logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

देवगड तालुक्यात वादळी वाऱ्याचा प्रचंड तडाखा, बापर्डे ते विठ्ठलादेवीपर्यंत मोठी पडझड लाखोंचे नुकसान, प्रशासनाकडून तातडीने पंचनाम्यांचे देवगड तालुक्यात शनिवारी सायंकाळी अचानक निर्माण झालेल्या वादळसदृश्य परिस्थितीमुळे अनेक गावांना मोठा फटका बसला. बापर्डे, सौंदाळे, फणसगाव, मुटाट, विठ्ठलादेवी, गोवळ, तांबेवाडी, सोमलेवाडी आदी भागांत झाडे उन्मळून पडणे, घरांची छपरे उडणे, सिमेंट पत्रे तुटणे तसेच शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याच्या घटना घडल्या. या संपूर्ण नुकसानीची पाहणी आज पालकमंत्री नितेश राणे यांच्या आदेशानुसार प्रशासन व लोकप्रतिनिधींनी संयुक्तपणे केली. तहसीलदार रमेश पवार यांनी सांगितले की, या वादळी वाऱ्यात लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून सर्व संबंधित विभागांना तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. देवगड पंचायत समितीचे सभापती, उपसभापती, ग्रामपंचायत सरपंच, ग्रामसेवक तसेच संबंधित अधिकारी यांच्या उपस्थितीत संपूर्ण भागाची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. शनिवारी सायंकाळी साडेचार ते पाचच्या दरम्यान अचानक जोरदार वादळ सदृश्य स्थिती मुळे तालुक्यात मोठे नुकसान झाले. अनेक ठिकाणी मोठमोठी झाडे उन्मळून पडली, घरांच्या छपरांवरील पत्रे उडाली, शाळांच्या इमारतींचे नुकसान झाले. गोवळ तांबेवाडी येथे शाळेचे छप्पर उडून जवळील एका वृद्ध महिलेच्या घरावर कोसळले. मात्र सुदैवाने त्या महिलेच्या घराचा दुसरा भाग बाधित झाल्याने मोठी दुर्घटना टळली आणि कोणतीही जीवितहानी झाली नाही. आज नुकसानग्रस्त भागांची पाहणी दौऱ्याच्या निमित्ताने देवगड तहसीलदार रमेश पवार सभापती गणेश राणे हे त्या ठिकाणी गेले असता या महिलेने रडत रडतच आपली सर्व व्यथा सभापतींना सांगितली सभापतींनी पाठीवर हात देत या महिलेला काळजी करू नको आई आम्ही आहोत असे सांगत धीर दिला. व सर्व तिच्या नुकसान ग्रस्त घराची पाहणी केली पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनुसार बापर्डे ते सौंदाळे या संपूर्ण परिसराचा पाहणी दौरा करण्यात आला. या दौऱ्यात बापर्डे ,गोवळ, फणसगाव, सौंदाळे, गोवळ तांबेवाडी, सोमलेवाडी आणि विठ्ठलादेवी परिसरात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले. काही ठिकाणी केळीच्या बागांचे नुकसान झाले असून अनेक ठिकाणी जुनी व मोठी झाडे उन्मळून पडली आहेत. घालवली ब्रह्मदेव मंदिर परिसरातील रस्ता मुसळधार पावसामुळे वाहून आलेल्या गाळामुळे वाहतुकीस अयोग्य झाला आहे. या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून पावसापूर्वी वाहतुकीस योग्य बनविण्याच्या सक्त सूचना संबंधित ठेकेदाराला देणार आ असल्याची माहिती सभापती गणेश राणे यांनी दिली. काही ठिकाणी घरांची संपूर्ण छपरे उडाल्याने नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. सुदैवाने अनेक घरांमध्ये त्यावेळी कोणी नसल्यामुळे जीवितहानी टळली. पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून नुकसानग्रस्त शेतकरी व नागरिकांना जास्तीत जास्त शासकीय मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचेही गणेश राणे यांनी सांगितले. दरम्यान, गोवळ परिसरातील आश्विन बाबाजी सावंत, विष्णू बाबाजी घाडी, मधुकर शंकर माळकर, संदीप विनायक माळकर, निर्मिला शिवराम तांबे आणि रघुनाथ गोपाळ मोरे यांचे नुकसान झाले आहे. तसेच फणसगाव येथील मोहन वासुदेव पालकर, दिलीप पांडुरंग नर, रुक्मिणी अंबाजी गुरव, यशवंत राजाराम महाडिक, महेंद्र नारायण नरसाळे सत्यवान भास्कर जगताप, प्रकाश रामचंद्र नरसाळे यांनाही वादळी वाऱ्याचा मोठा फटका बसला आहे. कुणकवण परिसरातही यशवंत सिताराम विचारे, अर्जुन राजाराम जनक, महादेव शिवराम राणे, अनंत सखाराम देवळेकर , शशिकांत आबा तोरस्कर यांच्या मालमत्तेचे नुकसान झाले असून प्रशासनाकडे तातडीने मदतीची मागणी करण्यात आली आहे. तहसीलदार रमेश पवार यांनी सर्व पंचनामे युद्धपातळीवर पूर्ण करून शासन दरबारी अहवाल पाठविण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. प्रत्यक्ष पाहणीदरम्यान तहसील कार्यालयात नोंद झालेल्या आकडेवारीपेक्षाही अधिक नुकसान झाल्याचे दिसून आल्याने प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. या पाहणी दौऱ्यात सभापती गणेश राणे उपसभापती अमोल लोके पंचायत समिती सदस्य विष्णू घाडी , संबंधित प्रशासकीय अधिकारी कधी उपस्थित होते.

2 hrs ago
user_मालवणी Express
मालवणी Express
Iam writer and editor सावंतवाडी, सिंधुदुर्ग, महाराष्ट्र•
2 hrs ago
b58a5717-dccb-4b46-9e6d-d34744454944

More news from Kolhapur and nearby areas
  • रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील बेनगी गावात सुरू असलेल्या क्रिकेट सामन्यादरम्यान चक्रीवादळामुळे मोठा मंच उडून गेला. या अचानक झालेल्या घटनेमुळे मैदानात एकच खळबळ उडाली, मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
    1
    रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील बेनगी गावात सुरू असलेल्या क्रिकेट सामन्यादरम्यान चक्रीवादळामुळे मोठा मंच उडून गेला. या अचानक झालेल्या घटनेमुळे मैदानात एकच खळबळ उडाली, मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
    user_Sm7news
    Sm7news
    Farmer Chandgad, Kolhapur•
    13 hrs ago
  • कोल्हापूर महानगरपालिकेने पावसाळ्यापूर्वी पुराची समस्या टाळण्यासाठी नालेसफाई मोहीम युद्धपातळीवर सुरू केली आहे. २३ मार्चपासून सुरू झालेल्या या मोहिमेत मनुष्यबळ आणि आधुनिक यंत्रांचा वापर करून शहरातील गाळ, कचरा व अडथळे दूर केले जात आहेत. मनपा प्रशासनाने वेळेत काम पूर्ण करण्याचे नियोजन केले असून, नागरिकांनाही नाल्यात कचरा न टाकण्याचे आवाहन केले आहे.
    1
    कोल्हापूर महानगरपालिकेने पावसाळ्यापूर्वी पुराची समस्या टाळण्यासाठी नालेसफाई मोहीम युद्धपातळीवर सुरू केली आहे. २३ मार्चपासून सुरू झालेल्या या मोहिमेत मनुष्यबळ आणि आधुनिक यंत्रांचा वापर करून शहरातील गाळ, कचरा व अडथळे दूर केले जात आहेत. मनपा प्रशासनाने वेळेत काम पूर्ण करण्याचे नियोजन केले असून, नागरिकांनाही नाल्यात कचरा न टाकण्याचे आवाहन केले आहे.
    user_Journalist Ajay
    Journalist Ajay
    करवीर, कोल्हापूर, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • आजच्या राशीभविष्यात प्रत्येक राशीसाठीचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या. प्रेम, आरोग्य, आर्थिक स्थिती आणि करिअरसंबंधी महत्त्वाची माहिती मिळेल.
    1
    आजच्या राशीभविष्यात प्रत्येक राशीसाठीचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या. प्रेम, आरोग्य, आर्थिक स्थिती आणि करिअरसंबंधी महत्त्वाची माहिती मिळेल.
    user_E city news network
    E city news network
    Local News Reporter करवीर, कोल्हापूर, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक विठ्ठल कांगणे यांचा अंधश्रद्धेवर बोलणारा एक व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे. यात त्यांनी लोकांना अंधश्रद्धा सोडून छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार अंगी बाणवण्याचा सल्ला दिला आहे. त्यांची विनोदी आणि शैलीदार मांडणी सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे.
    1
    महाराष्ट्रातील प्रसिद्ध स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक विठ्ठल कांगणे यांचा अंधश्रद्धेवर बोलणारा एक व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे. यात त्यांनी लोकांना अंधश्रद्धा सोडून छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार अंगी बाणवण्याचा सल्ला दिला आहे. त्यांची विनोदी आणि शैलीदार मांडणी सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे.
    user_EXPRESS NEWS
    EXPRESS NEWS
    Press advisory तासगाव, सांगली, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • जीवन निरगुडे यांना त्यांच्या 19 वर्षांच्या उत्कृष्ट पोलीस सेवेसाठी 'पोलीस महासंचालक सन्मान चिन्ह' देऊन गौरवण्यात आले. त्यांच्या या दैदिप्यमान यशाबद्दल पश्चिम बंगाल मराठी व्यापारी असोसिएशनने अभिनंदन केले आहे. हा सन्मान त्यांच्या समर्पित सेवेचे प्रतीक आहे.
    1
    जीवन निरगुडे यांना त्यांच्या 19 वर्षांच्या उत्कृष्ट पोलीस सेवेसाठी 'पोलीस महासंचालक सन्मान चिन्ह' देऊन गौरवण्यात आले. त्यांच्या या दैदिप्यमान यशाबद्दल पश्चिम बंगाल मराठी व्यापारी असोसिएशनने अभिनंदन केले आहे. हा सन्मान त्यांच्या समर्पित सेवेचे प्रतीक आहे.
    user_होनाई न्यूज/सा.माणदेश दर्शन
    होनाई न्यूज/सा.माणदेश दर्शन
    तासगाव, सांगली, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • आई ती असते जी संघर्षांमध्येही कधी हार मानत नाही. परमेश्वराने आपल्याला जगातील सर्वात प्रेमळ आणि शक्तिशाली माता दिल्याबद्दल त्याचे मनापासून आभार मानूया.
    4
    आई ती असते जी संघर्षांमध्येही कधी हार मानत नाही. परमेश्वराने आपल्याला जगातील सर्वात प्रेमळ आणि शक्तिशाली माता दिल्याबद्दल त्याचे मनापासून आभार मानूया.
    user_किशोर पाटील
    किशोर पाटील
    तासगाव, सांगली, महाराष्ट्र•
    1 day ago
  • सांगली जिल्ह्यात एका महावितरण कर्मचाऱ्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून हत्येमागचे कारण अद्याप गूढ आहे. पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.
    1
    सांगली जिल्ह्यात एका महावितरण कर्मचाऱ्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून हत्येमागचे कारण अद्याप गूढ आहे. पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.
    user_A1 update news
    A1 update news
    Journalist Jat, Sangli•
    12 hrs ago
  • आमदार सुहास बाबर यांनी खानापूर-आटपाडी मतदारसंघात 'ट्री आर्मी'च्या मदतीने मोठ्या वृक्षारोपण मोहिमेची घोषणा केली आहे. पिंपळाची व इतर झाडे लावून मतदारसंघाचा कायापालट करण्याचा त्यांचा संकल्प असून, यात वन विभागाचीही मदत घेतली जाईल.
    1
    आमदार सुहास बाबर यांनी खानापूर-आटपाडी मतदारसंघात 'ट्री आर्मी'च्या मदतीने मोठ्या वृक्षारोपण मोहिमेची घोषणा केली आहे. पिंपळाची व इतर झाडे लावून मतदारसंघाचा कायापालट करण्याचा त्यांचा संकल्प असून, यात वन विभागाचीही मदत घेतली जाईल.
    user_EXPRESS NEWS
    EXPRESS NEWS
    Press advisory तासगाव, सांगली, महाराष्ट्र•
    12 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.