Shuru
Apke Nagar Ki App…
नांदेडच्या माहूर शहरात विद्यार्थी आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीमार आणि दडपशाहीच्या निषेधार्थ गुरुवारी विविध संघटना एकत्र येत भव्य निषेध मोर्चा काढला. संविधानाच्या संरक्षणासाठी विद्यार्थी, सामाजिक, शेतकरी आणि युवक संघटनांचे हजारो लोक रस्त्यावर उतरल्याने शहरात तीव्र जनआक्रोश पाहायला मिळाला. या मोर्चादरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते तहसील कार्यालय या मार्गावर मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मोर्चानंतर शिष्टमंडळाने तहसीलदारांमार्फत भारताचे राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले तसेच विद्यार्थ्यांवरील कथित दडपशाहीचा तीव्र निषेध नोंदवला.
सक्षम महाराष्ट्र न्यूज
नांदेडच्या माहूर शहरात विद्यार्थी आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीमार आणि दडपशाहीच्या निषेधार्थ गुरुवारी विविध संघटना एकत्र येत भव्य निषेध मोर्चा काढला. संविधानाच्या संरक्षणासाठी विद्यार्थी, सामाजिक, शेतकरी आणि युवक संघटनांचे हजारो लोक रस्त्यावर उतरल्याने शहरात तीव्र जनआक्रोश पाहायला मिळाला. या मोर्चादरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते तहसील कार्यालय या मार्गावर मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मोर्चानंतर शिष्टमंडळाने तहसीलदारांमार्फत भारताचे राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले तसेच विद्यार्थ्यांवरील कथित दडपशाहीचा तीव्र निषेध नोंदवला.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- नांदेडच्या माहूर शहरात विद्यार्थी आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीमार आणि दडपशाहीच्या निषेधार्थ गुरुवारी विविध संघटना एकत्र येत भव्य निषेध मोर्चा काढला. संविधानाच्या संरक्षणासाठी विद्यार्थी, सामाजिक, शेतकरी आणि युवक संघटनांचे हजारो लोक रस्त्यावर उतरल्याने शहरात तीव्र जनआक्रोश पाहायला मिळाला. या मोर्चादरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते तहसील कार्यालय या मार्गावर मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मोर्चानंतर शिष्टमंडळाने तहसीलदारांमार्फत भारताचे राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले तसेच विद्यार्थ्यांवरील कथित दडपशाहीचा तीव्र निषेध नोंदवला.1
- यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील उमरी पठार येथे संत श्री ढोला महाराज वृद्धाश्रम गेल्या ३५ वर्षांपासून डौलाने उभा आहे. या वृद्धाश्रमाचे संस्थापक शेषराव डोंगरे यांनी उभारलेल्या या आश्रमात आजघडीला १५० निराधारांचे संगोपन केले जात असून ही या वृद्धाश्रमाची एक प्रेरणादायी यशोगाथा ठरत आहे.1
- कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर येथील आठवडी बाजारात २५ जुलै रोजी आषाढी एकादशीनिमित्त 'एक झाड विठ्ठलाचे' या उपक्रमांतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला आहे. पर्यावरण मित्र मंडळाच्या वतीने या उपक्रमांतर्गत वृक्षारोपणाचे आयोजन करण्यात आले. या वेळी आखाडा बाळापूर येथील प्रतिष्ठित व्यापारी रमेशभाऊ गोयंका यांच्या वतीने टिगार्ड भेट देण्यात आले आहेत. या कार्यक्रमास राजेंद्र प्रसाद अग्रवाल, अरुण कन्नावार, संतोष सापळीकर, किशोर सिंह बयास, प्रा. ओमप्रकाश बोंढारे, डॉ. अरुण सुर्यवंशी, शिवराज स्वामी, नामदेव बोंढारे, विजय कदम, माधवराव काळे, बालुसिंह ठाकुर, दशरथ पेंढारकर आणि मधुकर चेटप आदींसह पर्यावरण मित्र मंडळाचे प्रतिनिधी उपस्थित होते.1
- आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त वाशीम जिल्ह्यातील शेलूबाजार येथे भक्ती, श्रद्धा आणि सेवाभावाचा सुंदर संगम पाहायला मिळाला. या पर्वाचे औचित्य साधून उपवास करणाऱ्या भाविक व नागरिकांसाठी तब्बल १५० किलो फराळी उसळ तयार करून तिचे वाटप करण्यात आले. धार्मिक पर्वाला सामाजिक सेवेची जोड देण्याच्या उद्देशाने राबवण्यात आलेल्या या उपक्रमाला शेलूबाजारसह परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. फराळ वाटप सुरू होताच लहान मुलांपासून महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वच वयोगटातील लोकांनी शिस्तबद्ध पद्धतीने प्रसादाचा लाभ घेतला. यावेळी विठ्ठल-रुक्मिणीचे नामस्मरण आणि जयघोष करण्यात आल्याने संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता. प्रत्येक भाविकापर्यंत फराळ पोहोचावा यासाठी आयोजक आणि कार्यकर्त्यांनी नियोजनबद्ध काम केले. धार्मिक सण-उत्सवांतून सामाजिक बांधिलकी, बंधुभाव आणि परस्पर सहकार्याची भावना जोपासली जावी असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला असून, नागरिकांनी या सेवाभावी उपक्रमाचे कौतुक केले आहे.4
- नागझरी येथे आषाढी एकादशीच्या निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी ह. भ. प. शिवाजी महाराज शेळके (नागझरी) यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.1
- मालेगाव येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महाराष्ट्र बंददरम्यान आंदोलन करण्यात आले आहे. या बंद आंदोलनामध्ये वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते सक्रियपणे सहभागी होऊन आंदोलन करत आहेत.1
- आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त हिमायतनगर (वाढोणा) येथील श्री परमेश्वर मंदिरात अत्यंत भक्तिमय वातावरणात धार्मिक सोहळा पार पडला. या प्रसंगी शेकडो भाविकांनी विठ्ठल-रुख्मिणी आणि श्री परमेश्वराचे दर्शन घेतले. शेतकऱ्यांच्या शिवारात भरघोस पीक यावे, भरपूर पाऊस पडावा आणि सर्वांच्या घरात सुख-समृद्धी नांदावी, अशी प्रार्थना भाविकांनी या वेळी केली. सायंकाळी टाळ-मृदंगाच्या गजरात आणि हरिनामाच्या जयघोषात श्री परमेश्वर मंदिरातून भव्य नगरप्रदक्षिणा दिंडी काढण्यात आली. या दिंडीत चिमुकल्यांनी साकारलेली विठ्ठल-रुख्मिणीची वेशभूषा सर्वांचे मुख्य आकर्षण ठरली. या सोहळ्यामुळे वाढोणा नगरीत जणू पंढरपूरच अवतरल्याचे भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.1
- हिमायतनगर–भोकर राष्ट्रीय महामार्गावरील सोनारी फाट्यावर भरधाव चारचाकीने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दोन दुचाकींना जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. या अपघातामुळे परिसरात पुन्हा एकदा स्पीड ब्रेकरचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सोनारी फाट्यासह महामार्गावरील गावांच्या मुख्य चौकात आणि बसथांब्यांजवळ स्पीड ब्रेकर बसविण्याची मागणी ग्रामस्थांकडून अनेक वर्षांपासून केली जात आहे. मात्र, महामार्ग विभागाच्या दुर्लक्षामुळेच अपघातांची मालिका सुरूच असल्याचा थेट आरोप नागरिकांनी केला आहे. प्रशासनाच्या या भूमिकेवर तीव्र संताप व्यक्त करत 'आणखी किती बळी गेल्यानंतर प्रशासन जागे होणार?' असा रोखठोक आणि संतप्त सवाल आता स्थानिक नागरिकांकडून विचारला जात आहे.1