळ न दिल्याने वाहन चालकासह कारणे पेट घेत वाहन चालकाचा जागेवर मृत्यू झाला असून कार पूर्णपणे जळत असताना पाहायला दिसत आहे.1
- सहाय्यक निबंध दुधाटे यांचे तात्काळ निलंबन करा पत्रकार परिषदेत मागणी.1