logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

महावितरणचा सौरऊर्जेला ‘ब्रेक’; वाढीव क्षमतेच्या प्रकल्पांवर निर्बंध पंतप्रधान सूर्यघर योजनेला राज्याची अट; शेवगावमध्ये विक्रेते व ग्राहकांमध्ये नाराजी शेवगाव | प्रतिनिधी : लक्ष्मण मडके महावितरण (महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी) ने सौरऊर्जा प्रकल्पांबाबत नवा नियम लागू केल्याने राज्यभरात खळबळ उडाली आहे. केंद्र सरकारच्या पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजना अंतर्गत बसविण्यात येणाऱ्या घरगुती सौर प्रकल्पांच्या क्षमतेवर आता मर्यादा घालण्यात आल्या आहेत. नव्या नियमानुसार, ग्राहकाच्या मागील १२ महिन्यांच्या प्रत्यक्ष वीज वापराइतकीच सौर प्रकल्पाची क्षमता मंजूर केली जाणार आहे. यापूर्वी अनेक ग्राहक भविष्यातील गरजा लक्षात घेऊन ३ किलोवॅट किंवा ५ किलोवॅट क्षमतेचे प्रकल्प बसवत होते; मात्र आता वापरापेक्षा जास्त क्षमतेला मंजुरी मिळणार नाही. हा बदल १३ फेब्रुवारीपासून ‘डिस्कॉम’ पोर्टलवर लागू करण्यात आला असून, कोणतीही पूर्वसूचना न दिल्याने सौर क्षेत्रातील व्यावसायिक व ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. शेवगावसह अहमदनगर जिल्ह्यात अनेक प्रस्तावित प्रकल्प रखडण्याची शक्यता व्यक्त होत आहे. सरकारची भूमिका - राज्याचे ऊर्जा मंत्री अतुल सावे यांनी या निर्णयाचे समर्थन करताना सांगितले की, “काही ग्राहक केवळ अनुदानाचा लाभ घेण्यासाठी जास्त क्षमतेचे प्रकल्प बसवत होते. त्यामुळे शासनावर अनावश्यक आर्थिक ताण येत होता. सबसिडीचा योग्य वापर व्हावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.” स्थानिक पातळीवरील परिणाम - शेवगाव तालुक्यात मागील काही महिन्यांत सौरऊर्जेची मागणी वाढली होती. अनेक नागरिकांनी कर्ज काढून किंवा बचतीतून मोठ्या क्षमतेचे सौर प्रकल्प बसविण्याची तयारी केली होती. मात्र नव्या अटीमुळे त्यांना अपेक्षित क्षमतेचा प्रकल्प बसविता येणार नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. तज्ज्ञांच्या मते, भविष्यात घरातील वीज वापर वाढण्याची शक्यता लक्षात घेता मोठ्या क्षमतेचा प्रकल्प फायदेशीर ठरत होता. आता मात्र ग्राहकांना मर्यादित क्षमतेतच समाधान मानावे लागणार आहे. चौकट - > “महावितरणने अचानक घेतलेल्या निर्णयामुळे सौर व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. ग्राहक भविष्यातील गरजा ओळखून मोठ्या क्षमतेचे प्रकल्प बसवत होते. आता त्यांच्यावर निर्बंध आल्याने अनेक ऑर्डर्स रद्द होण्याची शक्यता आहे. शासनाने या निर्णयाचा पुनर्विचार करावा.” विक्रेत्यांच्या मते, जर हा नियम कायम राहिला तर ग्रामीण भागातील सौरऊर्जा विस्ताराला मोठा अडथळा निर्माण होऊ शकतो. शासनाने विक्रेते व ग्राहक यांच्याशी चर्चा करून व्यवहार्य तोडगा काढावा, अशी मागणी करण्यात येत आहे. रामदास धावणे सौर पॅनल विक्रेते, शेवगाव

1 hr ago
user_Press Reporter Laxman Madake ज
Press Reporter Laxman Madake ज
Lawyer शेवगाव, अहमदनगर, महाराष्ट्र•
1 hr ago
124be9df-b742-4786-9eb3-3ea58516cbbe

महावितरणचा सौरऊर्जेला ‘ब्रेक’; वाढीव क्षमतेच्या प्रकल्पांवर निर्बंध पंतप्रधान सूर्यघर योजनेला राज्याची अट; शेवगावमध्ये विक्रेते व ग्राहकांमध्ये नाराजी शेवगाव | प्रतिनिधी : लक्ष्मण मडके महावितरण (महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी) ने सौरऊर्जा प्रकल्पांबाबत नवा नियम लागू केल्याने राज्यभरात खळबळ उडाली आहे. केंद्र सरकारच्या पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजना अंतर्गत बसविण्यात येणाऱ्या घरगुती सौर प्रकल्पांच्या क्षमतेवर आता मर्यादा घालण्यात आल्या आहेत. नव्या नियमानुसार, ग्राहकाच्या मागील १२ महिन्यांच्या प्रत्यक्ष वीज वापराइतकीच सौर प्रकल्पाची क्षमता मंजूर केली जाणार आहे. यापूर्वी अनेक ग्राहक भविष्यातील गरजा लक्षात घेऊन ३ किलोवॅट किंवा ५ किलोवॅट क्षमतेचे प्रकल्प बसवत होते; मात्र आता वापरापेक्षा जास्त क्षमतेला मंजुरी मिळणार नाही. हा बदल १३ फेब्रुवारीपासून ‘डिस्कॉम’ पोर्टलवर लागू करण्यात आला असून, कोणतीही पूर्वसूचना न दिल्याने सौर क्षेत्रातील व्यावसायिक व ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. शेवगावसह अहमदनगर जिल्ह्यात अनेक प्रस्तावित प्रकल्प रखडण्याची शक्यता व्यक्त होत आहे. सरकारची भूमिका - राज्याचे ऊर्जा मंत्री अतुल सावे यांनी या निर्णयाचे समर्थन करताना सांगितले की, “काही ग्राहक केवळ अनुदानाचा लाभ घेण्यासाठी जास्त क्षमतेचे प्रकल्प बसवत होते. त्यामुळे शासनावर अनावश्यक आर्थिक ताण येत होता. सबसिडीचा योग्य वापर व्हावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.” स्थानिक पातळीवरील परिणाम - शेवगाव तालुक्यात मागील काही महिन्यांत सौरऊर्जेची मागणी वाढली होती. अनेक नागरिकांनी कर्ज काढून किंवा बचतीतून मोठ्या क्षमतेचे सौर प्रकल्प बसविण्याची तयारी केली होती. मात्र नव्या अटीमुळे त्यांना अपेक्षित क्षमतेचा प्रकल्प बसविता येणार नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. तज्ज्ञांच्या मते, भविष्यात घरातील वीज वापर वाढण्याची शक्यता लक्षात घेता मोठ्या क्षमतेचा प्रकल्प फायदेशीर ठरत होता. आता मात्र ग्राहकांना मर्यादित क्षमतेतच समाधान मानावे लागणार आहे. चौकट - > “महावितरणने अचानक घेतलेल्या निर्णयामुळे सौर व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. ग्राहक भविष्यातील गरजा ओळखून मोठ्या क्षमतेचे प्रकल्प बसवत होते. आता त्यांच्यावर निर्बंध आल्याने अनेक ऑर्डर्स रद्द होण्याची शक्यता आहे. शासनाने या निर्णयाचा पुनर्विचार करावा.” विक्रेत्यांच्या मते, जर हा नियम कायम राहिला तर ग्रामीण भागातील सौरऊर्जा विस्ताराला मोठा अडथळा निर्माण होऊ शकतो. शासनाने विक्रेते व ग्राहक यांच्याशी चर्चा करून व्यवहार्य तोडगा काढावा, अशी मागणी करण्यात येत आहे. रामदास धावणे सौर पॅनल विक्रेते, शेवगाव

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • Post by शहादेव काशिनाथ वैद्य
    3
    Post by शहादेव काशिनाथ वैद्य
    user_शहादेव काशिनाथ वैद्य
    शहादेव काशिनाथ वैद्य
    शेवगाव, अहमदनगर, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • शेवगाव (लक्ष्मण मडके) सुसरे ( पाथर्डी) येथील ग्रामसेवक दीर्घकाळ अनुपस्थित राहत असल्याने ग्रामपंचायतीचे दैनंदिन कामकाज ठप्प झाल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. विविध शासकीय कामांसाठी नागरिकांना वारंवार ग्रामपंचायत कार्यालयात चकरा माराव्या लागत असून, जन्म-मृत्यू दाखले, उत्पन्न व रहिवासी प्रमाणपत्रे, शासकीय योजनांचे प्रस्ताव, कर नोंदी तसेच पाणी व रस्ते विषयक कामे प्रलंबित राहिल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. या संदर्भात ग्रामस्थांच्या वतीने गटविकास अधिकारी, पंचायत समिती पाथर्डी यांच्याकडे लेखी निवेदन देण्यात आले आहे. अर्जदार श्री. उदय सुरेश काकासाहेब (रा. सुसरे, ता. पाथर्डी) यांनी निवेदनात नमूद केले आहे की, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ नुसार ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा मुख्य प्रशासकीय अधिकारी (सचिव) असून कार्यालयात नियमित उपस्थित राहणे, ग्रामसभेचे आयोजन करणे, विविध नोंदी व दाखले देणे, शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे आणि ग्रामपंचायतीचे प्रशासकीय कामकाज सुरळीत ठेवणे ही त्यांची जबाबदारी आहे. मात्र गेल्या महिनाभरापासून संबंधित ग्रामसेवक वारंवार अनुपस्थित राहत असल्याने प्रशासनिक यंत्रणा विस्कळीत झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. यासोबतच, निवेदन देण्यासाठी गेलेल्या ग्रामस्थांना संबंधित ग्रामसेवकाने कथितरित्या दमदाटी केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. “माझा भाऊ पीएसआय आहे. मला कोणी हिशोब मागितला तर ३५३ चा खोटा गुन्हा दाखल करीन आणि आईचं दूध आठवायला लावीन,” अशा स्वरूपाचे वक्तव्य ग्रामसेवकाने केल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या वेळी सुरेश उदागे, संदीप उदागे व सतीश पिसोटे उपस्थित असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या प्रकारामुळे गावातील वातावरण तापले असून, संबंधित ग्रामसेवकाविरुद्ध तात्काळ चौकशी करून शिस्तभंगाची कारवाई करावी तसेच सुसरे गावासाठी स्वतंत्र व नियमित नवीन ग्रामसेवकाची दोन दिवसांत नेमणूक करावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. अन्यथा पंचायत समिती कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे. दरम्यान, या प्रकरणामुळे पंचायत समिती प्रशासनासमोर ग्रामपातळीवरील कामकाज सुरळीत ठेवण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले असून, संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालून योग्य तो निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा सुसरे ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे.
    4
    शेवगाव (लक्ष्मण मडके)
सुसरे ( पाथर्डी) येथील ग्रामसेवक दीर्घकाळ अनुपस्थित राहत असल्याने ग्रामपंचायतीचे दैनंदिन कामकाज ठप्प झाल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. विविध शासकीय कामांसाठी नागरिकांना वारंवार ग्रामपंचायत कार्यालयात चकरा माराव्या लागत असून, जन्म-मृत्यू दाखले, उत्पन्न व रहिवासी प्रमाणपत्रे, शासकीय योजनांचे प्रस्ताव, कर नोंदी तसेच पाणी व रस्ते विषयक कामे प्रलंबित राहिल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
या संदर्भात ग्रामस्थांच्या वतीने गटविकास अधिकारी, पंचायत समिती पाथर्डी यांच्याकडे लेखी निवेदन देण्यात आले आहे. अर्जदार श्री. उदय सुरेश काकासाहेब (रा. सुसरे, ता. पाथर्डी) यांनी निवेदनात नमूद केले आहे की, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ नुसार ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा मुख्य प्रशासकीय अधिकारी (सचिव) असून कार्यालयात नियमित उपस्थित राहणे, ग्रामसभेचे आयोजन करणे, विविध नोंदी व दाखले देणे, शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे आणि ग्रामपंचायतीचे प्रशासकीय कामकाज सुरळीत ठेवणे ही त्यांची जबाबदारी आहे. मात्र गेल्या महिनाभरापासून संबंधित ग्रामसेवक वारंवार अनुपस्थित राहत असल्याने प्रशासनिक यंत्रणा विस्कळीत झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
यासोबतच, निवेदन देण्यासाठी गेलेल्या ग्रामस्थांना संबंधित ग्रामसेवकाने कथितरित्या दमदाटी केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. “माझा भाऊ पीएसआय आहे. मला कोणी हिशोब मागितला तर ३५३ चा खोटा गुन्हा दाखल करीन आणि आईचं दूध आठवायला लावीन,” अशा स्वरूपाचे वक्तव्य ग्रामसेवकाने केल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या वेळी सुरेश उदागे, संदीप उदागे व सतीश पिसोटे उपस्थित असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या प्रकारामुळे गावातील वातावरण तापले असून, संबंधित ग्रामसेवकाविरुद्ध तात्काळ चौकशी करून शिस्तभंगाची कारवाई करावी तसेच सुसरे गावासाठी स्वतंत्र व नियमित नवीन ग्रामसेवकाची दोन दिवसांत नेमणूक करावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. अन्यथा पंचायत समिती कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.
दरम्यान, या प्रकरणामुळे पंचायत समिती प्रशासनासमोर ग्रामपातळीवरील कामकाज सुरळीत ठेवण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले असून, संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालून योग्य तो निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा सुसरे ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे.
    user_Press Reporter Laxman Madake ज
    Press Reporter Laxman Madake ज
    Lawyer शेवगाव, अहमदनगर, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • छत्रपती संभाजीनगर,तिरुपती प्रिंट शॉप चे उद्घाटन सोहळा, जाधव वाडी छत्रपती संभाजीनगर मध्ये राजकीय सामाजिक विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न
    1
    छत्रपती संभाजीनगर,तिरुपती प्रिंट शॉप चे उद्घाटन सोहळा,
जाधव वाडी छत्रपती संभाजीनगर मध्ये राजकीय सामाजिक विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न
    user_One day news
    One day news
    News Anchor औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • झरेश्वर महादेव मंदिरात प्रथम वर्धापन दिनानिमित्त शिवलिलामृत पारायण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न. ह.भ.प.सदगुरू परमपूज्य श्री.राघव चैतन्य बाबा यांच्या काल्याच्या कीर्तनाने कार्यक्रमाची सांगता अहिल्यानगर तालुक्यातील आशितोष भगवान झरेश्वर महादेव मंदिर शिवमल्हारगडच्या प्रथम वर्धापनदिनानिमित्त नगर तालुक्यातील हिवरे झरे येथे श्रीमद् भागवत कथा व शिवलिलामृत पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. 9 फेब्रुवारीपासून या सोहळ्यास सुरवात झाली तर 16 फेब्रुवारी रोजी हरिभक्त पारायण राघव चैतन्य बाबा यांच्या काल्याच्या कीर्तनाने या सप्ताह कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या सप्ताहात 9 फेब्रुवारी रोजी भागवत महात्म्य,10 फेब्रुवारी रोजी परीक्षित दिग्विजय,जय विजय कथा, 11 फेब्रुवारीला ध्रृव व्याख्यान,अजामेळ व्याख्यान, हिरण्यकश्यपू वध, १२ फेब्रुवारी रोजी गजेंद्र मोक्ष, वामन अवतार, १३ फेब्रुवारी रोजी श्रीराम चरित्र, श्रीकृष्ण जन्मोत्सव, १४ फेब्रुवारी रोजी गोकुळलिला, गोवर्धन लिला, रासलिला १५ फेब्रुवारी रोजी कंस वध श्रीकृष्ण रुक्मिणी विवाह परिक्षित उद्धार यावर कथा प्रवचन झाले तर १६ फेब्रुवारी रोजी ह.भ.प.सदगुरू परमपूज्य श्री.राघव चैतन्य बाबा यांच्या काल्याच्या कीर्तनाने कार्यक्रमाची सांगता झाली.रविवार 15 फेब्रुवारी रोजी सकाळी 7 ते 8 या वेळेस शिवअभिषेक तसेच होम हवन झाला. त्याबरोबरच १६ फेब्रुवारी रोजी भागवत ग्रंथ मिरवणूक व ग्राम प्रदक्षिणा काढण्यात आली. या धार्मिक कार्यक्रमांचा भाविकांनी दररोज मोठ्या प्रमाणावर लाभ घेतला. हा आठ दिवसाचा पारायण सोहळा संपन्न करण्यासाठी आशुतोष झरेश्वर मंदिर पंच कमेटीचे खजिनदार रोहिदास भांडवलकर ,अध्यक्ष नारायण रोडे, उपाध्यक्ष ओंकार काटे, सदस्य संजय टकले,अक्षय काटे आदी कमिटीचे पदाधिकारी व हिवरे झरे येथील सर्व ग्रामस्थ व भजन मंडळी यांनी अथक परिश्रम घेतले. या पारायण सोहळ्यानिमित्त टकले परिवार, आंबदास काटे, राहुल बहिरट (खडकी), अभय सिंघ राठी (कमांडर) अहिल्यानगर, समस्त रोडे परिवार, झरेकर परिवार,गोरक्ष गायकवाड, समस्त काटे परिवार,बाबा शेठ झरेकर, आदी दानशूर भूमिपुत्रांनी अन्नदान करून विशेष योगदान केले.राजाराम रखमाजी वाबळे यांनी सभामंडप, परिसर पेंविंग ब्लॉक दिले.
    1
    झरेश्वर महादेव मंदिरात प्रथम वर्धापन दिनानिमित्त शिवलिलामृत पारायण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न.
ह.भ.प.सदगुरू परमपूज्य श्री.राघव चैतन्य बाबा यांच्या काल्याच्या कीर्तनाने कार्यक्रमाची सांगता
अहिल्यानगर तालुक्यातील आशितोष भगवान झरेश्वर महादेव मंदिर शिवमल्हारगडच्या प्रथम वर्धापनदिनानिमित्त नगर तालुक्यातील हिवरे झरे येथे श्रीमद् भागवत कथा व शिवलिलामृत पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. 9 फेब्रुवारीपासून या सोहळ्यास सुरवात झाली तर 16 फेब्रुवारी रोजी हरिभक्त पारायण राघव चैतन्य बाबा यांच्या काल्याच्या कीर्तनाने या सप्ताह कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या सप्ताहात 9 फेब्रुवारी रोजी भागवत महात्म्य,10 फेब्रुवारी रोजी परीक्षित दिग्विजय,जय विजय कथा, 11 फेब्रुवारीला ध्रृव व्याख्यान,अजामेळ व्याख्यान, हिरण्यकश्यपू वध, १२ फेब्रुवारी रोजी गजेंद्र मोक्ष, वामन अवतार, १३ फेब्रुवारी रोजी श्रीराम चरित्र, श्रीकृष्ण जन्मोत्सव, १४ फेब्रुवारी रोजी गोकुळलिला, गोवर्धन लिला, रासलिला १५ फेब्रुवारी रोजी कंस वध श्रीकृष्ण रुक्मिणी विवाह परिक्षित उद्धार यावर कथा प्रवचन झाले तर १६ फेब्रुवारी रोजी ह.भ.प.सदगुरू परमपूज्य श्री.राघव चैतन्य बाबा यांच्या काल्याच्या कीर्तनाने कार्यक्रमाची सांगता झाली.रविवार 15 फेब्रुवारी रोजी सकाळी 7 ते 8 या वेळेस शिवअभिषेक तसेच होम हवन झाला. त्याबरोबरच १६ फेब्रुवारी रोजी भागवत ग्रंथ मिरवणूक व ग्राम प्रदक्षिणा काढण्यात आली. या धार्मिक कार्यक्रमांचा भाविकांनी दररोज मोठ्या प्रमाणावर लाभ घेतला. 
हा आठ दिवसाचा पारायण सोहळा संपन्न करण्यासाठी आशुतोष झरेश्वर मंदिर पंच कमेटीचे खजिनदार रोहिदास भांडवलकर ,अध्यक्ष
नारायण रोडे, उपाध्यक्ष ओंकार काटे, सदस्य संजय टकले,अक्षय काटे आदी कमिटीचे पदाधिकारी व हिवरे झरे येथील सर्व ग्रामस्थ व भजन मंडळी यांनी अथक परिश्रम घेतले.
या पारायण सोहळ्यानिमित्त टकले परिवार, आंबदास काटे, राहुल बहिरट (खडकी), अभय सिंघ राठी (कमांडर) अहिल्यानगर, समस्त रोडे परिवार, झरेकर परिवार,गोरक्ष गायकवाड, समस्त काटे परिवार,बाबा शेठ झरेकर,
आदी दानशूर भूमिपुत्रांनी अन्नदान करून विशेष योगदान केले.राजाराम रखमाजी वाबळे यांनी सभामंडप, परिसर पेंविंग ब्लॉक दिले.
    user_Deepak Vijay Kaswa
    Deepak Vijay Kaswa
    अहमदनगर, अहमदनगर, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • Shree Gajanan Vidya Mandir School के और से Mk Deshmukh का Satkar
    1
    Shree Gajanan Vidya Mandir School के और से Mk Deshmukh का Satkar
    user_Gallinews Bharat
    Gallinews Bharat
    पत्रकार Aurangabad, Maharashtra•
    20 hrs ago
  • Post by दैनिक,"निळे प्रतीक"
    1
    Post by दैनिक,"निळे प्रतीक"
    user_दैनिक,"निळे प्रतीक"
    दैनिक,"निळे प्रतीक"
    पत्रकार औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • (प्रतिनिधी):- शासनाच्या घरकुल योजने अंतर्गत बेघरांना साधारण दोन लाख रुपयांचे अनुदान दिले जाते; मात्र बीड जिल्हा परिषदेच्या आवारात उभारण्यात आलेल्या डेमो घरकुलासाठी तब्बल दहा लाख रुपये खर्च करण्यात आल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख, बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ (महाराष्ट्र राज्य) डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी केला आहे. या बाबत त्यांनी जिल्हाधिकारी बीड तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद बीड यांच्या कडे लेखी तक्रार दाखल केली आहे. घरकुल योजनेत केंद्र शासनाकडून सुमारे १ लाख २० हजार रुपये, राज्य शासनाकडून अतिरिक्त ५० हजार रुपये, मनरेगा अंतर्गत २६ ते २८ हजार रुपये आणि स्वच्छतागृहासाठी १२ हजार रुपये असे मिळून एकूण सुमारे दोन लाख रुपयांचे अनुदान दिले जाते. मात्र जिल्हा परिषद आवारातील डेमो हाऊससाठी ३१ जानेवारी २०२४ रोजी ४ लाख ९९ हजार २७८ रुपयांची वर्क ऑर्डर देण्यात आली. त्या नंतर ५ जानेवारी २०२६ रोजी आणखी ४ लाख ९९ हजार रुपयांच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्यात आली. अशा प्रकारे एकाच कामासाठी दोन टप्प्यांत सुमारे १० लाखांचा खर्च करण्यात आल्याचा आरोप आहे. उभारण्यात आलेल्या डेमो हाऊस मध्ये एक लहान हॉल व दोन छोट्या खोल्या असून दोन लोखंडी दरवाजे, दोन मोठ्या खिडक्या व एक छोटी खिडकी बसविण्यात आली आहे. घर पत्र्याचे असून सुमारे २१७ चौरस फुट बांधकामासाठी सहा कॉलम उभारण्यात आले आहेत. पत्र्याच्या घरासाठी स्लॅबसाठी लागणारे कॉलम उभारण्याची गरज काय, असा सवाल डॉ. गणेश ढवळे यांनी उपस्थित केला आहे. “घरकुल मंजुरी पासून हप्ते खात्यावर पडण्यापर्यंत चिरीमिरी द्यावी लागते. शासनाकडून मंजूर ५ ब्रास वाळू प्रत्यक्षात मिळत नाही. हातात सव्वा लाख रुपये उरतात, त्यातून घर कसे बांधायचे?” असा सवाल ग्रामस्थ करत असताना डेमो हाऊस साठी १० लाखांचा खर्च म्हणजे घरकुल योजनेची क्रूर थट्टा असल्याची संतप्त प्रतिक्रिया डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी दिली आहे. सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. ------_------ :>-> शासन बेघरांना घरकुल योजनेसाठी २ लाख रुपये अनुदान देते.. त्यात घरकुल मंजुरी पासुन हफ्ते पडण्याची पैसे द्यावे लागतात.. हातात कसे बसे सव्वा लाख रुपये पडतात आणि बीड जिल्हा परिषद घरकुल योजनेचा डेमोसाठी १० लाख रुपये खर्च करते..हि क्रुर थट्टा आहे... संबंधित प्रकरणात सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी अशी जिल्हाधिकारी बीड आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड यांना लेखी मागणी केली आहे. डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर -----_----- -:- डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर -:- सामाजिक कार्यकर्ते
    1
    (प्रतिनिधी):- शासनाच्या घरकुल योजने अंतर्गत बेघरांना साधारण दोन लाख रुपयांचे अनुदान दिले जाते; मात्र बीड जिल्हा परिषदेच्या आवारात उभारण्यात आलेल्या डेमो घरकुलासाठी तब्बल दहा लाख रुपये खर्च करण्यात आल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख, बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ (महाराष्ट्र राज्य) डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी केला आहे. या बाबत त्यांनी जिल्हाधिकारी बीड तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद बीड यांच्या कडे लेखी तक्रार दाखल केली आहे. घरकुल योजनेत केंद्र शासनाकडून सुमारे १ लाख २० हजार रुपये, राज्य शासनाकडून अतिरिक्त ५० हजार रुपये, मनरेगा अंतर्गत २६ ते २८ हजार रुपये आणि स्वच्छतागृहासाठी १२ हजार रुपये असे मिळून एकूण सुमारे दोन लाख रुपयांचे अनुदान दिले जाते. मात्र जिल्हा परिषद आवारातील डेमो हाऊससाठी ३१ जानेवारी २०२४ रोजी ४ लाख ९९ हजार २७८ रुपयांची वर्क ऑर्डर देण्यात आली. त्या नंतर ५ जानेवारी २०२६ रोजी आणखी ४ लाख ९९ हजार रुपयांच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्यात आली. अशा प्रकारे एकाच कामासाठी दोन टप्प्यांत सुमारे १० लाखांचा खर्च करण्यात आल्याचा आरोप आहे. उभारण्यात आलेल्या डेमो हाऊस मध्ये एक लहान हॉल व दोन छोट्या खोल्या असून दोन लोखंडी दरवाजे, दोन मोठ्या खिडक्या व एक छोटी खिडकी बसविण्यात आली आहे. घर पत्र्याचे असून सुमारे २१७ चौरस फुट बांधकामासाठी सहा कॉलम उभारण्यात आले आहेत. पत्र्याच्या घरासाठी स्लॅबसाठी लागणारे कॉलम उभारण्याची गरज काय, असा सवाल डॉ. गणेश ढवळे यांनी उपस्थित केला आहे. “घरकुल मंजुरी पासून हप्ते खात्यावर पडण्यापर्यंत चिरीमिरी द्यावी लागते. शासनाकडून मंजूर ५ ब्रास वाळू प्रत्यक्षात मिळत नाही. हातात सव्वा लाख रुपये उरतात, त्यातून घर कसे बांधायचे?” असा सवाल ग्रामस्थ करत असताना डेमो हाऊस साठी १० लाखांचा खर्च म्हणजे घरकुल योजनेची क्रूर थट्टा असल्याची संतप्त प्रतिक्रिया डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी दिली आहे. सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
------_------
:>-> शासन बेघरांना घरकुल योजनेसाठी २ लाख रुपये अनुदान देते.. त्यात घरकुल मंजुरी पासुन हफ्ते पडण्याची पैसे द्यावे लागतात.. हातात कसे बसे सव्वा लाख रुपये पडतात आणि बीड जिल्हा परिषद घरकुल योजनेचा डेमोसाठी १० लाख रुपये खर्च करते..हि क्रुर थट्टा आहे... संबंधित प्रकरणात सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी अशी जिल्हाधिकारी बीड आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड यांना लेखी मागणी केली आहे. डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
-----_-----
-:- डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर -:-
सामाजिक कार्यकर्ते
    user_शेख महेशर ताहेर(पञकार)
    शेख महेशर ताहेर(पञकार)
    बीड, बीड, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • अंबादास दानवे सिल्लोड शहरात, आमदार अब्दुल सत्तार यांच्या पत्नी चे निधन, सिल्लोड शहराच्या माजी नगराध्यक्षा नफीसा बेगम अब्दुल सत्तार यांचे निधन, सिल्लोड शहरात शोककळा.. अंत्यविधीसाठी हजारो नागरिकांचा.
    1
    अंबादास दानवे सिल्लोड शहरात, आमदार अब्दुल सत्तार यांच्या पत्नी चे निधन,
सिल्लोड शहराच्या माजी नगराध्यक्षा नफीसा बेगम अब्दुल सत्तार यांचे निधन, सिल्लोड शहरात शोककळा.. अंत्यविधीसाठी हजारो नागरिकांचा.
    user_One day news
    One day news
    News Anchor औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    21 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.