logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

प्रियंका बोलत नाहीये, तिने मान टाकली...; फोन करून रचला बनाव, पण एका चुकीने अडकला चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गापूर शहरात दुपारी घडलेल्या हत्येच्या घटनेनंतर रात्री आणखी एक धक्कादायक खून प्रकरण उघडकीस आले आहे. सात वर्षांनी मोठ्या असलेल्या आपल्या प्रेयसीचा मोबाइल चार्जरच्या वायरने गळा आवळून खून करून त्याला आत्महत्येचे स्वरूप देण्याचा प्रयत्न आरोपी प्रियकराने केला. मात्र वैद्यकीय अहवालामुळे हा बनाव उघडकीस आला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या घटनेनंतर मोठी खळबळ उडाली आहे. अंकेश योगेश बहीरवार (वय 22 रा. सोनापूर, ता. सावली) असे आरोपीचे नाव असून प्रियंका वांढरे (वय 29, रा. तुकूम) असे मृत तरुणीचे नाव आहे. प्रियंका पतीपासून विभक्त राहत होती. याच काळात तिची ओळख अंकेशशी झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले आणि दोघेही प्रियंकाच्या घरी वरच्या मजल्यावर लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून क्षुल्लक कारणांवरून त्यांच्यात वाद सुरू होते. 14 मार्च 2026 च्या रात्री अंकेशने प्रियंकाच्या वडिलांना फोन करून “प्रियंका बोलत नाहीये, तिने मान टाकली आहे” असे सांगून घाबरवण्याचा प्रयत्न केला. कुटुंबीयांनी वर जाऊन पाहिले असता प्रियंका बेशुद्ध अवस्थेत आढळली. तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.... सुरुवातीला हा प्रकार आत्महत्येचा असल्याचा संशय होता. मात्र गुरुवारी प्राप्त झालेल्या शवविच्छेदन अहवालात प्रियंकाचा मृत्यू गळा आवळल्याने झाल्याचे स्पष्ट झाले. यानंतर पोलिसांनी अंकेशला ताब्यात घेतले. चौकशीत, प्रियंका आपल्यावर नियंत्रण ठेवते, घरच्यांशी बोलू देत नाही अशा किरकोळ कारणांवरून वाद होत असल्याचे आरोपीने सांगितले. याच कारणातून त्याने टोकाचे पाऊल उचलल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून गुन्ह्यात वापरलेला मोबाइल चार्जर आणि एक्सटेन्शन बोर्ड जप्त केला आहे. आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 103(1) अंतर्गत दुर्गापूर पोलिस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.....

18 hrs ago
user_Santosh Bahekar PRESS
Santosh Bahekar PRESS
Advertising Photographer बुलढाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
18 hrs ago
294d62e9-8041-4dd3-81d5-a008a73811f5

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • एकाचवेळी ९ जनावर अंत्यसंस्कार भयानक दृश्य मृतदेह कोणता कुणाचा??? नाशिकची घटना मन हेलावून टाकणारी आहे.. दिंडोरी शहरात स्नेहसंमेलनासाठी आलेल्या दरगोडे कुटुंबातील 9 सदस्य असलेली कार कडे नसलेल्या विहिरीत कोसळली.. सर्वच्या सर्व सदस्यांचा या अपघातात बळी गेला. त्या विहिरीला मजबूत कडे नसल्याने ती विहिर चालकाच्या लक्षातच आलेली नव्हती.. वळण घेऊन मुख्य रस्त्याला लागण्याच्या वेळी ऐन वळणावर असलेल्या या विहिरीने 9 जणांचा अकस्मात बळी घेतला. अंत्यविधी वेळी कोणता मृतदेह कुणाचा? हे देखील गावकऱ्यांना कळत नव्हते.मानवी इतिहासात ह्या घटना मनाला हादरवून जाणाऱ्या आहेत.
    1
    एकाचवेळी ९ जनावर अंत्यसंस्कार भयानक दृश्य 
मृतदेह कोणता कुणाचा??? नाशिकची घटना मन हेलावून टाकणारी आहे.. दिंडोरी शहरात स्नेहसंमेलनासाठी आलेल्या दरगोडे कुटुंबातील 9 सदस्य असलेली कार कडे नसलेल्या विहिरीत कोसळली.. सर्वच्या सर्व सदस्यांचा या अपघातात बळी गेला.
त्या विहिरीला मजबूत कडे नसल्याने ती विहिर चालकाच्या लक्षातच आलेली नव्हती.. वळण घेऊन मुख्य रस्त्याला लागण्याच्या वेळी ऐन वळणावर असलेल्या या विहिरीने 9 जणांचा अकस्मात बळी घेतला. अंत्यविधी वेळी कोणता मृतदेह कुणाचा? हे देखील गावकऱ्यांना कळत नव्हते.मानवी इतिहासात ह्या घटना मनाला हादरवून जाणाऱ्या आहेत.
    user_पत्रकार ओमप्रकाश उढाण
    पत्रकार ओमप्रकाश उढाण
    घनसावंगी, जालना, महाराष्ट्र•
    54 min ago
  • अल्पवयीन मुलीला बलात्कार करून गरोदर करणाऱ्या आरोपीला अजिंठा पोलीस यांनी अटक केल्याची माहिती आज रोजी माध्यमांना देण्यात आली असून मोहोळ येथील एका तरुणीला आरोपीने बळजबरीने बलात्कार करून तिला गरोदर करून पाहून गेला होता सदरील आरोपीला आज रोजी अजिंठा पोलिसांनी अटक केली आहे अशी माहिती आज रोजी माध्यमांना देण्यात आली आहे.
    1
    अल्पवयीन मुलीला बलात्कार करून गरोदर करणाऱ्या आरोपीला अजिंठा पोलीस यांनी अटक केल्याची माहिती आज रोजी माध्यमांना देण्यात आली असून मोहोळ येथील एका तरुणीला आरोपीने बळजबरीने बलात्कार करून तिला गरोदर करून पाहून गेला होता सदरील आरोपीला आज रोजी अजिंठा पोलिसांनी अटक केली आहे अशी माहिती आज रोजी माध्यमांना देण्यात आली आहे.
    user_Rupesh Thakur
    Rupesh Thakur
    औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • काटेपूर्णा जलाशयात अत्यल्प जलसाठा; पाणीटंचाईची भीती वाढली वाशिम जिल्ह्यातील जऊळका रेल्वे गावानजीक असलेल्या काटेपूर्णा जलाशय प्रकल्पामध्ये सध्या अत्यल्प जलसाठा उपलब्ध असून केवळ सुमारे ७ टक्के मूर्त साठा शिल्लक आहे. उन्हाळ्याची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे येत्या काळात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या जलाशयातून मालेगाव शहरासह जऊळका रेल्वे, जामखेड, वडी वरदरी बुद्रुक या गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. मात्र सध्याच्या परिस्थितीत जलाशयातून अतिरिक्त पाणी उपसा होत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. उन्हाळ्याचा कालावधी लक्षात घेता उपलब्ध पाणीसाठा फक्त पिण्यासाठी व जनावरांच्या गरजांसाठी राखून ठेवावा, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे. प्रशासनाने तातडीने याकडे लक्ष देऊन योग्य नियोजन करावे, अन्यथा येत्या काही महिन्यांत गंभीर पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
    1
    काटेपूर्णा जलाशयात अत्यल्प जलसाठा; पाणीटंचाईची भीती वाढली
वाशिम जिल्ह्यातील जऊळका रेल्वे गावानजीक असलेल्या काटेपूर्णा जलाशय प्रकल्पामध्ये सध्या अत्यल्प जलसाठा उपलब्ध असून केवळ सुमारे ७ टक्के मूर्त साठा शिल्लक आहे. उन्हाळ्याची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे येत्या काळात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या जलाशयातून मालेगाव शहरासह जऊळका रेल्वे, जामखेड, वडी वरदरी बुद्रुक या गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. मात्र सध्याच्या परिस्थितीत जलाशयातून अतिरिक्त पाणी उपसा होत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.
उन्हाळ्याचा कालावधी लक्षात घेता उपलब्ध पाणीसाठा फक्त पिण्यासाठी व जनावरांच्या गरजांसाठी राखून ठेवावा, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे. प्रशासनाने तातडीने याकडे लक्ष देऊन योग्य नियोजन करावे, अन्यथा येत्या काही महिन्यांत गंभीर पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
    user_सारनाथ अवचार
    सारनाथ अवचार
    पत्रकार मालेगाव, वाशिम, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • महापौर सय्यद इकबाल ॲक्शन मोडवर; शंकरनगर डीपी प्रश्न तासाभरात निकाली नागरिकांनी मानले आभार
    1
    महापौर सय्यद इकबाल ॲक्शन मोडवर; शंकरनगर डीपी प्रश्न तासाभरात निकाली नागरिकांनी मानले आभार
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    18 hrs ago
  • धुळे जिल्ह्यात पाकिस्तान निर्मित सौंदर्यप्रसाधनांची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या दोन व्यापाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत एकूण 61 हजार 474 रुपयांचा प्रतिबंधित मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
    1
    धुळे जिल्ह्यात पाकिस्तान निर्मित सौंदर्यप्रसाधनांची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या दोन व्यापाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत एकूण 61 हजार 474 रुपयांचा प्रतिबंधित मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
    user_Dhule News 24
    Dhule News 24
    Newspaper publisher धुळे, धुळे, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • Post by स्मिता तलेय
    1
    Post by स्मिता तलेय
    user_स्मिता तलेय
    स्मिता तलेय
    अमरावती, अमरावती, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • शहरात कुंटणखाना चालू होणाऱ्या तीन आरोपींना वाळूज एमआयडीसी परिसरातील कामगार चौकातील एका लॉज परिसरातून गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली असून याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात तीन आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती आज रोजी माध्यमांना सदरील माहिती देण्यात आली आहे.
    1
    शहरात कुंटणखाना चालू होणाऱ्या तीन आरोपींना वाळूज एमआयडीसी परिसरातील कामगार चौकातील एका लॉज परिसरातून गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली असून याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात तीन आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती आज रोजी माध्यमांना सदरील माहिती देण्यात आली आहे.
    user_Rupesh Thakur
    Rupesh Thakur
    औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • परभणी महापालिका जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी विश्वनाथ गोबाडे यांची निवड
    1
    परभणी महापालिका जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी विश्वनाथ गोबाडे यांची निवड
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    18 hrs ago
  • साक्री तालुक्यातील तामसवाडी परिसरात वऱ्हाडींना घेऊन जाणाऱ्या क्रुझर वाहनाचा भीषण अपघात झाला असून या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला तर 12 हून अधिक जण जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
    1
    साक्री तालुक्यातील तामसवाडी परिसरात वऱ्हाडींना घेऊन जाणाऱ्या क्रुझर वाहनाचा भीषण अपघात झाला असून या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला तर 12 हून अधिक जण जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
    user_Dhule News 24
    Dhule News 24
    Newspaper publisher धुळे, धुळे, महाराष्ट्र•
    20 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.