logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

वनक्षेत्राच्या ७/१२ नोंदीचे कामकाज दि. ३१ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे वन विभागाला कडक निर्देश - जिल्हा प्रशासनाचा सातत्याने पाठपुरावा वनक्षेत्राच्या ७/१२ नोंदीचे कामकाज दि. ३१ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे वन विभागाला कडक निर्देश - जिल्हा प्रशासनाचा सातत्याने पाठपुरावा पालघर जिल्ह्यातील वनक्षेत्राच्या महसुली नोंदी ७/१२ उताऱ्यावर घेण्याचे कामकाज दि. ३१/०८/२०२६ पर्यंत निश्चितपणे पूर्ण करण्याचे कडक निर्देश जिल्हा प्रशासनाकडून वन विभागाला देण्यात आले आहेत. शासनाच्या आदेशानुसार हे कामकाज जूनअखेरपर्यंत पूर्ण करणे अपेक्षित होते, मात्र SIR तसेच पावसामुळे या कामास विलंब झाला. आता ऑगस्टअखेरपर्यंत या कामाची पूर्तता करण्याच्या शासनाच्या सूचनांचा पुनरुच्चार करण्यात आला आहे. ही अंतिम मुदत निश्चित करत निवासी उपजिल्हाधिकारी यांनी मंगळवार, दि. २५/०८/२०२६ रोजी झालेल्या आढावा बैठकीत वन विभागाला या मुदतीत कामकाज पूर्ण करून त्याबाबतचा पूर्तता अहवाल सादर करण्याचे स्पष्ट निर्देश दिले. जमिनींच्या मालकीबाबतच्या नोंदी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ नुसार महसुली अभिलेख (७/१२) द्वारे नियंत्रित केल्या जातात, तर वनक्षेत्राचा स्वतंत्र अभिलेख वन विभागाकडून वन नोंदवहींमध्ये (फॉर्म क्र. १) ठेवला जातो. या दोन अभिलेखांमध्ये तफावत राहिल्यास शासकीय जमिनींच्या तपशिलामध्ये वनक्षेत्राची नोंद, अतिक्रमण व वनेत्तर वापर यासारख्या बाबींमुळे भविष्यात न्यायालयीन प्रकरणे उद्भवण्याचा धोका असतो आणि नेमकी हीच बाब लक्षात घेऊन राज्य शासनाने या कामकाजाचा पाठपुरावा प्राधान्याने हाती घेतला आहे. शासनाच्या दि. २३ एप्रिल २०२६ रोजीच्या परिपत्रकानुसार सर्वेक्षण क्रमांकनिहाय वनाचा प्रकार/वैधानिक दर्जा, वनाचा उपप्रकार व ७/१२ सदरी घ्यावयाच्या नोंदी विहित कालमर्यादेत पूर्ण करण्याचे बंधन घालण्यात आले होते. याच परिपत्रकाच्या परिशिष्टानुसार उपवनसंरक्षक, डहाणू व जव्हार यांच्याकडून आवश्यक माहिती प्राप्त करून घेत, सहायक वनसंरक्षक, वनपरिक्षेत्र अधिकारी, तहसीलदार व उपअधीक्षक, भूमी अभिलेख यांच्या समन्वयाने पालघर जिल्ह्यातील वनक्षेत्राच्या नोंदी गाव नमुना ७/१२ मधील भोगवटादार सदरी घेण्याचे कामकाज विहित कार्यपद्धतीने क्षेत्रीय स्तरावर सुरू आहे. या निर्देशांची काटेकोर अंमलबजावणी व्हावी यासाठी जिल्हा प्रशासनाने कामकाज एका बैठकीपुरते मर्यादित न ठेवता सातत्याने त्याचा पाठपुरावा केला आहे - दि. १०/०६/२०२६, दि. २५/०६/२०२६, दि. ३०/०७/२०२६ आणि आता दि. २५/०८/२०२६ अशा सलग चार आढावा बैठका जिल्हाधिकारी व निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आल्या आहेत. प्रत्येक बैठकीत उपवनसंरक्षक, वनपरिक्षेत्र अधिकारी, तहसीलदार व उपअधीक्षक, भूमी अभिलेख यांच्याकडून कामकाजाच्या प्रगतीचा हिशेब घेतला जात आहे. दि. ३०/०७/२०२६ च्या बैठकीत वन विभागाकडून आवश्यक नोंदी, नकाशे व कागदपत्रे तसेच महसूल विभागाकडील ७/१२ वर आवश्यक नोंदी १५ दिवसांत घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. या मुदतीनंतरही कामकाज पूर्ण न झाल्याने, या मुदतीत कामकाज पूर्ण न झाल्यास याबाबत गांभीर्याने दखल घेतली जाईल, असे कडक निर्देश बजावण्यात आले आहेत. जिल्ह्यातील अनेक जमिनी वनजमिनींना लागून आहेत आणि महसूल व वन विभागाच्या अभिलेखांमध्ये तफावत असल्यामुळे वन अधिसूचनेच्या कक्षेत संबंधित जमीन येते किंवा नाही, हे निश्चित करण्यासाठी प्रत्येक प्रकरण वन विभागाकडे ना-हरकत प्रमाणपत्रासाठी (NOC) पाठवावे लागते. आतापर्यंत जवळपास सर्व संरक्षित व राखीव वनजमिनींच्या नोंदी अद्ययावत करण्यात आल्या असून, संबंधित उपवनसंरक्षकांकडून त्यांचे प्रमाणीकरण करून घेण्यास सांगण्यात आले आहे. खासगी वन व इतर वनजमिनींच्या बाबतीत कामकाज सुरू असून, ते लवकरात लवकर पूर्ण करणे आवश्यक आहे. हे कामकाज पूर्ण झाल्यानंतर जमीनधारकांसाठी जमिनीचा वापर अधिक स्पष्ट होईल तसेच कायदेशीर परवानग्या मिळविण्याची प्रक्रिया सुलभ होईल. त्याचबरोबर खासगी वनजमिनींचा आणि निश्चित करण्यात आलेल्या वनक्षेत्राचा गैरवापर होऊ नये यासाठी आवश्यक संरक्षणही सुनिश्चित करता येईल. जिल्हा प्रशासनाच्या या टप्प्याटप्प्याने राबविलेल्या कडक व सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे वनक्षेत्राच्या नोंदीचे रखडलेले कामकाज आता अंतिम टप्प्यात पोहोचले असून, दि. ३१ ऑगस्टच्या मुदतीत ते पूर्णत्वास जाईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. या नोंदी अद्ययावत झाल्यानंतर वनक्षेत्राशी संबंधित न्यायालयीन प्रकरणे टाळता येतील, तसेच ‘इज ऑफ डुइंग बिझनेस’च्या दृष्टीने विकास परवानगीच्या कामी वनक्षेत्राच्या नोंदी अद्ययावत झाल्यानंतर संबंधित कार्यवाही अधिक गतीने करणे शक्य होईल. जिल्हा प्रशासन ही मुदत काटेकोरपणे पाळली जाते किंवा नाही, यावर बारीक लक्ष ठेवून आहे.

12 hrs ago
user_आपले मानवाधिकार
आपले मानवाधिकार
Yoga instructor Mumbai, Maharashtra•

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • हिंदुओं के त्यौहारों का समय आते ही घर में बनने वाली मिठाईयों में कमी आय गई क्योंकि शक्कर और गुड़ दोनों के भाव सरकार ने बढ़ा दिए
    1
    हिंदुओं के त्यौहारों का समय आते ही घर में बनने वाली मिठाईयों में कमी आय गई क्योंकि शक्कर और गुड़ दोनों के भाव सरकार ने बढ़ा दिए
    user_Mumbai Sahara News
    Mumbai Sahara News
    TV News Anchor मुंबई, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • कल्याण सांसद श्रीकांत शिंदे जी से लड़का यह पूछ रहा है कि, जिस तरह से 'लाडकी बहीण' (Ladki Bahin) योजना लाकर माता-बहनों के लिए योजनाएं लाई गई हैं, उसी तरह लाडके भाइयों (युवाओं) के लिए सरकार कौन सी योजना लेकर आएगी? कल्याण सांसद श्रीकांत शिंदे जी से लड़का यह पूछ रहा है कि, जिस तरह से 'लाडकी बहीण' (Ladki Bahin) योजना लाकर माता-बहनों के लिए योजनाएं लाई गई हैं, उसी तरह लाडके भाइयों (युवाओं) के लिए सरकार कौन सी योजना लेकर आएगी?
    1
    कल्याण सांसद श्रीकांत शिंदे जी से लड़का यह पूछ रहा है कि, जिस तरह से 'लाडकी बहीण' (Ladki Bahin) योजना लाकर माता-बहनों के लिए योजनाएं लाई गई हैं, उसी तरह लाडके भाइयों (युवाओं) के लिए सरकार कौन सी योजना लेकर आएगी?

    user_News Vani 24
    News Vani 24
    News Anchor मुंबई, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • नारळी पौर्णिमेचा जल्लोष — वरळी कोळीवाड्यात परंपरेचा रंग, उत्सवाचा संग! नारळी पौर्णिमेचा जल्लोष — वरळी कोळीवाड्यात परंपरेचा रंग, उत्सवाचा संग!
    1
    नारळी पौर्णिमेचा जल्लोष — वरळी कोळीवाड्यात परंपरेचा रंग, उत्सवाचा संग!
नारळी पौर्णिमेचा जल्लोष — वरळी कोळीवाड्यात परंपरेचा रंग, उत्सवाचा संग!
    user_MI MARATHI INDIA
    MI MARATHI INDIA
    Photographer मुंबई, मुंबई, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • “गोविंदा हा खेळ चॅम्पियन आहे!” मुख्यमंत्री मा. ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी गोविंदा खेळाला ऑलिम्पिकपर्यंत घेऊन जाण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून सर्वतोपरी सहकार्याची ग्वाही दिली. गोविंदांच्या पारंपरिक खेळाला जागतिक व्यासपीठ मिळवून देण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. प्रताप सरनाईक यांच्या प्रो-गोविंदा दहीहंडीला मुख्यमंत्री फडणवीसांची उपस्थिती मुंबईत दहीहंडी उत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या पुढाकारातून ‘प्रो-गोविंदा’ दहीहंडीच्या माध्यमातून पारंपरिक दहीहंडीला आधुनिक स्पर्धेचे स्वरूप देण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत प्रो-गोविंदा उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी फडणवीस यांनी दहीहंडी ही महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा असून, या खेळाला देश-विदेशात मोठी ओळख मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याची भूमिका मांडली. गोविंदा पथकांचा उत्साह, मानवी मनोरे आणि थरारक स्पर्धेमुळे यंदाची दहीहंडी विशेष आकर्षण ठरत आहे. मुंबईकर इंडिया टीव्ही स्पेशल रिपोर्ट
    1
    “गोविंदा हा खेळ चॅम्पियन आहे!” 

मुख्यमंत्री मा. ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी गोविंदा खेळाला ऑलिम्पिकपर्यंत घेऊन जाण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून सर्वतोपरी सहकार्याची ग्वाही दिली. गोविंदांच्या पारंपरिक खेळाला जागतिक व्यासपीठ मिळवून देण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.

प्रताप सरनाईक यांच्या प्रो-गोविंदा दहीहंडीला मुख्यमंत्री फडणवीसांची उपस्थिती
मुंबईत दहीहंडी उत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या पुढाकारातून ‘प्रो-गोविंदा’ दहीहंडीच्या माध्यमातून पारंपरिक दहीहंडीला आधुनिक स्पर्धेचे स्वरूप देण्यात आले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत प्रो-गोविंदा उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी फडणवीस यांनी दहीहंडी ही महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा असून, या खेळाला देश-विदेशात मोठी ओळख मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याची भूमिका मांडली.
गोविंदा पथकांचा उत्साह, मानवी मनोरे आणि थरारक स्पर्धेमुळे यंदाची दहीहंडी विशेष आकर्षण ठरत आहे.
मुंबईकर इंडिया टीव्ही स्पेशल रिपोर्ट
    user_मुंबईकर इंडिया टीव्ही न्यूज
    मुंबईकर इंडिया टीव्ही न्यूज
    Media company मुंबई, मुंबई, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • ऑटो-टैक्सी चालकों के लिए मराठी अनिवार्य! | CM फडणवीस का बड़ा बयान महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने ऑटो, टैक्सी और कैब चालकों के लिए मराठी भाषा के मुद्दे पर बड़ा बयान दिया है। उन्होंने कहा कि हिंदी भाषी भाइयों को मराठी भाषा का विशेषज्ञ बनाने की कोशिश नहीं है, लेकिन उन्हें मराठी का कामकाजी ज्ञान होना चाहिए। भाषा सीखने की समय-सीमा तीन बार बढ़ाई जा चुकी है। सीएम फडणवीस ने यह भी कहा कि महायुति सरकार भाषा के आधार पर किसी के साथ अन्याय नहीं होने देगी। Police Vision Times पर देखिए महाराष्ट्र और मुंबई की महत्वपूर्ण खबरें।
    1
    ऑटो-टैक्सी चालकों के लिए मराठी अनिवार्य! | CM फडणवीस का बड़ा बयान
महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने ऑटो, टैक्सी और कैब चालकों के लिए मराठी भाषा के मुद्दे पर बड़ा बयान दिया है।
उन्होंने कहा कि हिंदी भाषी भाइयों को मराठी भाषा का विशेषज्ञ बनाने की कोशिश नहीं है, लेकिन उन्हें मराठी का कामकाजी ज्ञान होना चाहिए। भाषा सीखने की समय-सीमा तीन बार बढ़ाई जा चुकी है।
सीएम फडणवीस ने यह भी कहा कि महायुति सरकार भाषा के आधार पर किसी के साथ अन्याय नहीं होने देगी।
Police Vision Times पर देखिए महाराष्ट्र और मुंबई की महत्वपूर्ण खबरें।
    user_Police Vision Times
    Police Vision Times
    Journalist मुंबई, मुंबई, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • राखी बांधते ही छलक पड़े भाई के आंसू, बहन का प्यार देख पत्थर दिल भी रो पड़े! सड़क किनारे जब बहन ने भाई की कलाई पर बांधी राखी, भावुक कर देने वाला विडियो हुआ वायरल राखी का त्योहार सिर्फ एक धागा बांधने का नाम नहीं, बल्कि भाई-बहन के उस रिश्ते का एहसास है, जिसे शब्दों में बयां करना मुश्किल है। सोशल मीडिया पर वायरल हो रहे एक वीडियो ने इस रिश्ते की ऐसी तस्वीर सामने रखी है, जिसे देखकर शायद ही किसी की आंखें नम न हों। वीडियो में एक बहन अपने भाई की कलाई पर राखी बांधती नजर आ रही है। हालात चाहे जैसे भी हों, बहन ने अपने भाई के प्रति प्यार और अपनापन दिखाते हुए राखी बांधी। इस भावुक पल में भाई भी अपने आंसुओं को रोक नहीं पाया। सबसे ज्यादा दिल छू लेने वाला दृश्य तब दिखाई देता है, जब बहन राखी बांधने के बाद भाई के साथ भावुक होकर खड़ी नजर आती है। आसपास मौजूद लोग भी इस भाई-बहन के रिश्ते को देखकर भावुक होते दिखाई देते हैं। यह वीडियो एक बार फिर याद दिलाता है कि रिश्ते दौलत से नहीं, दिल से निभाए जाते हैं। भाई के पास भले ही देने के लिए कुछ बड़ा न हो, लेकिन बहन की राखी और उसका प्यार उसके लिए दुनिया की सबसे बड़ी दौलत बन जाता है। वीडियो सोशल मीडिया पर तेजी से वायरल हो रहा है और लोग इसे देखकर भाई-बहन के इस अनमोल रिश्ते को सलाम कर रहे हैं। सच ही कहा गया है—राखी का धागा कलाई पर बंधता है, लेकिन उसका रिश्ता सीधे दिल से जुड़ता है।
    1
    राखी बांधते ही छलक पड़े भाई के आंसू, बहन का प्यार देख पत्थर दिल भी रो पड़े!
सड़क किनारे जब बहन ने भाई की कलाई पर बांधी राखी, भावुक कर देने वाला विडियो हुआ वायरल
राखी का त्योहार सिर्फ एक धागा बांधने का नाम नहीं, बल्कि भाई-बहन के उस रिश्ते का एहसास है, जिसे शब्दों में बयां करना मुश्किल है। सोशल मीडिया पर वायरल हो रहे एक वीडियो ने इस रिश्ते की ऐसी तस्वीर सामने रखी है, जिसे देखकर शायद ही किसी की आंखें नम न हों।
वीडियो में एक बहन अपने भाई की कलाई पर राखी बांधती नजर आ रही है। हालात चाहे जैसे भी हों, बहन ने अपने भाई के प्रति प्यार और अपनापन दिखाते हुए राखी बांधी। इस भावुक पल में भाई भी अपने आंसुओं को रोक नहीं पाया।
सबसे ज्यादा दिल छू लेने वाला दृश्य तब दिखाई देता है, जब बहन राखी बांधने के बाद भाई के साथ भावुक होकर खड़ी नजर आती है। आसपास मौजूद लोग भी इस भाई-बहन के रिश्ते को देखकर भावुक होते दिखाई देते हैं।
यह वीडियो एक बार फिर याद दिलाता है कि रिश्ते दौलत से नहीं, दिल से निभाए जाते हैं। भाई के पास भले ही देने के लिए कुछ बड़ा न हो, लेकिन बहन की राखी और उसका प्यार उसके लिए दुनिया की सबसे बड़ी दौलत बन जाता है।
वीडियो सोशल मीडिया पर तेजी से वायरल हो रहा है और लोग इसे देखकर भाई-बहन के इस अनमोल रिश्ते को सलाम कर रहे हैं।
सच ही कहा गया है—राखी का धागा कलाई पर बंधता है, लेकिन उसका रिश्ता सीधे दिल से जुड़ता है।
    user_MUNNA MIYAN
    MUNNA MIYAN
    Voice of people Mumbai, Maharashtra•
    3 hrs ago
  • कुणाल जो सोशल मीडिया पर एक के बाद एक छाया हुआ था जहां तक जानकारी थी कि एक आईफोन के लिये पहाड़ी से कूदा था लेकिन सच कुछ और ही है सुनिए आप ,सुनने के बाद कुणाल के लिये आपके दिल में प्यार उमड़ेगा और आप कहेंगे बेटा हो तो कुणाल जैसा।
    1
    कुणाल जो सोशल मीडिया पर एक के बाद  एक छाया हुआ था जहां तक जानकारी थी कि एक आईफोन के लिये पहाड़ी से कूदा था लेकिन सच कुछ और ही है सुनिए आप ,सुनने के बाद कुणाल के लिये आपके दिल में प्यार उमड़ेगा और आप कहेंगे बेटा हो तो कुणाल जैसा।
    user_MUNNA MIYAN
    MUNNA MIYAN
    Voice of people Mumbai, Maharashtra•
    26 min ago
  • ​'परप्रांतीयांची मुजोरी! शिवीगाळ-दमदाटी करत अडवल्या रिक्षा, पहा टायगर न्यूजचा रिपोर्ट!' Tiger News Aap Tak ​'परप्रांतीयांची मुजोरी! शिवीगाळ-दमदाटी करत अडवल्या रिक्षा, पहा टायगर न्यूजचा रिपोर्ट!' Tiger News Aap Tak
    1
    ​'परप्रांतीयांची मुजोरी! शिवीगाळ-दमदाटी करत अडवल्या रिक्षा, पहा टायगर न्यूजचा रिपोर्ट!' Tiger News Aap Tak 
​'परप्रांतीयांची मुजोरी! शिवीगाळ-दमदाटी करत अडवल्या रिक्षा, पहा टायगर न्यूजचा रिपोर्ट!' Tiger News Aap Tak
    user_Tiger News Aap Tak
    Tiger News Aap Tak
    Local News Reporter Mumbai, Maharashtra•
    3 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.