logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरासाठीचा निधी औरंगजेबाच्या कबरीला दिल्या जाणाऱ्या निधीपेक्षा कमी असल्याचा दावा हिंदु जनजागृती समितीने केला आहे. या धक्कादायक तुलनेमुळे राज्यभरात तीव्र संताप आणि प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

23 hrs ago
user_Kiran Mali
Kiran Mali
Local News Reporter धरणगाव, जळगाव, महाराष्ट्र•
23 hrs ago

महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरासाठीचा निधी औरंगजेबाच्या कबरीला दिल्या जाणाऱ्या निधीपेक्षा कमी असल्याचा दावा हिंदु जनजागृती समितीने केला आहे. या धक्कादायक तुलनेमुळे राज्यभरात तीव्र संताप आणि प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाकडून देवस्थान इनाम जमिनी आणि मंदिरांच्या अन्य जमिनी कुळांना किंवा वहिवाटदारांना हस्तांतरित करण्यासाठी नवीन कायदा प्रस्तावित येत आहे. या धोरणाला महाराष्ट्र मंदिर महासंघाने कडाडून विरोध दर्शवला आहे. त्यांनी ही कृती हिंदू देवस्थानांचे अस्तित्व संपवून भूमाफियांचे खिसे भरण्याचा डाव असल्याचा संशय व्यक्त करत, शासनाने हा बेकायदेशीर आणि अन्यायकारक मसुदा तात्काळ मागे घ्यावा, अशी मागणी केली आहे. अन्यथा राज्यभर मंदिरांच्या वतीने तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा महाराष्ट्र मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक श्री. सुनील घनवट यांनी जळगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिला. यावेळी सविस्तर भूमिका मांडताना श्री. सुनील घनवट यांनी स्पष्ट केले की, भारतीय कायद्यानुसार हिंदू देवता (मूर्ती) ही एक ‘कायदेशीर व्यक्ती’ असल्याने देवस्थानच्या मालमत्तेचा मूळ मालक ‘देव’ असतो. महाराष्ट्र राज्य सरकार, ‘महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५०’ अन्वये केवळ नियामक, प्रशासकीय आणि आर्थिक अधिकारांच्या माध्यमातून सार्वजनिक मंदिरांवर नियंत्रण ठेवते. त्यामुळे विश्वस्तांना व शासनाला देवस्थानांच्या मूळ मालकाची जमीन परस्पर त्रयस्थांना किंवा वहिवाटदारांना वाटण्याचा कोणताही अधिकार नाही. सर्वोच्च आणि उच्च न्यायालयांच्या प्रस्थापित निकालांनुसार देवस्थान जमिनींवर कुळांना मालकी हक्क सांगता येत नाही. असे असतानाही हा कायदा आणणे हे संविधानाच्या कलम २५, २६ आणि ३००-अ मधील मूलभूत अधिकारांचे थेट उल्लंघन असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मंदिर महासंघाचे श्री. निळकंठ चौधरी यांनी मंदिर आणि वक्फ प्रॉपर्टीबाबत शासनाच्या दुजाभावावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. शासनाने १३ एप्रिल २०१६ रोजी परिपत्रक काढून वक्फ मालमत्तांच्या ७/१२ उताऱ्यावर "वक्फ प्रतिबंधित सत्ता प्रकार" अशी नोंद घेण्याचे स्पष्ट निर्देश दिले असताना, हिंदू देवस्थानांच्या जमिनी वहिवाटदारांच्या घशात का घातल्या जात आहेत, असा सवाल त्यांनी केला. हा राज्यघटनेच्या समानतेच्या (कलम १४) तत्त्वाचा उघड भंग असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. तसेच, ‘महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम’मधील कलम ८८ ब/ १२९ ब नुसार देवस्थान जमिनींना कुळ कायद्यातून आधीच संरक्षण मिळाले आहे. या मूळ कायद्याचे संरक्षण डावलून, विकासाच्या नावाखाली मोक्याच्या जमिनी बिल्डर आणि भूमाफियांच्या घशात घालण्याचा हा छुपा प्रयत्न असून, ज्यामुळे मंदिरांची आर्थिक स्वायत्तता धोक्यात येईल, अशी भीती व्यक्त करण्यात आली. महाराष्ट्र मंदिर महासंघाने शासनाकडे ५ प्रमुख मागण्या केल्या आहेत: १. देवस्थान इनाम व देवस्थानच्या जमिनी कुळे/वहिवाटदारांना हस्तांतरित करण्यासंदर्भातील प्रस्तावित कायद्याचा मसुदा तात्काळ आणि कायमस्वरूपी मागे घ्यावा. २. वक्फ प्रमाणे संरक्षण देऊन हिंदू देवस्थानांच्या सर्व जमिनींच्या ७/१२ उताऱ्यावर "देवस्थान प्रतिबंधित सत्ता प्रकार - अहस्तांतरणीय" अशी स्पष्ट नोंद घेण्याचे परिपत्रक शासनाने तात्काळ काढावे. ३. गुजरात राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्रात कठोर 'अँटी लँड ग्रॅबिंग कायदा' लागू करावा आणि देवस्थान जमीन हडपणाऱ्यांना १४ वर्षे सश्रम कारावास आणि अजामीनपात्र शिक्षेची तरतूद करावी. ४. मागील २५ वर्षांतील सर्व देवस्थान जमिनींचे हस्तांतरण, बोगस नोंदी आणि अतिक्रमणांची सखोल चौकशी करण्यासाठी उच्चपदस्थ सनदी अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक (SIT) स्थापन करावी. ५. देवस्थान जमिनींबाबत महसूली आणि दिवाणी न्यायालयांत प्रलंबित असलेले वाद त्वरित निकाली काढण्यासाठी विशेष जलदगती न्यायालये स्थापन करून ६ महिन्यात खटले निकाली काढावेत. यावेळी स्वामी नारायण मंदिराचे श्री. नयन स्वामी महाराज यांनी मंदिरांच्या मालकीच्या अनेक एकर जमिनी हडपण्याचा उद्देश असलेल्या वहिवाटदारांवर कर्नाटक, गुजरात प्रमाणे कठोर कारवाई करण्याची मागणी केली. सनातन संस्थेचे सद्गुरू नंदकुमार जाधव यांनी सांगितले की, देवस्थान जमिनी केवळ महसुली दप्तरातील आकडेवारी नसून, त्या महाराष्ट्राच्या संस्कृती, श्रद्धा आणि समाजजीवनाचा मूळ आधार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श समोर ठेवून शासनाने धर्मदाय मालमत्तांचे ‘विश्वस्त’ म्हणून रक्षण करावे आणि मंदिराच्या कारभारात प्रशासकीय हस्तक्षेप करू नये. या वस्तुनिष्ठ आणि कायदेशीर बाबींकडे दुर्लक्ष करून हा कायदा लादण्याचा प्रयत्न झाल्यास, राज्यभरातील सकल हिंदू समाज, सर्व मंदिरे, भाविक, पुरोहित, पुजारी आणि विविध हिंदू, सामाजिक व आध्यात्मिक संघटना एकत्र येऊन तीव्र आंदोलन करतील, असा त्यांनी इशारा दिला. त्यांनी हिंदुत्ववादी शासनाने मंदिरांच्या मागण्यांचा तातडीने विचार करण्याची मागणी केली.
    1
    महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाकडून देवस्थान इनाम जमिनी आणि मंदिरांच्या अन्य जमिनी कुळांना किंवा वहिवाटदारांना हस्तांतरित करण्यासाठी नवीन कायदा प्रस्तावित येत आहे. या धोरणाला महाराष्ट्र मंदिर महासंघाने कडाडून विरोध दर्शवला आहे. त्यांनी ही कृती हिंदू देवस्थानांचे अस्तित्व संपवून भूमाफियांचे खिसे भरण्याचा डाव असल्याचा संशय व्यक्त करत, शासनाने हा बेकायदेशीर आणि अन्यायकारक मसुदा तात्काळ मागे घ्यावा, अशी मागणी केली आहे. अन्यथा राज्यभर मंदिरांच्या वतीने तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा महाराष्ट्र मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक श्री. सुनील घनवट यांनी जळगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिला.

यावेळी सविस्तर भूमिका मांडताना श्री. सुनील घनवट यांनी स्पष्ट केले की, भारतीय कायद्यानुसार हिंदू देवता (मूर्ती) ही एक ‘कायदेशीर व्यक्ती’ असल्याने देवस्थानच्या मालमत्तेचा मूळ मालक ‘देव’ असतो. महाराष्ट्र राज्य सरकार, ‘महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५०’ अन्वये केवळ नियामक, प्रशासकीय आणि आर्थिक अधिकारांच्या माध्यमातून सार्वजनिक मंदिरांवर नियंत्रण ठेवते. त्यामुळे विश्वस्तांना व शासनाला देवस्थानांच्या मूळ मालकाची जमीन परस्पर त्रयस्थांना किंवा वहिवाटदारांना वाटण्याचा कोणताही अधिकार नाही. सर्वोच्च आणि उच्च न्यायालयांच्या प्रस्थापित निकालांनुसार देवस्थान जमिनींवर कुळांना मालकी हक्क सांगता येत नाही. असे असतानाही हा कायदा आणणे हे संविधानाच्या कलम २५, २६ आणि ३००-अ मधील मूलभूत अधिकारांचे थेट उल्लंघन असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

मंदिर महासंघाचे श्री. निळकंठ चौधरी यांनी मंदिर आणि वक्फ प्रॉपर्टीबाबत शासनाच्या दुजाभावावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. शासनाने १३ एप्रिल २०१६ रोजी परिपत्रक काढून वक्फ मालमत्तांच्या ७/१२ उताऱ्यावर "वक्फ प्रतिबंधित सत्ता प्रकार" अशी नोंद घेण्याचे स्पष्ट निर्देश दिले असताना, हिंदू देवस्थानांच्या जमिनी वहिवाटदारांच्या घशात का घातल्या जात आहेत, असा सवाल त्यांनी केला. हा राज्यघटनेच्या समानतेच्या (कलम १४) तत्त्वाचा उघड भंग असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. तसेच, ‘महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम’मधील कलम ८८ ब/ १२९ ब नुसार देवस्थान जमिनींना कुळ कायद्यातून आधीच संरक्षण मिळाले आहे. या मूळ कायद्याचे संरक्षण डावलून, विकासाच्या नावाखाली मोक्याच्या जमिनी बिल्डर आणि भूमाफियांच्या घशात घालण्याचा हा छुपा प्रयत्न असून, ज्यामुळे मंदिरांची आर्थिक स्वायत्तता धोक्यात येईल, अशी भीती व्यक्त करण्यात आली.

महाराष्ट्र मंदिर महासंघाने शासनाकडे ५ प्रमुख मागण्या केल्या आहेत: १. देवस्थान इनाम व देवस्थानच्या जमिनी कुळे/वहिवाटदारांना हस्तांतरित करण्यासंदर्भातील प्रस्तावित कायद्याचा मसुदा तात्काळ आणि कायमस्वरूपी मागे घ्यावा. २. वक्फ प्रमाणे संरक्षण देऊन हिंदू देवस्थानांच्या सर्व जमिनींच्या ७/१२ उताऱ्यावर "देवस्थान प्रतिबंधित सत्ता प्रकार - अहस्तांतरणीय" अशी स्पष्ट नोंद घेण्याचे परिपत्रक शासनाने तात्काळ काढावे. ३. गुजरात राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्रात कठोर 'अँटी लँड ग्रॅबिंग कायदा' लागू करावा आणि देवस्थान जमीन हडपणाऱ्यांना १४ वर्षे सश्रम कारावास आणि अजामीनपात्र शिक्षेची तरतूद करावी. ४. मागील २५ वर्षांतील सर्व देवस्थान जमिनींचे हस्तांतरण, बोगस नोंदी आणि अतिक्रमणांची सखोल चौकशी करण्यासाठी उच्चपदस्थ सनदी अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक (SIT) स्थापन करावी. ५. देवस्थान जमिनींबाबत महसूली आणि दिवाणी न्यायालयांत प्रलंबित असलेले वाद त्वरित निकाली काढण्यासाठी विशेष जलदगती न्यायालये स्थापन करून ६ महिन्यात खटले निकाली काढावेत.

यावेळी स्वामी नारायण मंदिराचे श्री. नयन स्वामी महाराज यांनी मंदिरांच्या मालकीच्या अनेक एकर जमिनी हडपण्याचा उद्देश असलेल्या वहिवाटदारांवर कर्नाटक, गुजरात प्रमाणे कठोर कारवाई करण्याची मागणी केली. सनातन संस्थेचे सद्गुरू नंदकुमार जाधव यांनी सांगितले की, देवस्थान जमिनी केवळ महसुली दप्तरातील आकडेवारी नसून, त्या महाराष्ट्राच्या संस्कृती, श्रद्धा आणि समाजजीवनाचा मूळ आधार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श समोर ठेवून शासनाने धर्मदाय मालमत्तांचे ‘विश्वस्त’ म्हणून रक्षण करावे आणि मंदिराच्या कारभारात प्रशासकीय हस्तक्षेप करू नये. या वस्तुनिष्ठ आणि कायदेशीर बाबींकडे दुर्लक्ष करून हा कायदा लादण्याचा प्रयत्न झाल्यास, राज्यभरातील सकल हिंदू समाज, सर्व मंदिरे, भाविक, पुरोहित, पुजारी आणि विविध हिंदू, सामाजिक व आध्यात्मिक संघटना एकत्र येऊन तीव्र आंदोलन करतील, असा त्यांनी इशारा दिला. त्यांनी हिंदुत्ववादी शासनाने मंदिरांच्या मागण्यांचा तातडीने विचार करण्याची मागणी केली.
    user_Kiran Mali
    Kiran Mali
    Local News Reporter धरणगाव, जळगाव, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून दहशत माजवून चार महिलांचा जीव घेणारी टी-२ वाघीण अखेर वनविभागाच्या विशेष पथकाने यशस्वीरित्या जेरबंद केली आहे. शनिवारी रात्री (२३ मे) सुमारे ७.१५ वाजता सिंदेवाही तालुक्यातील पवनपार तलाव परिसरातील (वनक्षेत्र क्र. २८२) ट्रॅन्क्युलायझर डार्टच्या सहाय्याने तिला बेशुद्ध करण्यात आले. रात्री ८ वाजेपर्यंत ही संपूर्ण कारवाई यशस्वीपणे पूर्ण झाली. वनविभागाने अवघ्या दोन दिवसांत ट्रॅप कॅमेरे, सीसीटीव्ही, पायी गस्त आणि डार्ट गनचा वापर करून ही मोठी मोहीम फत्ते केली. सुमारे १४ वर्षांची ही प्रौढ वाघीण असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, जेरबंद करताना तिच्यासोबत कोणतेही बछडे आढळून आले नाहीत, मात्र संभाव्य बछड्यांच्या शोधासाठी वनविभागाकडून स्वतंत्र मोहीम सुरू करण्यात आली आहे. पकडण्यात आलेल्या वाघिणीला पुढील उपचार व देखरेखीसाठी नागपूर येथील गोरेवाडा वन्यजीव बचाव केंद्रात हलवण्यात आले आहे. चंद्रपूर जिल्ह्यात मानवी व वाघ यांच्यातील वाढत्या संघर्षामुळे निर्माण झालेल्या भीतीवर या कारवाईने मोठा दिलासा मिळाला असून, परिसरातील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
    1
    चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून दहशत माजवून चार महिलांचा जीव घेणारी टी-२ वाघीण अखेर वनविभागाच्या विशेष पथकाने यशस्वीरित्या जेरबंद केली आहे. शनिवारी रात्री (२३ मे) सुमारे ७.१५ वाजता सिंदेवाही तालुक्यातील पवनपार तलाव परिसरातील (वनक्षेत्र क्र. २८२) ट्रॅन्क्युलायझर डार्टच्या सहाय्याने तिला बेशुद्ध करण्यात आले. रात्री ८ वाजेपर्यंत ही संपूर्ण कारवाई यशस्वीपणे पूर्ण झाली.

वनविभागाने अवघ्या दोन दिवसांत ट्रॅप कॅमेरे, सीसीटीव्ही, पायी गस्त आणि डार्ट गनचा वापर करून ही मोठी मोहीम फत्ते केली. सुमारे १४ वर्षांची ही प्रौढ वाघीण असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, जेरबंद करताना तिच्यासोबत कोणतेही बछडे आढळून आले नाहीत, मात्र संभाव्य बछड्यांच्या शोधासाठी वनविभागाकडून स्वतंत्र मोहीम सुरू करण्यात आली आहे. पकडण्यात आलेल्या वाघिणीला पुढील उपचार व देखरेखीसाठी नागपूर येथील गोरेवाडा वन्यजीव बचाव केंद्रात हलवण्यात आले आहे. चंद्रपूर जिल्ह्यात मानवी व वाघ यांच्यातील वाढत्या संघर्षामुळे निर्माण झालेल्या भीतीवर या कारवाईने मोठा दिलासा मिळाला असून, परिसरातील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
    user_RahimKhan Pathan
    RahimKhan Pathan
    Voice of people सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • बकरी ईद निमित्ताने छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) शहर पोलीस प्रशासनाने गोवंशीय जनावरांची कुर्बानी न करण्याचे आवाहन केले आहे. यासाठी शहर पोलीस आयुक्त प्रवीण पवार साहेब यांनी शहरातील मुस्लिम धर्मगुरुंसोबत बैठक घेतली. या बैठकीत मुस्लिम धर्मगुरुंनी पोलीस प्रशासनाच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यांनी गोवंशीय जनावरांची कुर्बानी होणार नाही असे आश्वासन दिले, तसेच मुस्लिम समाजाला गोवंशीय जनावरांची कुर्बानी न करण्याचे आवाहनही केले. या प्रयत्नात कोणी आढळल्यास, ती व्यक्ती स्वतः जबाबदार असेल असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.
    1
    बकरी ईद निमित्ताने छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) शहर पोलीस प्रशासनाने गोवंशीय जनावरांची कुर्बानी न करण्याचे आवाहन केले आहे. यासाठी शहर पोलीस आयुक्त प्रवीण पवार साहेब यांनी शहरातील मुस्लिम धर्मगुरुंसोबत बैठक घेतली.

या बैठकीत मुस्लिम धर्मगुरुंनी पोलीस प्रशासनाच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यांनी गोवंशीय जनावरांची कुर्बानी होणार नाही असे आश्वासन दिले, तसेच मुस्लिम समाजाला गोवंशीय जनावरांची कुर्बानी न करण्याचे आवाहनही केले. या प्रयत्नात कोणी आढळल्यास, ती व्यक्ती स्वतः जबाबदार असेल असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.
    user_छ.संभाजीनगर जि.शुरु रिपोर्टर
    छ.संभाजीनगर जि.शुरु रिपोर्टर
    Voice of people कन्नड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड येथे डिझेलसाठी नागरिकांची तुफान झुंबड उडाल्याचे समोर आले आहे. यामुळे परिसरात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली असून, लोकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
    1
    औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड येथे डिझेलसाठी नागरिकांची तुफान झुंबड उडाल्याचे समोर आले आहे. यामुळे परिसरात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली असून, लोकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
    user_Anis qureshi sillod
    Anis qureshi sillod
    Local News Reporter Sillod, Aurangabad•
    21 hrs ago
  • मालेगावचे अप्पर पोलीस अधीक्षक मा. सूरज गुंजाळ (IPS) साहेब यांनी काल रविवारी बच्छाव सर्कल, दाभाडी रोड येथे पावसामुळे निर्माण झालेला वाहतुकीचा अडथळा स्वतः दूर केला. पावसामुळे रस्त्यावर बॅरिकेड्स पडले होते, ज्यामुळे वाहतूक खोळंबली होती. गुंजाळ साहेबांनी स्वतः रस्त्यावरील बॅरिकेड्स उचलून बाजूला केले आणि वाहतुकीसाठी मार्ग मोकळा करून दिला. त्यांच्या या कार्याला सलाम करण्यात आला आहे.
    1
    मालेगावचे अप्पर पोलीस अधीक्षक मा. सूरज गुंजाळ (IPS) साहेब यांनी काल रविवारी बच्छाव सर्कल, दाभाडी रोड येथे पावसामुळे निर्माण झालेला वाहतुकीचा अडथळा स्वतः दूर केला. पावसामुळे रस्त्यावर बॅरिकेड्स पडले होते, ज्यामुळे वाहतूक खोळंबली होती. गुंजाळ साहेबांनी स्वतः रस्त्यावरील बॅरिकेड्स उचलून बाजूला केले आणि वाहतुकीसाठी मार्ग मोकळा करून दिला. त्यांच्या या कार्याला सलाम करण्यात आला आहे.
    user_नागेश मोरे
    नागेश मोरे
    पत्रकार मालेगाव, नाशिक, महाराष्ट्र•
    39 min ago
  • जालना जिल्ह्यातील भोकरदन येथे पोलिसांनी एका देहव्यापार अड्ड्यावर छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी पती, पत्नी आणि खोलीच्या मालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या छाप्यात एका महिलेची सुटका करण्यात आली.
    1
    जालना जिल्ह्यातील भोकरदन येथे पोलिसांनी एका देहव्यापार अड्ड्यावर छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी पती, पत्नी आणि खोलीच्या मालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या छाप्यात एका महिलेची सुटका करण्यात आली.
    user_बबन धसाळ
    बबन धसाळ
    Farmer भोकरदन, जालना, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • साताऱ्यातील कोरेगाव-रहिमतपूर रोड परिसरात एका बोगस कॉल सेंटरवर स्थानिक गुन्हे शाखेने मध्यरात्री मोठी कारवाई करत एका आंतरराज्यीय सायबर टोळीचा पर्दाफाश केला आहे. अमेरिकन नागरिकांना 'डिजिटल अरेस्ट'ची भीती दाखवून लाखो डॉलरची फसवणूक केल्याच्या गंभीर आरोपाखाली या धाडीत १७ आरोपींसह चार महिलांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही टोळी अमेरिकन नागरिकांना फोन करून 'तुमच्या नावाने अमेझॉनवरून ऑर्डर करण्यात आली आहे' अशी खोटी माहिती देत असे. त्यानंतर बनावट मेसेज आणि बनावट ऑर्डर नंबर वापरून, त्यांना 'डिजिटल अरेस्ट'ची भीती दाखवली जात होती. याच भीतीचा फायदा घेत, गिफ्ट व्हाऊचरच्या माध्यमातून डॉलरमध्ये मोठी रक्कम उकळली जात होती. ही कारवाई पोलीस अधीक्षक निखील पिंगळे आणि अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखा आणि कोरेगाव पोलिसांच्या संयुक्त पथकाने रिलायबल अपार्टमेंटमध्ये सुरू असलेले हे बोगस कॉल सेंटर उघडकीस आणले. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ताब्यात घेतलेल्या आरोपींमध्ये मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगड आणि राजस्थानमधील व्यक्तींचा समावेश आहे. सायबर फसवणुकीच्या वाढत्या जाळ्यावर सातारा पोलिसांनी दिलेला हा एक मोठा धक्का मानला जात असून, तपास सुरू असल्याने आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
    1
    साताऱ्यातील कोरेगाव-रहिमतपूर रोड परिसरात एका बोगस कॉल सेंटरवर स्थानिक गुन्हे शाखेने मध्यरात्री मोठी कारवाई करत एका आंतरराज्यीय सायबर टोळीचा पर्दाफाश केला आहे. अमेरिकन नागरिकांना 'डिजिटल अरेस्ट'ची भीती दाखवून लाखो डॉलरची फसवणूक केल्याच्या गंभीर आरोपाखाली या धाडीत १७ आरोपींसह चार महिलांना ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही टोळी अमेरिकन नागरिकांना फोन करून 'तुमच्या नावाने अमेझॉनवरून ऑर्डर करण्यात आली आहे' अशी खोटी माहिती देत असे. त्यानंतर बनावट मेसेज आणि बनावट ऑर्डर नंबर वापरून, त्यांना 'डिजिटल अरेस्ट'ची भीती दाखवली जात होती. याच भीतीचा फायदा घेत, गिफ्ट व्हाऊचरच्या माध्यमातून डॉलरमध्ये मोठी रक्कम उकळली जात होती.

ही कारवाई पोलीस अधीक्षक निखील पिंगळे आणि अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखा आणि कोरेगाव पोलिसांच्या संयुक्त पथकाने रिलायबल अपार्टमेंटमध्ये सुरू असलेले हे बोगस कॉल सेंटर उघडकीस आणले.

या प्रकरणी भारतीय न्याय संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ताब्यात घेतलेल्या आरोपींमध्ये मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगड आणि राजस्थानमधील व्यक्तींचा समावेश आहे. सायबर फसवणुकीच्या वाढत्या जाळ्यावर सातारा पोलिसांनी दिलेला हा एक मोठा धक्का मानला जात असून, तपास सुरू असल्याने आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
    user_SHEGAONlive
    SHEGAONlive
    Local News Reporter Buldana, Buldhana•
    5 hrs ago
  • महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरासाठीचा निधी औरंगजेबाच्या कबरीला दिल्या जाणाऱ्या निधीपेक्षा कमी असल्याचा दावा हिंदु जनजागृती समितीने केला आहे. या धक्कादायक तुलनेमुळे राज्यभरात तीव्र संताप आणि प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
    1
    महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरासाठीचा निधी औरंगजेबाच्या कबरीला दिल्या जाणाऱ्या निधीपेक्षा कमी असल्याचा दावा हिंदु जनजागृती समितीने केला आहे. या धक्कादायक तुलनेमुळे राज्यभरात तीव्र संताप आणि प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
    user_Kiran Mali
    Kiran Mali
    Local News Reporter धरणगाव, जळगाव, महाराष्ट्र•
    23 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.