बिलवाडी गावाजवळील पुलासह चौक सुशोभीकरण मंजूर करणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील* गावाच्या एकजुटीचे कौतुक; विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन उत्साहात संपन्न बिलवाडी / जळगाव/पाळधी प्रतिनिधी दि. 3 एप्रिल – “बिलवाडी गावाने नेहमीच मला भरभरून प्रेम आणि सहकार्य दिले आहे. गावातील ग्रामस्थांची एकजूट ही खरोखरच कौतुकास्पद आहे. गावाजवळील नदीवर पुलाचे काम लवकरच मंजूर करणार असून गावातील चौकाचे सुशोभीकरणही करण्यात येईल. अशी ग्वाही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. ते बिलवाडी येथे विविध विकासकामांच्या लोकार्पण व भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी बोलत होते. या कामांचे झाले लोकार्पण व भूमिपूजन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ग्रामपंचायत कार्यालय संरक्षण भिंत, दलित वस्तीत सामाजिक सभागृह (बौद्ध विहार) व स्मशानभूमीला संरक्षण भिंतीचे लोकार्पण करण्यात आले. तसेच गावांतर्गत काँक्रिटीकरण कामाचे भूमिपूजनही करण्यात आले. कार्यक्रम जल्लोषपूर्ण वातावरणात आणि मोठ्या उत्साहात संपन्न झाला. पालकमंत्री यांचे ग्रामपंचायत व ग्रामस्थांतर्फे शाल श्रीफळ व बुके देऊन भव्य सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक श्री.साळुंखे सर यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख धोंडू जगताप यांनी मानले. यांची होती प्रमुख उपस्थिती सरपंच दिनोद पाटील, उपसरपंच कविता पाटील, जि. प. सदस्य पवन सोनवणे, माजी सभापती नंदू बाबा पाटील, उपजिल्हाप्रमुख रवी कापडणे, ग्रा. पं. सदस्य आबा मिस्तरी, अनिल पाटील, सुपडू गायकवाड, समाधान गुजर, लताबाई पाटील, डॉक्टर भरत पाटील, भगवान पाटील, योगराज गुजर, ह.भ.प. धनराज महाराज, सुधाकर सोनवणे, पोलीस पाटील सुवर्णाताई उमरे, साहेबराव वराडे, सचिन पाटील, बापू थोरात, समाधान बडगुजर, डॉ. सुधाकर पाटील, विजय आमले, राजू पाटील, महेंद्र राजपूत, गोरख पाटील, विश्वनाथ मंडपे, संदीप सुरळकर यांच्यासह परिसरातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शिवसेना व युवा सेनेचे पदाधिकारी तसेच बिलवाडी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बिलवाडी गावाजवळील पुलासह चौक सुशोभीकरण मंजूर करणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील* गावाच्या एकजुटीचे कौतुक; विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन उत्साहात संपन्न बिलवाडी / जळगाव/पाळधी प्रतिनिधी दि. 3 एप्रिल – “बिलवाडी गावाने नेहमीच मला भरभरून प्रेम आणि सहकार्य दिले आहे. गावातील ग्रामस्थांची एकजूट ही खरोखरच कौतुकास्पद आहे. गावाजवळील नदीवर पुलाचे काम लवकरच मंजूर करणार असून गावातील चौकाचे सुशोभीकरणही करण्यात येईल. अशी ग्वाही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. ते बिलवाडी येथे विविध विकासकामांच्या लोकार्पण व भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी बोलत होते. या कामांचे झाले लोकार्पण व भूमिपूजन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ग्रामपंचायत कार्यालय संरक्षण भिंत, दलित वस्तीत सामाजिक सभागृह (बौद्ध विहार) व स्मशानभूमीला संरक्षण भिंतीचे लोकार्पण करण्यात आले. तसेच गावांतर्गत काँक्रिटीकरण कामाचे भूमिपूजनही करण्यात आले. कार्यक्रम जल्लोषपूर्ण वातावरणात आणि मोठ्या उत्साहात संपन्न झाला. पालकमंत्री यांचे ग्रामपंचायत
व ग्रामस्थांतर्फे शाल श्रीफळ व बुके देऊन भव्य सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक श्री.साळुंखे सर यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख धोंडू जगताप यांनी मानले. यांची होती प्रमुख उपस्थिती सरपंच दिनोद पाटील, उपसरपंच कविता पाटील, जि. प. सदस्य पवन सोनवणे, माजी सभापती नंदू बाबा पाटील, उपजिल्हाप्रमुख रवी कापडणे, ग्रा. पं. सदस्य आबा मिस्तरी, अनिल पाटील, सुपडू गायकवाड, समाधान गुजर, लताबाई पाटील, डॉक्टर भरत पाटील, भगवान पाटील, योगराज गुजर, ह.भ.प. धनराज महाराज, सुधाकर सोनवणे, पोलीस पाटील सुवर्णाताई उमरे, साहेबराव वराडे, सचिन पाटील, बापू थोरात, समाधान बडगुजर, डॉ. सुधाकर पाटील, विजय आमले, राजू पाटील, महेंद्र राजपूत, गोरख पाटील, विश्वनाथ मंडपे, संदीप सुरळकर यांच्यासह परिसरातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शिवसेना व युवा सेनेचे पदाधिकारी तसेच बिलवाडी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- धुळे जिल्ह्यात पाकिस्तान निर्मित सौंदर्यप्रसाधनांची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या दोन व्यापाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत एकूण 61 हजार 474 रुपयांचा प्रतिबंधित मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.1
- दिंडोरीत भीषण अपघात: उघड्या विहिरीत कार कोसळून ९ जणांचा मृत्यू; प्रशासनावर गंभीर प्रश्नचिन्ह 🗞️ सविस्तर बातमी: नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुका येथे शिवाजीनगर (इंदोरे भाग) परिसरात शुक्रवारी रात्री (३ एप्रिल २०२६) सुमारे १० वाजण्याच्या सुमारास अत्यंत भीषण आणि हृदयद्रावक अपघात घडला. सुनील दरगोडे यांच्या कुटुंबातील एकूण ९ जण कारने (MH15 JS 1053) स्नेहसंमेलन आटोपून घरी परतत असताना रस्त्यालगत असलेल्या उघड्या विहिरीत कार कोसळली. रात्रीचा अंधार आणि विहिरीभोवती कोणतीही सुरक्षितता व्यवस्था नसल्याने चालकाला विहीर दिसली नाही आणि हा भीषण अपघात घडला. या दुर्घटनेत ६ लहान शालेय मुले, २ महिला आणि १ चालक अशा सर्व ९ जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. विहीर पाण्याने पूर्ण भरलेली असल्यामुळे बचावकार्य अत्यंत कठीण झाले. स्थानिक नागरिक आणि बचाव पथकांनी रात्री उशिरापर्यंत रेस्क्यू ऑपरेशन राबवले. घटनेची माहिती मिळताच राज्याचे मंत्री गिरीश महाजन घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी या अपघाताला “अधिकाऱ्यांची मोठी चूक” ठरवत संताप व्यक्त केला. “रस्त्याच्या मध्यभागी विहीर कशी असू शकते?” असा सवाल उपस्थित करत त्यांनी सखोल चौकशीचे आदेश दिले. तसेच मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनीही या घटनेची गंभीर दखल घेतली. त्यांनी अपघाताला “अत्यंत दुर्दैवी” संबोधत मृतांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत जाहीर केली आणि रस्ता सुरक्षा ऑडिट करण्याचे निर्देश दिले. या प्रकरणी विहिरीचे मालक राजेंद्र राजे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातानंतर प्रशासनाने विहिरीभोवती तातडीने बॅरिकेडिंग केले आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून, स्थानिक नागरिकांनी प्रशासनाच्या निष्काळजीपणावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. रस्ता सुरक्षेबाबत आणि उघड्या विहिरींसारख्या धोकादायक ठिकाणांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे.1
- Post by अब तक न्यूज महाराष्ट्र1
- Post by Shaha News Marathi1
- Post by Santosh Bahekar PRESS1
- अशोक खरातांना वाचवणारे सत्तेत बसलेत, हर्षवर्धन सपकाळांचा सत्ताधाऱ्यांवर थेट निशाणा1
- Post by AKBAR SHAHA REPORTER1
- साक्री तालुक्यातील तामसवाडी परिसरात वऱ्हाडींना घेऊन जाणाऱ्या क्रुझर वाहनाचा भीषण अपघात झाला असून या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला तर 12 हून अधिक जण जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.1