सेवेतूनच भक्ती! आसोला यात्रेत भक्तराज महाराजांचे भाविकांसाठी प्रसाद व जलसेवा मानोरा :--तालुक्यातील श्रीक्षेत्र आसोला येथे बारस निमित्त श्री सोहमनाथ महाराज यांची भव्य यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. या यात्रेसाठी परिसरासह बाहेरील जिल्ह्यांतूनही हजारो भाविकांनी हजेरी लावली होती. यात्रेच्या निमित्ताने परिसरात धार्मिक वातावरण निर्माण झाले होते. यावेळी पोहरादेवी येथील भक्तराज महाराज व त्यांच्या मित्र मंडळाच्या वतीने भाविकांसाठी खिचडी, बुंदीचा प्रसाद तसेच थंड पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करण्यात आले. उन्हाच्या तीव्रतेतही भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी करण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात आले. भक्तराज महाराज यांनी भाविकांची सेवा हीच खरी ईश्वरसेवा या भावनेतून हा उपक्रम राबवला. त्यांच्या या सेवाभावी कार्यामुळे यात्रेतील वातावरण अधिक भक्तिमय व प्रेरणादायी झाले. यात्रेत आलेल्या भाविकांनी या उपक्रमाचे स्वागत करत, अशा सेवाभावी कार्यामुळे धार्मिक कार्यक्रमांना अधिक सामाजिक मूल्य प्राप्त होते, अशी भावना व्यक्त केली.
सेवेतूनच भक्ती! आसोला यात्रेत भक्तराज महाराजांचे भाविकांसाठी प्रसाद व जलसेवा मानोरा :--तालुक्यातील श्रीक्षेत्र आसोला येथे बारस निमित्त श्री सोहमनाथ महाराज यांची भव्य यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. या यात्रेसाठी परिसरासह बाहेरील जिल्ह्यांतूनही हजारो भाविकांनी हजेरी लावली होती. यात्रेच्या निमित्ताने परिसरात धार्मिक वातावरण निर्माण झाले होते. यावेळी पोहरादेवी येथील भक्तराज महाराज व त्यांच्या मित्र मंडळाच्या वतीने भाविकांसाठी खिचडी, बुंदीचा प्रसाद तसेच थंड पाण्याच्या बाटल्यांचे वाटप
करण्यात आले. उन्हाच्या तीव्रतेतही भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी करण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात आले. भक्तराज महाराज यांनी भाविकांची सेवा हीच खरी ईश्वरसेवा या भावनेतून हा उपक्रम राबवला. त्यांच्या या सेवाभावी कार्यामुळे यात्रेतील वातावरण अधिक भक्तिमय व प्रेरणादायी झाले. यात्रेत आलेल्या भाविकांनी या उपक्रमाचे स्वागत करत, अशा सेवाभावी कार्यामुळे धार्मिक कार्यक्रमांना अधिक सामाजिक मूल्य प्राप्त होते, अशी भावना व्यक्त केली.
- इसापूर येथील श्याम गायकवाड याने सकाळपासून शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक टॉवरवर चढून विविध मागण्यांसंदर्भात आंदोलन केले. त्यामुळे प्रशासनात खळबळ उडाली होती. इसापूर ग्रामपंचायत अंतर्गत नमुना ८ चोरी गेल्याची तक्रार सचिव, सरपंच, उपसरपंच यांनी पोलिस स्टेशनला दिली. त्या तक्रारीवरून काय कार्यवाही झाली, याचा खुलासा द्यावा. इसापूर येथील गावाचा नकाशा नसल्याने कोणते कोणाचे घर आहे. हे सिद्ध होत नाही. काही लोकांना नोटरीनुसार त्यांची नावे नमुना ८ मध्ये नोंद घेण्याचा नियम आहे. आपल्या घराचा नोटरीकृत असलेल्या दस्तानुसार घर नावाने करून द्यावे, एकाच मालमत्तेवर दोन वा तीन व्यक्तीची मालकी कशी याचाही खुलासा देऊन दोषींवर कारवाई करावी, अशा विविध मागण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. गटविकास अधिकाऱ्यांनी प्रशासक, ग्रामपंचायत अधिकारी यांना सदर आंदोलकाच्या मागण्यासंदर्भात कार्यवाही करण्यात याती व आंदोलकाला आंदोलनापासून परावृत्त करण्याबाबत पत्र दिले.1
- दारव्हा शहरातील मध्यवर्ती बसस्थानकावर प्रवाशांसाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याची कोणतीही व्यवस्था नसल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. मार्च अखेरीस वाढत्या उन्हामुळे तसेच लग्नसराईचा हंगाम आणि विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू असल्याने बसस्थानकावर मोठी गर्दी होत आहे. अशा परिस्थितीत बसस्थानकावर ठेवलेले माठ रिकामे असून पाण्याचा थेंबही उपलब्ध नसल्याची बाब समोर आली आहे. परिणामी प्रवाशांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. यासंदर्भात बहुजन मुक्ती पार्टीचे लोकसभा अध्यक्ष बिमोद मुधाने (यवतमाळ-वाशीम) यांनी आगार व्यवस्थापकांनी तात्काळ दखल घेऊन दारव्हा बसस्थानकावर शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी प्रसिद्धी माध्यमांतून केली आहे.1
- Post by वैजनाथ पावडे1
- Post by Amravati News Update1
- Post by Labour addaa.1
- हिमायतनगरमध्ये महावितरणचा मनमानी कारभार; अपघाताचा वाढता धोका हिमायतनगर तालुक्यात रस्त्यालगतच मनमानी पद्धतीने उभारलेले वीज खांब नागरिकांच्या जीवावर बेतत असल्याचा आरोप होत आहे. बांधकाम विभागाची परवानगी न घेता राष्ट्रीय महामार्गासह सरसम–दरेसरसम –पवना मार्गावर खांब उभारण्यात आल्याने वाहनधारकांमध्ये संताप वाढला आहे. निकृष्ट काम आणि ठेकेदार-प्रशासन संगनमताचा आरोप होत असून, हिमायतनगर तालुक्यातील महावितरण विभागाच्या विविध प्रकरणाकडे आमदार Baburao Kadam Kohlikar यांनीही अधिवेशनात लक्ष वेधले आहे. 👉 नागरिकांची मागणी: ✔️ संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाका ✔️ देयके तात्काळ थांबवा ✔️ रस्त्यापासून किमान 20 फूट अंतरावरच वीज खांब उभे करा सध्या या प्रकारामुळे अपघाताचा धोका वाढला असून तातडीने कारवाईची मागणी जोर धरत आहे. #Himayatnagar #Mahavitaran #Nanded #BreakingNews #PublicSafety RoadSafety Corruption1
- खामगाव : तालुक्यातील सुटाळा बुद्रुक येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात आणि मोठ्या थाटामाटात पार पडला. या मंगलमयी सोहळ्यासाठी संपूर्ण गावासह परिसरातून भाविकांनी मोठी गर्दी केली होती. शिव-पार्वती विवाहाच्या चार दिवसानंतर आता मंदिर परिसरात भव्य यात्रेला सुरुवात झाली असून, संपूर्ण गाव भक्तीच्या रंगात न्हाऊन निघाले आहे.या उत्सवाचे औचित्य साधून स्थानिक शिव मंदिराला अतिशय आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. रंगीबेरंगी दिव्यांच्या माळांनी उजळून निघालेले मंदिर भाविकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरले होते. विवाहाच्या पूर्वसंध्येपासूनच परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. पारंपारिक पद्धतीने पार पडला. शास्त्रोक्त विधी, पुरोहितांचे मंत्रोच्चार आणि मंगलाष्टकांच्या स्वरात शिव-पार्वतीचा विवाह संपन्न झाला. यावेळी उपस्थित भाविकांनी 'हर हर महादेव'च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दणाणून सोडला. या सोहळ्यानंतर मोठ्या प्रमाणात महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.विवाह सोहळा संपन्न झाल्यानंतर चार दिवसांनी, म्हणजेच आजपासून सुटाळा बुद्रुक महादेव संस्थान परिसरात मोठ्या यात्रेला प्रारंभ झाला आहे. या यात्रेचे खास वैशिष्ट्य म्हणजे, गावातील विवाहित लेकी-सुना या यात्रेच्या निमित्ताने खास माहेरी येतात.यात्रेनिमित्त परिसरात विविध दुकाने, पाळणे आणि खेळण्यांची दुकाने थाटली गेली आहेत. सुटाळा बुद्रुक येथील ही परंपरा सामाजिक एकोपा आणि श्रद्धेचे प्रतीक बनली असून, या सोहळ्यामुळे गावात उत्सवी चैतन्य पसरले आहे.परिसरातील नागरिक या यात्रेचा आणि दर्शनाचा लाभ घेण्यासाठी मोठ्या संख्येने सुटाळा बुद्रुक येथे दाखल होत आहेत.2
- Post by वैजनाथ पावडे1