Shuru
Apke Nagar Ki App…
हिमायतनगर–भोकर राष्ट्रीय महामार्गावरील सोनारी फाट्यावर भरधाव चारचाकीने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दोन दुचाकींना जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. या अपघातामुळे परिसरात पुन्हा एकदा स्पीड ब्रेकरचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सोनारी फाट्यासह महामार्गावरील गावांच्या मुख्य चौकात आणि बसथांब्यांजवळ स्पीड ब्रेकर बसविण्याची मागणी ग्रामस्थांकडून अनेक वर्षांपासून केली जात आहे. मात्र, महामार्ग विभागाच्या दुर्लक्षामुळेच अपघातांची मालिका सुरूच असल्याचा थेट आरोप नागरिकांनी केला आहे. प्रशासनाच्या या भूमिकेवर तीव्र संताप व्यक्त करत 'आणखी किती बळी गेल्यानंतर प्रशासन जागे होणार?' असा रोखठोक आणि संतप्त सवाल आता स्थानिक नागरिकांकडून विचारला जात आहे.
ALM Bharat
हिमायतनगर–भोकर राष्ट्रीय महामार्गावरील सोनारी फाट्यावर भरधाव चारचाकीने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दोन दुचाकींना जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. या अपघातामुळे परिसरात पुन्हा एकदा स्पीड ब्रेकरचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सोनारी फाट्यासह महामार्गावरील गावांच्या मुख्य चौकात आणि बसथांब्यांजवळ स्पीड ब्रेकर बसविण्याची मागणी ग्रामस्थांकडून अनेक वर्षांपासून केली जात आहे. मात्र, महामार्ग विभागाच्या दुर्लक्षामुळेच अपघातांची मालिका सुरूच असल्याचा थेट आरोप नागरिकांनी केला आहे. प्रशासनाच्या या भूमिकेवर तीव्र संताप व्यक्त करत 'आणखी किती बळी गेल्यानंतर प्रशासन जागे होणार?' असा रोखठोक आणि संतप्त सवाल आता स्थानिक नागरिकांकडून विचारला जात आहे.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- नांदेडच्या माहूर शहरात विद्यार्थी आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीमार आणि दडपशाहीच्या निषेधार्थ गुरुवारी विविध संघटना एकत्र येत भव्य निषेध मोर्चा काढला. संविधानाच्या संरक्षणासाठी विद्यार्थी, सामाजिक, शेतकरी आणि युवक संघटनांचे हजारो लोक रस्त्यावर उतरल्याने शहरात तीव्र जनआक्रोश पाहायला मिळाला. या मोर्चादरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते तहसील कार्यालय या मार्गावर मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मोर्चानंतर शिष्टमंडळाने तहसीलदारांमार्फत भारताचे राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले तसेच विद्यार्थ्यांवरील कथित दडपशाहीचा तीव्र निषेध नोंदवला.1
- केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षातर्फे विजय मोर्चा काढण्यात आला. हा विजय मोर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून ते महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापर्यंत काढण्यात आला. या मोर्चामध्ये नांदेड जिल्ह्याचे खासदार रवींद्र चव्हाण यांच्यासह काँग्रेसचे इतर कार्यकर्ते उपस्थित होते.1
- नांदेड जिल्ह्यातील माहूर येथील सांदिपानि पब्लिक स्कूलमध्ये आषाढी महोत्सवानिमित्त विद्यार्थ्यांच्या विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या महोत्सवाच्या निमित्ताने शाळेतील विद्यार्थ्यांनी एकत्र येत विविध उपक्रम उत्साहात पार पाडले आहेत.1
- कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर येथील आठवडी बाजारात २५ जुलै रोजी आषाढी एकादशीनिमित्त 'एक झाड विठ्ठलाचे' या उपक्रमांतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला आहे. पर्यावरण मित्र मंडळाच्या वतीने या उपक्रमांतर्गत वृक्षारोपणाचे आयोजन करण्यात आले. या वेळी आखाडा बाळापूर येथील प्रतिष्ठित व्यापारी रमेशभाऊ गोयंका यांच्या वतीने टिगार्ड भेट देण्यात आले आहेत. या कार्यक्रमास राजेंद्र प्रसाद अग्रवाल, अरुण कन्नावार, संतोष सापळीकर, किशोर सिंह बयास, प्रा. ओमप्रकाश बोंढारे, डॉ. अरुण सुर्यवंशी, शिवराज स्वामी, नामदेव बोंढारे, विजय कदम, माधवराव काळे, बालुसिंह ठाकुर, दशरथ पेंढारकर आणि मधुकर चेटप आदींसह पर्यावरण मित्र मंडळाचे प्रतिनिधी उपस्थित होते.1
- राज्य सरकारकडून सुरू करण्यात आलेल्या अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या प्रक्रियेला विरोध दर्शवण्यासाठी नांदेडमध्ये आगामी ९ ऑगस्ट रोजी महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या निर्णयाला अनुसूचित जातीतील ५९ जातींच्या संघटनांकडून विरोध केला जात असून, या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यातील सर्व अनुसूचित जातींमधील नागरिकांना एकत्रित करून हा मोर्चा काढण्यात येणार आहे. हा मोर्चा ९ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता आयटीआय चौकातील महात्मा फुले पुतळ्यापासून सुरू होईल. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय येथे पोहोचून या मोर्चाचे जाहीर सभेत रूपांतर होणार आहे.1
- आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त हिमायतनगर (वाढोणा) येथील श्री परमेश्वर मंदिरात अत्यंत भक्तिमय वातावरणात धार्मिक सोहळा पार पडला. या प्रसंगी शेकडो भाविकांनी विठ्ठल-रुख्मिणी आणि श्री परमेश्वराचे दर्शन घेतले. शेतकऱ्यांच्या शिवारात भरघोस पीक यावे, भरपूर पाऊस पडावा आणि सर्वांच्या घरात सुख-समृद्धी नांदावी, अशी प्रार्थना भाविकांनी या वेळी केली. सायंकाळी टाळ-मृदंगाच्या गजरात आणि हरिनामाच्या जयघोषात श्री परमेश्वर मंदिरातून भव्य नगरप्रदक्षिणा दिंडी काढण्यात आली. या दिंडीत चिमुकल्यांनी साकारलेली विठ्ठल-रुख्मिणीची वेशभूषा सर्वांचे मुख्य आकर्षण ठरली. या सोहळ्यामुळे वाढोणा नगरीत जणू पंढरपूरच अवतरल्याचे भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.1
- हिमायतनगर–भोकर राष्ट्रीय महामार्गावरील सोनारी फाट्यावर भरधाव चारचाकीने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दोन दुचाकींना जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. या अपघातामुळे परिसरात पुन्हा एकदा स्पीड ब्रेकरचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सोनारी फाट्यासह महामार्गावरील गावांच्या मुख्य चौकात आणि बसथांब्यांजवळ स्पीड ब्रेकर बसविण्याची मागणी ग्रामस्थांकडून अनेक वर्षांपासून केली जात आहे. मात्र, महामार्ग विभागाच्या दुर्लक्षामुळेच अपघातांची मालिका सुरूच असल्याचा थेट आरोप नागरिकांनी केला आहे. प्रशासनाच्या या भूमिकेवर तीव्र संताप व्यक्त करत 'आणखी किती बळी गेल्यानंतर प्रशासन जागे होणार?' असा रोखठोक आणि संतप्त सवाल आता स्थानिक नागरिकांकडून विचारला जात आहे.1