logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

उड्डाणपुलाखाली दरोड्याची तयारी उधळली; पाच सराईत गुन्हेगार जेरबंद नांदेडमध्ये ‘ऑपरेशन फ्लश आऊट’ अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत कामठा बाजार ते गाडेगाव रोडवरील उड्डाणपुलाखाली दरोड्याच्या तयारीत असलेल्या पाच सराईत गुन्हेगारांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून गावठी पिस्तुल, जिवंत काडतूस, खंजर, गजाळी, मिरची पूड व इतर साहित्य असा सुमारे १.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस निरीक्षक अतुल भोसले व सहायक पोलीस निरीक्षक विठ्ठल घोगरे यांच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई केली. आरोपी दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याचे निष्पन्न झाले असून पुढील तपासासाठी त्यांना विमानतळ पोलीस ठाण्याकडे सोपविण्यात आले आहे.

11 hrs ago
user_MUKRAMABAD MDL
MUKRAMABAD MDL
मुखेड, नांदेड, महाराष्ट्र•
11 hrs ago
29a3b63e-0e5c-40ab-8766-000c3c78374b

उड्डाणपुलाखाली दरोड्याची तयारी उधळली; पाच सराईत गुन्हेगार जेरबंद नांदेडमध्ये ‘ऑपरेशन फ्लश आऊट’ अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत कामठा बाजार ते गाडेगाव रोडवरील उड्डाणपुलाखाली दरोड्याच्या तयारीत असलेल्या पाच सराईत गुन्हेगारांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून गावठी पिस्तुल, जिवंत काडतूस, खंजर, गजाळी, मिरची पूड व इतर साहित्य असा सुमारे १.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस निरीक्षक अतुल भोसले व सहायक पोलीस निरीक्षक विठ्ठल घोगरे यांच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई केली. आरोपी दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याचे निष्पन्न झाले असून पुढील तपासासाठी त्यांना विमानतळ पोलीस ठाण्याकडे सोपविण्यात आले आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • जळकोट
    1
    जळकोट
    user_मुस्तफा कोतवाल
    मुस्तफा कोतवाल
    जळकोट, लातूर, महाराष्ट्र•
    35 min ago
  • लोकस्वराज्य आंदोलन महाराष्ट्र आयोजित वज्रमुठ माहा आंदोलन आझाद मैदान मुंबई
    4
    लोकस्वराज्य आंदोलन महाराष्ट्र आयोजित वज्रमुठ माहा आंदोलन आझाद मैदान मुंबई
    user_सत्यलोकशब्द न्युज लाईव्ह
    सत्यलोकशब्द न्युज लाईव्ह
    कंधार, नांदेड, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • Post by Today One Live
    1
    Post by Today One Live
    user_Today One Live
    Today One Live
    Journalist Nanded, Maharashtra•
    3 hrs ago
  • नांदेड शहरात अनेक ठिकाणी अतिक्रमण करणाऱ्या विरोधात महानगरपालिका तथा पोलीस प्रशासनाच्या संयुक्त विद्यमानाने नांदेड शहरांमधील अतिक्रमण हटवण्याचे काम प्रगतीपथावर अवैद्यरीत्या अतिक्रमण करणाऱ्या व्यापारी तथा नागरिकांच्या विरोधात प्रशासन ॲक्शन मोडवर अतिक्रमण केलेल्या सर्व ठिकाणी अतिक्रमण जेसीबीच्या साह्याने तोडून काढण्यात आले, रस्त्यावर अवैद्यरित्या टपऱ्या व इतर दुकाने मांडून ठेवलेल्या त्या सुद्धा मोठ्या प्रमाणात अतिक्रमण कारवाई मध्ये जाण्यात आले, अतिक्रमण कराल तर कठोर कारवाई होईल अशा सज्जन इशारासह प्रशासनाने अतिक्रमण करणाऱ्यांना ठणकावून चांगले आहे, परंतु सरकारी जमिनीवर कब्जा करणाऱ्या विरोधात सुद्धा मोठ्या प्रमाणात कठोर कारवाई कधी करणार.? असा देखील सवाल सर्वसामान्य नागरिकांकडून होत आहे. शहरात अनेक टीका सरकारी जागेवर कब्जा करून बसणारे काही गुंड प्रवृत्तीचे प्रकार राजकीय पदाधिकारी व इतर समाजाचा ठेका देणारे लोक यांनी मोठ्या प्रमाणात सरकारी जमिनीवर कब्जा केलेला आहे. प्रताप सरकारी जमीन बिल्डरांच्या घशात घालून मोठ्या प्रमाणात कोट्यावधी रुपये यांचा आर्थिक व्यवहार सुद्धा करण्यात आला आहे. यांच्या विरोधात स्थानिक प्रशासन कारवाई करणार का हे सुद्धा अतिशय गंभीर प्रश्न निर्माण होत आहे. ? स्थानिक प्रशासनाचे अर्धवट सोडलेले काम देखील सध्या चर्चेत आलेले असून रखडलेले रस्ते रखडलेले ड्रेनेजलाइन पाण्याच्या लाईन नाल्या ,अस्वच्छता, कचऱ्याने तुडुंब भरलेल्या नाल्या सुद्धा आतापर्यंत नालेसफाई करण्यात आलेली नाही मागील प्रशासकीय कार्यकाळात सुद्धा कुठल्याही प्रकारे नालेसफाई करण्यात आलेली नाही आजही तेच हाल असून नालेसफाई कधी करणार एखादा महापौर येण्याची वाट बघत आहे का प्रशासन असे देखील सवाल मोठ्या प्रमाणात निर्माण झालेले आहे, 300 कोटी रुपयाच्या जवळपास वार्षिक खर्च करून देखील स्वच्छता ही होत नसताना देखील बघण्यास मिळत नाही. यावर प्रशासन लक्ष देईल का. सोमेश कॉलनी, कला मंदिर, एसपी ऑफिसच्या पाठचा रस्ता, कैकाडी गल्ली, गुजराती हायस्कूल परिसर, गोवर्धन घाट मधील परिसर, आता इतर ठिकाणी ड्रेनेज चेंबर रस्त्याच्या वर आणि रस्ता खाली अशी अवस्था आज रस्त्याची झालेली आहे मग वाहनधारक वाहन चालवणार कशी.....? अशा प्रकारे बोगस निष्कृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरवर कठोर दंडात्मक कारवाई होईल का शासन करणार का असा देखील सवाल सर्वसामान्य नागरिकांच्या मनात निर्माण झालेला आहे. अवैधरित्या जड वाहतूक शहरी भागामध्ये बिनधास्तपणे क्षमतेपेक्षा जास्त मालवाहतूक करून फिरत आहे. या हायवा टिप्पर गाड्यांमुळे अनेक निरपराध नागरिकांना आपला जीव गमावा लागला आहे. या निरापराधाच्या नुकसान भरपाई शासन कधी करणार. आणि जड वाहतूक बंद असताना वाहतूक करणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई कधी करणार. याकडे नांदेडकरांचे लक्ष आहे.! अनेक समस्यांना वाचा फोडणारा युवा राज्य न्यूज चैनल. वेळोवेळी सर्वसामान्य नागरिकांच्या आवाज म्हणून उभा आहे
    4
    नांदेड शहरात अनेक ठिकाणी अतिक्रमण करणाऱ्या विरोधात महानगरपालिका तथा पोलीस प्रशासनाच्या संयुक्त विद्यमानाने नांदेड शहरांमधील अतिक्रमण हटवण्याचे काम प्रगतीपथावर अवैद्यरीत्या अतिक्रमण करणाऱ्या व्यापारी तथा नागरिकांच्या विरोधात प्रशासन ॲक्शन मोडवर अतिक्रमण केलेल्या सर्व ठिकाणी अतिक्रमण जेसीबीच्या साह्याने तोडून काढण्यात आले, रस्त्यावर अवैद्यरित्या टपऱ्या व इतर दुकाने मांडून ठेवलेल्या त्या सुद्धा मोठ्या प्रमाणात अतिक्रमण कारवाई मध्ये जाण्यात आले, अतिक्रमण कराल तर कठोर कारवाई होईल अशा सज्जन इशारासह प्रशासनाने अतिक्रमण करणाऱ्यांना ठणकावून चांगले आहे, परंतु सरकारी जमिनीवर कब्जा करणाऱ्या विरोधात सुद्धा मोठ्या प्रमाणात कठोर कारवाई कधी करणार.? असा देखील सवाल सर्वसामान्य नागरिकांकडून होत आहे. शहरात अनेक टीका सरकारी जागेवर कब्जा करून बसणारे काही गुंड प्रवृत्तीचे प्रकार राजकीय पदाधिकारी व इतर समाजाचा ठेका देणारे लोक यांनी मोठ्या प्रमाणात सरकारी जमिनीवर कब्जा केलेला आहे. प्रताप सरकारी जमीन बिल्डरांच्या घशात घालून मोठ्या प्रमाणात कोट्यावधी रुपये यांचा आर्थिक व्यवहार सुद्धा करण्यात आला आहे. यांच्या विरोधात स्थानिक प्रशासन कारवाई करणार का हे सुद्धा अतिशय गंभीर प्रश्न निर्माण होत आहे. ? 
स्थानिक प्रशासनाचे अर्धवट सोडलेले काम देखील सध्या चर्चेत आलेले असून रखडलेले रस्ते रखडलेले ड्रेनेजलाइन पाण्याच्या लाईन नाल्या ,अस्वच्छता, कचऱ्याने तुडुंब भरलेल्या नाल्या सुद्धा आतापर्यंत नालेसफाई करण्यात आलेली नाही मागील प्रशासकीय कार्यकाळात सुद्धा कुठल्याही प्रकारे नालेसफाई करण्यात आलेली नाही आजही तेच हाल असून नालेसफाई कधी करणार एखादा महापौर येण्याची वाट बघत आहे का प्रशासन असे देखील सवाल मोठ्या प्रमाणात निर्माण झालेले आहे, 300 कोटी रुपयाच्या जवळपास वार्षिक खर्च करून देखील स्वच्छता ही होत नसताना देखील बघण्यास मिळत नाही. 
यावर प्रशासन लक्ष देईल का. 
सोमेश कॉलनी, कला मंदिर, एसपी ऑफिसच्या पाठचा रस्ता, कैकाडी गल्ली, गुजराती हायस्कूल परिसर, गोवर्धन घाट मधील परिसर, आता इतर ठिकाणी ड्रेनेज चेंबर रस्त्याच्या वर आणि रस्ता खाली अशी अवस्था आज रस्त्याची झालेली आहे मग वाहनधारक वाहन चालवणार कशी.....? अशा प्रकारे बोगस निष्कृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरवर कठोर दंडात्मक कारवाई होईल का शासन करणार का असा देखील सवाल सर्वसामान्य नागरिकांच्या मनात निर्माण झालेला आहे. 
अवैधरित्या जड वाहतूक शहरी भागामध्ये बिनधास्तपणे क्षमतेपेक्षा जास्त मालवाहतूक करून फिरत आहे. या हायवा टिप्पर गाड्यांमुळे अनेक निरपराध नागरिकांना आपला जीव गमावा लागला आहे. या निरापराधाच्या नुकसान भरपाई शासन कधी करणार. आणि जड वाहतूक बंद असताना वाहतूक करणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई कधी करणार. याकडे नांदेडकरांचे लक्ष आहे.! अनेक समस्यांना वाचा फोडणारा युवा राज्य न्यूज चैनल. वेळोवेळी सर्वसामान्य नागरिकांच्या आवाज म्हणून उभा आहे
    user_Shivkumar kale Press reporter
    Shivkumar kale Press reporter
    Nanded, Maharashtra•
    5 hrs ago
  • मी भाजपाचा साधा सदस्य सुद्धा नाही, संघ परीवारच कुठल दायीत्व माझ्याकडे नाही असे सांगत स्वत: किशोर शिवणीकर यांनी भाजपा संबंधाबाबत स्पष्टीकरण दिले आहे.
    1
    मी भाजपाचा साधा सदस्य सुद्धा नाही, संघ परीवारच कुठल दायीत्व माझ्याकडे नाही असे सांगत स्वत: किशोर शिवणीकर यांनी भाजपा संबंधाबाबत स्पष्टीकरण दिले आहे.
    user_Janta police taims
    Janta police taims
    उदगीर, लातूर, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • माजी आ. सुधाकर भालेराव आणि चंद्रकांत टेंगेटोल यांनी शिवसेना मजबुतीकरणसाठी पाया रोवला उदगीर (विशेष प्रतिनिधी) सर्वसामान्य माणसाचा प्रतिनिधी मुख्यमंत्री बनतो, हे शिवसेनेचे नेते ना. एकनाथराव शिंदे यांनी दाखवून दिले. मात्र ते मुख्यमंत्री असताना देखील लातूर जिल्ह्यामध्ये शिवसेनेला बाळसे धरता आले नव्हते. नगरपालिका निवडणुकीच्या पूर्वसंध्येला माजी आमदार सुधाकरराव भालेराव यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. आणि शिवसेना बांधणीचे काम सुरू झाले. खऱ्या अर्थाने पक्ष संघटन बांधणे हे काही फार सोपे नाही, मात्र अवघ्या पंधरा दिवसात सुधाकरराव भालेराव यांच्या संघटन कुशल नेतृत्वामुळे उदगीर नगरपालिकेमध्ये स्वतंत्र पॅनल शिवसेनेने टाकले, आणि 40 च्या 40 जागा लढवल्या, जनतेतून नगराध्यक्ष असल्यामुळे ती ही जागा मोठ्या ताकतीने शिवसेनेने लढवली. ज्या ठिकाणी बोटावर मोजन्या इतके कार्यकर्ते होते, त्याच उदगीर शहरांमध्ये गल्लीबोळातून हजारोंच्या संख्येने रॅली निघाली, घराघरातून शिवसेना आणि ना. एकनाथराव शिंदे यांचे नाव घुमू लागले. ही किमया घडउन आणली केवळ माजी आमदार सुधाकर भालेराव आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत टेंगेटोल यांच्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्याच्या आणि पक्ष बांधणी संघटन कुशलतेमुळेच असे म्हटले तर नवल वाटू नये. त्यानंतर आलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये देखील मोठ्या ताकतीने शिवसेनेने जागा लढवल्या, उदगीर विधानसभा मतदार संघामध्ये महायुती असली तरीही शिवसेनेला वगळून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी युती केली होती. तरीही शिवसेनेने अत्यंत तगडी लढत देत अनेक ठिकाणी दुसऱ्या क्रमांकावर राहिले. काही जागा तर शुल्लक मतांनी गेल्या. निवडणुका म्हटले की, हार जीत हे येणारच, परंतु अल्पावधीत माजी आमदार सुधाकर भालेराव आणि चंद्रकांत टेंगेटोल यांनी उदगीर परिसरात जादूची कांडी फिरावी, त्या पद्धतीने शिवसेनेची बांधणी केली आहे. असे म्हटले तर नवल वाटू नये. कार्यकर्त्याची मोठी फळी त्यांनी उभारून दाखवली, त्यामुळेच अनेक नेत्यांना शिवसेना हा पक्ष आवडू लागला. परिणामतः अहमदपूरचे माजी मंत्री विनायकराव पाटील, औसा येथील सहकार क्षेत्रामध्ये उत्कृष्ट काम करणारे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी, लातूर येथील भाजपचे नेते गोमसाळे या मान्यवरांनी आपापल्या परिसरातील शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेना नेते राज्याचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथराव शिंदे यांच्या हस्ते आणि माजी आमदार सुधाकर भालेराव, जिल्हाप्रमुख चंद्रकांत टेंगेटोल यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. मुख्यमंत्री असताना देखील शिवसेनेची बांधणी एवढ्या मोठ्या ताकतीने झाली नव्हती, तेवढ्या ताकतीने सध्या लातूर जिल्ह्यामध्ये शिवसेना पक्ष बांधणी सुरू आहे. कार्यकर्त्याचे संघटना अत्यंत गतिमान पद्धतीने सुरू असल्यामुळेच माजी आमदार सुधाकरराव भालेराव यांच्यावर लातूर जिल्ह्याची जबाबदारी सोपवलेली आहे. जिल्ह्याचे संघटक म्हणून ते काम पाहत आहेत. संघटन बांधणीसाठी गाव पातळीवर त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. गाव तिथे शिवसेना आणि घर तिथे शिवसैनिक अशी मोहीम राबवत असताना, प्रत्येक गावातील प्रत्येक घरातील नागरिकाच्या मनामध्ये शिवसेना घर करून बसू लागली आहे. हे आगामी निवडणुकीच्या दृष्टीने शिवसेनेसाठी फार प्रबळ दावेदारी ठरू शकणार आहे. अहमदपूर मध्ये विनायकराव पाटील यांनी मित्र मंडळाच्या बळावर निवडणूक लढवून जिंकून दाखवली होती. कोणत्याही पक्षाचे पाठबळ नसताना देखील त्यांनी त्यावेळी निवडणूक जिंकली होती. आता तर शिवसेनेचे पाठबळ मिळाले आणि पक्ष बांधणी याच ताकतीने सुरू राहिली तर निश्चितपणे त्यांनाही भविष्य आहे. अशी चर्चा कार्यकर्ते करू लागले आहेत. त्याच पद्धतीने जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघांमध्ये शिवसेनेची ताकद वाढावी या दृष्टीने आपले प्रयत्न चालू राहतील अशी ग्वाही लातूर जिल्ह्याचे संघटक म्हणून कार्य करत असलेले माजी आमदार सुधाकरराव भालेराव यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे. आपल्या जिल्हाध्यक्षाच्या कार्यकाळात जिल्ह्यामध्ये ऐतिहासिक पद्धतीने शिवसेनेला बळ देण्याचे काम आपण करून दाखवू असा विश्वास जिल्हाप्रमुख चंद्रकांत टेंगेटोल यांनी बोलून दाखवला आहे.
    4
    माजी आ. सुधाकर भालेराव आणि चंद्रकांत टेंगेटोल यांनी शिवसेना मजबुतीकरणसाठी पाया रोवला 
उदगीर (विशेष प्रतिनिधी) सर्वसामान्य माणसाचा प्रतिनिधी मुख्यमंत्री बनतो, हे शिवसेनेचे नेते ना. एकनाथराव शिंदे यांनी दाखवून दिले. मात्र ते मुख्यमंत्री असताना देखील लातूर जिल्ह्यामध्ये शिवसेनेला बाळसे धरता आले नव्हते. नगरपालिका निवडणुकीच्या पूर्वसंध्येला माजी आमदार सुधाकरराव भालेराव यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. आणि शिवसेना बांधणीचे काम सुरू झाले. खऱ्या अर्थाने पक्ष संघटन बांधणे हे काही फार सोपे नाही, मात्र अवघ्या पंधरा दिवसात सुधाकरराव भालेराव यांच्या संघटन कुशल नेतृत्वामुळे उदगीर नगरपालिकेमध्ये स्वतंत्र पॅनल शिवसेनेने टाकले, आणि 40 च्या 40 जागा लढवल्या, जनतेतून नगराध्यक्ष असल्यामुळे ती ही जागा मोठ्या ताकतीने शिवसेनेने लढवली. ज्या ठिकाणी बोटावर मोजन्या इतके कार्यकर्ते होते, त्याच उदगीर शहरांमध्ये गल्लीबोळातून हजारोंच्या संख्येने रॅली निघाली, घराघरातून शिवसेना आणि ना. एकनाथराव शिंदे यांचे नाव घुमू लागले. ही किमया घडउन आणली केवळ माजी आमदार सुधाकर भालेराव आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत टेंगेटोल यांच्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्याच्या आणि पक्ष बांधणी संघटन कुशलतेमुळेच असे म्हटले तर नवल वाटू नये.
त्यानंतर आलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये देखील मोठ्या ताकतीने शिवसेनेने जागा लढवल्या, उदगीर विधानसभा मतदार संघामध्ये महायुती असली तरीही शिवसेनेला वगळून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी युती केली होती. तरीही शिवसेनेने अत्यंत तगडी लढत देत अनेक ठिकाणी दुसऱ्या क्रमांकावर राहिले. काही जागा तर शुल्लक मतांनी गेल्या. निवडणुका म्हटले की, हार जीत हे येणारच, परंतु अल्पावधीत माजी आमदार सुधाकर भालेराव आणि चंद्रकांत टेंगेटोल यांनी उदगीर परिसरात जादूची कांडी फिरावी, त्या पद्धतीने शिवसेनेची बांधणी केली आहे. असे म्हटले तर नवल वाटू नये. कार्यकर्त्याची मोठी फळी त्यांनी उभारून दाखवली, त्यामुळेच अनेक नेत्यांना शिवसेना हा पक्ष आवडू लागला. परिणामतः अहमदपूरचे माजी मंत्री विनायकराव पाटील, औसा येथील सहकार क्षेत्रामध्ये उत्कृष्ट काम करणारे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी, लातूर येथील भाजपचे नेते गोमसाळे या मान्यवरांनी आपापल्या परिसरातील शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेना नेते राज्याचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथराव शिंदे यांच्या हस्ते आणि माजी आमदार सुधाकर भालेराव, जिल्हाप्रमुख चंद्रकांत टेंगेटोल यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. 
मुख्यमंत्री असताना देखील शिवसेनेची बांधणी एवढ्या मोठ्या ताकतीने झाली नव्हती, तेवढ्या ताकतीने सध्या लातूर जिल्ह्यामध्ये शिवसेना पक्ष बांधणी सुरू आहे. 
कार्यकर्त्याचे संघटना अत्यंत गतिमान पद्धतीने सुरू असल्यामुळेच माजी आमदार सुधाकरराव भालेराव यांच्यावर लातूर जिल्ह्याची जबाबदारी सोपवलेली आहे. जिल्ह्याचे संघटक म्हणून ते काम पाहत आहेत. संघटन बांधणीसाठी गाव पातळीवर त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. गाव तिथे शिवसेना आणि घर तिथे शिवसैनिक अशी मोहीम राबवत असताना, प्रत्येक गावातील प्रत्येक घरातील नागरिकाच्या मनामध्ये शिवसेना घर करून बसू लागली आहे. हे आगामी निवडणुकीच्या दृष्टीने शिवसेनेसाठी फार प्रबळ दावेदारी ठरू शकणार आहे. 
अहमदपूर मध्ये विनायकराव पाटील यांनी मित्र मंडळाच्या बळावर निवडणूक लढवून जिंकून दाखवली होती. कोणत्याही पक्षाचे पाठबळ नसताना देखील त्यांनी त्यावेळी निवडणूक जिंकली होती. आता तर शिवसेनेचे पाठबळ मिळाले आणि पक्ष बांधणी याच ताकतीने सुरू राहिली तर निश्चितपणे त्यांनाही भविष्य आहे. अशी चर्चा कार्यकर्ते करू लागले आहेत. त्याच पद्धतीने जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघांमध्ये शिवसेनेची ताकद वाढावी या दृष्टीने आपले प्रयत्न चालू राहतील अशी ग्वाही लातूर जिल्ह्याचे संघटक म्हणून कार्य करत असलेले माजी आमदार सुधाकरराव भालेराव यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे. आपल्या जिल्हाध्यक्षाच्या कार्यकाळात जिल्ह्यामध्ये ऐतिहासिक पद्धतीने शिवसेनेला बळ देण्याचे काम आपण करून दाखवू असा विश्वास जिल्हाप्रमुख चंद्रकांत टेंगेटोल यांनी बोलून दाखवला आहे.
    user_Laxman Ugile
    Laxman Ugile
    उदगीर, लातूर, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • कछरा का दिकत
    1
    कछरा का दिकत
    user_Ajay Pawar
    Ajay Pawar
    माहूर, नांदेड, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • शिवकुमार काळे सविस्तर वृत्त दिनांक २९ एप्रिल नांदेड: इतिहासाचा वारसा जपणारा नांदेड येथील ऐतिहासिक भुईकोट किल्ला सध्या प्रशासकीय उदासीनता आणि स्थानिक लोकांच्या अतिक्रमणामुळे शेवटच्या घटका मोजत आहे. पुरातत्व विभाग आणि स्थानिक प्रशासनाचे या ऐतिहासिक वास्तूकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याने, हा किल्ला आता केवळ अस्वच्छता आणि अवैध प्रकारांचा अड्डा बनला असल्याचे भीषण वास्तव समोर आले आहे. गटारगंगेच्या विळख्यात किल्ला पाण्याच्या मध्यभागी असलेल्या या किल्ल्याचे सौंदर्य एकेकाळी पर्यटकांचे आकर्षण होते. मात्र, आता परिस्थिती उलट झाली आहे. स्थानिक रहिवाशांनी किल्ल्याच्या भोवतालच्या परिसरात चक्क गटारीचे आणि नाल्याचे पाणी सोडले आहे. यामुळे किल्ल्याच्या तटबंदीला धोका निर्माण झाला असून परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. स्वच्छतेचा अभाव आणि साचलेले सांडपाणी यामुळे ऐतिहासिक वास्तूची विटंबना होत आहे. अवैध कब्जे आणि सुरक्षेचा अभाव किल्ल्याच्या आत आणि आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध रित्या ताबा मिळवण्याचे कटकारस्थान सुरू असल्याचे दिसून येत आहे. किल्ल्यात कोणत्याही प्रकारची सुरक्षा व्यवस्था उपलब्ध नाही. सुरक्षा रक्षकांच्या अभावामुळे या ठिकाणी 'तवाळगिरी' करणाऱ्या युवकांचा वावर वाढला असून, पर्यटकांना दमदाटी करणे आणि त्यांच्याशी उद्धटपणे बोलण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. कर्मचाऱ्यांची मनमानी आणि माहिती फलकांची दुरवस्था मिळालेल्या माहितीनुसार, या ठिकाणी नियुक्त असलेल्या कर्मचाऱ्यांकडून मनमानी कारभार सुरू आहे. ऐतिहासिक वस्तूंची जोपासना करण्याऐवजी त्यांची विटंबना केली जात आहे. किल्ल्याची माहिती देणारे फलक आणि महत्त्वाच्या ऐतिहासिक खुणा नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. पर्यटकांसाठी कोणत्याही मूलभूत सुविधा येथे उपलब्ध नाहीत. संवर्धनाची गरज: प्रशासन कधी जागे होणार? नांदेडच्या वैभवात भर टाकणारा हा भुईकोट किल्ला आता पूर्णपणे ढासळण्याच्या स्थितीत आहे. पुरातत्व विभागाने याकडे त्वरित लक्ष देऊन अवैध बांधकामे हटवावीत आणि किल्ल्याच्या संवर्धनासाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी इतिहासप्रेमींकडून केली जात आहे. स्थानिक प्रशासन आणि पुरातत्व विभाग या सर्व प्रकारावर काय भूमिका घेणार आणि या ऐतिहासिक वारशाचे जतन करण्यासाठी कोणत्या उपाययोजना करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जर वेळीच पावले उचलली नाहीत, तर नांदेडचा हा ऐतिहासिक वारसा कायमचा नष्ट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
    3
    शिवकुमार काळे 
सविस्तर वृत्त दिनांक २९ एप्रिल 
नांदेड:
इतिहासाचा वारसा जपणारा नांदेड येथील ऐतिहासिक भुईकोट किल्ला सध्या प्रशासकीय उदासीनता आणि स्थानिक लोकांच्या अतिक्रमणामुळे शेवटच्या घटका मोजत आहे. पुरातत्व विभाग आणि स्थानिक प्रशासनाचे या ऐतिहासिक वास्तूकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याने, हा किल्ला आता केवळ अस्वच्छता आणि अवैध प्रकारांचा अड्डा बनला असल्याचे भीषण वास्तव समोर आले आहे.
गटारगंगेच्या विळख्यात किल्ला
पाण्याच्या मध्यभागी असलेल्या या किल्ल्याचे सौंदर्य एकेकाळी पर्यटकांचे आकर्षण होते. मात्र, आता परिस्थिती उलट झाली आहे. स्थानिक रहिवाशांनी किल्ल्याच्या भोवतालच्या परिसरात चक्क गटारीचे आणि नाल्याचे पाणी सोडले आहे. यामुळे किल्ल्याच्या तटबंदीला धोका निर्माण झाला असून परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. स्वच्छतेचा अभाव आणि साचलेले सांडपाणी यामुळे ऐतिहासिक वास्तूची विटंबना होत आहे.
अवैध कब्जे आणि सुरक्षेचा अभाव
किल्ल्याच्या आत आणि आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध रित्या ताबा मिळवण्याचे कटकारस्थान सुरू असल्याचे दिसून येत आहे. किल्ल्यात कोणत्याही प्रकारची सुरक्षा व्यवस्था उपलब्ध नाही. सुरक्षा रक्षकांच्या अभावामुळे या ठिकाणी 'तवाळगिरी' करणाऱ्या युवकांचा वावर वाढला असून, पर्यटकांना दमदाटी करणे आणि त्यांच्याशी उद्धटपणे बोलण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत.
कर्मचाऱ्यांची मनमानी आणि माहिती फलकांची दुरवस्था
मिळालेल्या माहितीनुसार, या ठिकाणी नियुक्त असलेल्या कर्मचाऱ्यांकडून मनमानी कारभार सुरू आहे. ऐतिहासिक वस्तूंची जोपासना करण्याऐवजी त्यांची विटंबना केली जात आहे. किल्ल्याची माहिती देणारे फलक आणि महत्त्वाच्या ऐतिहासिक खुणा नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. पर्यटकांसाठी कोणत्याही मूलभूत सुविधा येथे उपलब्ध नाहीत.
संवर्धनाची गरज: प्रशासन कधी जागे होणार?
नांदेडच्या वैभवात भर टाकणारा हा भुईकोट किल्ला आता पूर्णपणे ढासळण्याच्या स्थितीत आहे. पुरातत्व विभागाने याकडे त्वरित लक्ष देऊन अवैध बांधकामे हटवावीत आणि किल्ल्याच्या संवर्धनासाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी इतिहासप्रेमींकडून केली जात आहे.
स्थानिक प्रशासन आणि पुरातत्व विभाग या सर्व प्रकारावर काय भूमिका घेणार आणि या ऐतिहासिक वारशाचे जतन करण्यासाठी कोणत्या उपाययोजना करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जर वेळीच पावले उचलली नाहीत, तर नांदेडचा हा ऐतिहासिक वारसा कायमचा नष्ट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
    user_Shivkumar kale Press reporter
    Shivkumar kale Press reporter
    Nanded, Maharashtra•
    9 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.