पालकमंत्री अतुल सावे, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांची निर्मल प्रकाशन ला भेट पालकमंत्री अतुल सावे यांची निर्मल प्रकाशनाला भेट नांदेड दि.१८- महाराष्ट्र राज्य शासनाचा अत्यंत प्रतिष्ठेचा पाच लाख रूपयांचा श्री.पु.भागवत प्रकाशन पुरस्कार निर्मल प्रकाशनाला प्राप्त झाल्याबद्दल नांदेडचे पालकमंत्री ना.अतुल सावे यांनी प्रकाशनाच्या कार्यालयात जाऊन प्रकाशक निर्मलकुमार सूर्यवंशी यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.निर्मल प्रकाशनाने अत्यंत दर्जेदार पुस्तके प्रकाशित करून आपला नावलौकिक वाढविला असून नामवंत लेखकांसोबतच नवोदित लेखकांना लिहिते केले,ही मोठी कौतुकाची बाब आहे,असे गौरवोद्गार पालकमंत्र्यांनी यावेळी काढले.निर्मलकुमार सूर्यवंशी यांनी शासनाने प्रकाशन व्यवसायासाठी असलेला सर्वोच्च पुरस्कार देऊन सन्मानित केल्यामुळे आपली जबाबदारी वाढली आहे असे सांगितले.ज्येष्ठ साहित्यिक डॉ जगदीश कदम यांनी निर्मल प्रकाशनाच्या वाटचालीचा आढावा घेतला.याप्रसंगी जिल्हाधिकारी राहूल कर्डिले, जिल्हा पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार, महानगरपालिका आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे, निवासी उपजिल्हाधिकारी किरण कुरूंदकर,डॉ.जगदीश कदम, दिगंबर क्षीरसागर, सतीश कुलकर्णी,पंडित पाटील,आनंद कल्याणकर,प्र.श्री.जाधव, डॉ.भगवान अंजनीकर, व्यंकटेश चौधरी,सरदार राजकमल सिंग गाडीवाले, दत्तोपंत पाटील आदी उपस्थित होते #atulsawe #rahulkardile #abinashkumar #maheshdoifode
पालकमंत्री अतुल सावे, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांची निर्मल प्रकाशन ला भेट पालकमंत्री अतुल सावे यांची निर्मल प्रकाशनाला भेट नांदेड दि.१८- महाराष्ट्र राज्य शासनाचा अत्यंत प्रतिष्ठेचा पाच लाख रूपयांचा श्री.पु.भागवत प्रकाशन पुरस्कार निर्मल
प्रकाशनाला प्राप्त झाल्याबद्दल नांदेडचे पालकमंत्री ना.अतुल सावे यांनी प्रकाशनाच्या कार्यालयात जाऊन प्रकाशक निर्मलकुमार सूर्यवंशी यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.निर्मल प्रकाशनाने अत्यंत दर्जेदार पुस्तके प्रकाशित करून आपला नावलौकिक वाढविला असून नामवंत लेखकांसोबतच नवोदित लेखकांना लिहिते केले,ही
मोठी कौतुकाची बाब आहे,असे गौरवोद्गार पालकमंत्र्यांनी यावेळी काढले.निर्मलकुमार सूर्यवंशी यांनी शासनाने प्रकाशन व्यवसायासाठी असलेला सर्वोच्च पुरस्कार देऊन सन्मानित केल्यामुळे आपली जबाबदारी वाढली आहे असे सांगितले.ज्येष्ठ साहित्यिक डॉ जगदीश कदम यांनी निर्मल प्रकाशनाच्या वाटचालीचा आढावा घेतला.याप्रसंगी जिल्हाधिकारी राहूल
कर्डिले, जिल्हा पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार, महानगरपालिका आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे, निवासी उपजिल्हाधिकारी किरण कुरूंदकर,डॉ.जगदीश कदम, दिगंबर क्षीरसागर, सतीश कुलकर्णी,पंडित पाटील,आनंद कल्याणकर,प्र.श्री.जाधव, डॉ.भगवान अंजनीकर, व्यंकटेश चौधरी,सरदार राजकमल सिंग गाडीवाले, दत्तोपंत पाटील आदी उपस्थित होते #atulsawe #rahulkardile #abinashkumar #maheshdoifode
- Post by Nandkumar Motiram Totewad1
- Post by Shaikh irfan Shaikh isa1
- श्रीरामनवमी व हनुमान जन्मोत्सवाचा जल्लोष फटाक्यांची आतिषबाजी, रिद्धम लाईव्ह संगीताचा जल्लोष आणि युवकांचा उत्साह यामध्ये निघालेल्या भव्य शोभायात्रेने शहराचे लक्ष वेधले! गोमाता, श्रीराम व हनुमान यांच्या सुंदर झांक्यांनी भक्तिमय वातावरण निर्माण केले “जय श्रीराम”च्या घोषणांनी परिसर दुमदुमला लकडोबा चौकात हनुमान चालीसा पठणाने शोभायात्रेचा भक्तीमय समारोप झाला #जयश्रीराम #हनुमानजयंती #रामनवमी #शोभायात्रा #FestivalVibes Bhakti Nanded Maharashtra TrendingNow RhythmLive1
- Post by M B B1
- Post by माधव गायकवाड4
- नांदेड : कंधार तालुक्यातील मानार प्रकल्पाच्या कोठा–जगडा मार्गावर असलेल्या अरुंद पुलावरून एक कार खाली कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या अपघातात कारमधील पाच प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कार अरुंद पुलावरून जात असताना चालकाचा ताबा सुटल्याने वाहन थेट पुलाखाली कोसळले. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिक नागरिकांनी तत्काळ धाव घेत बचावकार्य सुरू केले. जखमींना तातडीने बाहेर काढून जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. वेळेवर मदत मिळाल्यामुळे मोठा अनर्थ टळल्याचे सांगितले जात आहे. या घटनेमुळे त्या मार्गावरील पुलाची सुरक्षितता पुन्हा एकदा प्रश्नचिन्हाखाली आली असून, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.1
- Skyline Builders & Developers “क्षितिज पुरम – जिथे तुमच्या स्वप्नांना मिळतो स्वतःचा पत्ता ” क्षितिज पुरम… जिथे आकाशातील स्वप्नं… जमिनीवर उतरतात!2
- ज्या ज्या गावला ब्रेकर आहे त्या त्या गावचे लोकांनी साथ द्यावा ही कळकळीची विनंती कारण की आपल्याला एवढे ब्रेकर मूळ आपले पेशंट नांदेड पर्यंत सुद्धा पोहोचत नाहीत याची काळजी घेणं फार गरजेचं आहे त्यासाठी हा टोल अधिकारी म्हणतोय ज्या गावचे ब्रेकर काढायचा आहे त्या गावचा ठराव मागते ग्रामपंचायतचा त्यासाठी ब्रेकर चा त्रास आहे त्यांनी सहकार्य करावं हे कळकळीची विनंती1