logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

उदयगिरी महाविद्यालयाच्या तीन विद्यार्थ्यांना प्लेसमेंट तर अकरा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती  उदगीर (एल पी उगीले) किरण अकॅडमी आयटी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट, पुणे व संगणकशास्त्र विभाग महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय उदगीर यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाईन ट्रेनिंग अँड प्लेसमेंटचे आयोजन करण्यात आले, त्यात बीसीएटीवाय आणि बीएस्सीटीवाय च्या 35 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. अकॅडमी तर्फे जनरल अ‍ॅपटीट्यूड टेस्ट, ग्रुप डिस्कशन व पर्सनल इंटरव्यू घेण्यात आले, त्यातून तीन विद्यार्थिनी कु. केंद्रे राजनंदिनी, कु. मुंडे वैष्णवी आणि कु. स्वामी सुषमा सुशील यांची ट्रेनिंग व प्लेसमेंट साठी निवड झाली. अकरा विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप साठी निवड करण्यात आली.  यशस्वी विद्यार्थ्यांची प्लेसमेंट मध्ये निवड झाल्याबद्दल महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर, उपाध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश तोंडारे, बसवराज पाटील मलकापूरकर, सचिव डॉ. रामप्रसाद लखोटिया, सहसचिव मल्लिकार्जुन चिल्लरगे, प्रशांत पेन्सलवार, कोषाध्यक्ष महादेव नौबदे तसेच सर्व संस्था सदस्य, प्राचार्य डॉ. आर. के. मस्के, उपप्राचार्य डॉ. एस. एन. हल्लाळे, संगणक शास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. एस. व्ही. आवाळे, प्रा. राहुल बिरादार तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

1 hr ago
user_Laxman Ugile
Laxman Ugile
उदगीर, लातूर, महाराष्ट्र•
1 hr ago

उदयगिरी महाविद्यालयाच्या तीन विद्यार्थ्यांना प्लेसमेंट तर अकरा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती  उदगीर (एल पी उगीले) किरण अकॅडमी आयटी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट, पुणे व संगणकशास्त्र विभाग महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय उदगीर यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाईन ट्रेनिंग अँड प्लेसमेंटचे आयोजन करण्यात आले, त्यात बीसीएटीवाय आणि बीएस्सीटीवाय च्या 35 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. अकॅडमी तर्फे जनरल अ‍ॅपटीट्यूड टेस्ट, ग्रुप डिस्कशन व पर्सनल इंटरव्यू घेण्यात आले, त्यातून तीन विद्यार्थिनी कु. केंद्रे राजनंदिनी, कु. मुंडे वैष्णवी आणि कु. स्वामी सुषमा सुशील यांची ट्रेनिंग व प्लेसमेंट साठी निवड झाली. अकरा विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप साठी निवड करण्यात आली.  यशस्वी विद्यार्थ्यांची प्लेसमेंट मध्ये निवड झाल्याबद्दल महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर, उपाध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश तोंडारे, बसवराज पाटील मलकापूरकर, सचिव डॉ. रामप्रसाद लखोटिया, सहसचिव मल्लिकार्जुन चिल्लरगे, प्रशांत पेन्सलवार, कोषाध्यक्ष महादेव नौबदे तसेच सर्व संस्था सदस्य, प्राचार्य डॉ. आर. के. मस्के, उपप्राचार्य डॉ. एस. एन. हल्लाळे, संगणक शास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. एस. व्ही. आवाळे, प्रा. राहुल बिरादार तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • उदयगिरी महाविद्यालयाच्या तीन विद्यार्थ्यांना प्लेसमेंट तर अकरा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती  उदगीर (एल पी उगीले) किरण अकॅडमी आयटी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट, पुणे व संगणकशास्त्र विभाग महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय उदगीर यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाईन ट्रेनिंग अँड प्लेसमेंटचे आयोजन करण्यात आले, त्यात बीसीएटीवाय आणि बीएस्सीटीवाय च्या 35 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. अकॅडमी तर्फे जनरल अ‍ॅपटीट्यूड टेस्ट, ग्रुप डिस्कशन व पर्सनल इंटरव्यू घेण्यात आले, त्यातून तीन विद्यार्थिनी कु. केंद्रे राजनंदिनी, कु. मुंडे वैष्णवी आणि कु. स्वामी सुषमा सुशील यांची ट्रेनिंग व प्लेसमेंट साठी निवड झाली. अकरा विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप साठी निवड करण्यात आली.  यशस्वी विद्यार्थ्यांची प्लेसमेंट मध्ये निवड झाल्याबद्दल महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर, उपाध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश तोंडारे, बसवराज पाटील मलकापूरकर, सचिव डॉ. रामप्रसाद लखोटिया, सहसचिव मल्लिकार्जुन चिल्लरगे, प्रशांत पेन्सलवार, कोषाध्यक्ष महादेव नौबदे तसेच सर्व संस्था सदस्य, प्राचार्य डॉ. आर. के. मस्के, उपप्राचार्य डॉ. एस. एन. हल्लाळे, संगणक शास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. एस. व्ही. आवाळे, प्रा. राहुल बिरादार तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.
    1
    उदयगिरी महाविद्यालयाच्या तीन विद्यार्थ्यांना प्लेसमेंट तर अकरा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती 
उदगीर (एल पी उगीले) किरण अकॅडमी आयटी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट, पुणे व संगणकशास्त्र विभाग महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय उदगीर यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाईन ट्रेनिंग अँड प्लेसमेंटचे आयोजन करण्यात आले, त्यात बीसीएटीवाय आणि बीएस्सीटीवाय च्या 35 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. अकॅडमी तर्फे जनरल अ‍ॅपटीट्यूड टेस्ट, ग्रुप डिस्कशन व पर्सनल इंटरव्यू घेण्यात आले, त्यातून तीन विद्यार्थिनी कु. केंद्रे राजनंदिनी, कु. मुंडे वैष्णवी आणि कु. स्वामी सुषमा सुशील यांची ट्रेनिंग व प्लेसमेंट साठी निवड झाली. अकरा विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप साठी निवड करण्यात आली.  यशस्वी विद्यार्थ्यांची प्लेसमेंट मध्ये निवड झाल्याबद्दल महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर, उपाध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश तोंडारे, बसवराज पाटील मलकापूरकर, सचिव डॉ. रामप्रसाद लखोटिया, सहसचिव मल्लिकार्जुन चिल्लरगे, प्रशांत पेन्सलवार, कोषाध्यक्ष महादेव नौबदे तसेच सर्व संस्था सदस्य, प्राचार्य डॉ. आर. के. मस्के, उपप्राचार्य डॉ. एस. एन. हल्लाळे, संगणक शास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. एस. व्ही. आवाळे, प्रा. राहुल बिरादार तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.
    user_Laxman Ugile
    Laxman Ugile
    उदगीर, लातूर, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • Post by EKMAT DIGITAL
    1
    Post by EKMAT DIGITAL
    user_EKMAT DIGITAL
    EKMAT DIGITAL
    शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    14 min ago
  • लातूर जिल्हा पोलीस दलाचे आस्थापनेवरील चालक पोलीस शिपाई भरती सन २०२४-२०२५ ची "शारीरिक मोजमाप व शारीरिक चाचणी" प्रक्रिया दिनांक १७.०२.२०२६ रोजी सकाळी ०४.०० वाजता पासून पोलीस मुख्यालय, बाभळगाव, लातूर येथे सुरू झालेली आहे
    1
    लातूर जिल्हा पोलीस दलाचे आस्थापनेवरील चालक पोलीस शिपाई भरती सन २०२४-२०२५ ची "शारीरिक मोजमाप व शारीरिक चाचणी" प्रक्रिया दिनांक १७.०२.२०२६ रोजी सकाळी ०४.०० वाजता पासून पोलीस मुख्यालय, बाभळगाव, लातूर येथे सुरू झालेली आहे
    user_Sunil Gawali
    Sunil Gawali
    शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • विरहनुमान रोड साळे गल्ली येथील हनुमान मंदिर येथे महाशिवरात्री निमित्त नीलकंटेश्वर महादेवाचा रुद्र अभिषेक करण्यात आला यावेळेस शेकडो भाविक भक्त उपस्थित होते अतिशय भक्ती मय वातावरणात अभिषेक संपन्न झाला
    1
    विरहनुमान रोड साळे गल्ली येथील हनुमान मंदिर येथे महाशिवरात्री निमित्त नीलकंटेश्वर महादेवाचा रुद्र अभिषेक करण्यात आला यावेळेस शेकडो भाविक भक्त उपस्थित होते अतिशय भक्ती मय वातावरणात अभिषेक संपन्न झाला
    user_अखंड भारत
    अखंड भारत
    Samaj Sevak Latur, Mumbai•
    16 hrs ago
  • लातूर (प्रतिनिधी): शहरातील लाहोटी तंत्रनिकेतन समोरील मुख्य रस्त्यावर सोमवारी सायंकाळी एका युवकावर चार ते पाच जणांनी धारदार शस्त्राने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात युवक गंभीर जखमी झाला असून त्याला तात्काळ शासकीय रुग्णालय लातूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, हल्लेखोरांनी अचानक युवकाला गाठत त्याच्यावर चाकूने वार केले. घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. स्थानिक नागरिकांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच लातूर शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तातडीने तपास सुरू करून संशयितांचा शोध घेतला. या प्रकरणात एकास ताब्यात घेण्यात आले असून इतर आरोपी फरार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. हल्ल्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, जुन्या वादातून हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, जखमी युवकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे. शहरात घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
    2
    लातूर (प्रतिनिधी): शहरातील लाहोटी तंत्रनिकेतन समोरील मुख्य रस्त्यावर सोमवारी सायंकाळी एका युवकावर चार ते पाच जणांनी धारदार शस्त्राने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात युवक गंभीर जखमी झाला असून त्याला तात्काळ शासकीय रुग्णालय लातूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, हल्लेखोरांनी अचानक युवकाला गाठत त्याच्यावर चाकूने वार केले. घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. स्थानिक नागरिकांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली.
माहिती मिळताच लातूर शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तातडीने तपास सुरू करून संशयितांचा शोध घेतला. या प्रकरणात एकास ताब्यात घेण्यात आले असून इतर आरोपी फरार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
हल्ल्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, जुन्या वादातून हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, जखमी युवकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे. शहरात घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
    user_फोटो क्राईम न्यूज
    फोटो क्राईम न्यूज
    पत्रकार Latur, Maharashtra•
    19 hrs ago
  • वसंत स्मृती येथील बैठकीत कडक इशारा..! नायगाव पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी केवळ पद मिळवणे पुरेसे नाही तर गावपातळीवर जाऊन गोरगरीब जनतेची कामे करणे आवश्यक आहे पद घेऊन घरी बसणाऱ्या पदाधिकाऱ्यांची आता गय केली जाणार नाही कामात कसूर करणाऱ्यांना तातडीने पदावरून कमी करून सक्रिय कार्यकर्त्यांना संधी दिली जाईल असा स्पष्ट इशारा खासदार रवींद्र चव्हाण यांनी दिला नायगाव येथील वसंत स्मृती मेमोरियल मध्ये आयोजित नांदेड दक्षिण काँग्रेस'च्या विस्तारित बैठकीत ते बोलत होते
    1
    वसंत स्मृती येथील बैठकीत कडक इशारा..!
नायगाव पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी केवळ पद मिळवणे पुरेसे नाही तर गावपातळीवर जाऊन गोरगरीब जनतेची कामे करणे आवश्यक आहे
पद घेऊन घरी बसणाऱ्या पदाधिकाऱ्यांची आता गय केली जाणार नाही कामात कसूर करणाऱ्यांना तातडीने पदावरून कमी करून सक्रिय कार्यकर्त्यांना संधी दिली जाईल
असा स्पष्ट इशारा खासदार रवींद्र चव्हाण यांनी दिला
नायगाव येथील वसंत स्मृती मेमोरियल मध्ये आयोजित नांदेड दक्षिण काँग्रेस'च्या विस्तारित बैठकीत ते बोलत होते
    user_Shuddhodhan Dhawale
    Shuddhodhan Dhawale
    Voice of people नायगाव (खैरगाव), नांदेड, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • आशिव येथील शाळकरी मुलांच्या नृत्याने शिवस्मारक यात्रेचे जंगी स्वागत
    1
    आशिव येथील शाळकरी मुलांच्या नृत्याने शिवस्मारक यात्रेचे जंगी स्वागत
    user_बाळकृष्ण प्रकाश कदम
    बाळकृष्ण प्रकाश कदम
    Farmer औसा, लातूर, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • जिल्ह्यात मटका, जुगार, गुटखा व अवैध मद्यविक्री बोकाळली!!, पंधरा दिवसात ७५ गुन्हे दाखल!! मटका किंग मुळे अवैध धंदे जोमात !! थातूरमातूर कारवाई करत पोलीस गेले कोमात !! लातूर (एल पी उगीले) वाढवणा हद्दीतील मटका किंग मुळे संपूर्ण जिल्ह्यामध्ये कायदा सुव्यवस्थेला धोका निर्माण झालेला असताना सुद्धा स्थानिक पोलीस मात्र त्या अवैध धंद्याला आळा घालण्याऐवजी खत पाणी घालत असल्याची ओरड होत आहे. ही ओरड पाहून पोलिसांनी चमकोगिरी करत थातुरमातूर कारवाई करून आपण किती कर्तबगार अधिकारी आहोत, त्याची टिमकी वाजवण्याचा प्रयत्न चालवला आहे. वास्तविक पाहता मटका किंग कोण? हे जगजाहीर असताना देखील, मुळावर घाव न घालता फांद्या तोडून पाने मोजण्याचे काम पोलीस प्रशासन करत आहेत.  गंमत म्हणजे प्राधान्याने मटका किंग मुळे मटक्याला मोठ्या प्रमाणात जोर आला आहे. काही अधिकारी आणि चक्क जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे विशेष पथक तसेच पोलीस उपमहानिरीक्षकांचे पथक मधील काही कर्मचारी माझ्या खिशात आहेत, अशी भूमिका हा मटका किंग घेत असल्याचे बोलले जात आहे.  पोलीस प्रशासनकडून आम्ही किती कर्तबगार आहोत हे दाखवण्यासाठी मटका खेळणाऱ्या किरकोळ जुगार्‍यावर गुन्हे दाखल करून आपली कर्तबगरी जनतेला  सांगण्याचा प्रयत्न चालवला आहे. मात्र प्रत्यक्षात पाणी कुठे मुरते? हे जनतेला माहित आहे.  केवळ चमकोगिरीसाठीच धाडी चे नाट्य!! पोलीस प्रशासनाच्या वतीने कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या तसेच लपून सुरू असलेल्या मटका, जुगार, गुटखा विक्री व अवैध मद्यविक्रीसारख्या समाजविघातक धंद्यांना आळा घालण्याच्या उद्देशाने लातूर जिल्हा पोलीस दल यांच्यामार्फत सातत्यपूर्ण, कठोर कारवाया राबविण्यात येत आहेत. अशी बतावणी केली जाते. वरिष्ठ अधिकाऱ्याला अंधारात ठेवून स्थानिक अधिकारी काय पापड बेलत आहेत? हे जनतेला माहित आहे. दुर्दैवाने जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे,  अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या ही गोष्ट लक्षात का येत नाही? याचे मोठे कोडे जनतेला पडले आहे. केवळ पंधरा दिवसांमध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या आदेशान्वये व मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे तसेच स्थानिक गुन्हे शाखा यांच्या समन्वयाने अवैध धंद्यांविरुद्ध विशेष मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे. दिनांक ०१ फेब्रुवारी २०२६ ते १५ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत अचानक धाडसत्रे, गुप्त माहितीच्या आधारे छापे, तसेच सतत गस्त व पाहणी मोहिमा राबविण्यात आल्या. सदरच्या एकत्रित कारवाईमध्ये मटका / जुगार व दारूबंदी कायद्यांतर्गत – २९ गुन्हे दाखल.अवैध मद्यविक्री प्रकरणी – ५३ गुन्हे दाखल.,गुटखा विक्री प्रकरणी – ०३ गुन्हे दाखल.,अशा एकूण ७५ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून या कारवाईत विविध प्रकारचा मुद्देमाल जसे की रोख रक्कम, जुगार साहित्य, अवैध मद्यसाठा, तसेच गुटखा साठा असा एकूण ₹ ९,९४,५१४/- (रुपये नऊ लाख चौ-याण्णव हजार पाचशे चौदा) किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जर पंधरा दिवसांमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात गुन्हे दाखल होत असतील तर हे अवैध धंदे लपून छपून चालतात असे म्हणणे हास्यास्पद होणार नाही का? तरीही पोलीस अधिकारी म्हणतात," मी करतो मारल्यावानी तू कर रडल्यावानी"अशा पद्धतीने हे सर्व प्रकार चालू आहेत असे लोकांमध्ये बोलले जात आहे. केवळ पंधरा दिवसांमध्ये दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांतील आरोपींविरुद्ध संबंधित कायद्यांन्वये कठोर कारवाई करण्यात आलेली असून पुढील तपास सुरू आहे. तसेच संबंधित आरोपी भविष्यात पुन्हा अशा अवैध कृत्यांत सहभागी होऊ नयेत यासाठी त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई प्रस्तावित करण्यात येत आहे. प्रतिबंधक आदेशांचे उल्लंघन केल्यास त्यांच्याविरुद्ध आणखी कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. हद्दपारची कारवाई नावाला!! गुन्हेगार थोड्याच दिवसात येतात गावाला !! कित्येक पोलीस स्टेशन अंतर्गत जुगार खेळणाऱ्या गोरगरिबांना गुन्हेगार ठरवून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जातात, " जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही"असे म्हणतात, त्याप्रमाणे हे जुगारी पुन्हा पुन्हा जुगार खेळतात. ते कोण आहेत हे पोलिसांना पक्के माहीत असते. वरिष्ठाकडून अवैध धंद्याच्या विरोधामध्ये केसेस दाखल करा, असा फर्मान आला की ह्या गोरगरिबांना बकरे बनवून त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना हद्दपार केले जाते. मात्र ती हद्दपार किती थातूरमातूर असते हे पोलिसांना देखील चांगलेच माहिती आहे. कारण पुन्हा काही दिवसात तेच आरोपी तेच अद्द पार झालेले गुन्हेगार ठरवले गेलेले जुगारी गावात फिरताना आढळून येत असल्याची ही चर्चा हळी हंडरगुळी च बाजारात गावकरी करत आहेत. पोलीस प्रशासन बेंबीच्या देठापासून ओरडून अशा कारवाया भविष्यातही अधिक तीव्रतेने व सातत्याने सुरू राहणार असून अवैध धंद्यांविरुद्धची ही मोहीम यापुढेही अधिक प्रभावीपणे सुरू राहणार आहे. असे सांगत असले तरी या अवैध धंद्याला खतपाणी कोण घालतो? हे पाहणे गरजेचे आहे. पोलीस उपमहानिरीक्षकाच्या विशेष पथकातील अनेक कर्मचारी झारीतले शुक्राचार्य ! नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप हे पूर्वीपासून अवैध धंद्याच्या विरोधात असल्याची माहिती लातूरकरांना आहे. मात्र त्यांची लवकरच बदली होणार असल्याचे सांगत काही पोलिस अधिकारीच अवैध धंद्यांचा बाजार मांडत आहेत. गंमत म्हणजे हे अवैध धंदे थांबले पाहिजेत, अशा प्रामाणिक इच्छे खातर पोलीस उप महानिरीक्षकांनी विशेष पथके नेमली खरी, मात्र त्या पथकातील कित्येक कर्मचारी हे अवैध धंदेवाल्यांच्या खिशात असल्याची उघड उघड भाषा मटका किंग मुळे होते आहे. इतकेच नाही तर या पथकातील काही कर्मचारीच धाड टाकण्यासाठी येत असल्याची पूर्वकल्पना या अवैध धंदेवाल्याला देऊन, आम्हाला काही केसेस हवे आहेत. असे सांगून नाममात्र कारवाई करून निघून जातात. काही वेळेला अशा पोलिसांशी दोस्ती असलेल्या मटका किंग मुळे धाड ही केवळ त्या मटकेवाल्याच्या विरोधात फटका चालवणाऱ्या दुसऱ्या बुक्की पडत असते. असे मटका खेळणारेच बोलू लागले आहेत. त्यावरून दिव्याखाली अंधार तर नाही ना? याचा विचार पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी केला पाहिजे. थोड्याफार फरकाने तीच अवस्था जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या पथकाची झाली आहे असे म्हटले तर वावगे होणार नाही.  एलसीबी कडे अनेकांचे लागले डोळे !! तिथे असतात का हो लोण्याचे गोळे?  लातूर जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या वतीने मध्यंतरीच्या काळात अत्यंत उत्कृष्ट कामगिरी झाली. मात्र या शाखेच्या ज्येष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हेगारांचा कर्दनकाळ म्हणून ओळखले जाणारे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांचा नांदेड परिक्षेत्रातील कार्यकाळ संपत आला आहे. एकतर त्यांना आणखी एक वर्षाचा वाढीव कार्यकाळ द्यावा अशी मागणी काही लोकांनी सुरू केली आहे. गंमत म्हणजे तेव्हापासूनच या अवैध धंद्यांना ऊत येऊ लागला आहे. इतकेच नाही तर काही अधिकारी आपली वर्णी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेवर कशी लागेल? त्या ठिकाणी जर घोडेबाजार होत असेल तर आपला कोण दलाल प्रभावीपणे काम करेल? कोणत्या राजकीय लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून आपले काम होऊ शकेल! याची शोध मोहीम अनेक पोलीस अधिकाऱ्यांनी सुरू केली आहे. त्यामुळे अवैध धद्याकडे कोणाचे लक्ष नाही, उलट पक्षी हे अवैध धंदे असेच किंवा यापेक्षा अधिक जोमाने कसे चालतील? आणि त्याच्या बदल्यात आपल्याला काय फायदा होईल? याचे गणित घालण्यातही अनेक पोलीस अधिकारी मशगुल असल्याचे बोलले जात आहे. पोलीस दलातील जाहिरातल्या शुक्राचार्यांना शोधणे हेच खरे गरजेचे आहे. कारण गुन्हेगारांना पाठबळ देणारे खरे गुन्हेगार हेच लोक आहेत. त्यामुळे याचा शोध घेणे गरजेचे झाले आहे. उदगीर ग्रामीण हद्द मटक्याची राजधानी !! अवैध धंद्यालाही नाही कमी!! उदगीर शहरासोबतच ग्रामीण हद्द मोठ्या प्रमाणात अवैध धद्याच्या माहेरघर झाले आहे. जिल्ह्यात सर्वात अधिक उत्पन्नाचा ठिकाण म्हणून उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन कडे पाहत असल्याने, जर या ठिकाणच्या पोलीस अधिकाऱ्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा मिळाली तर त्या पोलीस स्टेशन वर आपला हक्क सांगण्यासाठी ही काही पोलीस अधिकारी आमदार, खासदारांचे दरवाजे दिसत असल्याची चर्चा आहे. तर काहीजण पोलीस प्रशासनातील कर्तबगार दलालांच्याही मागे फिरत असल्याची चर्चा आहे. उदगीर शहर असेल ग्रामीण असेल किंवा वाढवणा असेल तशी ही पोलीस स्टेशन बरी आहेत, मात्र आता अवैध धंद्यासाठी ती अत्यंत उत्तम ठरू लागली आहेत. या भागामध्ये मोठ मोठ्या ठिकाणी का धाडी पडत नसतील? यासंदर्भात लोकांमध्ये चर्चा सुरू आहे. नेत्यांच्या मैत्रीच्या अडून चालणाऱ्या अवैध धंद्यांना किती दिवस पडद्याआड ठेवणार? किती दिवस नेत्यांचे बगलबच्चे सांभाळण्यासाठी अवैध धंद्याला आणि अवैध धंदे पडद्याअडून चालवणाऱ्यांना बळ देत राहणार? हा खरा प्रश्न आहे. कधीकाळी ऐतिहासिक शहर म्हणून नावाजलेले उदगीर, कधीकाळी शैक्षणिक क्षेत्रामध्ये मराठवाड्याचे पुणे म्हणून गौरवले जाणारे उदगीर, दुर्दैवाने आज अवैध धंद्याची राजधानी म्हणून ओळखली जाऊ लागली आहे. ही गोष्ट महाराष्ट्राचे युवा नेते अमित देशमुख यांनी चक्क जाहीर सभेतून बोलून दाखवल्यानंतर देखील या गोष्टीकडे प्रशासनाने दुर्लक्ष का केले असेल? त्यामागे काय गोडबंगाल असेल? या गोष्टी तपासण्याची गरज निर्माण झाली आहे. विशेषतः ज्यांना हे अवैध धंदे नको आहेत, अशा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तरी या गोष्टीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. अशी चर्चा आता उदगीर परिसरात चालू आहे. वाढवणा हद्दीत तर भर जत्रेत अंदर बहार जुगाराला चांगलाच आला होता बहार !! वाढवणा पोलीस स्टेशन हद्दीमधील गुडसूर या क्रांतिकारी गावामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही यात्रा मोठ्या उत्साहात भरली होती. आध्यात्मिक वारसा असलेल्या या यात्रेसाठी पंचक्रोशीतील लोक मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. पारंपारिक पद्धतीप्रमाणे कुस्त्याचे फडही रंगले होते. ग्रामीण भागातील लोकांचे आकर्षण ठरलेल्या अशा जत्रेतून छोटी छोटी कपड्याची दुकाने, ताजी मिठाई करून विकणारी दुकाने यांचाही बाजार सजला होता. मात्र त्या सर्वापेक्षा तरुण आणि शाळकरी पोर देखील आकर्षित होत होते ते मटक्याच्या बाजारात, जुगाराच्या अड्ड्यात ! गंमत म्हणजे हा जुगाराचा अड्डा भररस्त्यावर मांडलेला होता. ग्रामीण भागामध्ये चित्तर ओळखलं बक्षीस म्हणून तीन पाणी जुगार जो खेळला जातो, त्याचाही बाजार या यात्रेमध्ये मांडलेला दिसून येत होता. आध्यात्मिक क्षेत्रावर जर जुगाराचे क्षेत्र अशा पद्धतीने अतिक्रमण करून तरुणांना आणि शालेय विद्यार्थ्यांना देखील दिशाहीन बनवत असेल? तर त्याला जबाबदार कोण? पोलीस प्रशासन की जनता? यासंदर्भात ही विचार होणे गरजेचे आहे.  दुर्दैवाने कधी कधी एखादा शोध उत्कृष्ट लागला की त्या पोलिसांचे कौतुक केले जाते आणि स्वाभाविकच ते करणे जाणे गरजेचे असते. मात्र त्या कर्तबगारीच्या पदराडून अवैध धंद्याला जर कोणी खतपाणी घालत असेल. चक्क कायदा आणि सुव्यवस्थेला कोलदांडा घालून सर्वसामान्य नागरिकांची लूट चालवली जात असेल तर त्या संदर्भामध्ये शहाजी उमाप सारख्या संवेदनशील व्यक्तिमत्त्वाच्या अधिकाऱ्याने निश्चित लक्ष घालने गरजेचे आहे. त्यासोबतच त्यांच्या पथकातील जे अवैध धंदेवाल्यांचे खबरे म्हणून काम करत आहेत, त्यांच्या जागेवर तरुण आणि धाडसी पोलीस कर्मचाऱ्यांना संधी दिल्यास पथक अधिक मजबूत होईल. अगोदर गुन्हे शोधण्यासाठी पोलीस प्रशासन समाजातील काही होतकरूंना हाताशी धरून त्यांचा गुप्त बातमीदार म्हणून फायदा करून घेत होते. त्यांच्याकडून मिळणाऱ्या माहितीच्या आधारावर धाडी टाकल्या जात होत्या. मात्र आता अवैध धंदेवाले हुशार झाले आहेत, त्यांनीच पोलीस पथकातील काही कर्मचाऱ्यांना आपली बातमीदार म्हणून नेमले आहे. याचाही विचार होणे गरजेचे आहे.
    1
    जिल्ह्यात मटका, जुगार, गुटखा व अवैध मद्यविक्री बोकाळली!!,
पंधरा दिवसात ७५ गुन्हे दाखल!!
मटका किंग मुळे अवैध धंदे जोमात !!
थातूरमातूर कारवाई करत पोलीस गेले कोमात !!
लातूर (एल पी उगीले) वाढवणा हद्दीतील मटका किंग मुळे संपूर्ण जिल्ह्यामध्ये कायदा सुव्यवस्थेला धोका निर्माण झालेला असताना सुद्धा स्थानिक पोलीस मात्र त्या अवैध धंद्याला आळा घालण्याऐवजी खत पाणी घालत असल्याची ओरड होत आहे. ही ओरड पाहून पोलिसांनी चमकोगिरी करत थातुरमातूर कारवाई करून आपण किती कर्तबगार अधिकारी आहोत, त्याची टिमकी वाजवण्याचा प्रयत्न चालवला आहे. वास्तविक पाहता मटका किंग कोण? हे जगजाहीर असताना देखील, मुळावर घाव न घालता फांद्या तोडून पाने मोजण्याचे काम पोलीस प्रशासन करत आहेत. 
गंमत म्हणजे प्राधान्याने मटका किंग मुळे मटक्याला मोठ्या प्रमाणात जोर आला आहे. काही अधिकारी आणि चक्क जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे विशेष पथक तसेच पोलीस उपमहानिरीक्षकांचे पथक मधील काही कर्मचारी माझ्या खिशात आहेत, अशी भूमिका हा मटका किंग घेत असल्याचे बोलले जात आहे. 
पोलीस प्रशासनकडून आम्ही किती कर्तबगार आहोत हे दाखवण्यासाठी मटका खेळणाऱ्या किरकोळ जुगार्‍यावर गुन्हे दाखल करून आपली कर्तबगरी जनतेला  सांगण्याचा प्रयत्न चालवला आहे. मात्र प्रत्यक्षात पाणी कुठे मुरते? हे जनतेला माहित आहे. 
केवळ चमकोगिरीसाठीच धाडी चे नाट्य!!
पोलीस प्रशासनाच्या वतीने कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या तसेच लपून सुरू असलेल्या मटका, जुगार, गुटखा विक्री व अवैध मद्यविक्रीसारख्या समाजविघातक धंद्यांना आळा घालण्याच्या उद्देशाने लातूर जिल्हा पोलीस दल यांच्यामार्फत सातत्यपूर्ण, कठोर कारवाया राबविण्यात येत आहेत. अशी बतावणी केली जाते. वरिष्ठ अधिकाऱ्याला अंधारात ठेवून स्थानिक अधिकारी काय पापड बेलत आहेत? हे जनतेला माहित आहे. दुर्दैवाने जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे,  अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या ही गोष्ट लक्षात का येत नाही? याचे मोठे कोडे जनतेला पडले आहे.
केवळ पंधरा दिवसांमध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या आदेशान्वये व मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे तसेच स्थानिक गुन्हे शाखा यांच्या समन्वयाने अवैध धंद्यांविरुद्ध विशेष मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे.
दिनांक ०१ फेब्रुवारी २०२६ ते १५ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत अचानक धाडसत्रे, गुप्त माहितीच्या आधारे छापे, तसेच सतत गस्त व पाहणी मोहिमा राबविण्यात आल्या. सदरच्या एकत्रित कारवाईमध्ये मटका / जुगार व दारूबंदी कायद्यांतर्गत – २९ गुन्हे दाखल.अवैध मद्यविक्री प्रकरणी – ५३ गुन्हे दाखल.,गुटखा विक्री प्रकरणी – ०३ गुन्हे दाखल.,अशा एकूण ७५ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून या कारवाईत विविध प्रकारचा मुद्देमाल जसे की रोख रक्कम, जुगार साहित्य, अवैध मद्यसाठा, तसेच गुटखा साठा असा एकूण ₹ ९,९४,५१४/- (रुपये नऊ लाख चौ-याण्णव हजार पाचशे चौदा) किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जर पंधरा दिवसांमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात गुन्हे दाखल होत असतील तर हे अवैध धंदे लपून छपून चालतात असे म्हणणे हास्यास्पद होणार नाही का?
तरीही पोलीस अधिकारी म्हणतात," मी करतो मारल्यावानी तू कर रडल्यावानी"अशा पद्धतीने हे सर्व प्रकार चालू आहेत असे लोकांमध्ये बोलले जात आहे. केवळ पंधरा दिवसांमध्ये दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांतील आरोपींविरुद्ध संबंधित कायद्यांन्वये कठोर कारवाई करण्यात आलेली असून पुढील तपास सुरू आहे. तसेच संबंधित आरोपी भविष्यात पुन्हा अशा अवैध कृत्यांत सहभागी होऊ नयेत यासाठी त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई प्रस्तावित करण्यात येत आहे. प्रतिबंधक आदेशांचे उल्लंघन केल्यास त्यांच्याविरुद्ध आणखी कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
हद्दपारची कारवाई नावाला!!
गुन्हेगार थोड्याच दिवसात येतात गावाला !!
कित्येक पोलीस स्टेशन अंतर्गत जुगार खेळणाऱ्या गोरगरिबांना गुन्हेगार ठरवून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जातात, " जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही"असे म्हणतात, त्याप्रमाणे हे जुगारी पुन्हा पुन्हा जुगार खेळतात. ते कोण आहेत हे पोलिसांना पक्के माहीत असते. वरिष्ठाकडून अवैध धंद्याच्या विरोधामध्ये केसेस दाखल करा, असा फर्मान आला की ह्या गोरगरिबांना बकरे बनवून त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना हद्दपार केले जाते. मात्र ती हद्दपार किती थातूरमातूर असते हे पोलिसांना देखील चांगलेच माहिती आहे. कारण पुन्हा काही दिवसात तेच आरोपी तेच अद्द पार झालेले गुन्हेगार ठरवले गेलेले जुगारी गावात फिरताना आढळून येत असल्याची ही चर्चा हळी हंडरगुळी च बाजारात गावकरी करत आहेत.
पोलीस प्रशासन बेंबीच्या देठापासून ओरडून अशा कारवाया भविष्यातही अधिक तीव्रतेने व सातत्याने सुरू राहणार असून अवैध धंद्यांविरुद्धची ही मोहीम यापुढेही अधिक प्रभावीपणे सुरू राहणार आहे. असे सांगत असले तरी या अवैध धंद्याला खतपाणी कोण घालतो? हे पाहणे गरजेचे आहे.
पोलीस उपमहानिरीक्षकाच्या विशेष पथकातील अनेक कर्मचारी झारीतले शुक्राचार्य !
नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप हे पूर्वीपासून अवैध धंद्याच्या विरोधात असल्याची माहिती लातूरकरांना आहे. मात्र त्यांची लवकरच बदली होणार असल्याचे सांगत काही पोलिस अधिकारीच अवैध धंद्यांचा बाजार मांडत आहेत. गंमत म्हणजे हे अवैध धंदे थांबले पाहिजेत, अशा प्रामाणिक इच्छे खातर पोलीस उप महानिरीक्षकांनी विशेष पथके नेमली खरी, मात्र त्या पथकातील कित्येक कर्मचारी हे अवैध धंदेवाल्यांच्या खिशात असल्याची उघड उघड भाषा मटका किंग मुळे होते आहे. इतकेच नाही तर या पथकातील काही कर्मचारीच धाड टाकण्यासाठी येत असल्याची पूर्वकल्पना या अवैध धंदेवाल्याला देऊन, आम्हाला काही केसेस हवे आहेत. असे सांगून नाममात्र कारवाई करून निघून जातात. काही वेळेला अशा पोलिसांशी दोस्ती असलेल्या मटका किंग मुळे धाड ही केवळ त्या मटकेवाल्याच्या विरोधात फटका चालवणाऱ्या दुसऱ्या बुक्की पडत असते. असे मटका खेळणारेच बोलू लागले आहेत. त्यावरून दिव्याखाली अंधार तर नाही ना? याचा विचार पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी केला पाहिजे. थोड्याफार फरकाने तीच अवस्था जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या पथकाची झाली आहे असे म्हटले तर वावगे होणार नाही. 
एलसीबी कडे अनेकांचे लागले डोळे !!
तिथे असतात का हो लोण्याचे गोळे? 
लातूर जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या वतीने मध्यंतरीच्या काळात अत्यंत उत्कृष्ट कामगिरी झाली. मात्र या शाखेच्या ज्येष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हेगारांचा कर्दनकाळ म्हणून ओळखले जाणारे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांचा नांदेड परिक्षेत्रातील कार्यकाळ संपत आला आहे. एकतर त्यांना आणखी एक वर्षाचा वाढीव कार्यकाळ द्यावा अशी मागणी काही लोकांनी सुरू केली आहे. गंमत म्हणजे तेव्हापासूनच या अवैध धंद्यांना ऊत येऊ लागला आहे. इतकेच नाही तर काही अधिकारी आपली वर्णी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेवर कशी लागेल? त्या ठिकाणी जर घोडेबाजार होत असेल तर आपला कोण दलाल प्रभावीपणे काम करेल? कोणत्या राजकीय लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून आपले काम होऊ शकेल! याची शोध मोहीम अनेक पोलीस अधिकाऱ्यांनी सुरू केली आहे. त्यामुळे अवैध धद्याकडे
कोणाचे लक्ष नाही, उलट पक्षी हे अवैध धंदे असेच किंवा यापेक्षा अधिक जोमाने कसे चालतील? आणि त्याच्या बदल्यात आपल्याला काय फायदा होईल? याचे गणित घालण्यातही अनेक पोलीस अधिकारी मशगुल असल्याचे बोलले जात आहे. पोलीस दलातील जाहिरातल्या शुक्राचार्यांना शोधणे हेच खरे गरजेचे आहे. कारण गुन्हेगारांना पाठबळ देणारे खरे गुन्हेगार हेच लोक आहेत. त्यामुळे याचा शोध घेणे गरजेचे झाले आहे.
उदगीर ग्रामीण हद्द मटक्याची राजधानी !!
अवैध धंद्यालाही नाही कमी!!
उदगीर शहरासोबतच ग्रामीण हद्द मोठ्या प्रमाणात अवैध धद्याच्या माहेरघर झाले आहे. जिल्ह्यात सर्वात अधिक उत्पन्नाचा ठिकाण म्हणून उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन कडे पाहत असल्याने, जर या ठिकाणच्या पोलीस अधिकाऱ्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा मिळाली तर त्या पोलीस स्टेशन वर आपला हक्क सांगण्यासाठी ही काही पोलीस अधिकारी आमदार, खासदारांचे दरवाजे दिसत असल्याची चर्चा आहे. तर काहीजण पोलीस प्रशासनातील कर्तबगार दलालांच्याही मागे फिरत असल्याची चर्चा आहे. उदगीर शहर असेल ग्रामीण असेल किंवा वाढवणा असेल तशी ही पोलीस स्टेशन बरी आहेत, मात्र आता अवैध धंद्यासाठी ती अत्यंत उत्तम ठरू लागली आहेत. या भागामध्ये मोठ मोठ्या ठिकाणी का धाडी पडत नसतील? यासंदर्भात लोकांमध्ये चर्चा सुरू आहे. नेत्यांच्या मैत्रीच्या अडून चालणाऱ्या अवैध धंद्यांना किती दिवस पडद्याआड ठेवणार? किती दिवस नेत्यांचे बगलबच्चे सांभाळण्यासाठी अवैध धंद्याला आणि अवैध धंदे पडद्याअडून चालवणाऱ्यांना बळ देत राहणार? हा खरा प्रश्न आहे. कधीकाळी ऐतिहासिक शहर म्हणून नावाजलेले उदगीर, कधीकाळी शैक्षणिक क्षेत्रामध्ये मराठवाड्याचे पुणे म्हणून गौरवले जाणारे उदगीर, दुर्दैवाने आज अवैध धंद्याची राजधानी म्हणून ओळखली जाऊ लागली आहे. ही गोष्ट महाराष्ट्राचे युवा नेते अमित देशमुख यांनी चक्क जाहीर सभेतून बोलून दाखवल्यानंतर देखील या गोष्टीकडे प्रशासनाने दुर्लक्ष का केले असेल? त्यामागे काय गोडबंगाल असेल? या गोष्टी तपासण्याची गरज निर्माण झाली आहे. विशेषतः ज्यांना हे अवैध धंदे नको आहेत, अशा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तरी या गोष्टीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. अशी चर्चा आता उदगीर परिसरात चालू आहे.
वाढवणा हद्दीत तर भर जत्रेत अंदर बहार जुगाराला चांगलाच आला होता बहार !!
वाढवणा पोलीस स्टेशन हद्दीमधील गुडसूर या क्रांतिकारी गावामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही यात्रा मोठ्या उत्साहात भरली होती. आध्यात्मिक वारसा असलेल्या या यात्रेसाठी पंचक्रोशीतील लोक मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. पारंपारिक पद्धतीप्रमाणे कुस्त्याचे फडही रंगले होते. ग्रामीण भागातील लोकांचे आकर्षण ठरलेल्या अशा जत्रेतून छोटी छोटी कपड्याची दुकाने, ताजी मिठाई करून विकणारी दुकाने यांचाही बाजार सजला होता. मात्र त्या सर्वापेक्षा तरुण आणि शाळकरी पोर देखील आकर्षित होत होते ते मटक्याच्या बाजारात, जुगाराच्या अड्ड्यात ! गंमत म्हणजे हा जुगाराचा अड्डा भररस्त्यावर मांडलेला होता. ग्रामीण भागामध्ये चित्तर ओळखलं बक्षीस म्हणून तीन पाणी जुगार जो खेळला जातो, त्याचाही बाजार या यात्रेमध्ये मांडलेला दिसून येत होता. आध्यात्मिक क्षेत्रावर जर जुगाराचे क्षेत्र अशा पद्धतीने अतिक्रमण करून तरुणांना आणि शालेय विद्यार्थ्यांना देखील दिशाहीन बनवत असेल? तर त्याला जबाबदार कोण? पोलीस प्रशासन की जनता? यासंदर्भात ही विचार होणे गरजेचे आहे. 
दुर्दैवाने कधी कधी एखादा शोध उत्कृष्ट लागला की त्या पोलिसांचे कौतुक केले जाते आणि स्वाभाविकच ते करणे जाणे गरजेचे असते. मात्र त्या कर्तबगारीच्या पदराडून अवैध धंद्याला जर कोणी खतपाणी घालत असेल. चक्क कायदा आणि सुव्यवस्थेला कोलदांडा घालून सर्वसामान्य नागरिकांची लूट चालवली जात असेल तर त्या संदर्भामध्ये शहाजी उमाप सारख्या संवेदनशील व्यक्तिमत्त्वाच्या अधिकाऱ्याने निश्चित लक्ष घालने गरजेचे आहे. त्यासोबतच त्यांच्या पथकातील जे अवैध धंदेवाल्यांचे खबरे म्हणून काम करत आहेत, त्यांच्या जागेवर तरुण आणि धाडसी पोलीस कर्मचाऱ्यांना संधी दिल्यास पथक अधिक मजबूत होईल. अगोदर गुन्हे शोधण्यासाठी पोलीस प्रशासन समाजातील काही होतकरूंना हाताशी धरून त्यांचा गुप्त बातमीदार म्हणून फायदा करून घेत होते. त्यांच्याकडून मिळणाऱ्या माहितीच्या आधारावर धाडी टाकल्या जात होत्या. मात्र आता अवैध धंदेवाले हुशार झाले आहेत, त्यांनीच पोलीस पथकातील काही कर्मचाऱ्यांना आपली बातमीदार म्हणून नेमले आहे. याचाही विचार होणे गरजेचे आहे.
    user_Laxman Ugile
    Laxman Ugile
    उदगीर, लातूर, महाराष्ट्र•
    2 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.