क्रीडा विभागाच्या योजनांसाठी 10 ऑगस्टपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन नांदेड,राज्यामध्ये क्रीडा क्षेत्राचा विकास व्हावा तसेच नागरिकांचे आरोग्यमान सुधारावे, या उद्देशाने शासनाच्या क्रीडा व युवा धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. या धोरणाअंतर्गत विद्यार्थी व तरुणांसाठी व्यायामशाळा आणि क्रीडांगणे विकसित करण्यासाठी व्यायामशाळा विकास अनुदान योजना आणि क्रीडांगण विकास अनुदान योजना राबविण्यात येत असून, सन 2026-27 साठी पात्र संस्थांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. व्यायामशाळा विकास अनुदान योजना या योजनेंतर्गत किमान 1,000 चौरस फूट जागा आणि त्यापैकी 500 चौरस फूट चटई क्षेत्राचे स्वतंत्र व्यायामगृह असणे आवश्यक आहे. व्यायामगृहाच्या बांधकामासाठी कमाल 14 लाख रुपये अनुदान उपलब्ध आहे. तसेच अत्याधुनिक व्यायाम साहित्य खरेदी व ओपन जिम (Open Gym) उभारणीसाठी कमाल 7 लाख रुपये अनुदान दिले जाते. या योजनेसाठी नांदेड जिल्ह्यातील शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय रुग्णालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, शासकीय व अनुदानित शैक्षणिक संस्था, आश्रमशाळा, वसतिगृहे, पोलीस कल्याण निधी, शासकीय कार्यालये, जिमखाना तसेच शासनाच्या निकषांनुसार पात्र संस्था अर्ज करू शकतात. *क्रीडांगण विकास अनुदान योजना* या योजनेंतर्गत क्रीडांगण समपातळीकरण, 200 मीटर धावपट्टी, कुंपण, विविध खेळांची प्रमाणित मैदाने, प्रसाधनगृह व चेंजिंग रूम, पिण्याच्या पाण्याची सुविधा, भांडारगृह, फ्लडलाइट, प्रेक्षक गॅलरी, शेड, ड्रेनेज व्यवस्था आदी विकासकामांसाठी कमाल 7 लाख रुपये अनुदान दिले जाते. तसेच क्रीडा साहित्य खरेदीसाठी कमाल 3 लाख रुपये अनुदान उपलब्ध आहे. या योजनेसाठी ग्रामपंचायत, नगरपरिषद, महानगरपालिका, जिल्हा परिषद, शासकीय व अनुदानित शाळा, आश्रमशाळा, महाविद्यालये, पोलीस विभाग, स्पोर्ट्स क्लब, ऑफिसर्स क्लब, शासकीय कार्यालये व जिमखाना आदी पात्र आहेत. संबंधित संस्थेकडे स्वतःच्या मालकीची किंवा किमान 30 वर्षांच्या नोंदणीकृत भाडेपट्ट्यानुसार उपलब्ध जागा असणे आवश्यक आहे. इच्छुक व पात्र संस्थांनी सर्वसाधारण, अनुसूचित जाती, आदिवासी व बिगर आदिवासी घटकांअंतर्गत विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक कागदपत्रांसह 10 ऑगस्ट 2026 पर्यंत कार्यालयीन वेळेत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल, स्टेडियम परिसर, इनडोअर हॉल, नांदेड येथे सादर करावेत. अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी भैरवनाथ नाईकवाडी यांनी केले आहे.

- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अभिष्टचिंतन सोहळा संपन्न किर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या किर्तन पासदगाव येथे संपन्न1
- पिएमश्री जिल्हा परिषद हायस्कूल मुलींचे, मुखेड येथे साहित्य रत्न लोकशाहीर डॉ. अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्ताने वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून विध्यार्थी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.. अतिशय छान असं विषयास धरून खूप मोठ्या संख्येनी लेकरांची भाषणे झाली.. सर्व वर्ग शिक्षकांनी विध्यार्थ्यांची चांगली तयारी करून घेतली.. मुख्याध्यापक राजपूत सरांचे चांगले सहकार्य झाले.. तसेंच नेहमीप्रमाणेच शालेय व्यवस्थापन समितीचे पण चांगले योगदान मिळाले... सर्वांचे मनःपूर्वक आभार... आपलाच...नितीनदादा तलवारे मराठवाडा अध्यक्ष तथा शा. स. सदस्य, मुखेड. पिएमश्री जिल्हा परिषद हायस्कूल मुलींचे, मुखेड येथे साहित्य रत्न लोकशाहीर डॉ. अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्ताने वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून विध्यार्थी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.. अतिशय छान असं विषयास धरून खूप मोठ्या संख्येनी लेकरांची भाषणे झाली.. सर्व वर्ग शिक्षकांनी विध्यार्थ्यांची चांगली तयारी करून घेतली.. मुख्याध्यापक राजपूत सरांचे चांगले सहकार्य झाले.. तसेंच नेहमीप्रमाणेच शालेय व्यवस्थापन समितीचे पण चांगले योगदान मिळाले... सर्वांचे मनःपूर्वक आभार...नितीनदादा तलवारे मराठवाडा अध्यक्ष तथा शा. स. सदस्य, मुखेड.3
- आ.प्रताप पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त इंदुरीकर महाराज यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न नांदेड येथे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त युवा नेते माधवराव पावडे यांच्या वतीने इंदुरीकर महाराज यांच्या कीर्तनाचा भव्य दिव्य कार्यक्रम संपन्न झाला. एवढी आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांना विविध क्षेत्रातील मान्यवरांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या तसेच इंदुरीकर महाराज यांच्या कीर्तनाचा लाभ देखील हजारो नागरिकांनी घेतला.1
- वैजनाथ पावडे यांच्या निवासस्थानी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती घोटा देवी येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी उत्साहात साजरी 👏👏👏👏 (प्रतिनिधी): हिंगोली तालुक्यातील घोटा देवी येथे धनगर समाज युवा मल्हार सेना मराठवाडा अध्यक्ष वैजनाथ पावडे यांच्या निवासस्थानी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती तसेच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी अत्यंत आदरपूर्वक व प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर वैजनाथ पावडे यांनी उपस्थित शालेय विद्यार्थी व मेंढपाळ समाजातील मुलांना या दोन्ही महान विभूतींच्या जीवनकार्याची सविस्तर माहिती देत मार्गदर्शन केले. आपल्या मार्गदर्शनात त्यांनी सांगितले की, "महान पुरुषांचे विचार, त्याग, शिक्षणप्रेम आणि समाजसेवेची प्रेरणा प्रत्येकाने आपल्या जीवनात उतरवली पाहिजे. चांगले संस्कार, शिक्षण आणि समाजहिताची भावना जोपासून आपणही समाजसुधारक म्हणून कार्य केले, तर आपल्या जीवनालाही खरा अर्थ प्राप्त होईल. जयंती व पुण्यतिथी हे केवळ स्मरणाचे दिवस नसून त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याची प्रेरणा देणारे दिवस आहेत." यावेळी नुकत्याच सुरू करण्यात आलेल्या आश्रमातील विद्यार्थी, मेंढपाळ समाजातील मुले तसेच परिसरातील शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनीही महान व्यक्तींच्या विचारांचे पालन करून शिक्षण, शिस्त आणि समाजसेवा यांचा संकल्प केला. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, सामाजिक बांधिलकी आणि महान व्यक्तींच्या विचारांबद्दल जागरूकता निर्माण झाली असून, उपस्थितांनी या उपक्रमाचे कौतुक केले.1
- दिगंबर जैन तीर्थक्षेत्र पुसेगाव येथे मंगल कलश स्थापना सोहळा उत्साहात संपन्न सेनगाव तालुक्यातील पुसेगाव येथील दिगंबर जैन तीर्थक्षेत्र या ठिकाणी मंगल कलश स्थापना सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या धार्मिक कार्यक्रमाला जैन समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता श्रमणि आर्यिका 105 विशाखा श्री माताजी का 24 वा पावन वर्षायोग 2026 मंगल कलश स्थापना सोहळा दिनांक 1 ऑगस्ट रोजी पुसेगाव या ठिकाणी संपन्न झाला. पुसेगाव या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्वात उंच असलेली भगवान बाहुबलीची 31 फूट मूर्ती स्थापन करण्यात आली असून महाराष्ट्रातील हे एक प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे. याच ठिकाणी मंगल कलश स्थापना सोहळा आयोजित करण्यात आला असून ध्वजारोहण देखील करण्यात आले या ध्वजारोहण कार्यक्रमाला सकल दिगंबर जैन समाज,मान्यवर व प्रमुख पाहुणे व गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच मंगल कलश स्थापना निमित्ताने संगीतमय सुरांचा कार्यक्रम देखील पार पडला हिंगोली जिल्ह्यातून तसेच महाराष्ट्रातील सकल समाज बांधव मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होता कार्यक्रम यशस्वीतेसाठी भगवान बाहुबली मूर्ती निर्माण कार्य अध्यक्ष रवी कान्हेड यांच्यासह जैन समाज बांधवांनी परिश्रम घेतले.1
- आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन किर्तनकार इंदुरीकर महाराज किर्तन सोहळा संपन्न1
- लोकस्वराज्य आंदोलन महाराष्ट्र अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण इशारा परिषद नांदेड लोकस्वराज्य आंदोलन महाराष्ट्र अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण इशारा परिषद नांदेड1