शेतकऱ्यांच्या हितासाठी 63 केव्हीए ऐवजी 100k केव्हीए ट्रांसफार्मर बसवण्याची आमदार राजेश बकाने यांची मागणी *शेतकऱ्यांच्या हितासाठी ६३ केव्हीएऐवजी १०० केव्हीए ट्रान्सफॉर्मर बसविण्याची आमदार राजेश बकाने यांची मागणी* देवळी–पुलगाव विधानसभा मतदारसंघासह जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये शेतीसाठीचा वीजपुरवठा अपुरा पडत असल्याने शेतकऱ्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. ही बाब लक्षात घेऊन जिल्हा वार्षिक योजनेच्या बैठकीत आमदार राजेश बकाने यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधत महत्त्वपूर्ण मागणी केली. बैठकीत बोलताना आमदार बकाने म्हणाले की, सध्या अनेक गावांमध्ये ६३ केव्हीए क्षमतेच्या एका ट्रान्सफॉर्मरवर मोठ्या प्रमाणात कृषी वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत. त्यामुळे ट्रान्सफॉर्मरवर क्षमतेपेक्षा अधिक भार येतो. परिणामी वारंवार वीज खंडित होणे, कमी दाबाने वीज मिळणे, ट्रान्सफॉर्मर जळणे किंवा बिघाड होणे अशा समस्या निर्माण होत असून त्याचा थेट परिणाम शेतीवर होत आहे. यंदा पावसाचे स्वरूप अनिश्चित असून निसर्गाच्या लहरीपणामुळे अनेक भागांमध्ये पिकांना ओलीत करण्याची गरज भासू शकते. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना विद्युत पंपाच्या माध्यमातून सिंचनावरच अवलंबून राहावे लागणार आहे. मात्र, वीजपुरवठाच सुरळीत नसेल तर शेतकऱ्यांसमोर मोठे संकट निर्माण होऊ शकते, असे आमदार बकाने यांनी बैठकीत स्पष्ट केले. यासाठी ज्या गावांमध्ये ६३ केव्हीए ट्रान्सफॉर्मरवर जास्त प्रमाणात वीज जोडण्या आहेत, त्या ठिकाणी तातडीने १०० केव्हीए क्षमतेचे ट्रान्सफॉर्मर बसविण्याचे नियोजन करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली. यामुळे ट्रान्सफॉर्मरवरील अतिरिक्त भार कमी होईल, वीजपुरवठा अधिक सुरळीत राहील आणि शेतकऱ्यांना वेळेवर सिंचन करता येईल, असे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी आणि शेतीला आवश्यक असलेला अखंड व दर्जेदार वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी महावितरणने या मागणीवर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षाही आमदार राजेश बकाने यांनी व्यक्त केली. शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने ही मागणी अत्यंत महत्त्वाची असून आगामी काळात सिंचन व्यवस्थेवर त्याचा सकारात्मक परिणाम होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे दिवंगत नेते अजितदादा पवार यांच्या जयंती सप्ताहाचे औचित्य - जगदविख्यात साहित्य भूषण शिवशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे दिवंगत नेते अजितदादा पवार यांच्या जयंती सप्ताहाचे औचित्य - जगदविख्यात साहित्य भूषण शिवशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्ताने (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी , सामाजिक न्याय विभाग ( श,प) व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अ.प ) यांचे आर्वीत भव्य भोजनदानाचे आयोजन आर्वी:-दिनांक एक जून 2026 रोजी साहित्यसम्राट लोकशाहीर डॉक्टर अण्णा भाऊ साठे यांच्या 106 व्या जयंतीनिमित्त तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे दिवंगत नेते माजी उपमुख्यमंत्री माननीय नामदार श्री अजित दादा पवार यांचे जयंतीच्या अनुषंगाने आर्वी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे सामाजिक न्याय विभागाचे राज्य संघटक सचिव राजपाल भगत व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित दादा पवार विचाराचे आर्वी विधानसभा अध्यक्ष दिलीप पोटफोडे यांच्या नेतृत्वात भव्य भोजनदान कार्यक्रमाचे आयोजन केले होते आर्वी शहरांमध्ये अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्ताने ढोल ताशे सांस्कृतीक देखावे, लोकांचा जनसागर विविध प्रभागातून भव्य मिरवणूका निघाल्या होत्या यामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर आधारित देखावे सादर केले होते हजारो लोकांचा जनसागर जयंतीच्या निमित्ताने रस्त्यावर आला होता यावेळी दोन्हीही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कडून संयुक्तपणे आयोजित भोजनदान कार्यक्रमाचा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या अनुयायांनी व नागरिकांनी अत्यंत आनंदाने आस्वाद घेतला या कार्यक्रमा च्यायशस्वितेसाठी सौ भारती पोटफोडे महिला व बालकल्याण सभापती आर्वी नगरपरिषद, सौ रेखा वानखडे जिल्हाध्यक्ष रोजगार व स्वयंरोजगार सेल, सोनू चिंधेकर, सोनिका गोधने, शिल्पा इखार, सोनाली जैन, महेश देवशोध, दिनेश रुद्रकार, सामाजिक कार्यकर्ते संजय पाटील, वासुदेवराव सपकाळ, नितीन मिश्रा, सिद्धांत कळंबे, रवींद्र वानखडे, रशीद शेख, राहुल विरेकर, निखिल वानखडे, समीर शेख, गोलू रायकवार, यांनी परिश्रम घेतले यावेळी प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते1
- अन्याय निवारण समिती अध्यक्ष ज्वाला धोटे यांनी नागपूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची सदिच्छा भेट! अन्याय निवारण समिती अध्यक्ष ज्वाला धोटे यांनी नागपूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची सदिच्छा भेट! नागगपूर : आदिवासी बांधवांच्या जमिनीवर भूमाफियांनी विविध बोगस सोसायटी स्थापन केल्या असून,आदिवासींच्या जमिनी गिळंकृत करण्यात येत आहे. या संदर्भात ज्वाला जांबुवंतराव धोटे यांनी जिल्हाधिकारी साहेबांना गंभीर विषयाची सविस्तर माहिती दिली.1
- साहित्य के 'रत्न' को नमनअन्नाभाऊ साठे की 106वीं जयंती: सर्वपक्षीय नेताओं के महासंगम के साथ हुआ भव्य आयोजन!1
- NAGPUR, उत्तर नागपुर के आमदार को, ढूंढो 100रुपए ईनाम पाओ,,NIT का घेराव जनता ने किया,, आमदार को ढूंढो ईनाम पाओ,1
- महावितरण च्या हलगर्जीपणामुळे कर्मचाऱ्याचा मृत्यू;खा.बळवंत वानखडे यांच्या मध्यस्थीनंतरच मृतदेह ताब्यात घेण्यास कुटुंबियांची सहमती1
- शोषित,पीडित,वंचितांच्या हक्कासाठी लढणारे लोकनायक साहित्यसम्राट लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन शोषित,पीडित,वंचितांच्या हक्कासाठी लढणारे लोकनायक साहित्यसम्राट लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन1
- अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष ज्वाला धोटे यांनी गिट्टीखदान पोलीस ठाण्याचे नवनियुक्त वपोनि निरीक्षक सारंग मिराशी यांची सदिच्छा भेट! अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष ज्वाला धोटे यांनी गिट्टीखदान पोलीस ठाण्याचे नवनियुक्त वपोनि निरीक्षक सारंग मिराशी यांची सदिच्छा भेट! नागपूर : गुंड व गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींविरुद्ध कठोर कारवाई करणारे आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी ओळखले जाणारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सारंग मिराशी यांना त्यांच्या नव्या जबाबदारीबद्दल शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच परिसरातील कायदा व सुव्यवस्था, नागरिकांच्या समस्या आणि सामाजिक समन्वयाबाबतही सकारात्मक चर्चा करण्यात आली. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश वडेट्टीवार, ज्येष्ठ पत्रकार चंद्रशेखर दुबे, सुरेंद्र तायवाडे आणि कैलाश शेडामे उपस्थित होते.1
- "सुख-दुःखात कायम सोबत उभा राहणाऱ्या प्रत्येक मित्राला आजचा हा दिवस समर्पित!" मैत्री म्हणजे विश्वास, साथ आणि आयुष्यभर जपण्यासारखं सुंदर नातं! ❤️🤝 महाराष्ट्र न्यूज 24 कडून सर्व मित्रांना मित्रता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 💐 #मित्रतादिवस #FriendshipDay #MaharashtraNews24 #Varud #Marathi1