logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

विवेकानंद इंग्लिश स्कूल केंधळी (मंठा) येथे रोबोटिक्स व AI प्रशिक्षण उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उस्फूर्त प्रतिसाद...... विवेकानंद इंग्लिश स्कूलमध्ये मागील एक महिन्यापासून रोबोटिक्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) या विषयावर विशेष प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला. हा उपक्रम सायन्स किड्झ मुंबई अ‍ॅकॅडमीच्या माध्यमातून आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे मार्गदर्शन (प्रशिक्षक) रवी गुप्ता यांनी केले,जे सध्या अमेरिकेत कार्यरत आहेत. त्यांनी तेथील प्रगत तंत्रज्ञानाचा अनुभव घेऊन, येथील विद्यार्थ्यांना आधुनिक रोबोटिक्स आणि AI विषयी सखोल मार्गदर्शन केले.या प्रशिक्षणामध्ये विद्यार्थ्यांना केवळ सैद्धांतिक ज्ञान न देता प्रत्यक्ष प्रकल्पांच्या माध्यमातून शिकविण्यात आले. विद्यार्थ्यांनी स्वतः काही नाविन्यपूर्ण प्रकल्प तयार केले, जसे की स्मार्ट फूड बॉक्स फॉर नॉन-प्रिव्हिलेज्ड पीपल हा प्रकल्प गरजू लोकांपर्यंत अन्न पोहोचवण्यासाठी उपयुक्त ठरतो, ज्यामुळे अन्नाची नासाडी कमी होऊन गरजूंना मदत मिळू शकते.शेतकऱ्यांसाठी ऑटोमॅटिक वेदर सिस्टीम या प्रकल्पाद्वारे शेतकऱ्यांना हवामानाची अचूक माहिती आणि अलर्ट मिळू शकतात,ज्यामुळे ते आपल्या पिकांची योग्य काळजी घेऊ शकतात.या उपक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना भविष्यासाठी तयार करणे हा होता. आजच्या युगात रोबोटिक्स आणि AI हे केवळ विषय नसून भविष्यातील तंत्रज्ञानाची पायाभरणी आहेत. या प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता,तार्किक विचारशक्ती, समस्या सोडविण्याची क्षमता आणि नवकल्पनांची आवड विकसित झाली आहे.विवेकानंद इंग्लिश स्कूल मधील हा उपक्रम लहान शहरांतील विद्यार्थ्यांना जागतिक तंत्रज्ञानाशी जोडण्याचा एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरत आहे. खरंच,आजचे हे विद्यार्थी उद्याचे वैज्ञानिक,अभियंते आणि नवोन्मेषक बनण्याच्या दिशेने आत्मविश्वासाने वाटचाल करत आहेत. गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या या उपक्रमाची आज सांगता करण्यात आली. हा उपक्रम शाळेचे अध्यक्ष आदरणीय श्री. संदीप दादा बाहेकर सर, शाळेच्या मुख्याध्यापिका आदरणीय श्रीमती. रश्मी यादव मॅडम, (प्रशिक्षक) रवी गुप्ता सर,राठोड सर,सर्व शिक्षक वृंद,तसेच पालक आणि विद्यार्थी यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी बाहेकर सर व यादव मॅडम यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.त्यानंतर उपक्रमाचे मार्गदर्शक रवी गुप्ता सर यांना श्रीफळ,शाल,गुच्छ देऊन,सन्मानित करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी बनवलेल्या प्रकल्पाची पाहणी बाहेकर सर यादव मॅडम तसेच इतर मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आली. त्यावेळी विद्यार्थ्यांसह पालकवर्गही मोठ्या संख्येने उपस्थित होता. यावेळी शाळेचे अध्यक्ष बाहेकर सर यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी असे उपक्रम शाळेमार्फत राबवली जातील. असे आपल्या मनोगतात त्यांनी सांगितले.तसेच शाळेचे विद्यार्थी भविष्यात प्रकल्पाच्या माध्यमातून, योग्य प्रशिक्षण घेऊन,देश विदेशात गरुड झेप घेतील.अशी आशा व्यक्त केली. या प्रकल्पाचे पंचक्रोशीसह इतर सर्व स्तरातून जोरदार कौतुक होत आहे. शाळेने असे उत्कृष्ट उपक्रम यापुढेही विद्यार्थ्यांसाठी राबवावे अशी मागणी पालक वर्गातून होत आहे.

9 hrs ago
user_Sandip Gaikwad
Sandip Gaikwad
Accountant मंठा, जालना, महाराष्ट्र•

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • बार्शीत भक्तीरसाचा महापूर..... शिवलीलाताई पाटील यांच्या कीर्तनाला महिलांचा विक्रमी प्रतिसाद..!
    1
    बार्शीत भक्तीरसाचा महापूर..... शिवलीलाताई पाटील यांच्या कीर्तनाला महिलांचा विक्रमी प्रतिसाद..!
    user_राजश्री दत्तात्रय गवळी
    राजश्री दत्तात्रय गवळी
    Advertising agency सिंदखेड राजा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • 9 साल पहले एक नाबालिग छात्रा को फ्लाइंग किस देने के मामले में मुंबई की एक अदालत ने लड़के को तीन साल की सजा सुनाई है. रोडसाइड रोमियोज़ के लिए ये एक बड़ी सबक़ है.
    1
    9 साल पहले एक नाबालिग छात्रा को फ्लाइंग किस देने के मामले में मुंबई की एक अदालत ने लड़के को तीन साल की सजा सुनाई है. रोडसाइड रोमियोज़ के लिए ये एक बड़ी सबक़ है.
    user_Krishna Bhabal
    Krishna Bhabal
    Bank of india Maharashtra•
    1 hr ago
  • चिखली तालुक्यातील धोत्रा . भंनगोजी येथे. दगडूबा शिंदे यांच्या घराला, रात्री आग,, लाखोंचे नुकसान, सुदैवाने जीवित हानी टळली,
    1
    चिखली तालुक्यातील धोत्रा . भंनगोजी येथे. दगडूबा शिंदे यांच्या घराला, रात्री आग,, लाखोंचे नुकसान, सुदैवाने जीवित हानी टळली,
    user_✍️.MANSUR. SHAHA. ✍️
    ✍️.MANSUR. SHAHA. ✍️
    चिखली, बुलढाणा, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • बदनापूर जिल्हा जालना बदनापूर येथील कॅनरा बँकेत बँक अधिकाऱ्यांनी चोरी केली व 22 लोकांनी बनावट सोने गहाण ठेऊन फसवणूक केली त्या बावीस लोकांची चौकशी करून त्यांना अटक केली जाणार असल्याची शक्यता असून नियमानुसार त्यांना अटक अटळ असल्याचे बोलले जाते.
    1
    बदनापूर जिल्हा जालना 
बदनापूर येथील कॅनरा बँकेत बँक अधिकाऱ्यांनी चोरी केली व 22 लोकांनी बनावट सोने गहाण ठेऊन फसवणूक केली त्या बावीस लोकांची चौकशी करून त्यांना अटक केली जाणार असल्याची शक्यता असून नियमानुसार त्यांना अटक अटळ असल्याचे बोलले जाते.
    user_सय्यद नजाकत
    सय्यद नजाकत
    बदनापूर, जालना, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • भोकरदन या ठिकाणी आज वारकरी संप्रदायाच्या वतीने विकास लवांडे यांच्यावर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी आज पोलीस ठाण्यात भजन आणि ओव्या गात मागणी केली आहे
    1
    भोकरदन या ठिकाणी आज वारकरी संप्रदायाच्या वतीने विकास लवांडे यांच्यावर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी आज पोलीस ठाण्यात भजन आणि ओव्या गात मागणी केली आहे
    user_विश्वास धसाळ Press
    विश्वास धसाळ Press
    पत्रकार भोकरदन, जालना, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • वार्ड क्रमांक 18 में सड़क और नाली निर्माण कार्य का उद्घाटन समारोह उत्साह के साथ संपन्न
    1
    वार्ड क्रमांक 18 में सड़क और नाली निर्माण कार्य का उद्घाटन समारोह उत्साह के साथ संपन्न
    user_Sanjhsuyog News Channel
    Sanjhsuyog News Channel
    Beed, Maharashtra•
    2 hrs ago
  • कन्नड–चाळीसगाव घाटात भीषण अपघात; चारचाकी दरीत कोसळली कन्नड ते चाळीसगाव घाटामध्ये एक गाडी दरीत कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अपघातात गाडीत नेमके किती जण होते, तसेच अपघात कसा झाला याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. या गाडीत मुंबईतील पोलीस अधिकारी यांचे कुटुंब असल्याचे प्राथमिक माहिती हाती येत आहे.
    1
    कन्नड–चाळीसगाव घाटात भीषण अपघात; चारचाकी दरीत कोसळली
कन्नड ते चाळीसगाव घाटामध्ये एक गाडी दरीत कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अपघातात गाडीत नेमके किती जण होते, तसेच अपघात कसा झाला याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. या गाडीत मुंबईतील पोलीस अधिकारी यांचे कुटुंब असल्याचे प्राथमिक माहिती हाती येत आहे.
    user_पत्रकार ओमप्रकाश उढाण
    पत्रकार ओमप्रकाश उढाण
    घनसावंगी, जालना, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • Post by राजश्री दत्तात्रय गवळी
    1
    Post by राजश्री दत्तात्रय गवळी
    user_राजश्री दत्तात्रय गवळी
    राजश्री दत्तात्रय गवळी
    Advertising agency सिंदखेड राजा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • हरसूल स्थित सईदा कॉलोनी में उस समय अफरा-तफरी मच गई जब सड़क पर चल रहे एक ट्रक में अचानक भीषण आग लग गई। देखते ही देखते आग ने पूरे ट्रक को अपनी चपेट में ले लिया और लपटें ऊंची उठने लगीं। प्रत्यक्षदर्शियों के अनुसार, ट्रक चालक ने सूझबूझ दिखाते हुए तुरंत वाहन रोक दिया और सुरक्षित बाहर निकल गया। स्थानीय लोगों ने भी मौके पर पहुंचकर मदद की और स्थिति को नियंत्रित करने का प्रयास किया। आग इतनी तेज थी कि ट्रक में रखा सामान (चारा) पूरी तरह जलकर खाक हो गया। हालांकि राहत की बात यह रही कि इस घटना में किसी भी प्रकार की जनहानि नहीं हुई। फिलहाल आग लगने के कारणों का पता नहीं चल पाया है। सूचना मिलने पर दमकल विभाग मौके पर पहुंचा और आग पर काबू पाया गया।
    1
    हरसूल स्थित सईदा कॉलोनी में उस समय अफरा-तफरी मच गई जब सड़क पर चल रहे एक ट्रक में अचानक भीषण आग लग गई। देखते ही देखते आग ने पूरे ट्रक को अपनी चपेट में ले लिया और लपटें ऊंची उठने लगीं। प्रत्यक्षदर्शियों के अनुसार, ट्रक चालक ने सूझबूझ दिखाते हुए तुरंत वाहन रोक दिया और सुरक्षित बाहर निकल गया। स्थानीय लोगों ने भी मौके पर पहुंचकर मदद की और स्थिति को नियंत्रित करने का प्रयास किया। आग इतनी तेज थी कि ट्रक में रखा सामान (चारा) पूरी तरह जलकर खाक हो गया। हालांकि राहत की बात यह रही कि इस घटना में किसी भी प्रकार की जनहानि नहीं हुई। फिलहाल आग लगने के कारणों का पता नहीं चल पाया है। सूचना मिलने पर दमकल विभाग मौके पर पहुंचा और आग पर काबू पाया गया।
    user_Krishna Bhabal
    Krishna Bhabal
    Bank of india Maharashtra•
    1 hr ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.