नवीन शर्ती'च्या जमिनीचे बेकायदेशीर हस्तांतरण करून शासनाची फसवणूक करणाऱ्या भूमाफियांना महसूल खात्याने दिला जोरदार दणका! मालेगाव महानगरपालिका हद्दीतील संगमेश्वर भागातील 'नवीन शर्ती'च्या जमिनीचे बेकायदेशीर हस्तांतरण करून शासनाची फसवणूक करणाऱ्या भूमाफियांना महसूल खात्याने जोरदार दणका दिला आहे. जमीन अदलाबदल व्यवहार बेकायदेशीर ठरविण्याचा विभागीय आयुक्तांचा आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही कायम ठेवला आहे. या निर्णयानंतर महसूल प्रशासनाने तातडीने पावले उचलत वादग्रस्त जमिनीच्या ७/१२ उताऱ्यावर पूर्ववत मूळ मालकांची नावे नोंदवण्याची कारवाई केली आहे. या निर्णयामुळे भूमाफियांचे धाबे दणाणले आहे. सन २०१३ मध्ये संगमेश्वर शिवारातील सर्वे नंबर ११४ 'अ' मधील ४.५५ हेक्टर क्षेत्र आणि तालुक्यातील गुगुळवाड येथील गट नंबर ३५३ मधील ४.६१ हेक्टर क्षेत्र, या दोन्ही जमिनींची नियमबाह्यरीत्या अदलाबदल करण्यात आली होती. तत्कालीन प्रांताधिकाऱ्यांनी या व्यवहारास परवानगी दिली होती आणि त्यानुसार दुय्यम निबंधक कार्यालयात त्याची नोंदणीही झाली होती. मात्र, सरकारी नियमानुसार संबंधित जमिनी सलग खंडात नसल्यामुळे त्यांची अदलाबदल करण्याचा हा व्यवहार पूर्णपणे बेकायदेशीर ठरत असल्याची तक्रार झाली होती. या तक्रारीच्या आधारे अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी २०२३ मध्ये प्रांताधिकाऱ्यांचा परवानगी आदेश रद्द केला होता. या विरोधात संबंधितांनी विभागीय आयुक्तांकडे आणि पुढे महसूल मंत्र्यांकडे अपील केले, मात्र या दोन्ही ठिकाणी अदलाबदल व्यवहार बेकायदेशीर ठरवण्याचा निर्णय कायम ठेवण्यात आला. या बेकायदेशीर अदलाबदलीनंतर संगमेश्वरातील 'ग्रीन झोन' (हरित पट्टा) असलेल्या शेतजमिनीचा वापर कोणतीही परवानगी न घेता रहिवासासाठी बदलण्यात आला. तुकडेबंदी कायद्याचे थेट उल्लंघन करत या जमिनीचे छोटे तुकडे पाडण्यात आले आणि तब्बल १६४ जणांना 'बैल गोठा' या नावाने हे भूखंड विक्री केले गेले. तसेच शासनाचा आवश्यक नजराणा न भरता या सर्व खरेदीखतांची नोंदणी करण्यात आली, ज्यामुळे शासनाचा करोडो रुपयांचा महसूल बुडाल्याची तक्रार करण्यात आली होती. मध्यंतरी यासंदर्भात विधिमंडळात लक्षवेधी मांडल्यानंतर या संपूर्ण घोटाळ्याची वरिष्ठ पातळीवरून चौकशी सुरू झाली. चौकशीत निष्काळजीपणा आणि गैरव्यवहाराचा ठपका ठेवत तत्कालीन उपविभागीय अधिकारी उदय किसवे यांना निलंबित करण्यात आले होते, तर विनापरवानगी दस्त नोंदणी करणाऱ्या दुय्यम निबंधक कार्यालयातील ८ अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाच्या कारवाईची टांगती तलवार आहे.

- येवला विंचूर चौफुलीवर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत ५० वर्षीय महिला जागीच ठार येवला विंचूर चौफुलीवर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत ५० वर्षीय महिला जागीच ठार येवला: येवला शहरातील विंचूर चौफुली पोलीस चौकीसमोर रस्ता ओलांडताना भरधाव ट्रकच्या धडकेत निर्मला बाळासाहेब भिसे (वय ५०, रा. पैलवान गल्ली, येवला) या महिलेचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेनंतर स्थानिकांनी तातडीने धाव घेत मृतदेह येवला उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला. याप्रकरणी येवला शहर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या अपघातानंतर स्थानिक नागरिकांमधून प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे. विंचूर चौफुली ते फत्तेबुरुज नाका परिसरात रस्त्यावर एकही दिशाफलक (Signboard) लावण्यात आलेला नाही. परिणामी, चालकांना अचानक ब्रेक मारावे लागतात किंवा वाहने मागे-पुढे करावी लागतात, ज्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळेच एका निष्पाप महिलेचा जीव गेल्याचा आरोप स्थानिकांनी केला असून, चौफुलीवर तातडीने दिशाफलक बसवण्याची जोरदार मागणी होत आहे. ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला1
- Post by लोखंडे संभाजी नगर पत्रकार1
- वणी ता दिंडोरी येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी दिंडोरी तालुक्यातील वनी येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळेस प्रमुख पाहुणे म्हणून लोकनेते सरपंच मधुकर भरसट उपसरपंच विलास आबा कड ; किरण गांगुर्डे सामाजिक कार्यकर्ते सागर चौधरी ;रवी भाऊ सोनवणे पोलीस प्रशासनाच्या वतीने ग्रेड पीएसआय सोनवणे व पोलीस हवालदार बागुल आदी मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते . यावेळेस महामानवांना पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यावर्षी प्रथमच लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी केल्याने कार्यकर्त्यांचे वनी ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य किरण गांगुर्डे यांनी कौतुक केले यावेळेस परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते . जागर जनस्थान साठी शामराव सोनवणे दिंडोरी1
- भूकंपाच्या पार्श्वभूमीवर खासदार भास्कर भगरे यांची सराड आश्रमशाळेत पाहणी भूकंपाच्या पार्श्वभूमीवर खासदार भास्कर भगरे यांची सराड आश्रमशाळेत पाहणी बोरगाव : सुरगाणा तालुक्यातील बोरगाव परिसरात जाणवलेल्या भूकंपाच्या सौम्य धक्क्यांच्या पार्श्वभूमीवर दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भास्कर भगरे यांनी शासकीय आश्रमशाळा सराड येथे भेट देऊन शाळेच्या इमारतीची तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची पाहणी केली. भूकंपाच्या धक्क्यांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, शासकीय आश्रमशाळा सराड येथे मोठ्या संख्येने विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या पार्श्वभूमीवर खासदार भगरे यांनी शाळेत प्रत्यक्ष भेट देत विद्यार्थ्यांचे निवासस्थान तसेच इमारतीची पाहणी केली. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत शिक्षक व शाळा प्रशासनाकडून माहिती घेतली.यावेळी सुरगाण्याचे तहसीलदार रामजी राठोड, सराडचे सरपंच नामदेव भोये, जनार्दन भोये, हरिभाऊ भोये यांच्यासह ग्रामस्थ व संबंधित अधिकारी उपस्थित होते भूकंपाच्या पार्श्वभूमीवर शाळेच्या इमारतीची तांत्रिक तपासणी करून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. विद्यार्थ्यांनी घाबरून न जाता काळजी घेण्याचे आवाहनही करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वाधिक प्राधान्य देण्यात यावे, अशी भूमिका यावेळी खासदार भगरे यांनी व्यक्त केली. भूकंपाच्या धक्क्यानंतर खासदारांनी शाळेला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केल्याने विद्यार्थी, शिक्षक तसेच पालकांमध्ये काही प्रमाणात दिलासाचे वातावरण निर्माण झाले आहे.1
- फुलंब्रीत बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट! कारवाईसाठी ३ ऑगस्टपासून आमरण उपोषणाचा इशारा1
- अमळनेरात अतिवृष्टीचा कहर 😱 | बोरि नदीला पूर | आमदार अनिल पाटील यांचे मोठे आवाहन अमळनेरात अतिवृष्टीचा कहर 😱 | बोरि नदीला पूर | आमदार अनिल पाटील यांचे मोठे आवाहन अमळनेरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे बोरि नदी आणि नाल्यांना पूर आला असून अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. या पार्श्वभूमीवर आमदार अनिल भाईदास पाटील यांनी नागरिकांना घाबरू नका, पण सतर्क राहा असे आवाहन केले आहे. पूरस्थितीत प्रशासन सज्ज असून मदतकार्य सुरू आहे. जयनिल फाऊंडेशनकडून अन्न व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांनी सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे आणि आवश्यक असल्यास प्रशासनाशी संपर्क साधावा. 👉 अशा ताज्या बातम्यांसाठी चॅनलला Subscribe करा, Like करा आणि Share करा. #AmalnerFlood #RainAlert #MaharashtraRain #FloodNews #BreakingNews #AnilPatil #HeavyRain #BoriRiver #MaharashtraNews #LiveNews #WeatherUpdate #FloodAlert #ViralNews #IndiaNews #Amalner1