भारत सरकारच्या नशा मुक्त भारत अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी लातूर पोलीस सज्ज नशामुक्त भारत अभियान' अंतर्गत विवेकानंद चौक पोलिसांची धडक कारवाई; लातूर (एल पी उगीले) येथील विवेकानंद चौक पोलीस स्टेशन अंतर्गत अंमली पदार्थ सेवन करणाऱ्या चौघांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. केंद्र शासनाच्या 'नशामुक्त भारत अभियान' अनुषंगाने पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या निर्देशानुसार व अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर जिल्ह्यात अंमली पदार्थांचे सेवन, साठा, विक्री व वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेचाच एक भाग म्हणून विवेकानंद चौक पोलीस ठाण्यामार्फत विशेष कारवाई करण्यात आली असून, अंमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या चार जणांविरुद्ध एन.डी.पी.एस. अधिनियम, कलम 27 अन्वये स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.दि. 31 जुलै 2026 रोजी सायंकाळी विवेकानंद चौक पोलीस ठाण्याच्या पथकाने कुष्ठधाम-सारोळा रोड समोरील मोकळी जागा व परिसरात विशेष पाहणी व कारवाई केली. यावेळी संशयित व्यक्तींची तपासणी केली असता त्या अंमली पदार्थाचे सेवन करत असल्याच्या अवस्थेत आढळून आले. त्यांच्या ताब्यातून गांजा सेवनासाठी वापरलेली चिलीम, त्यामधील अर्धवट जळालेला गांजा, ओलसर कापड तसेच माचीसची डबी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर प्रकरणात चार आरोपी विरुद्ध स्वतंत्रपणे गुन्हे क्र. 547/2026, 548/2026, 549/2026 व 550/2026 असे गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. सदर प्रकरणांमध्ये अनुक्रमे पोलीस अमलदार योगेश गायकवाड, सचिन राठोड, दिलीप सोनकांबळे, रणवीर बालासाहेब देशमुख यांनी फिर्याद दिली आहे. पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांचे मार्गदर्शनात पुढील तपास पोलीस अमलदार एस. डी. बेरळीकर व एम. एस. डीगे हे करीत आहेत. 'नशामुक्त भारत अभियान' प्रभावीपणे राबविण्याच्या दृष्टीने लातूर पोलीसांकडून अंमली पदार्थांचे सेवन, साठा, विक्री व वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही कठोर व सातत्यपूर्ण कारवाई सुरू राहणार आहे. नागरिकांनी अंमली पदार्थांबाबत कोणतीही माहिती उपलब्ध झाल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी अथवा लातूर पोलिसांशी संपर्क साधून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

- पिएमश्री जिल्हा परिषद हायस्कूल मुलींचे, मुखेड येथे साहित्य रत्न लोकशाहीर डॉ. अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्ताने वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून विध्यार्थी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.. अतिशय छान असं विषयास धरून खूप मोठ्या संख्येनी लेकरांची भाषणे झाली.. सर्व वर्ग शिक्षकांनी विध्यार्थ्यांची चांगली तयारी करून घेतली.. मुख्याध्यापक राजपूत सरांचे चांगले सहकार्य झाले.. तसेंच नेहमीप्रमाणेच शालेय व्यवस्थापन समितीचे पण चांगले योगदान मिळाले... सर्वांचे मनःपूर्वक आभार... आपलाच...नितीनदादा तलवारे मराठवाडा अध्यक्ष तथा शा. स. सदस्य, मुखेड. पिएमश्री जिल्हा परिषद हायस्कूल मुलींचे, मुखेड येथे साहित्य रत्न लोकशाहीर डॉ. अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्ताने वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून विध्यार्थी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.. अतिशय छान असं विषयास धरून खूप मोठ्या संख्येनी लेकरांची भाषणे झाली.. सर्व वर्ग शिक्षकांनी विध्यार्थ्यांची चांगली तयारी करून घेतली.. मुख्याध्यापक राजपूत सरांचे चांगले सहकार्य झाले.. तसेंच नेहमीप्रमाणेच शालेय व्यवस्थापन समितीचे पण चांगले योगदान मिळाले... सर्वांचे मनःपूर्वक आभार...नितीनदादा तलवारे मराठवाडा अध्यक्ष तथा शा. स. सदस्य, मुखेड.3
- भारतीय शेतकरी कामगार पक्ष च्या वर्धापन दिनानिमित्त सर्व निष्ठावंत कार्यकर्त्यांना क्रांतिकारी लाल सलाम व हार्दिक शुभेच्छा1
- सारोळा चौकात एसटी बसचा अपघात थोडक्यात टळला; 60 ते 70 प्रवाशांचा जीव भांड्यात लातूर, दि. 1 ऑगस्ट : शहरातील नांदेड रोडवरील सारोळा चौक येथे शनिवारी रात्री सुमारे 9.40 वाजण्याच्या सुमारास उदगीर डेपोच्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसचा अपघात थोडक्यात टळल्याची घटना घडली. या बसमध्ये अंदाजे 60 ते 70 प्रवासी प्रवास करत असल्याची प्राथमिक माहिती आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, बस काही काळ चालकाच्या नियंत्रणाबाहेर गेल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र, चालकाने प्रसंगावधान राखल्याने मोठी दुर्घटना टळली. या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा गंभीर दुखापत झाल्याची अधिकृत माहिती रात्री उशिरापर्यंत उपलब्ध नव्हती. घटनेनंतर परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली. घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, चालकाने मद्यपान केले होते का किंवा नेमके कारण काय होते, याबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही. या घटनेची सखोल चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी प्रवासी व नागरिकांकडून करण्यात येत आहे. सारोळा चौकात एसटी बसचा अपघात थोडक्यात टळला; 60 ते 70 प्रवाशांचा जीव भांड्यात लातूर, दि. 1 ऑगस्ट : शहरातील नांदेड रोडवरील सारोळा चौक येथे शनिवारी रात्री सुमारे 9.40 वाजण्याच्या सुमारास उदगीर डेपोच्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसचा अपघात थोडक्यात टळल्याची घटना घडली. या बसमध्ये अंदाजे 60 ते 70 प्रवासी प्रवास करत असल्याची प्राथमिक माहिती आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, बस काही काळ चालकाच्या नियंत्रणाबाहेर गेल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र, चालकाने प्रसंगावधान राखल्याने मोठी दुर्घटना टळली. या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा गंभीर दुखापत झाल्याची अधिकृत माहिती रात्री उशिरापर्यंत उपलब्ध नव्हती. घटनेनंतर परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली. घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, चालकाने मद्यपान केले होते का किंवा नेमके कारण काय होते, याबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही. या घटनेची सखोल चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी प्रवासी व नागरिकांकडून करण्यात येत आहे.1
- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अभिष्टचिंतन सोहळा संपन्न किर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या किर्तन पासदगाव येथे संपन्न1
- देगलूर येथे आण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्त - शिवसेना युवासेनेतर्फे खिचडी वाटप देगलूर क्रांतिसूर्य, लोकशाहीर, साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त देगलूर येथील अण्णाभाऊ साठे चौकात शिवसेना व युवासेना, देगलूर शहर व ग्रामीण यांच्या वतीने विनम्र अभिवादन करून भव्य खिचडी वाटपाचा सामाजिक उपक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या प्रारंभी लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर उपस्थित अनुयायी, साहित्यप्रेमी, समाजबांधव तसेच नागरिकांना खिचडीचे वाटप करण्यात आले. समाजात समता, बंधुता व सामाजिक ऐक्याचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमाचे आयोजन नांदेड युवासेना जिल्हाप्रमुख तथा देगलूर विधानसभा क्षेत्र प्रमुख नामदेव थडके पाटील यांच्या पुढाकारातून करण्यात आले. कार्यक्रमास शिवसेना नांदेड जिल्हा उपप्रमुख व्यंकटपाटील खतगावकर, डॉ. धुमाळे,मा . सरपंच मनोहर देगावकर, शिवसेना तालुकाप्रमुख गंगाधर तूमलूरकर, ॲड. अंकुशराजे जाधव, सुनील थडके, ॲड. कापसे विवेक सावकार पलकंडवार रावनपल्ले अंकुश खतगावकर, अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष कुणाल गवलवाड, उपाध्यक्ष मष्णाभाऊ ढोसनिकर, सचिव प्रदीप नरंगलकर तसेच देगलूर तालुक्यातील युवासैनिक, शिवसैनिक आणि असंख्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य, श्रमिक चळवळ आणि सामाजिक समतेच्या विचारांचा जागर करत त्यांच्या कार्याचा गौरव केला. समाजहित आणि सेवाभाव जोपासणारे असे उपक्रम भविष्यातही सातत्याने राबविण्याचा निर्धार आयोजकांनी व्यक्त केला.1