logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

प्रभावती नगरात परशुराम–बसवेश्वर जन्मोत्सव उत्साहात; ‘ब्रह्मतेज’ पुरस्काराने मान्यवरांचा गौरव परभणी (प्रतिनिधी):- शहरातील जुना पेडगाव रोडवरील दत्त मंदिर, प्रभावती नगर येथे भगवान परशुराम व संत महात्मा बसवेश्वर यांचा संयुक्त जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. या सोहळ्याचे यंदा १२ वे वर्ष असून विविध क्षेत्रातील मान्यवरांचा ‘ब्रह्मतेज’ पुरस्काराने सन्मान करण्यात आला. कार्यक्रमास वेशासं. बाळू गुरु असोलेकर यांचे आशीर्वचन लाभले. यावेळी आमदार डॉ. राहुल पाटील, न. चि. जाधव, नगरसेवक विजय जामकर, बालासाहेब बुलबुले, अर्जुन सामाले, अमोल वाघमारे, शिवलिंग खापरे, अध्यक्ष योगेश जोशी (सोनपेठकर), स्वागताध्यक्ष कुलदीप मानवतकर, सचिव प्रकाश कौसडीकर, उपाध्यक्ष महेश पारवेकर यांच्यासह अनेक मान्यवर व नागरिक उपस्थित होते. याप्रसंगी आमदार डॉ. राहुल पाटील (राजकीय क्षेत्र), डॉ. विवेक नावंदर (आरोग्य), ॲड. पवन निकम (सामाजिक), प्रमोद जाधव (युवा उद्योजक – औद्योगिक क्षेत्र) आणि राजन मंगरूळकर (पत्रकारिता) यांचा ‘ब्रह्मतेज’ पुरस्काराने विशेष गौरव करण्यात आला. कार्यक्रमादरम्यान मान्यवरांच्या हस्ते भगवान परशुराम व महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. आमदार डॉ. राहुल पाटील यांनी आपल्या भाषणात या महापुरुषांच्या विचारांचे आजच्या समाजातील महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष योगेश जोशी यांनी केले. सूत्रसंचालन भक्ती कुलकर्णी यांनी तर आभार कुलदीप मानवतकर यांनी मानले. सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी संयोजन समितीतील मकरंद मांडे, नितीन फुटाणे, बाळासाहेब तांबवे, महेश कौसडीकर, अजिंक्य जोशी, केदार गुंजकर, संजू गुरु वझूरकर, मनोज पवार, नंदकुमार परांडकर, शिवाजी गुंजकर, दीपक कासंडे, कुलदीप पुरंदरे आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास परिसरातील नागरिक व महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

5 hrs ago
user_Kapil Ashokrao Shinde
Kapil Ashokrao Shinde
मानवत, परभणी, महाराष्ट्र•
5 hrs ago
230032e0-6135-4ac1-a04b-b29980604b86

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • Post by Ramesh Mulgir
    1
    Post by Ramesh Mulgir
    user_Ramesh Mulgir
    Ramesh Mulgir
    मानवत, परभणी, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • Skyline Builders & Developers “क्षितिज पुरम – जिथे तुमच्या स्वप्नांना मिळतो स्वतःचा पत्ता ” क्षितिज पुरम… जिथे आकाशातील स्वप्नं… जमिनीवर उतरतात!
    2
    Skyline Builders & Developers “क्षितिज पुरम – जिथे तुमच्या स्वप्नांना मिळतो स्वतःचा पत्ता ”
क्षितिज पुरम…
जिथे आकाशातील स्वप्नं… जमिनीवर उतरतात!
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    3 hrs ago
  • Post by Anil Rathod
    1
    Post by Anil Rathod
    user_Anil Rathod
    Anil Rathod
    माजलगाव, बीड, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • महात्मा बसेश्वर महाराजांची जयंती मंठा येथील उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी पारंपरिक पद्धतीने ढोल ताशाच्या गजरात महात्मा बसवेश्वर महाराजांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यासाठी.
    1
    महात्मा बसेश्वर महाराजांची जयंती मंठा येथील उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी पारंपरिक पद्धतीने ढोल ताशाच्या गजरात महात्मा बसवेश्वर महाराजांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यासाठी.
    user_Mahadev pakhare super
    Mahadev pakhare super
    मराठवाडा अभिनेता,पत्रकार मंठा, जालना, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • लिलाव प्रक्रियेदरम्यान गोदामात तारण मालच नसल्याचे उघड झाले. तक्रारीनंतर गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध घेत आर्थिक गुन्हे शाखेने तांत्रिक विश्लेषणाद्वारे त्याला श्रीगोंदा (जि. अहिल्यानगर) येथून ताब्यात घेतले. न्यायालयाने आरोपीस 8 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
    1
    लिलाव प्रक्रियेदरम्यान गोदामात तारण मालच नसल्याचे उघड झाले.
तक्रारीनंतर गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध घेत आर्थिक गुन्हे शाखेने तांत्रिक विश्लेषणाद्वारे त्याला श्रीगोंदा (जि. अहिल्यानगर) येथून ताब्यात घेतले.
न्यायालयाने आरोपीस 8 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
    user_Sandip Gaikwad
    Sandip Gaikwad
    Accountant मंठा, जालना, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • Post by परळी वार्ता
    1
    Post by परळी वार्ता
    user_परळी वार्ता
    परळी वार्ता
    Newspaper publisher परळी, बीड, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • पुष्कर घाटात भीषण अपघात ! १५० फूट खोल दरीत कोसळली ३१ प्रवाशांना घेऊन जाणारी बस कोसळली ! आज १9 एप्रिल रविवारी सदरील घटना घडली असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
    1
    पुष्कर घाटात भीषण अपघात ! १५० फूट खोल दरीत कोसळली ३१ प्रवाशांना घेऊन जाणारी बस कोसळली !
आज १9 एप्रिल रविवारी सदरील घटना घडली असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
    user_पत्रकार ओमप्रकाश उढाण
    पत्रकार ओमप्रकाश उढाण
    घनसावंगी, जालना, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • दरेगाव येथील वन विभागाच्या शिवारात असलेल्या जंगल परिसरात एका व्यक्तीचा खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. संबंधित व्यक्ती संशयास्पद अवस्थेत आढळून आल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही बाब स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास येताच त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू केली. दरम्यान, या घटनेमुळे तालुका पोलीस ठाण्यात नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, खुनामागील कारणांचा तपास तालुका पोलीस करत आहेत. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.
    1
    दरेगाव येथील वन विभागाच्या शिवारात असलेल्या जंगल परिसरात एका व्यक्तीचा खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. संबंधित व्यक्ती संशयास्पद अवस्थेत आढळून आल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ही बाब स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास येताच त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू केली.
दरम्यान, या घटनेमुळे तालुका पोलीस ठाण्यात नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, खुनामागील कारणांचा तपास तालुका पोलीस करत आहेत. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.
    user_Sandip Gaikwad
    Sandip Gaikwad
    Accountant मंठा, जालना, महाराष्ट्र•
    9 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.