कृषीदूताच्या वतीने पिकातील अन्नद्रव्यांच्या कमतरते बाबत प्रात्यक्षिक व जनजागृती . पिकातील अन्नद्रव्यांच्या कमतरतेबाबत प्रात्यक्षिक व जनजागृती मानाप्पावस्ती (ता. बारामती): महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी संलग्न कृषी महाविद्यालय, बारामती यांच्या ग्रामीण कृषी कार्यानुभव (RAWE) कार्यक्रमांतर्गत मानाप्पावस्ती येथे "पिकातील अन्नद्रव्यांची कमतरता ओळख व व्यवस्थापन" या विषयावर प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले. या प्रात्यक्षिकामध्ये प्रसेनजीत कांबळे , पार्थ कुलकर्णी , आदित्य लोहार , तुषार करे , श्रेयस साळुंखे , मयूर पवार , सोहेल थोरात या विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांना विविध पिकांमध्ये अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे दिसणारी लक्षणे, त्यांची कारणे तसेच योग्य खत व्यवस्थापन, सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर आणि संतुलित खत व्यवस्थापनाचे महत्त्व याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी माहितीपर फलकाच्या माध्यमातून पिकांमधील अन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे समजावून सांगण्यात आली. या उपक्रमाला गावातील शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. उपस्थित शेतकऱ्यांनी विविध प्रश्न विचारून शंकांचे निरसन करून घेतले. या प्रात्यक्षिकामुळे शेतकऱ्यांना अन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे वेळेवर ओळखून योग्य उपाययोजना करण्याबाबत उपयुक्त माहिती मिळाली. या कार्यक्रमाचे आयोजन कृषी महाविद्यालय, बारामतीच्या RAWE विद्यार्थ्यांनी मार्गदर्शक प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली केले.

- मनसेकडून परंडा पोलीस स्टेशनच्या दोन नवपदोन्नत हवालदारांचा जाहीर सत्कार! परंडा पोलीस स्टेशनमधील कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचारी रमेश नारायण शिरसागर आणि शिवानंद भीमाशंकर स्वामी यांची पोलीस नाईक पदावरून पोलीस हवालदार पदावर पदोन्नती झाल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.1
- दिवंगत अजितदादांच्या पाऊलखुणांवर; कंकालेश्वर मंदिरात सुनेत्रा पवार यांची भेट, विकासकामांची पाहणी1
- श्री नंदकुमार धायगुडे पाटील यांचा भव्य सत्कार सोहळा संपन्न सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड चे सेवानिवृत्ती विकास अधिकारी नंदकुमार धायगुडे पाटील यांचा भव्य सत्कार सोहळा संपन्न.3
- दबाव, गुंड आणि ठरावाचा आरोप ; रोहित पवारांचा शिवेंद्रराजेंवर जोरदार हल्लाबोल ; भाजपमध्ये गेल्यानंतर अशी संस्कृती सुरू झाली अहिल्यानगर साताऱ्यातील कथित सोसायटी ठराव प्रकरणावरून राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापले असून, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्यावर गंभीर आरोप करत जोरदार हल्लाबोल केला आहे. दबाव, दहशत आणि गुंडांच्या माध्यमातून ठराव मंजूर करून घेण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती मिळाली आहे, असा दावा रोहित पवार यांनी करत या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त केली. रोहित पवार म्हणाले की, शिवेंद्रराजे भोसले यांच्याशी आमचा जुना परिचय असून त्यांच्या कुटुंबाबद्दल मनात आदर आहे. मात्र, अलीकडील सोसायटी ठराव प्रकरणात ज्या पद्धतीने दबावतंत्र वापरल्याच्या चर्चा समोर येत आहेत, त्या लोकशाहीला घातक आहेत. निर्णय हा लोकशाही मार्गाने व्हायला हवा; दडपशाहीच्या माध्यमातून नव्हे, असे त्यांनी स्पष्ट केले. *आ.रोहित पवार यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचीही केली मागणी* आमदार रोहित पवार यांनी भाजपवरही अप्रत्यक्ष निशाणा साधत भाजपसोबत गेल्यानंतर अशा प्रकारच्या घटना घडू लागल्या आहेत, असा आरोप केला. हा निर्णय शिवेंद्रराजेंचा वैयक्तिक होता की त्यामागे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचा सल्ला होता, याबाबत आपण ठामपणे बोलू शकत नसल्याचेही त्यांनी नमूद केले. लोकांच्या न्यायासाठी संघर्ष करणे वेगळे आणि दबाव टाकून निर्णय मंजूर करून घेणे वेगळे आहे. अशा प्रकारच्या राजकारणाला जनतेची मान्यता नाही, असे म्हणत रोहित पवार यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचीही मागणी केली.1
- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन; बहुजन समाजाची उत्स्फूर्त उपस्थिती लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन; बहुजन समाजाची उत्स्फूर्त उपस्थिती बीड | प्रतिनिधी : लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आज (दि. १ ऑगस्ट २०२६) सकाळी १० वाजता बीड शहरातील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाला विविध समाजघटकांतील मान्यवर, लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बीडचे जिल्हाधिकारी मा. विवेकजी जॉन्शन यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याला अभिवादन केले. तसेच बीडचे आमदार मा. संदीप भैया क्षीरसागर, युवा नेते कल्याणजी डोंगरे, जिल्हाध्यक्ष वीर, अखिल भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष ससाणे, अनिल डोळस, एम. एस. धनवे यांच्यासह अनेक मान्यवरांनी अण्णाभाऊंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. कार्यक्रमास नगरसेवक भारत अण्णा कांबळे, संपादक नितीन मुजमुले, बळीराम चांदणे, विनोद हातागळे, अजिंक्य चांदणे, राजू माहुवाले यांच्यासह बौद्ध समाज, मातंग समाज आणि इतर बहुजन समाजातील अनेक नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी उपस्थित मान्यवरांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य, सामाजिक विचार आणि परिवर्तनवादी कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प व्यक्त केला. संपूर्ण परिसर घोषणांनी आणि अण्णाभाऊंच्या विचारांच्या जयघोषाने दुमदुमून गेला. कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.3
- ता. गेवराई. जिल्हा बिड. गोपत गोपपिंपळगाव. झोपड. पटी. येथे. रस्त्याची. आटचन. आहे. लहान. मुलाना. रस्ता. नसल्याने. शाळ. बद. आहे1
- सिना-कोळेगाव धरणात अजूनही समाधानकारक पाणीसाठा नाही; जिवंत साठा उणेच! सिना-कोळेगाव धरणात अजूनही समाधानकारक पाणीसाठा नाही; जिवंत साठा उणेच!1
- हिंजवडीत पीएमआरडीएचा कारभार चव्हाट्यावर; क्रेन दुकानावर कोसळली, अधिकारी गायब..! पिंपरी चिंचवड : हिंजवडीतील मान-मारुंजी परिसरात अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करताना पीएमआरडीएची मोठी क्रेन दुकानावर कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दुपारी चारच्या सुमारास घडलेल्या या घटनेत सुदैवाने जीवितहानी टळली; मात्र दुकानाचे मोठे नुकसान झाले आहे.विशेष म्हणजे, घटना घडून दोन तास उलटूनही क्रेन हटवण्यासाठी किंवा घटनास्थळी सुरक्षेची व्यवस्था करण्यासाठी पीएमआरडीएचे अधिकारी अथवा पोलीस उपस्थित नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.पावसाळ्यात ही कारवाई का करण्यात आली आणि झालेल्या नुकसानीची भरपाई कोण देणार, असा सवाल दुकानदार आणि नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.... : संदीप जाधव - स्थानिक नागरिक #हिंजवडी #पिंपरीचिंचवड #PMRDA #होर्डिंगकारवाई #क्रेनअपघात #अनधिकृतहोर्डिंग #हिंजवडीअपघात #मानमारुंजी #PMRDAकारवाई #दुकानाचेनुकसान #प्रशासनाचानिष्काळजीपणा #पुणेन्यूज #ब्रेकिंगन्यूज #TheTayakNews1