logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

सीजेपीसमोर अखेर सरकार नमले असून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. या घडामोडीमुळे सीजेपीच्या मागणीपुढे सरकारला शेवटी झुकणे भाग पडल्याचे समोर आले आहे.

5 hrs ago
user_वणी न्यूज एक्सप्रेस
वणी न्यूज एक्सप्रेस
Wani, Yavatmal•
5 hrs ago

सीजेपीसमोर अखेर सरकार नमले असून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. या घडामोडीमुळे सीजेपीच्या मागणीपुढे सरकारला शेवटी झुकणे भाग पडल्याचे समोर आले आहे.

More news from Yavatmal and nearby areas
  • सीजेपीसमोर अखेर सरकार नमले असून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. या घडामोडीमुळे सीजेपीच्या मागणीपुढे सरकारला शेवटी झुकणे भाग पडल्याचे समोर आले आहे.
    1
    सीजेपीसमोर अखेर सरकार नमले असून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. या घडामोडीमुळे सीजेपीच्या मागणीपुढे सरकारला शेवटी झुकणे भाग पडल्याचे समोर आले आहे.
    user_वणी न्यूज एक्सप्रेस
    वणी न्यूज एक्सप्रेस
    Wani, Yavatmal•
    5 hrs ago
  • यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील उमरी पठार येथे संत श्री ढोला महाराज वृद्धाश्रम गेल्या ३५ वर्षांपासून डौलाने उभा आहे. या वृद्धाश्रमाचे संस्थापक शेषराव डोंगरे यांनी उभारलेल्या या आश्रमात आजघडीला १५० निराधारांचे संगोपन केले जात असून ही या वृद्धाश्रमाची एक प्रेरणादायी यशोगाथा ठरत आहे.
    1
    यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील उमरी पठार येथे संत श्री ढोला महाराज वृद्धाश्रम गेल्या ३५ वर्षांपासून डौलाने उभा आहे. या वृद्धाश्रमाचे संस्थापक शेषराव डोंगरे यांनी उभारलेल्या या आश्रमात आजघडीला १५० निराधारांचे संगोपन केले जात असून ही या वृद्धाश्रमाची एक प्रेरणादायी यशोगाथा ठरत आहे.
    user_विलास महल्ले
    विलास महल्ले
    Ghatanji, Yavatmal•
    10 hrs ago
  • देशभरात विद्यार्थ्यांचे आंदोलन आणि शिक्षण व्यवस्थेवरून सुरू असलेल्या वाढत्या वादाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची बातमी समोर आल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. विद्यार्थ्यांच्या तीव्र विरोधापुढे अखेर सरकारला झुकावे लागल्याचे चित्र निर्माण झाले असून या संपूर्ण घडामोडींमुळे मोठी राजकीय खळबळ उडाली आहे. या घटनाक्रमावर विविध राजकीय पक्ष आणि विद्यार्थी संघटनांच्या विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. या राजीनाम्यामागे नेमकी काय कारणे सांगितली जात आहेत, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा सरकारवर काय परिणाम झाला आणि आता यापुढे सरकार कोणते पाऊल उचलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
    1
    देशभरात विद्यार्थ्यांचे आंदोलन आणि शिक्षण व्यवस्थेवरून सुरू असलेल्या वाढत्या वादाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची बातमी समोर आल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. विद्यार्थ्यांच्या तीव्र विरोधापुढे अखेर सरकारला झुकावे लागल्याचे चित्र निर्माण झाले असून या संपूर्ण घडामोडींमुळे मोठी राजकीय खळबळ उडाली आहे.

या घटनाक्रमावर विविध राजकीय पक्ष आणि विद्यार्थी संघटनांच्या विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. या राजीनाम्यामागे नेमकी काय कारणे सांगितली जात आहेत, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा सरकारवर काय परिणाम झाला आणि आता यापुढे सरकार कोणते पाऊल उचलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
    user_Imran Shaikh
    Imran Shaikh
    वर्धा, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर येथे देवशयनी आषाढी एकादशीचे औचित्य साधून 'आनंददायी शनिवार' उपक्रमांतर्गत इंदिरा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय हरित सेनेच्या वतीने भव्य वृक्षदिंडीचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाची सुरुवात संस्थाध्यक्ष वामनरावजी खोडे, अल्लीपूर पोलीस ठाण्याच्या ठाणेदार संगीता हेलोंडे आणि प्राचार्या अर्चना मुडे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून झाली. शाळेच्या प्रांगणातून निघालेली ही वृक्षदिंडी अल्लीपूर नगरीतील प्रमुख मार्गांवरून फिरली, ज्याला नागरिक व ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दिंडीत सहभागी विद्यार्थ्यांनी वारकरी संप्रदायाची वेशभूषा परिधान केली होती, ज्यामध्ये आयुष सुनील किनगावकर या विद्यार्थ्याने साकारलेली भगवान विठ्ठलाची आकर्षक वेशभूषा विशेष लक्षवेधी ठरली. विद्यार्थ्यांनी "झाडे लावा, झाडे जगवा", "झाडे लावा, जीवन वाचवा" आणि "हिरवी धरती, सुंदर सृष्टी" अशा घोषणा देत पर्यावरण जनजागृती केली. विठ्ठल मंदिर देवस्थान समितीच्या वतीने माजी खासदार सुरेशराव वाघमारे, माजी पंचायत समिती सदस्य प्रफुल कातोरे, माजी वैद्यकीय अधिकारी डॉ. विठ्ठलराव टिचुकले, परेश सावरकर आणि बळवंत कापसे यांनी वृक्षदिंडीचे स्वागत करून शाळा व्यवस्थापनाचा सत्कार केला. या दिंडीत सामाजिक वनीकरण विभागाचे वनपाल काजवे व फाळे यांनीही सहभाग घेतला. वृक्षदिंडीचा समारोप शाळेच्या प्रांगणात वृक्षारोपणाने करण्यात आला. प्रास्ताविकात प्राचार्या अर्चना मुडे यांनी पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज असून नागरिकांनी वृक्षारोपणासोबतच वृक्षांचे संगोपन करण्याची जबाबदारी स्वीकारावी, असे आवाहन केले. या प्रसंगी संस्थासचिव योगेश खोडे, संचालिका स्मिता भांगे, विज्ञान विभाग प्रमुख डॉ. निलम खोडे, पर्यवेक्षक नरेश येडे, ज्येष्ठ शिक्षक शरद कारवटकर, सांस्कृतिक विभाग प्रमुख हेमंतकुमार पारसडे आणि राष्ट्रीय हरित सेना प्रमुख राम कामडी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राम कामडी व अनिल चांभारे यांनी केले, तर प्रा. रवींद्र उगेमुगे यांनी आभार मानले.
    3
    वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर येथे देवशयनी आषाढी एकादशीचे औचित्य साधून 'आनंददायी शनिवार' उपक्रमांतर्गत इंदिरा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय हरित सेनेच्या वतीने भव्य वृक्षदिंडीचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाची सुरुवात संस्थाध्यक्ष वामनरावजी खोडे, अल्लीपूर पोलीस ठाण्याच्या ठाणेदार संगीता हेलोंडे आणि प्राचार्या अर्चना मुडे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून झाली. शाळेच्या प्रांगणातून निघालेली ही वृक्षदिंडी अल्लीपूर नगरीतील प्रमुख मार्गांवरून फिरली, ज्याला नागरिक व ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

दिंडीत सहभागी विद्यार्थ्यांनी वारकरी संप्रदायाची वेशभूषा परिधान केली होती, ज्यामध्ये आयुष सुनील किनगावकर या विद्यार्थ्याने साकारलेली भगवान विठ्ठलाची आकर्षक वेशभूषा विशेष लक्षवेधी ठरली. विद्यार्थ्यांनी "झाडे लावा, झाडे जगवा", "झाडे लावा, जीवन वाचवा" आणि "हिरवी धरती, सुंदर सृष्टी" अशा घोषणा देत पर्यावरण जनजागृती केली. विठ्ठल मंदिर देवस्थान समितीच्या वतीने माजी खासदार सुरेशराव वाघमारे, माजी पंचायत समिती सदस्य प्रफुल कातोरे, माजी वैद्यकीय अधिकारी डॉ. विठ्ठलराव टिचुकले, परेश सावरकर आणि बळवंत कापसे यांनी वृक्षदिंडीचे स्वागत करून शाळा व्यवस्थापनाचा सत्कार केला. या दिंडीत सामाजिक वनीकरण विभागाचे वनपाल काजवे व फाळे यांनीही सहभाग घेतला.

वृक्षदिंडीचा समारोप शाळेच्या प्रांगणात वृक्षारोपणाने करण्यात आला. प्रास्ताविकात प्राचार्या अर्चना मुडे यांनी पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज असून नागरिकांनी वृक्षारोपणासोबतच वृक्षांचे संगोपन करण्याची जबाबदारी स्वीकारावी, असे आवाहन केले. या प्रसंगी संस्थासचिव योगेश खोडे, संचालिका स्मिता भांगे, विज्ञान विभाग प्रमुख डॉ. निलम खोडे, पर्यवेक्षक नरेश येडे, ज्येष्ठ शिक्षक शरद कारवटकर, सांस्कृतिक विभाग प्रमुख हेमंतकुमार पारसडे आणि राष्ट्रीय हरित सेना प्रमुख राम कामडी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राम कामडी व अनिल चांभारे यांनी केले, तर प्रा. रवींद्र उगेमुगे यांनी आभार मानले.
    user_Satish Kale
    Satish Kale
    वर्धा, वर्धा, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • नागपूरच्या हजारीपहाड येथील आदिवासी वारसांच्या मालकीची १.३१ हेक्टर जमीन बेकायदेशीररीत्या बळकावल्याचा आरोप करत संबंधितांवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी पत्रकार परिषदेत करण्यात आली आहे. वारसदारांच्या वतीने आममुखत्यार रेखा गणपतराव कोराम यांनी माहिती दिली की, मौजा हजारीपहाड येथील खसरा क्रमांक २० च्या जमिनीचे मूळ मालक दिवंगत किसन उईके यांच्या निधनानंतर सर्व कायदेशीर वारसांची नावे ७/१२ उताऱ्यावर नोंदवणे गरजेचे होते. मात्र, काही व्यक्तींनी इतर वारसांना डावलून स्वतःची नावे नोंदवली आणि २२ जानेवारी १९९० रोजी ही जमीन जय गृहनिर्माण सहकारी संस्थेला विकल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी चुकीच्या नोंदी रद्द करून सर्व वारसांची नावे नोंदवण्यासाठी महसूल अधिकाऱ्यांकडे अर्ज दाखल करण्यात आला आहे. तसेच वारसदारांनी आपल्या जागेवर लावलेला फलक काही व्यक्तींनी परवानगीशिवाय तोडून उखडून फेकून दिल्याचा आरोप करत हा जमिनीवर बेकायदेशीर ताबा मिळवण्याचा प्रयत्न असल्याचा दावा करण्यात आला. या संदर्भात सदर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. या पत्रकार परिषदेला रेखा गणपत कोराम, माणिक महादेव पंदराम, अशोक सहादू कुकडे, पूर्णिमा सोनटक्के आणि अशोक बागुल उपस्थित होते.
    1
    नागपूरच्या हजारीपहाड येथील आदिवासी वारसांच्या मालकीची १.३१ हेक्टर जमीन बेकायदेशीररीत्या बळकावल्याचा आरोप करत संबंधितांवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी पत्रकार परिषदेत करण्यात आली आहे. वारसदारांच्या वतीने आममुखत्यार रेखा गणपतराव कोराम यांनी माहिती दिली की, मौजा हजारीपहाड येथील खसरा क्रमांक २० च्या जमिनीचे मूळ मालक दिवंगत किसन उईके यांच्या निधनानंतर सर्व कायदेशीर वारसांची नावे ७/१२ उताऱ्यावर नोंदवणे गरजेचे होते. मात्र, काही व्यक्तींनी इतर वारसांना डावलून स्वतःची नावे नोंदवली आणि २२ जानेवारी १९९० रोजी ही जमीन जय गृहनिर्माण सहकारी संस्थेला विकल्याचा आरोप करण्यात आला आहे.

याप्रकरणी चुकीच्या नोंदी रद्द करून सर्व वारसांची नावे नोंदवण्यासाठी महसूल अधिकाऱ्यांकडे अर्ज दाखल करण्यात आला आहे. तसेच वारसदारांनी आपल्या जागेवर लावलेला फलक काही व्यक्तींनी परवानगीशिवाय तोडून उखडून फेकून दिल्याचा आरोप करत हा जमिनीवर बेकायदेशीर ताबा मिळवण्याचा प्रयत्न असल्याचा दावा करण्यात आला. या संदर्भात सदर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. या पत्रकार परिषदेला रेखा गणपत कोराम, माणिक महादेव पंदराम, अशोक सहादू कुकडे, पूर्णिमा सोनटक्के आणि अशोक बागुल उपस्थित होते.
    user_SATISH BHALERAO
    SATISH BHALERAO
    नागपूर (ग्रामीण), नागपूर, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • नांदेडच्या माहूर शहरात विद्यार्थी आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीमार आणि दडपशाहीच्या निषेधार्थ गुरुवारी विविध संघटना एकत्र येत भव्य निषेध मोर्चा काढला. संविधानाच्या संरक्षणासाठी विद्यार्थी, सामाजिक, शेतकरी आणि युवक संघटनांचे हजारो लोक रस्त्यावर उतरल्याने शहरात तीव्र जनआक्रोश पाहायला मिळाला. या मोर्चादरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते तहसील कार्यालय या मार्गावर मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मोर्चानंतर शिष्टमंडळाने तहसीलदारांमार्फत भारताचे राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले तसेच विद्यार्थ्यांवरील कथित दडपशाहीचा तीव्र निषेध नोंदवला.
    1
    नांदेडच्या माहूर शहरात विद्यार्थी आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीमार आणि दडपशाहीच्या निषेधार्थ गुरुवारी विविध संघटना एकत्र येत भव्य निषेध मोर्चा काढला. संविधानाच्या संरक्षणासाठी विद्यार्थी, सामाजिक, शेतकरी आणि युवक संघटनांचे हजारो लोक रस्त्यावर उतरल्याने शहरात तीव्र जनआक्रोश पाहायला मिळाला.

या मोर्चादरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते तहसील कार्यालय या मार्गावर मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मोर्चानंतर शिष्टमंडळाने तहसीलदारांमार्फत भारताचे राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले तसेच विद्यार्थ्यांवरील कथित दडपशाहीचा तीव्र निषेध नोंदवला.
    user_सक्षम महाराष्ट्र न्यूज
    सक्षम महाराष्ट्र न्यूज
    Advertising Photographer माहूर, नांदेड, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील तळोधी नगरीत आषाढी एकादशीनिमित्त बाल वारकऱ्यांच्या 'विठ्ठल विठ्ठल जय हरी' अशा हरीनामाच्या गजराने संपूर्ण शहर दुमदुमून गेले. या खास प्रसंगी परिसरातील अनेक शाळांमधील चिमुकल्यांना विठ्ठल आणि रुक्मिणी यांच्या वेशभूषेत सजवून शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीतील लहानांचा उत्साह आणि भक्तीमय वातावरणामुळे तळोधी परिसराला एखाद्या छोट्या पंढरपूरचे स्वरूप प्राप्त झाले असल्याचे दिसून आले.
    1
    चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील तळोधी नगरीत आषाढी एकादशीनिमित्त बाल वारकऱ्यांच्या 'विठ्ठल विठ्ठल जय हरी' अशा हरीनामाच्या गजराने संपूर्ण शहर दुमदुमून गेले. या खास प्रसंगी परिसरातील अनेक शाळांमधील चिमुकल्यांना विठ्ठल आणि रुक्मिणी यांच्या वेशभूषेत सजवून शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली.

या मिरवणुकीतील लहानांचा उत्साह आणि भक्तीमय वातावरणामुळे तळोधी परिसराला एखाद्या छोट्या पंढरपूरचे स्वरूप प्राप्त झाले असल्याचे दिसून आले.
    user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    Co-ed school हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर येथील विठ्ठल मंदिर देवस्थानमध्ये आषाढी एकादशीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सात दिवस चालणाऱ्या या सप्ताहात अखंड भजन आणि पूजनाचे कार्यक्रम नियमितपणे पार पडत आहेत. विठ्ठल मंदिर देवस्थान कमिटीचे अध्यक्ष माजी खासदार सुरेश वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली या सर्व कार्यक्रमांचे मंदिरामध्ये आयोजन करण्यात आले आहे. आज आषाढी एकादशी असल्याने सकाळपासूनच विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने मंदिरात येत आहेत.
    2
    वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर येथील विठ्ठल मंदिर देवस्थानमध्ये आषाढी एकादशीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सात दिवस चालणाऱ्या या सप्ताहात अखंड भजन आणि पूजनाचे कार्यक्रम नियमितपणे पार पडत आहेत. विठ्ठल मंदिर देवस्थान कमिटीचे अध्यक्ष माजी खासदार सुरेश वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली या सर्व कार्यक्रमांचे मंदिरामध्ये आयोजन करण्यात आले आहे.

आज आषाढी एकादशी असल्याने सकाळपासूनच विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने मंदिरात येत आहेत.
    user_Satish Kale
    Satish Kale
    वर्धा, वर्धा, महाराष्ट्र•
    12 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.