logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

Jharkhand Latehar

1 hr ago
user_Anand Yadav
Anand Yadav
अमरावती, अमरावती, महाराष्ट्र•
1 hr ago
08b9084d-42e3-45b2-b8a8-5a46a01c8190

Jharkhand Latehar

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • Post by Amravati News Update
    1
    Post by Amravati News Update
    user_Amravati News Update
    Amravati News Update
    Amravati News अमरावती, अमरावती, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • Post by Labour addaa.
    1
    Post by Labour addaa.
    user_Labour addaa.
    Labour addaa.
    Plumber Amravati, Maharashtra•
    21 hrs ago
  • धामणगाव रेल्वे येथे महावीर जयंती मोठ्या उत्साहात साजरी धामणगांव रेल्वे : जैन धर्मियांचे २४ वे तीर्थंकर भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त धामणगांव रेल्वे शहरात महावीर जयंती उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. सकाळपासूनच जैन मंदिर परिसरात पूजा-अर्चा, अभिषेक, धार्मिक विधी तसेच प्रवचनांचे आयोजन करण्यात आले होते. भगवान महावीर यांच्या प्रतिमेची आकर्षक फुलांनी सजावट करण्यात आली होती. यानंतर शहरातून भव्य शोभायात्रा व मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत जैन समाजातील महिला, पुरुष, युवक-युवती तसेच बालकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला. धार्मिक घोषणाबाजी, भजन, ढोल-ताशांच्या गजरात संपूर्ण शहर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेले होते. मिरवणूक शहरातील मुख्य मार्गाने काढण्यात येत महावीर भवनपर्यंत पोहोचली. भगवान महावीर यांनी दिलेल्या अहिंसा, सत्य, करुणा व मानवतेच्या संदेशाचे आचरण जीवनात करण्याचे आवाहन यावेळी मान्यवरांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी महाप्रसाद वितरण तसेच विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. महावीर जयंतीनिमित्त संपूर्ण धामणगांव रेल्वे शहरात आनंद, उत्साह आणि धार्मिक एकतेचे वातावरण पाहायला मिळाले. सिटी न्यूज साठी प्रतिनिधी संतोष वाघमारे धामणगांव रेल्वे
    1
    धामणगाव रेल्वे येथे महावीर जयंती मोठ्या उत्साहात साजरी
धामणगांव रेल्वे : जैन धर्मियांचे २४ वे तीर्थंकर भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त धामणगांव रेल्वे शहरात महावीर जयंती उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. सकाळपासूनच जैन मंदिर परिसरात पूजा-अर्चा, अभिषेक, धार्मिक विधी तसेच प्रवचनांचे आयोजन करण्यात आले होते.
भगवान महावीर यांच्या प्रतिमेची आकर्षक फुलांनी सजावट करण्यात आली होती. यानंतर शहरातून भव्य शोभायात्रा व मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत जैन समाजातील महिला, पुरुष, युवक-युवती तसेच बालकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला. धार्मिक घोषणाबाजी, भजन, ढोल-ताशांच्या गजरात संपूर्ण शहर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेले होते.
मिरवणूक शहरातील मुख्य मार्गाने काढण्यात येत महावीर भवनपर्यंत पोहोचली. भगवान महावीर यांनी दिलेल्या अहिंसा, सत्य, करुणा व मानवतेच्या संदेशाचे आचरण जीवनात करण्याचे आवाहन यावेळी मान्यवरांनी केले.
कार्यक्रमाच्या शेवटी महाप्रसाद वितरण तसेच विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. महावीर जयंतीनिमित्त संपूर्ण धामणगांव रेल्वे शहरात आनंद, उत्साह आणि धार्मिक एकतेचे वातावरण पाहायला मिळाले.
सिटी न्यूज साठी प्रतिनिधी संतोष वाघमारे धामणगांव रेल्वे
    user_Santosh Waghmare
    Santosh Waghmare
    T. V. News Reporter Dhamangaon Railway, Amravati•
    3 hrs ago
  • दारव्हा तालुक्यातील नायगाव येथे दिनांक ३० मार्च  रोजी सायंकाळच्या सुमारास आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. अचानक आलेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे काढणीच्या अवस्थेत असलेला गहू, ज्वारी आणि तीळ या प्रमुख पिकांना मोठा फटका बसला आहे. अनेक शेतकऱ्यांची पिके अक्षरशः आडवी पडून जमिनीदोस्त झाली असून उत्पादनात मोठी घट होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. सध्या रब्बी हंगामातील पिके कापणीसाठी तयार होती. मात्र, वादळी वाऱ्यामुळे पिके पडल्याने कापणी करणे कठीण झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या हातात येणारा उत्पन्नाचा मुख्य आधारच डळमळीत झाला आहे. अनेक ठिकाणी पिके पाण्यात भिजल्याने त्यांची गुणवत्ता खालावण्याची शक्यता असून बाजारभावावरही त्याचा परिणाम होणार आहे.  दरम्यान, नायगाव व परिसरातील शेतकऱ्यांनी शासनाकडे मदतीची मागणी केली आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत व नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. तसेच पीकविमा योजनेंतर्गतही मदत मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
    1
    दारव्हा तालुक्यातील नायगाव येथे दिनांक ३० मार्च  रोजी सायंकाळच्या सुमारास आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. अचानक आलेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे काढणीच्या अवस्थेत असलेला गहू, ज्वारी आणि तीळ या प्रमुख पिकांना मोठा फटका बसला आहे. अनेक शेतकऱ्यांची पिके अक्षरशः आडवी पडून जमिनीदोस्त झाली असून उत्पादनात मोठी घट होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
सध्या रब्बी हंगामातील पिके कापणीसाठी तयार होती. मात्र, वादळी वाऱ्यामुळे पिके पडल्याने कापणी करणे कठीण झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या हातात येणारा उत्पन्नाचा मुख्य आधारच डळमळीत झाला आहे. अनेक ठिकाणी पिके पाण्यात भिजल्याने त्यांची गुणवत्ता खालावण्याची शक्यता असून बाजारभावावरही त्याचा परिणाम होणार आहे. 
दरम्यान, नायगाव व परिसरातील शेतकऱ्यांनी शासनाकडे मदतीची मागणी केली आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत व नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. तसेच पीकविमा योजनेंतर्गतही मदत मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
    user_GAJAANNAN THHAKKARE
    GAJAANNAN THHAKKARE
    दारव्हा, यवतमाळ, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • इसापूर येथील श्याम गायकवाड याने सकाळपासून शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक टॉवरवर चढून विविध मागण्यांसंदर्भात आंदोलन केले. त्यामुळे प्रशासनात खळबळ उडाली होती. इसापूर ग्रामपंचायत अंतर्गत नमुना ८ चोरी गेल्याची तक्रार सचिव, सरपंच, उपसरपंच यांनी पोलिस स्टेशनला दिली. त्या तक्रारीवरून काय कार्यवाही झाली, याचा खुलासा द्यावा. इसापूर येथील गावाचा नकाशा नसल्याने कोणते कोणाचे घर आहे. हे सिद्ध होत नाही. काही लोकांना नोटरीनुसार त्यांची नावे नमुना ८ मध्ये नोंद घेण्याचा नियम आहे. आपल्या घराचा नोटरीकृत असलेल्या दस्तानुसार घर नावाने करून द्यावे, एकाच मालमत्तेवर दोन वा तीन व्यक्तीची मालकी कशी याचाही खुलासा देऊन दोषींवर कारवाई करावी, अशा विविध मागण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. गटविकास अधिकाऱ्यांनी प्रशासक, ग्रामपंचायत अधिकारी यांना सदर आंदोलकाच्या मागण्यासंदर्भात कार्यवाही करण्यात याती व आंदोलकाला आंदोलनापासून परावृत्त करण्याबाबत पत्र दिले.
    1
    इसापूर येथील श्याम गायकवाड याने सकाळपासून शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक टॉवरवर चढून विविध मागण्यांसंदर्भात आंदोलन केले. त्यामुळे प्रशासनात खळबळ उडाली होती. इसापूर ग्रामपंचायत अंतर्गत नमुना ८ चोरी गेल्याची तक्रार सचिव, सरपंच, उपसरपंच यांनी पोलिस स्टेशनला दिली. त्या तक्रारीवरून काय कार्यवाही झाली, याचा खुलासा द्यावा. इसापूर येथील गावाचा नकाशा नसल्याने कोणते कोणाचे घर आहे. हे सिद्ध होत नाही. काही लोकांना नोटरीनुसार त्यांची नावे नमुना ८ मध्ये नोंद घेण्याचा नियम आहे. आपल्या घराचा नोटरीकृत असलेल्या दस्तानुसार घर नावाने करून द्यावे, एकाच मालमत्तेवर दोन वा तीन व्यक्तीची मालकी कशी याचाही खुलासा देऊन दोषींवर कारवाई करावी, अशा विविध मागण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. गटविकास अधिकाऱ्यांनी प्रशासक, ग्रामपंचायत अधिकारी यांना सदर आंदोलकाच्या मागण्यासंदर्भात कार्यवाही करण्यात याती व आंदोलकाला आंदोलनापासून परावृत्त करण्याबाबत पत्र दिले.
    user_Sajid Patlewale
    Sajid Patlewale
    दिग्रस, यवतमाळ, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • अपघातांची मालिका सुरूच असून,* *अपघातांचा अक्षरशः कहर पाहायला मिळत आहे…*
    1
    अपघातांची मालिका सुरूच असून,* *अपघातांचा अक्षरशः कहर पाहायला मिळत आहे…*
    user_SURYA MARATHI NEWS
    SURYA MARATHI NEWS
    Chief Editor संग्रामपूर, बुलढाणा, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • किरकोळ वादाचे हिंसक रूप! लोखंडी रॉडने तरुणावर जीवघेणा हल्ला — तिघांविरुद्ध गुन्हा दाखल शेगाव : शहरातील जयअंबे नगर परिसरात किरकोळ वादातून संताप अनावर झाल्याने एका तरुणावर लोखंडी रॉडने निर्घृण हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शेगाव शहर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला असून परिसरात खळबळ उडाली आहे. पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अण्णाभाऊ नारायण म्हस्के (वय ३१) हे २३ मार्च रोजी दुपारी शेतातून घरी परतत असताना आरोपी प्रकाश मेटकर याने विनाकारण शिवीगाळ करत वाद उकरून काढला. क्षुल्लक कारणावरून सुरू झालेला वाद काही क्षणातच हिंसक बनला. संतापलेल्या आरोपीने जवळ पडलेला लोखंडी रॉड उचलून म्हस्के यांच्या हातावर व डोक्यावर सपासप वार केले. या अचानक झालेल्या हल्ल्यात म्हस्के गंभीर जखमी झाले. इतक्यावरच न थांबता आरोपीची आई व बहीण सोनाली यांनीही घटनास्थळी धाव घेत फिर्यादीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. “त्याला मारून टाका” अशी आरोळी देत हल्ल्यास उत्तेजन दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी धाडस दाखवत मध्यस्थी केली व जखमीला आरोपींच्या तावडीतून सोडवून तातडीने सरकारी रुग्णालयात दाखल केले. अन्यथा मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या घटनेप्रकरणी २७ मार्च रोजी शेगाव शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीसांकडून सुरू आहे. किरकोळ वादातून वाढती हिंसा पुन्हा समोर; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
    1
    किरकोळ वादाचे हिंसक रूप! लोखंडी रॉडने तरुणावर जीवघेणा हल्ला — तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
शेगाव : शहरातील जयअंबे नगर परिसरात किरकोळ वादातून संताप अनावर झाल्याने एका तरुणावर लोखंडी रॉडने निर्घृण हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शेगाव शहर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला असून परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अण्णाभाऊ नारायण म्हस्के (वय ३१) हे २३ मार्च रोजी दुपारी शेतातून घरी परतत असताना आरोपी प्रकाश मेटकर याने विनाकारण शिवीगाळ करत वाद उकरून काढला. क्षुल्लक कारणावरून सुरू झालेला वाद काही क्षणातच हिंसक बनला.
संतापलेल्या आरोपीने जवळ पडलेला लोखंडी रॉड उचलून म्हस्के यांच्या हातावर व डोक्यावर सपासप वार केले. या अचानक झालेल्या हल्ल्यात म्हस्के गंभीर जखमी झाले.
इतक्यावरच न थांबता आरोपीची आई व बहीण सोनाली यांनीही घटनास्थळी धाव घेत फिर्यादीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. “त्याला मारून टाका” अशी आरोळी देत हल्ल्यास उत्तेजन दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी धाडस दाखवत मध्यस्थी केली व जखमीला आरोपींच्या तावडीतून सोडवून तातडीने सरकारी रुग्णालयात दाखल केले. अन्यथा मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या घटनेप्रकरणी २७ मार्च रोजी शेगाव शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीसांकडून सुरू आहे.
किरकोळ वादातून वाढती हिंसा पुन्हा समोर; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
    user_Sachin kadukar
    Sachin kadukar
    Photographer Shegaon, Buldhana•
    13 hrs ago
  • Post by Amravati News Update
    1
    Post by Amravati News Update
    user_Amravati News Update
    Amravati News Update
    Amravati News अमरावती, अमरावती, महाराष्ट्र•
    17 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.