NEET पेपरफुटी प्रकरण आणि दिल्लीत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला वर्धा आणि पुलगाव शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. वर्धा शहरात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मोर्चा काढून केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली, तर पुलगाव येथे पुलगाव विकास आघाडीच्या नेतृत्वाखाली निषेध मोर्चा काढण्यात आला. मोर्चादरम्यान अनेक व्यापारी प्रतिष्ठाने स्वयंस्फूर्तीने बंद ठेवण्यात आली होती, तर काही ठिकाणी आंदोलनकर्त्यांनी व्यापाऱ्यांना बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. या आंदोलनाला काँग्रेस पक्षासह विविध सामाजिक व राजकीय संघटनांनी सहभाग नोंदवत जाहीर पाठिंबा दिला. आंदोलकांनी NEET पेपरफुटी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा, ही या आंदोलनातील प्रमुख मागणी होती. याशिवाय, दिल्लीतील आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज व मारहाण करणाऱ्या संबंधित पोलिस अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी तसेच दोषींवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणीही लावून धरण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील विद्यार्थ्यांची जाहीर माफी मागावी आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन द्यावे, असा आग्रह आंदोलनकर्त्यांनी धरला. पेपरफुटीमुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ झाला असून शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास डळमळीत झाला आहे, असा आरोप करत दोषींना कठोर शिक्षा झाल्याशिवाय आंदोलन सुरूच राहील असा थेट इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.

- NEET पेपरफुटी प्रकरण आणि दिल्लीत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला वर्धा आणि पुलगाव शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. वर्धा शहरात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मोर्चा काढून केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली, तर पुलगाव येथे पुलगाव विकास आघाडीच्या नेतृत्वाखाली निषेध मोर्चा काढण्यात आला. मोर्चादरम्यान अनेक व्यापारी प्रतिष्ठाने स्वयंस्फूर्तीने बंद ठेवण्यात आली होती, तर काही ठिकाणी आंदोलनकर्त्यांनी व्यापाऱ्यांना बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. या आंदोलनाला काँग्रेस पक्षासह विविध सामाजिक व राजकीय संघटनांनी सहभाग नोंदवत जाहीर पाठिंबा दिला. आंदोलकांनी NEET पेपरफुटी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा, ही या आंदोलनातील प्रमुख मागणी होती. याशिवाय, दिल्लीतील आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज व मारहाण करणाऱ्या संबंधित पोलिस अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी तसेच दोषींवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणीही लावून धरण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील विद्यार्थ्यांची जाहीर माफी मागावी आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन द्यावे, असा आग्रह आंदोलनकर्त्यांनी धरला. पेपरफुटीमुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ झाला असून शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास डळमळीत झाला आहे, असा आरोप करत दोषींना कठोर शिक्षा झाल्याशिवाय आंदोलन सुरूच राहील असा थेट इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.1
- आज २३ जुलै रोजी दुपारी १२ वाजता दिल्ली येथे वर्धा जिल्ह्याचे पदाधिकारी आणि सहकाऱ्यांनी खासदार अमर काळे यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान वर्धा जिल्ह्यातील विविध समस्यांवर तसेच इतर महत्त्वपूर्ण राजकीय आणि विकासकामांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. पदाधिकारी व सहकाऱ्यांनी लोकप्रिय खासदार अमर काळेजी यांच्यासोबत जिल्ह्यातील विविध विषयांवर ही विस्तृत चर्चा केली.1
- जंतर-मंतर येथील आंदोलन आता अधिक तीव्र झाले असून या आंदोलनाला संपूर्ण देशभरातून मोठा पाठिंबा मिळत आहे.1
- दिल्लीत तरुण आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईचे नागपूर जिल्ह्यातील भिवापूर येथे तीव्र पडसाद उमटले असून या घटनेचा जोरदार निषेध करण्यात आला आहे. या कारवाईच्या विरोधात नायब तहसीलदार यांना निवेदन सादर करून आपला रोष व्यक्त करण्यात आला आहे.1
- Post by Rajesh Khurana1
- दिल्ली येथील जंतर-मंतरवर शांततेत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचाराच्या निषेधार्थ आता जनताही रस्त्यावर उतरली आहे. या लाठीमार कारवाईचा तीव्र निषेध नोंदवत यवतमाळ जिल्ह्यात ठिकठिकाणी निषेध आंदोलने करण्यात आली. विद्यार्थी आंदोलनाच्या समर्थनार्थ यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने घाटंजी बंदची हाक देण्यात आली होती. विद्यार्थ्यांवर झालेल्या अन्यायाविरोधात आणि त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यात नागरिक आक्रमकपणे रस्त्यावर उतरून विरोध दर्शवत आहेत.1
- वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील मोहगाव येथील ४८ भाविक आषाढी एकादशीच्या औचित्यावर विठ्ठल नामाचा गजर करत एसटी बसने पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी अत्यंत भक्तिमय वातावरणात रवाना झाले आहेत. आमदार समिर कुणावार यांच्या मार्गदर्शनात आणि मोहगाव ग्रामपंचायतीचे प्रशासक विलास नवघरे यांच्या पुढाकाराने या विशेष प्रवासाचे आयोजन करण्यात आले. गुरुवारी सकाळी ८ वाजता हिंगणघाट आगाराची बस गावात पोहोचताच गावकऱ्यांनी तिचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. या प्रसंगी प्रशासक विलास नवघरे आणि करुणा नवघरे यांच्या हस्ते सपत्नीक बसचे विधिवत पूजन करण्यात आले. गावातील भाविकांची पांडुरंगाच्या दर्शनाची ओढ लक्षात घेऊन प्रशासक विलास नवघरे यांनी हिंगणघाट आगार व्यवस्थापकांशी संपर्क साधून एसटी बसची मागणी केली होती. ही मागणी आगार व्यवस्थापक गौतम शेंडे आणि बसस्थानक प्रमुख जयंत सडमाके यांनी मंजूर केली. चालक गोविंदा चुकलवार आणि वाहक संजय बावणे हे ४८ भाविकांना घेऊन पंढरपूरकडे रवाना झाले आहेत. मोहगाव गावात पहिल्यांदाच अशी पंढरपूर दर्शन स्पेशल बस आल्याने ग्रामस्थ व भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. हनुमान मंदिराजवळ मोठ्या संख्येने एकत्र येत गावकऱ्यांनी भाविकांना प्रवासाच्या शुभेच्छा दिल्या. भाविकांना प्रवासादरम्यान त्रास होऊ नये यासाठी प्रशासक विलास नवघरे यांनी सर्व प्राथमिक सोयी उपलब्ध करून दिल्या असून, सर्व ग्रामस्थांनी आमदार समिर कुणावार, विलास नवघरे, बंडू दोडके तसेच आगार अधिकाऱ्यांचे विशेष आभार मानले आहेत.1
- Post by Tojibur1