सावधान ज्ञानगंगा अभयारण्यात वाघ आलाय कामगार मंत्री आकाश फुंडकर यांची मोठे आवाहन बुलढाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्यात बिबटे,अस्वल, तडस यासारखे हिंस्र वन्य प्राण्यांच्या सोबतीला आता थेट वाघाची दिमाखदार एन्ट्री झाली आहे.खामगावच्या अभयारण्यात पिकेसीटी – वन वाघाचे आगमन झाले आहे.जंगल वाचवायचे असेल तर जंगलाचा राजा जंगलात राहिलाच पाहिजे," या उक्तीप्रमाणे बुलढाणा जिल्ह्यासाठी 2026 वर्ष एक ऐतिहासिक क्रांती घेऊन आले आहे. हे केवळ वन्यजीव प्रेमींसाठीच नाही, तर संपूर्ण जिल्ह्याच्या विकासासाठी 'न्यू इयर गिफ्ट' ठरले आहे. एकेकाळी शिकारीसाठी प्रसिद्ध असलेला हा परिसर वाघ नामशेष झाल्यामुळे ओसाड झाला होता. वाघाच्या अनुपस्थितीमुळे हरीण, नीलगाय आणि रोही यांसारख्या तृणभक्षक प्राण्यांची संख्या अनियंत्रित वाढली होती, ज्याचा थेट फटका शेतकऱ्यांच्या पिकांना बसत होता.आता वाघ आल्यामुळे निसर्गाचे चक्र पुन्हा सुरळीत होणार असून, जंगलाचे गतवैभव परत मिळण्यास मदत होईल. या व्याघ्र प्रकल्पामुळे परिसरात इको-टुरिझम वाढणार आहे.यामुळे स्थानिक तरुणांच्या हाताला रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील.हॉटेल, गाईड्स आणि स्थानिक बाजारपेठेला मोठी चालना मिळेल. खामगाव आणि परिसराच्या नावलौकिकात भर पडून आर्थिक समृद्धी येईल. नामदार आकाश फुंडकर यांचे जनतेला आवाहन या ऐतिहासिक प्रसंगी राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी आनंद व्यक्त केला आहे. त्यांनी नागरिकांना एक महत्त्वाचा इशाराही दिला आहे.हा वाघ तरुण असून तो अत्यंत चपळ आणि काहीसा हिंसक असू शकतो. त्याने अद्याप मानवी वस्ती किंवा वाहने पाहिलेली नाहीत. त्यामुळे वनविभागाच्या सूचनांचे पालन करणे अत्यंत गरजेचे आहे. कोणीही अतिउत्साहात जंगलात जाण्याचा प्रयत्न करू नये.वाघाच्या सुरक्षेसाठी आणि स्वतःच्या बचावासाठी नियमांचे काटेकोर पालन करावे.येणाऱ्या काळात या अभयारण्यात वाघिणीचेही आगमन व्हावे, जेणेकरून या जंगलाची वंशवृद्धी होईल आणि खामगावचे जंगल पर्यटनाच्या नकाशावर ठळकपणे चमकेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
सावधान ज्ञानगंगा अभयारण्यात वाघ आलाय कामगार मंत्री आकाश फुंडकर यांची मोठे आवाहन बुलढाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्यात बिबटे,अस्वल, तडस यासारखे हिंस्र वन्य प्राण्यांच्या सोबतीला आता थेट वाघाची दिमाखदार एन्ट्री झाली आहे.खामगावच्या अभयारण्यात पिकेसीटी – वन वाघाचे आगमन झाले आहे.जंगल वाचवायचे असेल तर जंगलाचा राजा जंगलात राहिलाच पाहिजे," या उक्तीप्रमाणे बुलढाणा जिल्ह्यासाठी 2026 वर्ष एक ऐतिहासिक क्रांती घेऊन आले आहे. हे केवळ वन्यजीव प्रेमींसाठीच नाही, तर संपूर्ण जिल्ह्याच्या विकासासाठी 'न्यू इयर गिफ्ट' ठरले आहे. एकेकाळी शिकारीसाठी प्रसिद्ध असलेला हा परिसर वाघ नामशेष झाल्यामुळे
ओसाड झाला होता. वाघाच्या अनुपस्थितीमुळे हरीण, नीलगाय आणि रोही यांसारख्या तृणभक्षक प्राण्यांची संख्या अनियंत्रित वाढली होती, ज्याचा थेट फटका शेतकऱ्यांच्या पिकांना बसत होता.आता वाघ आल्यामुळे निसर्गाचे चक्र पुन्हा सुरळीत होणार असून, जंगलाचे गतवैभव परत मिळण्यास मदत होईल. या व्याघ्र प्रकल्पामुळे परिसरात इको-टुरिझम वाढणार आहे.यामुळे स्थानिक तरुणांच्या हाताला रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील.हॉटेल, गाईड्स आणि स्थानिक बाजारपेठेला मोठी चालना मिळेल. खामगाव आणि परिसराच्या नावलौकिकात भर पडून आर्थिक समृद्धी येईल. नामदार आकाश फुंडकर यांचे जनतेला आवाहन या ऐतिहासिक प्रसंगी राज्याचे कामगार मंत्री
आकाश फुंडकर यांनी आनंद व्यक्त केला आहे. त्यांनी नागरिकांना एक महत्त्वाचा इशाराही दिला आहे.हा वाघ तरुण असून तो अत्यंत चपळ आणि काहीसा हिंसक असू शकतो. त्याने अद्याप मानवी वस्ती किंवा वाहने पाहिलेली नाहीत. त्यामुळे वनविभागाच्या सूचनांचे पालन करणे अत्यंत गरजेचे आहे. कोणीही अतिउत्साहात जंगलात जाण्याचा प्रयत्न करू नये.वाघाच्या सुरक्षेसाठी आणि स्वतःच्या बचावासाठी नियमांचे काटेकोर पालन करावे.येणाऱ्या काळात या अभयारण्यात वाघिणीचेही आगमन व्हावे, जेणेकरून या जंगलाची वंशवृद्धी होईल आणि खामगावचे जंगल पर्यटनाच्या नकाशावर ठळकपणे चमकेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
- ॲड.अमोल अंधारे शिवसेनेत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाला सन्मान ५१०० कार्यकर्त्यांच्या प्रवेशाकरिता उपमुख्यमंत्र्यांना दिले निवेदन खामगाव: खामगाव मधील हिंदू नेता म्हणून ओळख असलेल्या ॲड.अमोल अशोकराव अंधारे यांच्या शिवसेना प्रवेशामुळे आगामी जिल्हा परिषद,पंचायत समिती व ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या संघटनात्मक बळात मोठी वाढ होणार असल्याचे राजकीय जाणकारांकडून बोलले जात आहे.अकोला येथे आज आयोजित भव्य जाहीर सभेत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते, केंद्रीय मंत्री ना. प्रतापराव जाधव यांच्या मार्गदर्शनात व प्रमुख उपस्थितीत, आमदार संजू भाऊ गायकवाड यांच्या नेतृत्वात हिंदुत्ववादी विचारांचे प्रभावी नेतृत्व ॲड. अमोल अशोकराव अंधारे यांनी हजारो शिवसैनिकांचा साक्षीने शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. या पक्षप्रवेश सोहळ्यास खामगाव विधानसभा मतदारसंघाचे पक्ष निरीक्षक आमदार संजय रायमुलकर, शशिकांत खेडेकर तालुका प्रमुख राजू बघे यांच्यासह तालुक्यातील समर्थक तसेच पदाधिकारी, शिवसैनिक व हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. राजराजेश्वर नगरीत झालेल्या या जाहीर प्रवेशामुळे संपूर्ण खामगाव परिसरातील हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.खामगाव तालुक्यातील व घाटाखालील संपूर्ण परिसरात हिंदुत्ववादी ५१०० कार्यकर्त्यांच्या शिवसेना प्रवेशाकरिता खामगाव येथे भव्य जाहीर सभा देण्यात यावी, अशी मागणी याप्रसंगी निवेदनाद्वारे केली.यावेळी एकनाथ शिंदे यांनी ॲड. अमोल अंधारे यांच्या पाठीवर आशिर्वादरूपी हात ठेवत “नक्की लवकरच येतो कामाला लागा”असे आश्वास्थ केले.4
- Post by YUVA JALNA NEWS1
- पानकनेरगाव फाट्यावर रास्ता रोको आंदोलन आम्हाला गोळ्या घाला आम्ही मरायला तयार मात्र गुरुढोरांच्या गायरानमध्ये प्रकल्प होऊ देणार नाही आंदोलकांचा निर्धार अखेर लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे सेनगाव ते रिसोड पानकनेरगाव फाट्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले सदर आंदोलन नायब तहसीलदार यांच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले गावकऱ्यांनी आंदोलन करून मिळवलेल्या गायरान जमिनीवर प्रशासनाने सौर ऊर्जा प्रकल्प होत असल्याने गावकरी गेल्या महिनाभरापासून आक्रमक झालेले पहायला मिळत आहेत सोलर ऊर्जा प्रकल्पाच्या विरोधात ३१ डिसेंबर रोजी महोदय तहसीलदार साहेब यांना निवेदन देऊन ५ जानेवारी रोजी आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता त्याचा अनुषंगाने सेनगाव ते रिसोड महामार्गावर पानकनेरगांव फाट्यावर गावकऱ्यांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले या आंदोलनात शेकडो गावकरी आंदोलक आक्रमक पहायला मिळाले सेनगाव तालुक्यातील पानकनेरगाव हद्दीत तीनशे एकर गायरान जमीन आहे ही गायरान जमीन अतिक्रम धारकांच्या विळख्यात अडकली होती सदर अतिक्रमण मूक्त करण्यासाठी गेल्या तीन ते चार वर्षांपासून गावकरी बांधव रस्त्यावर उतरून न्यायाची भिक मागत आहे परंतु प्रशासनाने पूर्णतः न्याय दिलाच नाही मात्र आंदोलन करून थोडेफार यश मिळाले आहे तेही यश हिरावून घेत प्रशासनाने डल्ला मारत ही जमीन उद्योगपतीच्या घशात घातली म्हणून गावकरी मध्ये नाराजीची सूर उमटत होता व तसेच गायरान जमीन संपुष्टात आल्यावर वैरण व गुराढोरांची गैरसोय निर्माण होईल व तसेच वन्य प्राण्याची सूद्धा वसाहत निर्माण होईल वन्यप्राणी मालकीच्या शेतात येतील म्हणून शेतकरी बांधवांच्या वतीने ५ जानेवारी रोजी आंदोलन करण्यात आले आंदोलन एवढे आक्रमक दिसत होते की आम्हाला गोळ्या घाला आम्ही मागे हटणार नाही आणि गायरान जमीन सूद्धा उद्योगपतीच्या घशात जाऊ देणार गुरु ढोरे आणि खाटकाल विकायची का असा सवाल करत आंदोलकांच्या तीव्र भावना दिसत होते सदर आंदोलन स्थळी प्रशासनाचे अधिकारी नायब तहसीलदार यांच्या लेखी आश्वासनानंतर तात्पुरत आंदोलन स्थगित करण्यात आले व तसेच लेखी निवेदनात उर्वरित राहिलेले अतिक्रमण हटवून सौर ऊर्जा प्रकल्प बंद करण्यात यावा सदर ७ दिवसाच्या आत काम न थांबवल्यास जिल्हाधिकारी कार्यालय इमारतीच्या मजल्यावर उड्या मारून जिवन संपवून घेऊ असा इशारा आंदोलकांकडून यावेळी देण्यात आला आंदोलनाला पाठिंबा म्हणून क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरखे,जिल्हाध्यक्ष नामदेव पतंगे,सेनगाव तालुकाध्यक्ष प्रवीण मते आणि मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते. येथील प्रश्नासाठी गावकऱ्यांना क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने पाठिंबा देऊन सहभाग नोंदवला. व तसेच यावेळी पोलीस ठाण्याचे पोलीस सहायक निरीक्षक दीपक मस्के साहेब व बिड जमादार राजेश जाधव, तुकाराम मार्कळ, व सर्व पोलीस कर्मचारी यांचा चोख बंदोबस्त पाहायला मिळाला4
- ट्रेन में बम की मिली थी सूचना, इंस्पेक्टर साहब झाड़ू से ही खींच लाए संदिग्ध बैग; वायरल वीडियो देख लोगों ने किया सैल्यूट सोशल मीडिया पर वायरल हो रहे वीडियो में जो पुलिसकर्मी नजर आ रहा है वह इंस्पेक्टर अनिल सिंह हैं जिन्होंने संदिग्ध बैग को झाड़ू से ही मऊ रेलवे स्टेशन से बाहर निकाल दिया।1
- Post by ARK NEWS 201
- इम्तियाज जलील यांच्या गाडीवर हल्ला1
- Azhar Pathan Prachar | Election | Aimim1
- श्री संत तुकाराम महाराज व श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांची नावे थोर पुरुषांच्या यादीत समाविष्ट शिवसेना उबाठाच्या वतीने निवेदन खामगाव : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे खामगाव तालुक्याच्या वतीने तालुका प्रमुख श्रीराम खेलदार यांचे नेतृत्वात उपविभागीय अधिकारी खामगांव यांना सर्व शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांच्या उपस्थितीत जगतगुरु श्री संत तुकाराम महाराज व श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचे नाव महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाद्वारे प्रकाशित राष्ट्रपुरुष व थोर पुरुष यांची जयंती पुण्यतिथी साजरी करण्याबाबतच्या अधिकृत परिपत्रकातून वगळल्यामुळे यादीत नाव समाविष्ट करणे बाबत निवेदन देण्यात आले या निवेदनात महोदय. आम्ही खालील सही करणार आपल्याकडे विनंतीपूर्वक अर्ज करतो की महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने 29 डिसेंबर 2025 रोजी सन 2026 वर्षासाठीचे राष्ट्रपुरुष थोर व्यक्ती आणि संत महात्म्यांची जयंती व पुण्यतिथी साजरी करण्याबाबतचे अधिकृत परिपत्रक निर्गमित केले आहे मात्र या यादीत तब्बल 45 थोर व्यक्तींचा समावेश असला तरी महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि वारकरी संप्रदायाचा कळस असलेले जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज व वारकरी संप्रदायाचा पाया असलेले श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचे नाव वगळण्यात आले आहे शासनाने जाहीर केलेले या यादीत विविध क्षेत्रातील समाज सुधारक देशभक्त आणि संतांचा समावेश आहे मात्र महाराष्ट्राच्या मातीतील सर्वात प्रभावशाली संत व्यक्तिमत्व असलेल्या तुकोबाचा आणि ज्ञानोबाचा शासनाला विसर पडला आहे श्री संत तुकाराम महाराज व श्री संत ज्ञानेश्वर महाराज हे संपूर्ण विश्वाला व बहुजन समाजाला जागृत करणारे क्रांतिकारी साहित्यिक लेखक उत्कृष्ठ कवी संत होते त्यांनी आयुष्यभर अंधश्रद्धा आणि अयोग्य प्रथा परंपरेवर प्रहार केले शासनाच्या या कृतीमुळे महाराष्ट्रभर तीव्र संतापाची लाट उसळली असून त्यामुळे आम्ही शासनाचा तीव्र शब्दात निषेध करीत आहोत तरी शासनाने या गंभीर बाबीची तातडीने दखल घेऊन जगतगुरु श्री संत तुकाराम महाराज व श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचे नाव या यादीत समाविष्ट करावे अन्यथा शिवसेना स्टाईलने रस्त्यावर येऊन तीव्र आंदोलन करण्यात येईल कृपया नोंद घ्यावी व यापासून निर्माण होणाऱ्या परिणामास आपण स्वतः जबाबदार राहाल या निवेदनावर श्रीराम खेलदार खामगांव तालुकाप्रमुख शिवसेना विजय बोदडे आदींच्या सह्या आहेत.3