Shuru
Apke Nagar Ki App…
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विधानपरिषद आमदार अंबादास दानवे यांनी विधानपरिषदेत बोलताना विविध तथाकथित "भोंदू बाबा" प्रकरणांचा उल्लेख करत जोरदार टीका केली आहे. दानवे यांनी सभागृहात थेट बागेश्वर बाबा, अशोक खरात आणि नयन पद्मसागर यांच्या नावांचा उल्लेख करत त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला. अंधश्रद्धा आणि अशा प्रवृत्तींवर कडक कारवाई करण्याची गरज असल्याचे त्यांनी सभागृहात ठामपणे मांडले. दरम्यान, भोंदू बाबांच्या विरोधात विधानपरिषदेत आमदार अंबादास दानवे यांनी केलेल्या या आक्रमक भाषणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
Marathi News Point
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विधानपरिषद आमदार अंबादास दानवे यांनी विधानपरिषदेत बोलताना विविध तथाकथित "भोंदू बाबा" प्रकरणांचा उल्लेख करत जोरदार टीका केली आहे. दानवे यांनी सभागृहात थेट बागेश्वर बाबा, अशोक खरात आणि नयन पद्मसागर यांच्या नावांचा उल्लेख करत त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला. अंधश्रद्धा आणि अशा प्रवृत्तींवर कडक कारवाई करण्याची गरज असल्याचे त्यांनी सभागृहात ठामपणे मांडले. दरम्यान, भोंदू बाबांच्या विरोधात विधानपरिषदेत आमदार अंबादास दानवे यांनी केलेल्या या आक्रमक भाषणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- औरंगाबादमध्ये एमआयएमचे (AIMIM) शहर अध्यक्ष नासेर सिद्दीकी यांचे एक कॉल रेकॉर्डिंग सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहे. या व्हायरल कॉल रेकॉर्डिंगमुळे औरंगाबादच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे.1
- नाथनगर–वडखा–वरझडी या मार्गाची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याने संतप्त झालेल्या स्थानिक तरुणांनी स्वतः पुढाकार घेत या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू केले आहे. "राजकीय नेत्यांना फक्त निवडणुकीत मते मागण्यासाठीच गाव आठवते का?" असा संतप्त सवाल स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला असून लोकप्रतिनिधींच्या या भूमिकेबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या रस्त्यावरून दररोज शेंद्रा एमआयडीसीमध्ये कामासाठी जाणारे हजारो कामगार प्रवास करतात. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत असून अपघाताचा धोका प्रचंड वाढला आहे, विशेषतः पावसाळ्यात येथील प्रवास अत्यंत धोकादायक बनला आहे. नाथनगर, वडखा, वरझडी, बनगाव, गेवराई, गेवराई-२, आडगाव, लिंगदरी, दोनवाडा, खामखेडा, पिरवाडी, हालदुला आणि अजिंडव या सुमारे १२ ते १३ गावांतील नागरिक आणि शेंद्रा एमआयडीसीतील कामगार दररोज याच मार्गाचा वापर करतात. अनेक वेळा मागणी करूनही रस्त्याची दुरुस्ती न झाल्याने अखेर तरुणांनी स्वतःच हे काम हाती घेतले. स्थानिक नागरिकांनी आता प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडे या रस्त्याची तातडीने आणि कायमस्वरूपी दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. निवडणुकीच्या वेळी केवळ आश्वासने देणाऱ्या लोकप्रतिनिधींनी आता प्रत्यक्ष काम करून दाखवावे, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली असून, मागणी पूर्ण न झाल्यास येत्या काळात तीव्र लोकआंदोलन छेडण्याचा इशाराही दिला आहे.2
- छत्रपती संभाजी नगरचे खासदार संदिपान भुमरे साहेब यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे.1
- छत्रपती संभाजीनगर औरंगाबादमध्ये एका डॉनच्या घरात प्रचंड मोठी रक्कम सापडली आहे. या घरात मिळालेली रक्कम एवढी अफाट आहे की पोलिसांना ती मोजण्यासाठी तब्बल १४ तास लागले. पोलीस ५ मशीनच्या साहाय्याने या सापडलेल्या रकमेची मोजणी करत होते.1
- छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील भवन येथे सध्या अवैध वृक्षतोड जोरात सुरू आहे. छत्रपती संभाजी नगर-जळगाव महामार्गावरील वड आणि लिंबांच्या झाडांची सर्रास तोड सुरू असून याकडे वनविभागाच्या अधिकाऱ्यांचे साफ दुर्लक्ष होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. या बेकायदेशीर वृक्षतोडीबाबत वन विभागाच्या अधिकाऱ्यांना आधीच माहिती देण्यात आली आहे, तरीही त्यांनी कोणतीही कारवाई केलेली नाही. वन विभागाच्या या निष्क्रीयतेमुळे सिल्लोड तालुक्यातील भवन येथे वृक्षतोड जोमात आणि वन विभाग कोमात गेल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.1
- औरंगाबादमध्ये आमदार अब्दुल सत्तार यांच्या कार्यपद्धती आणि विकासकामांबाबत विरोधकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. विकासाचा लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचला नसून, तो केवळ काही मोजक्याच व्यक्तींना मिळाल्याचा आरोप करत विरोधकांनी सत्तार यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी आणि निषेध नोंदविला. या आंदोलनादरम्यान आंदोलकांनी विविध कथित गैरव्यवहारांची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी देखील केली आहे. दरम्यान, विरोधकांकडून झालेल्या या आरोपांवर आमदार अब्दुल सत्तार किंवा त्यांच्या कार्यालयाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही।1
- पैठण तालुक्यातील कडेठाण येथे शेतातून डाळिंब चोरी केल्याच्या संशयावरून एका पुरुषाला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या मारहाणीत संबंधित व्यक्ती जखमी झाली असून, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही नेमकी घटना कशामुळे घडली याचा तपास सध्या सुरू असून, कायदा हातात घेणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली जात आहे.1