भीषण स्फोट; कामगाराच्या पायाचे तुकडे, गंधक वाहतुकीवर प्रश्नचिन्ह सोलापुरात भीषण स्फोट; कामगाराच्या पायाचे तुकडे, गंधक वाहतुकीवर प्रश्नचिन्ह जुनी मिल कंपाऊंड परिसरातील घटना; साहित्य वाहनात ठेवताना झाला स्फोट सोलापूर शहरातील जुनी मिल कंपाऊंड परिसरात सोमवारी सायंकाळी झालेल्या भीषण स्फोटात एका कामगाराचा पाय गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली. सहारा गन हाऊस येथील साहित्य वाहनात ठेवताना हा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार, केदारनाथ सिद्धाप्पा छत्रे (वय ५३) असे जखमी कामगाराचे नाव असून ते सहारा गन हाऊस येथे काम करत होते. जुनी मिल कंपाऊंड परिसरातील रोडलगतच्या शॉपिंग सेंटरमध्ये संबंधित दुकान असून तेथून एमएच ४५ एन ३८१३ क्रमांकाच्या वाहनातून साहित्य वाहतूक केली जात होती. सायंकाळी साधारण ६ वाजून २१ मिनिटांच्या सुमारास केदारनाथ छत्रे हे साहित्य वाहनाच्या डिकीत ठेवत असताना अचानक साहित्य खाली पडले आणि मोठा स्फोट झाला. या भीषण स्फोटात त्यांच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, स्फोटाचा आवाज मोठा असल्याने परिसरातील नागरिक घाबरून बाहेर आले. घटनेनंतर काही काळ मदत यंत्रणा घटनास्थळी पोहोचली नसल्याचे सांगण्यात येत आहे. राज सलगर यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमी कामगाराला आपल्या वाहनातून सोलापूर शासकीय रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक माहितीनुसार, संबंधित साहित्यामध्ये गंधक असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. गंधक हा ज्वलनशील पदार्थ मानला जात असल्याने अशा प्रकारच्या साहित्याची वाहतूक आणि साठवणूक नियमांनुसार करण्यात आली होती का, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. दरम्यान, पोलिस व संबंधित यंत्रणांकडून घटनेचा पुढील तपास सुरू असून स्फोटाचे नेमके कारण शोधले जात आहे.

- लग्नाचा मंडप पेटला ; वाऱ्याने टेन्ट उडून विजेच्या तारांवर ! टेन्टसह काही दुचाकींना आग लग्नाचा मंडप पेटला ; वाऱ्याने टेन्ट उडून विजेच्या तारांवर कंडारी गावातील घटना; टेन्टसह काही दुचाकींना आग, लग्नसोहळ्यात एकच गोंधळ.. बुलडाणा जिल्ह्यातील कंडारी येथे एका लग्नसोहळ्यात रविवारी मन हेलावून टाकणारी घटना घडली. बदलत्या हवामानामुळे आणि अचानक वाढलेल्या जोरदार वाऱ्यामुळे लग्नासाठी उभारण्यात आलेला टेन्ट उडून वरून गेलेल्या विद्युत तारांवर जाऊन अडकला. यानंतर झालेल्या शॉर्टसर्किटमुळे टेन्टने क्षणार्धात पेट घेतल्याने लग्नसोहळ्यात एकच गोंधळ उडाला.1
- अकरा वर्षांपूर्वी हरवलेला मुलगा अखेर सापडला, जालना स्थानिक गुन्हे शाखा पथकाच्या कामगिरीला यश* अकरा वर्षांपूर्वी हरवलेला मुलगा अखेर सापडला, जालना स्थानिक गुन्हे शाखा पथकाच्या कामगिरीला यश *रोचक आणि चालु घडामोडी, प्रशासन, राजकिय, शेती विषयक, आरोग्य विषयक सर्व बातम्या आणि जाहिरातीसाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि अपडेट मिळवण्यासाठी 🔔आयकॉन ला प्रेस करा!!!* *बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क क्रमांक Adil khan- 9552440288* *Like.... share.... subscribe ✍️*1
- मंठा तालुक्यातील आवलगाव येथील मारोती तांबे यांनी ग्रामपंचायतीच्या विकासकामांमध्ये मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप करत बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आहे. कामे न करता बिले काढल्याचा त्यांचा दावा असून, दोन महिने तक्रारीची दखल न घेतल्याने ते ११ मेपासून गावातील सांडपाण्याच्या नालीत बसून आंदोलन करणार आहेत. चौकशी न झाल्यास प्रशासनाला गंभीर परिणामांची जबाबदारी घ्यावी लागेल, असे त्यांनी म्हटले आहे.1
- जालना जिल्ह्यातील मनथा येथे ग्रामपंचायत अधिकाऱ्यांवर कारवाईच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला आज ११ दिवस पूर्ण झाले. आंदोलकांनी पत्रांचा 'तमाशा' होऊनही प्रशासन अधिकाऱ्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप केला आहे. आज संध्याकाळपर्यंत निर्णय न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.1
- सोनपेठ येथे बाल संस्कार शिबिराला सुरुवात गुरु नंदकिशोर येथे बाल संस्कार शिबिर1
- वडवणी तहसील कार्यालय वार्यावर सकाळी ११ वाजेपर्यंत तहसील कार्यालयात तहसीलदार, नायब तहसीलदार, महसूल अधिकारी इतर कर्मचारी गैरहजर1
- कांनापूर गावातील रस्ता बनण्यात आला आहे आणि रस्त्यावर डायट बसविण्यात आली आहे आणि तिला खराब झाली आहे तर लाईटीसाठी बसवायला जेवढे पैसे लागतील तेवढे तुम्ही तर का नाईटी ला लागणार आहेत पाच हजार रुपये आणि ते रोडचं काम आहे रोडच्या कामाला लागणार आहे दहा हजार रुपये टोटल 15000 रुपये लागणार आहे माझी विनंती सरकारने हे पैसे द्यावा जरा सरकार पैसे देत असते तर नंबर 78 75 40 57 ७५ आणि नालीचा बी काम करायचं आहे1
- जालन्यात मोसंबी बागेवर शेतकऱ्याने चालवली कुऱ्हाड...200 झाडे शेतकऱ्याने कुऱ्हाडीने केली उध्वस्त... जालन्यात मोसंबी बागेवर शेतकऱ्याने चालवली कुऱ्हाड... घनसावंगी तालुक्यातील घोन्सी बुद्रुक येथील शेतकऱ्याने आपली एक एकरातील मोसंबी बाग कुऱ्हाडीने तोडली... एक एकरातील मोसंबीची 200 झाडे शेतकऱ्याने कुऱ्हाडीने केली उध्वस्त...1