logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

जंतर-मंतर येथील आंदोलन आता अधिक तीव्र झाले असून या आंदोलनाला संपूर्ण देशभरातून मोठा पाठिंबा मिळत आहे.

16 hrs ago
user_वणी न्यूज एक्सप्रेस
वणी न्यूज एक्सप्रेस
Wani, Yavatmal•
16 hrs ago

जंतर-मंतर येथील आंदोलन आता अधिक तीव्र झाले असून या आंदोलनाला संपूर्ण देशभरातून मोठा पाठिंबा मिळत आहे.

More news from Yavatmal and nearby areas
  • जंतर-मंतर येथील आंदोलन आता अधिक तीव्र झाले असून या आंदोलनाला संपूर्ण देशभरातून मोठा पाठिंबा मिळत आहे.
    1
    जंतर-मंतर येथील आंदोलन आता अधिक तीव्र झाले असून या आंदोलनाला संपूर्ण देशभरातून मोठा पाठिंबा मिळत आहे.
    user_वणी न्यूज एक्सप्रेस
    वणी न्यूज एक्सप्रेस
    Wani, Yavatmal•
    16 hrs ago
  • दिल्लीतील आंदोलनाच्या समर्थनार्थ मुंबईतील दादर परिसरात संविधानिक मार्गाने शांततापूर्ण मतप्रदर्शन करणाऱ्या राजुरा तालुक्यातील युवक व शासकीय विधी महाविद्यालय, मुंबईचा विद्यार्थी शिवकुमार आडे याला २० जुलै २०२६ रोजी मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले. दादर पोलीस ठाण्यात नेऊन सुमारे पाच तास चौकशी केल्यानंतर रात्री १० वाजण्याच्या सुमारास त्यांची सुटका करण्यात आली. मात्र, त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १८९(२) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ मधील कलम ३७(१)(३) आणि कलम १३५ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील चौकशीसाठी नोटीसही बजावण्यात आली आहे. या कारवाईवर प्रतिक्रिया देताना शिवकुमार आडे यांनी सांगितले की, "आज शांततापूर्ण पद्धतीने आपले मतप्रदर्शन करणेही गुन्हा ठरत असल्याची भावना निर्माण होत आहे. भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि शांततापूर्ण पद्धतीने मतप्रदर्शन करण्याचा अधिकार दिला आहे. मला न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास असून मी कायदेशीर मार्गानेच माझी बाजू न्यायालयासमोर मांडणार आहे." शांततापूर्ण आणि अहिंसक मार्गाने केलेले मतप्रदर्शन कायद्याच्या दृष्टीने गुन्हा मानले जाऊ शकते का, असा सवाल या घटनेमुळे उपस्थित झाला आहे. राजुरा तालुक्यातील विधी विद्यार्थ्यावर अशा प्रकारे कारवाई झाल्याने चंद्रपूर जिल्ह्यासह विविध सामाजिक, कायदेविषयक आणि विद्यार्थी संघटनांमध्ये तीव्र चर्चा सुरू झाली आहे. लोकशाही व्यवस्थेत संविधानिक अधिकार आणि कायदा-सुव्यवस्था यांच्यातील संतुलनाचा प्रश्न पुन्हा एकदा केंद्रस्थानी आला असून, या प्रकरणातील पुढील तपास, न्यायालयीन सुनावणी आणि कायदेशीर परिणामांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
    3
    दिल्लीतील आंदोलनाच्या समर्थनार्थ मुंबईतील दादर परिसरात संविधानिक मार्गाने शांततापूर्ण मतप्रदर्शन करणाऱ्या राजुरा तालुक्यातील युवक व शासकीय विधी महाविद्यालय, मुंबईचा विद्यार्थी शिवकुमार आडे याला २० जुलै २०२६ रोजी मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले. दादर पोलीस ठाण्यात नेऊन सुमारे पाच तास चौकशी केल्यानंतर रात्री १० वाजण्याच्या सुमारास त्यांची सुटका करण्यात आली. मात्र, त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १८९(२) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ मधील कलम ३७(१)(३) आणि कलम १३५ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील चौकशीसाठी नोटीसही बजावण्यात आली आहे.

या कारवाईवर प्रतिक्रिया देताना शिवकुमार आडे यांनी सांगितले की, "आज शांततापूर्ण पद्धतीने आपले मतप्रदर्शन करणेही गुन्हा ठरत असल्याची भावना निर्माण होत आहे. भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि शांततापूर्ण पद्धतीने मतप्रदर्शन करण्याचा अधिकार दिला आहे. मला न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास असून मी कायदेशीर मार्गानेच माझी बाजू न्यायालयासमोर मांडणार आहे." शांततापूर्ण आणि अहिंसक मार्गाने केलेले मतप्रदर्शन कायद्याच्या दृष्टीने गुन्हा मानले जाऊ शकते का, असा सवाल या घटनेमुळे उपस्थित झाला आहे.

राजुरा तालुक्यातील विधी विद्यार्थ्यावर अशा प्रकारे कारवाई झाल्याने चंद्रपूर जिल्ह्यासह विविध सामाजिक, कायदेविषयक आणि विद्यार्थी संघटनांमध्ये तीव्र चर्चा सुरू झाली आहे. लोकशाही व्यवस्थेत संविधानिक अधिकार आणि कायदा-सुव्यवस्था यांच्यातील संतुलनाचा प्रश्न पुन्हा एकदा केंद्रस्थानी आला असून, या प्रकरणातील पुढील तपास, न्यायालयीन सुनावणी आणि कायदेशीर परिणामांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
    user_Mahawani News
    Mahawani News
    Media house चंद्रपूर, चंद्रपूर, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • दिल्लीतील जंतर-मंतर येथे शांततेत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष लाठीचार्जच्या निषेधार्थ चंद्रपूर शहर आणि जिल्ह्यात आंदोलनाचा तीव्र प्रभाव पाहायला मिळाला. लोकशाही मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनावर मोदी सरकारने बळाचा वापर केल्याचा निषेध करत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी २३ जुलै रोजी 'महाराष्ट्र बंद'ची हाक दिली होती. या हाकेला राज्यातील सर्वच राजकीय पक्षांनी पाठिंबा दर्शवला असून, चंद्रपुरातील बाबुपेठ परिसरात हजारो नागरिकांनी एकत्र येत चंद्रपूर-बल्लारपूर मार्गावर थेट रस्ता रोको आंदोलन केले. नीट (NEET) पेपर लीक प्रकरणाविरोधात दिल्लीतील जंतर-मंतर येथे कॉक्रोच जनता पार्टीच्या वतीने धरणे आंदोलन सुरू होते. या शांतीपूर्ण आंदोलनादरम्यान दिल्ली पोलिसांनी आंदोलक विद्यार्थ्यांवर अमानुष लाठीचार्ज केला, ज्यातून लहान मुले, मुली आणि ज्येष्ठांनाही सोडण्यात आले नाही. तसेच, लडाखमधील मागण्यांसाठी सोनम वांगचुक मागील २५ दिवसांपासून आमरण उपोषणाला बसले असताना सरकारने बळाचा वापर करून त्यांचे आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न केला. यानंतर देशभरातील युवकांनी २० जुलै रोजी आयोजित केलेल्या 'संसद मार्च'दरम्यानही पोलिसांनी विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केला होता, ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संताप उसळला आहे. चंद्रपुरात या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला असला तरी शहरातील विविध भागांतील विद्यार्थी आणि पालकांनी एकत्र येत केंद्र सरकारविरोधात जोरदार निदर्शने केली. बाबुपेठ परिसरातील रस्ता रोको आंदोलनात हजारो नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते, ज्यामुळे चंद्रपूर-बल्लारपूर मार्गावरील वाहतूक व्यवस्था काही काळ पूर्णपणे विस्कळीत झाली होती.
    1
    दिल्लीतील जंतर-मंतर येथे शांततेत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष लाठीचार्जच्या निषेधार्थ चंद्रपूर शहर आणि जिल्ह्यात आंदोलनाचा तीव्र प्रभाव पाहायला मिळाला. लोकशाही मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनावर मोदी सरकारने बळाचा वापर केल्याचा निषेध करत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी २३ जुलै रोजी 'महाराष्ट्र बंद'ची हाक दिली होती. या हाकेला राज्यातील सर्वच राजकीय पक्षांनी पाठिंबा दर्शवला असून, चंद्रपुरातील बाबुपेठ परिसरात हजारो नागरिकांनी एकत्र येत चंद्रपूर-बल्लारपूर मार्गावर थेट रस्ता रोको आंदोलन केले.

नीट (NEET) पेपर लीक प्रकरणाविरोधात दिल्लीतील जंतर-मंतर येथे कॉक्रोच जनता पार्टीच्या वतीने धरणे आंदोलन सुरू होते. या शांतीपूर्ण आंदोलनादरम्यान दिल्ली पोलिसांनी आंदोलक विद्यार्थ्यांवर अमानुष लाठीचार्ज केला, ज्यातून लहान मुले, मुली आणि ज्येष्ठांनाही सोडण्यात आले नाही. तसेच, लडाखमधील मागण्यांसाठी सोनम वांगचुक मागील २५ दिवसांपासून आमरण उपोषणाला बसले असताना सरकारने बळाचा वापर करून त्यांचे आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न केला. यानंतर देशभरातील युवकांनी २० जुलै रोजी आयोजित केलेल्या 'संसद मार्च'दरम्यानही पोलिसांनी विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केला होता, ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संताप उसळला आहे.

चंद्रपुरात या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला असला तरी शहरातील विविध भागांतील विद्यार्थी आणि पालकांनी एकत्र येत केंद्र सरकारविरोधात जोरदार निदर्शने केली. बाबुपेठ परिसरातील रस्ता रोको आंदोलनात हजारो नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते, ज्यामुळे चंद्रपूर-बल्लारपूर मार्गावरील वाहतूक व्यवस्था काही काळ पूर्णपणे विस्कळीत झाली होती.
    user_Disha News
    Disha News
    Media house चंद्रपूर, चंद्रपूर, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • NEET पेपरफुटी प्रकरण आणि दिल्लीत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला वर्धा आणि पुलगाव शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. वर्धा शहरात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मोर्चा काढून केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली, तर पुलगाव येथे पुलगाव विकास आघाडीच्या नेतृत्वाखाली निषेध मोर्चा काढण्यात आला. मोर्चादरम्यान अनेक व्यापारी प्रतिष्ठाने स्वयंस्फूर्तीने बंद ठेवण्यात आली होती, तर काही ठिकाणी आंदोलनकर्त्यांनी व्यापाऱ्यांना बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. या आंदोलनाला काँग्रेस पक्षासह विविध सामाजिक व राजकीय संघटनांनी सहभाग नोंदवत जाहीर पाठिंबा दिला. आंदोलकांनी NEET पेपरफुटी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा, ही या आंदोलनातील प्रमुख मागणी होती. याशिवाय, दिल्लीतील आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज व मारहाण करणाऱ्या संबंधित पोलिस अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी तसेच दोषींवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणीही लावून धरण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील विद्यार्थ्यांची जाहीर माफी मागावी आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन द्यावे, असा आग्रह आंदोलनकर्त्यांनी धरला. पेपरफुटीमुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ झाला असून शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास डळमळीत झाला आहे, असा आरोप करत दोषींना कठोर शिक्षा झाल्याशिवाय आंदोलन सुरूच राहील असा थेट इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.
    1
    NEET पेपरफुटी प्रकरण आणि दिल्लीत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला वर्धा आणि पुलगाव शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. वर्धा शहरात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मोर्चा काढून केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली, तर पुलगाव येथे पुलगाव विकास आघाडीच्या नेतृत्वाखाली निषेध मोर्चा काढण्यात आला. मोर्चादरम्यान अनेक व्यापारी प्रतिष्ठाने स्वयंस्फूर्तीने बंद ठेवण्यात आली होती, तर काही ठिकाणी आंदोलनकर्त्यांनी व्यापाऱ्यांना बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. या आंदोलनाला काँग्रेस पक्षासह विविध सामाजिक व राजकीय संघटनांनी सहभाग नोंदवत जाहीर पाठिंबा दिला.

आंदोलकांनी NEET पेपरफुटी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा, ही या आंदोलनातील प्रमुख मागणी होती. याशिवाय, दिल्लीतील आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज व मारहाण करणाऱ्या संबंधित पोलिस अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी तसेच दोषींवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणीही लावून धरण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील विद्यार्थ्यांची जाहीर माफी मागावी आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन द्यावे, असा आग्रह आंदोलनकर्त्यांनी धरला.

पेपरफुटीमुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ झाला असून शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास डळमळीत झाला आहे, असा आरोप करत दोषींना कठोर शिक्षा झाल्याशिवाय आंदोलन सुरूच राहील असा थेट इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.
    user_Ravi yenorkar PRESS -IN BCN NEWS
    Ravi yenorkar PRESS -IN BCN NEWS
    हिंगणघाट, वर्धा, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • दिल्ली येथील जंतर-मंतरवर शांततेत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचाराच्या निषेधार्थ आता जनताही रस्त्यावर उतरली आहे. या लाठीमार कारवाईचा तीव्र निषेध नोंदवत यवतमाळ जिल्ह्यात ठिकठिकाणी निषेध आंदोलने करण्यात आली. विद्यार्थी आंदोलनाच्या समर्थनार्थ यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने घाटंजी बंदची हाक देण्यात आली होती. विद्यार्थ्यांवर झालेल्या अन्यायाविरोधात आणि त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यात नागरिक आक्रमकपणे रस्त्यावर उतरून विरोध दर्शवत आहेत.
    1
    दिल्ली येथील जंतर-मंतरवर शांततेत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचाराच्या निषेधार्थ आता जनताही रस्त्यावर उतरली आहे. या लाठीमार कारवाईचा तीव्र निषेध नोंदवत यवतमाळ जिल्ह्यात ठिकठिकाणी निषेध आंदोलने करण्यात आली.

विद्यार्थी आंदोलनाच्या समर्थनार्थ यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने घाटंजी बंदची हाक देण्यात आली होती. विद्यार्थ्यांवर झालेल्या अन्यायाविरोधात आणि त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यात नागरिक आक्रमकपणे रस्त्यावर उतरून विरोध दर्शवत आहेत.
    user_विलास महल्ले
    विलास महल्ले
    Ghatanji, Yavatmal•
    6 hrs ago
  • विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याचा प्रत्येक प्रयत्न हा लोकशाहीवर झालेला थेट हल्ला आहे. राहुल गांधी यांनी अत्यंत आक्रमक शब्दांत टीका करत म्हटले आहे की, "विद्यार्थ्यांवर क्रूरता करणारे नरेंद्र मोदी भित्रे आहेत — ते कायर जनरल डायर आहेत." लोकशाहीत प्रश्न विचारणे हा कोणताही गुन्हा नसून तो प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याऐवजी तो ऐकून घेतलाच पाहिजे, असे ठामपणे सांगत विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी आणि हक्कांसाठी आवाज उठवण्यात आला आहे.
    1
    विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याचा प्रत्येक प्रयत्न हा लोकशाहीवर झालेला थेट हल्ला आहे. राहुल गांधी यांनी अत्यंत आक्रमक शब्दांत टीका करत म्हटले आहे की, "विद्यार्थ्यांवर क्रूरता करणारे नरेंद्र मोदी भित्रे आहेत — ते कायर जनरल डायर आहेत."

लोकशाहीत प्रश्न विचारणे हा कोणताही गुन्हा नसून तो प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याऐवजी तो ऐकून घेतलाच पाहिजे, असे ठामपणे सांगत विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी आणि हक्कांसाठी आवाज उठवण्यात आला आहे.
    user_Vainganga News Live Network
    Vainganga News Live Network
    Press advisory पोंभुर्णा, चंद्रपूर, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील मोहगाव येथील ४८ भाविक आषाढी एकादशीच्या औचित्यावर विठ्ठल नामाचा गजर करत एसटी बसने पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी अत्यंत भक्तिमय वातावरणात रवाना झाले आहेत. आमदार समिर कुणावार यांच्या मार्गदर्शनात आणि मोहगाव ग्रामपंचायतीचे प्रशासक विलास नवघरे यांच्या पुढाकाराने या विशेष प्रवासाचे आयोजन करण्यात आले. गुरुवारी सकाळी ८ वाजता हिंगणघाट आगाराची बस गावात पोहोचताच गावकऱ्यांनी तिचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. या प्रसंगी प्रशासक विलास नवघरे आणि करुणा नवघरे यांच्या हस्ते सपत्नीक बसचे विधिवत पूजन करण्यात आले. गावातील भाविकांची पांडुरंगाच्या दर्शनाची ओढ लक्षात घेऊन प्रशासक विलास नवघरे यांनी हिंगणघाट आगार व्यवस्थापकांशी संपर्क साधून एसटी बसची मागणी केली होती. ही मागणी आगार व्यवस्थापक गौतम शेंडे आणि बसस्थानक प्रमुख जयंत सडमाके यांनी मंजूर केली. चालक गोविंदा चुकलवार आणि वाहक संजय बावणे हे ४८ भाविकांना घेऊन पंढरपूरकडे रवाना झाले आहेत. मोहगाव गावात पहिल्यांदाच अशी पंढरपूर दर्शन स्पेशल बस आल्याने ग्रामस्थ व भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. हनुमान मंदिराजवळ मोठ्या संख्येने एकत्र येत गावकऱ्यांनी भाविकांना प्रवासाच्या शुभेच्छा दिल्या. भाविकांना प्रवासादरम्यान त्रास होऊ नये यासाठी प्रशासक विलास नवघरे यांनी सर्व प्राथमिक सोयी उपलब्ध करून दिल्या असून, सर्व ग्रामस्थांनी आमदार समिर कुणावार, विलास नवघरे, बंडू दोडके तसेच आगार अधिकाऱ्यांचे विशेष आभार मानले आहेत.
    1
    वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील मोहगाव येथील ४८ भाविक आषाढी एकादशीच्या औचित्यावर विठ्ठल नामाचा गजर करत एसटी बसने पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी अत्यंत भक्तिमय वातावरणात रवाना झाले आहेत. आमदार समिर कुणावार यांच्या मार्गदर्शनात आणि मोहगाव ग्रामपंचायतीचे प्रशासक विलास नवघरे यांच्या पुढाकाराने या विशेष प्रवासाचे आयोजन करण्यात आले. गुरुवारी सकाळी ८ वाजता हिंगणघाट आगाराची बस गावात पोहोचताच गावकऱ्यांनी तिचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. या प्रसंगी प्रशासक विलास नवघरे आणि करुणा नवघरे यांच्या हस्ते सपत्नीक बसचे विधिवत पूजन करण्यात आले.

गावातील भाविकांची पांडुरंगाच्या दर्शनाची ओढ लक्षात घेऊन प्रशासक विलास नवघरे यांनी हिंगणघाट आगार व्यवस्थापकांशी संपर्क साधून एसटी बसची मागणी केली होती. ही मागणी आगार व्यवस्थापक गौतम शेंडे आणि बसस्थानक प्रमुख जयंत सडमाके यांनी मंजूर केली. चालक गोविंदा चुकलवार आणि वाहक संजय बावणे हे ४८ भाविकांना घेऊन पंढरपूरकडे रवाना झाले आहेत. मोहगाव गावात पहिल्यांदाच अशी पंढरपूर दर्शन स्पेशल बस आल्याने ग्रामस्थ व भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. हनुमान मंदिराजवळ मोठ्या संख्येने एकत्र येत गावकऱ्यांनी भाविकांना प्रवासाच्या शुभेच्छा दिल्या. भाविकांना प्रवासादरम्यान त्रास होऊ नये यासाठी प्रशासक विलास नवघरे यांनी सर्व प्राथमिक सोयी उपलब्ध करून दिल्या असून, सर्व ग्रामस्थांनी आमदार समिर कुणावार, विलास नवघरे, बंडू दोडके तसेच आगार अधिकाऱ्यांचे विशेष आभार मानले आहेत.
    user_Ravi yenorkar PRESS -IN BCN NEWS
    Ravi yenorkar PRESS -IN BCN NEWS
    हिंगणघाट, वर्धा, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • Post by Tojibur
    1
    Post by Tojibur
    user_Tojibur
    Tojibur
    वर्धा, महाराष्ट्र•
    7 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.