logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

“शेतकरीविरोधी अर्थसंकल्पाचा निषेध; परभणीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेची अर्थसंकल्पाची होळी” परभणी प्रतिनिधी: राज्य सरकारने सादर केलेला यंदाचा अर्थसंकल्प शेतकरीहिताचा नसून तो शेतकऱ्यांसाठी घातक असल्याचा आरोप करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने परभणीत तीव्र आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पाची प्रतीकात्मक होळी करून शासनाच्या धोरणांविरोधात निषेध व्यक्त करण्यात आला. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातील उपोषण मैदानावर संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकत्र आले होते. विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन देण्यात आले होते; मात्र प्रत्यक्षात अर्थसंकल्पात केवळ दोन लाख रुपयांपर्यंतच कर्जमाफी जाहीर करण्यात आली असून त्यासाठीही पात्र-अपात्रतेच्या अटी लावण्यात आल्या आहेत, असा आरोप संघटनेने केला. याशिवाय नियमितपणे कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना केवळ ५० हजार रुपयांची मदत देण्याची तरतूद करण्यात आली आहे. ही मदत अत्यल्प असून त्यामुळे शेतकऱ्यांना कोणताही दिलासा मिळणार नाही, असेही आंदोलनकर्त्यांनी सांगितले. त्यामुळे हा अर्थसंकल्प शेतकरीहिताचा नसून शेतकऱ्यांना मारक असल्याचा आरोप करण्यात आला. केंद्र सरकारने जाहीर केलेला किमान आधारभूत भाव (हमीभाव) मराठवाड्यातील शेतकऱ्यांना प्रत्यक्षात मिळत नसल्याची खंतही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. अनेकदा हमीभावापेक्षा एक ते दीड हजार रुपयांनी कमी दरात शेतमाल विकावा लागतो, त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याचे त्यांनी सांगितले. या सर्व मुद्द्यांच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत अर्थसंकल्पाची होळी केली आणि शासनाने शेतकरीहिताच्या ठोस निर्णयांची अंमलबजावणी करावी, अशी मागणी केली.

3 hrs ago
user_Kapil Ashokrao Shinde
Kapil Ashokrao Shinde
मानवत, परभणी, महाराष्ट्र•
3 hrs ago
0ba199a6-7cd6-42f4-aa56-88945dde8224

“शेतकरीविरोधी अर्थसंकल्पाचा निषेध; परभणीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेची अर्थसंकल्पाची होळी” परभणी प्रतिनिधी: राज्य सरकारने सादर केलेला यंदाचा अर्थसंकल्प शेतकरीहिताचा नसून तो शेतकऱ्यांसाठी घातक असल्याचा आरोप करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने परभणीत तीव्र आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पाची प्रतीकात्मक होळी करून शासनाच्या धोरणांविरोधात निषेध व्यक्त करण्यात आला. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातील उपोषण मैदानावर संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकत्र आले होते. विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन देण्यात आले होते; मात्र प्रत्यक्षात अर्थसंकल्पात केवळ दोन लाख रुपयांपर्यंतच कर्जमाफी जाहीर करण्यात आली असून त्यासाठीही पात्र-अपात्रतेच्या अटी लावण्यात आल्या आहेत, असा आरोप संघटनेने केला. याशिवाय नियमितपणे कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना केवळ ५० हजार रुपयांची मदत देण्याची तरतूद करण्यात आली आहे. ही मदत अत्यल्प असून त्यामुळे शेतकऱ्यांना कोणताही दिलासा मिळणार नाही, असेही आंदोलनकर्त्यांनी सांगितले. त्यामुळे हा अर्थसंकल्प शेतकरीहिताचा नसून शेतकऱ्यांना मारक असल्याचा आरोप करण्यात आला. केंद्र सरकारने जाहीर केलेला किमान आधारभूत भाव (हमीभाव) मराठवाड्यातील शेतकऱ्यांना प्रत्यक्षात मिळत नसल्याची खंतही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. अनेकदा हमीभावापेक्षा एक ते दीड हजार रुपयांनी कमी दरात शेतमाल विकावा लागतो, त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याचे त्यांनी सांगितले. या सर्व मुद्द्यांच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत अर्थसंकल्पाची होळी केली आणि शासनाने शेतकरीहिताच्या ठोस निर्णयांची अंमलबजावणी करावी, अशी मागणी केली.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • विलास बारहाते मानवत : येथील पीएमश्री जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेचे विद्यार्थी, शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व काही पालकांच्या सहभागातून ८ मार्च २०२६ रोजी सकाळी सहा वाजता ११ एसटी बसने निघाले जवळपास ५०० विद्यार्थी सहावी ते आठवी पर्यंतचे विद्यार्थी या सहली मध्ये होते. प्रथम लोणार येथील जगप्रसिद्ध उल्काजन्य लोणार सरोवर पाहिले. हे पर्यटकांसह  अभ्यासकांसाठी एक उत्तम सहलीचे ठिकाण आहे. ५० हजार वर्षांपूर्वीच्या या खऱ्या पाण्याच्या विवराच्या सभोवताली ऐतिहासिक मंदिरे व अद्वितीय जैवविविधता पर्यटकांना भुरळ घालतेय. येथील १२ व्या शतकातील प्राचीन मंदिरे, जसे की कमळजा माता मंदिर, स्थापत्यकलेचा उत्तम नमुना पाहवयास मिळतोय. लोणार सरोवर हे जगातील एकमेव बेसॉल्ट खडकातील आघाती सरोवर आहे. जे भूगर्भ शास्त्रज्ञांसाठी संशोधनाचा विषय आहे. या तलावाच्या आजूबाजूला घनदाट जंगल आणि अनेक पक्षी पाहायला मिळतात. नंतर खामगाव येथील नामांकित कंपनीचा बिस्किट कारखाना पाहिला. कश्या प्रकारे बिस्किटे निर्माण करतात हे पाहिल्यानंतर सर्वांना बिस्किट पुडे देण्यात आले. हा प्रकल्प स्थानिक रोजगार निर्मितीत मोलाची भूमिका बजावतो असं कामगारासोबत चर्चा केल्यानंतर समजलंय. त्यानंतर ही सहल शेगाव येथील श्री गजानन महाराज मंदिर या ठिकाणी गेली. हे एक पवित्र तीर्थक्षेत्र आणि विदर्भाचे पंढरपूर म्हणून ओळखले जाते. १९ व्या शतकात प्रकट झालेल्या महाराजांचे हे समाधी स्थळ असून, येथील संस्थानाचा कारभार अत्यंत शिस्तबद्ध, स्वच्छ आणि भक्तांसाठी सेवाभावी आहे. हे मंदिर भक्तांच्या श्रद्धेचे प्रमुख केंद्र असून, येथे दररोज मोठ्या प्रमाणावर मोफत महाप्रसाद वाटप केला जातोय. मंदिर परिसराच्या मध्यभागी श्री गजानन महाराजांचे अत्यंत आकर्षक संगमरवरी समाधी मंदिर आहे. श्री गजानन महाराज संस्थान हे भारतातील सर्वात मोठे आणि शिस्तप्रिय ट्रस्टपैकी एक आहे. जे सामाजिक व आध्यात्मिक कार्य करते. दर्शन व प्रसाद घेतल्या नंतर सहल मानवत च्या दिशेने वाटचाल करत शाळेत रात्री उशिरा दिड च्या सुमारास सुखद सहलीचा अनुभव घेत पोहोचली.
    1
    विलास बारहाते
मानवत : येथील पीएमश्री जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेचे विद्यार्थी, शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व काही पालकांच्या सहभागातून ८ मार्च २०२६ रोजी सकाळी सहा वाजता ११ एसटी बसने निघाले  जवळपास ५०० विद्यार्थी सहावी ते आठवी पर्यंतचे विद्यार्थी या सहली मध्ये होते. प्रथम लोणार येथील जगप्रसिद्ध उल्काजन्य लोणार सरोवर पाहिले. हे पर्यटकांसह  अभ्यासकांसाठी एक उत्तम सहलीचे ठिकाण आहे. ५० हजार वर्षांपूर्वीच्या या खऱ्या पाण्याच्या विवराच्या सभोवताली ऐतिहासिक मंदिरे व अद्वितीय जैवविविधता पर्यटकांना भुरळ घालतेय. येथील १२ व्या शतकातील प्राचीन मंदिरे, जसे की कमळजा माता मंदिर, स्थापत्यकलेचा उत्तम नमुना पाहवयास मिळतोय. लोणार सरोवर हे जगातील एकमेव बेसॉल्ट खडकातील आघाती सरोवर आहे. जे भूगर्भ शास्त्रज्ञांसाठी संशोधनाचा विषय आहे. या तलावाच्या आजूबाजूला घनदाट जंगल आणि अनेक पक्षी पाहायला मिळतात. नंतर खामगाव येथील नामांकित कंपनीचा बिस्किट कारखाना
पाहिला. कश्या प्रकारे बिस्किटे निर्माण करतात हे पाहिल्यानंतर सर्वांना बिस्किट पुडे देण्यात आले. हा प्रकल्प स्थानिक रोजगार निर्मितीत मोलाची भूमिका बजावतो असं कामगारासोबत चर्चा केल्यानंतर समजलंय. त्यानंतर ही सहल
शेगाव येथील श्री गजानन महाराज मंदिर या ठिकाणी गेली. हे एक पवित्र तीर्थक्षेत्र आणि विदर्भाचे पंढरपूर म्हणून ओळखले जाते. १९ व्या शतकात प्रकट झालेल्या महाराजांचे हे समाधी स्थळ असून, येथील संस्थानाचा कारभार अत्यंत शिस्तबद्ध, स्वच्छ आणि भक्तांसाठी सेवाभावी आहे. हे मंदिर भक्तांच्या श्रद्धेचे प्रमुख केंद्र असून, येथे दररोज मोठ्या प्रमाणावर मोफत महाप्रसाद वाटप केला जातोय. मंदिर परिसराच्या मध्यभागी श्री गजानन महाराजांचे अत्यंत आकर्षक संगमरवरी समाधी मंदिर आहे. श्री गजानन महाराज संस्थान हे भारतातील सर्वात मोठे आणि शिस्तप्रिय ट्रस्टपैकी एक आहे. जे सामाजिक व आध्यात्मिक कार्य करते. दर्शन व प्रसाद घेतल्या नंतर सहल मानवत च्या दिशेने वाटचाल करत शाळेत रात्री उशिरा दिड च्या सुमारास सुखद सहलीचा अनुभव घेत पोहोचली.
    user_विलास बारहाते
    विलास बारहाते
    मानवत, परभणी, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • *धार रोड कचरा डेपोच्या जागेवर कचरा टाकने बंद करा धार रोड परिसरातील नागरिकांचे मनपा आयुक्तांना निवेदन*
    1
    *धार रोड कचरा डेपोच्या जागेवर कचरा टाकने बंद करा धार रोड परिसरातील नागरिकांचे मनपा आयुक्तांना निवेदन*
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    14 hrs ago
  • तालुक्यातील मौजे बेलोरा येथे महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या फळबाग, पोखरा योजना तसेच सामाजिक वनीकरण योजनेत गंभीर आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. यासंदर्भात जालना जिल्हाधिकाऱ्यांकडे कायदेशीर अर्ज सादर करून चौकशीची मागणी करण्यात आली आहे. तक्रारीनुसार, गावातील ग्रामरोजगार सहाय्यक व कृषी सहाय्यक यांनी संगनमत करून शेतकऱ्यांच्या नावावर परस्पर फळबाग, पोखरा योजना व सामाजिक वनीकरण योजनेअंतर्गत झाडे प्रत्यक्षात न लावता अनुदान काढल्याचा आरोप करण्यात आला आहे. शासनाची योजना शेतकऱ्यांच्या हितासाठी असताना संबंधित अधिकाऱ्यांनी बनावट कागदपत्रे, खोटी हजेरी व काल्पनिक अहवाल तयार करून शासनाच्या निधीचा अपहार केल्याचा गंभीर आरोप तक्रारीत नमूद करण्यात आला आहे. या प्रकारामुळे शासनाची फसवणूक होण्यासोबतच शेतकऱ्यांचाही विश्वासघात झाल्याचे तक्रारदारांनी म्हटले आहे. शासनाच्या निधीचा अपहार करणे हा भारतीय दंड संहिता व भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार दंडनीय गुन्हा असल्याने संबंधित दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करून शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी अर्जात करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणी तात्काळ चौकशी समिती नेमून सर्व कागदपत्रे व नोंदींची पडताळणी करून दोषींवर कठोर कारवाई करावी आणि पीडित शेतकऱ्यांना त्यांचे हक्काचे अनुदान तातडीने उपलब्ध करून द्यावे, अशी मागणीही करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणाची दखल घेण्यात टाळाटाळ झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
    1
    तालुक्यातील मौजे बेलोरा येथे महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या फळबाग, पोखरा योजना तसेच सामाजिक वनीकरण योजनेत गंभीर आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. यासंदर्भात जालना जिल्हाधिकाऱ्यांकडे कायदेशीर अर्ज सादर करून चौकशीची मागणी करण्यात आली आहे.
तक्रारीनुसार, गावातील ग्रामरोजगार सहाय्यक व कृषी सहाय्यक यांनी संगनमत करून शेतकऱ्यांच्या नावावर परस्पर फळबाग, पोखरा योजना व सामाजिक वनीकरण योजनेअंतर्गत झाडे प्रत्यक्षात न लावता अनुदान काढल्याचा आरोप करण्यात आला आहे. शासनाची योजना शेतकऱ्यांच्या हितासाठी असताना संबंधित अधिकाऱ्यांनी बनावट कागदपत्रे, खोटी हजेरी व काल्पनिक अहवाल तयार करून शासनाच्या निधीचा अपहार केल्याचा गंभीर आरोप तक्रारीत नमूद करण्यात आला आहे.
या प्रकारामुळे शासनाची फसवणूक होण्यासोबतच शेतकऱ्यांचाही विश्वासघात झाल्याचे तक्रारदारांनी म्हटले आहे. शासनाच्या निधीचा अपहार करणे हा भारतीय दंड संहिता व भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार दंडनीय गुन्हा असल्याने संबंधित दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करून शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी अर्जात करण्यात आली आहे.
तसेच या प्रकरणी तात्काळ चौकशी समिती नेमून सर्व कागदपत्रे व नोंदींची पडताळणी करून दोषींवर कठोर कारवाई करावी आणि पीडित शेतकऱ्यांना त्यांचे हक्काचे अनुदान तातडीने उपलब्ध करून द्यावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.
दरम्यान, या प्रकरणाची दखल घेण्यात टाळाटाळ झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
    user_Sandip Gaikwad
    Sandip Gaikwad
    Accountant मंठा, जालना, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • Post by दिपक हैबतराव चोरमले
    1
    Post by दिपक हैबतराव चोरमले
    user_दिपक हैबतराव चोरमले
    दिपक हैबतराव चोरमले
    Local Politician औंढा (नागनाथ), हिंगोली, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • Post by गंगाधर जक्कुलवार
    1
    Post by गंगाधर जक्कुलवार
    user_गंगाधर जक्कुलवार
    गंगाधर जक्कुलवार
    Media house माहूर, नांदेड, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • 🚩 पिंपळगाव दत्त संस्थान येथे भव्य ‘श्री रामकथा’ व १०८ कुंडी दत्तयज्ञ सोहळा 🚩 हिमायतनगर, हदगाव व भोकर तालुक्याच्या मध्यभागी असलेल्या पिंपळगाव दत्त संस्थान येथे २० ते २७ मार्च २०२६ दरम्यान श्री रामकथा, १०८ कुंडी दत्तयज्ञ व नामसंकीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात प.पू. गोवत्स श्री राधाकृष्णजी महाराज (जोधपूर) यांच्या वाणीमधून श्रीरामकथेचे रसाळ निरूपण होणार आहे. यापूर्वी परमपूज्य बालयोगी व्यंकट स्वामी महाराज यांनी हिमायतनगरच्या श्री परमेश्वर मंदिराला भेट देऊन भाविकांना मार्गदर्शन करत कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले. भाविकांसाठी प्रवचन, कीर्तन, नामसंकीर्तन व महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे. 🙏 #Himayatnagar #Pimpalgaon #RamKatha #DattYagya #NamSankirtan ReligiousEvent Maharashtra SpiritualProgram Bhakti SanatanDharma 🚩🙏
    1
    🚩 पिंपळगाव दत्त संस्थान येथे भव्य ‘श्री रामकथा’ व १०८ कुंडी दत्तयज्ञ सोहळा 🚩
हिमायतनगर, हदगाव व भोकर तालुक्याच्या मध्यभागी असलेल्या पिंपळगाव दत्त संस्थान येथे २० ते २७ मार्च २०२६ दरम्यान श्री रामकथा, १०८ कुंडी दत्तयज्ञ व नामसंकीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या सोहळ्यात प.पू. गोवत्स श्री राधाकृष्णजी महाराज (जोधपूर) यांच्या वाणीमधून श्रीरामकथेचे रसाळ निरूपण होणार आहे.
यापूर्वी परमपूज्य बालयोगी व्यंकट स्वामी महाराज यांनी हिमायतनगरच्या श्री परमेश्वर मंदिराला भेट देऊन भाविकांना मार्गदर्शन करत कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले.
भाविकांसाठी प्रवचन, कीर्तन, नामसंकीर्तन व महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे. 🙏
#Himayatnagar #Pimpalgaon #RamKatha #DattYagya #NamSankirtan ReligiousEvent Maharashtra SpiritualProgram Bhakti SanatanDharma 🚩🙏
    user_NNL Marathi
    NNL Marathi
    Local News Reporter Nanded, Maharashtra•
    6 hrs ago
  • कस्तुरबा गांधी मुलींच्या वस्तीग्रह जालना येथे जागतिक महिला दिवस साजरा करण्यात आला
    1
    कस्तुरबा गांधी मुलींच्या वस्तीग्रह जालना येथे जागतिक महिला दिवस साजरा करण्यात आला
    user_YUVA JALNA NEWS
    YUVA JALNA NEWS
    जालना, जालना, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • सोनपेठ पंचायत समिती सभापतीपदी राष्ट्रवादीच्या निकिता अवचारे यांची निवड : उपसभापतीपदी पद्मसिंह देशमुख
    1
    सोनपेठ पंचायत समिती सभापतीपदी राष्ट्रवादीच्या निकिता अवचारे यांची निवड : उपसभापतीपदी पद्मसिंह देशमुख
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    16 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.