logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

आज १ ऑगस्ट या निमित्ताने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती विशेष लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती विशेष डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा वारसा जपणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे १ ऑगस्ट हा दिवस महाराष्ट्रासाठी अभिमानाचा दिवस आहे. आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आहे. आपल्या लेखणीने, शाहिरीने आणि साहित्याने समाजातील वंचित, शोषित आणि कष्टकरी जनतेचा आवाज बुलंद करणाऱ्या या महान साहित्यिकाला आज संपूर्ण महाराष्ट्र अभिवादन करत आहे. अण्णाभाऊ साठे यांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी वैचारिक नाते अतिशय दृढ होते. सामाजिक समता, बंधुता आणि अन्यायमुक्त समाजरचनेचे बाबासाहेबांचे विचार त्यांनी आपल्या साहित्य आणि शाहिरीतून जनसामान्यांपर्यंत पोहोचवले. त्यांच्या सुप्रसिद्ध 'फकिरा' या कादंबरीचे समर्पण त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना केले, ही बाब त्यांच्या मनातील आदर आणि वैचारिक बांधिलकी दर्शवते. अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या कथा, कादंबऱ्या, पोवाडे आणि लोकनाट्यांमधून दलित, कामगार, शेतमजूर आणि वंचित समाजाचे वास्तव प्रभावीपणे मांडले. त्यांनी साहित्याला सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी शस्त्र बनवले. आजच्या जयंतीनिमित्त त्यांचे कार्य आणि विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला "शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा" हा संदेश आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी दिलेला स्वाभिमानाचा विचार आजही समाजाला दिशा देणारा आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

1 hr ago
user_अनिल  सुखदेवे
अनिल सुखदेवे
पाऊनी, भंडारा, महाराष्ट्र•
1 hr ago
128e8376-1c7f-4e1e-86c1-98e040e4f9c8

आज १ ऑगस्ट या निमित्ताने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती विशेष लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती विशेष डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा वारसा जपणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे १ ऑगस्ट हा दिवस महाराष्ट्रासाठी अभिमानाचा दिवस आहे. आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आहे. आपल्या लेखणीने, शाहिरीने आणि साहित्याने समाजातील वंचित, शोषित आणि कष्टकरी जनतेचा आवाज बुलंद करणाऱ्या या महान साहित्यिकाला आज संपूर्ण महाराष्ट्र अभिवादन करत आहे. अण्णाभाऊ साठे यांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी वैचारिक नाते अतिशय दृढ होते. सामाजिक समता, बंधुता आणि अन्यायमुक्त समाजरचनेचे बाबासाहेबांचे विचार त्यांनी आपल्या साहित्य आणि शाहिरीतून जनसामान्यांपर्यंत पोहोचवले. त्यांच्या सुप्रसिद्ध 'फकिरा' या कादंबरीचे समर्पण त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना केले, ही बाब त्यांच्या मनातील आदर आणि वैचारिक बांधिलकी दर्शवते. अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या कथा, कादंबऱ्या, पोवाडे आणि लोकनाट्यांमधून दलित, कामगार, शेतमजूर आणि वंचित समाजाचे वास्तव प्रभावीपणे मांडले. त्यांनी साहित्याला सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी शस्त्र बनवले. आजच्या जयंतीनिमित्त त्यांचे कार्य आणि विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला "शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा" हा संदेश आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी दिलेला स्वाभिमानाचा विचार आजही समाजाला दिशा देणारा आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • किन्नर समाज के साथ भारत सरकार कर रही अन्याय,सरकारियों सुविधाओं से वंचित
    1
    किन्नर समाज के साथ भारत सरकार कर रही अन्याय,सरकारियों सुविधाओं से वंचित
    user_Nitesh Babu Agase
    Nitesh Babu Agase
    Local News Reporter तिरोडा, गोंदिया, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • एस टी महामंडळाचा लपंडाव सुरू विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात..... तालुका प्रतिनिधी हिंगणा हिंगणा मार्ग वाघ उमरी ही बस शाळेच्या विद्यार्थ्यांकरिता नेहमी सुरू असते. परंतू शाळेच्या विद्यार्थ्यांसोबत नेहमी लपंडाव खेळत आहे दोन दोन विषयांचे तास निघून जातात परंतु एस टी महामंडळाचा लपंडाव मात्र सुरू उमरी वाघ येथील पालकांनी निवेदन देऊन सुद्धा प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचे आरोप गावकरी आणि विद्यार्थी करीत आहे.
    1
    एस टी महामंडळाचा लपंडाव सुरू विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात.....
तालुका प्रतिनिधी हिंगणा 
हिंगणा मार्ग वाघ उमरी ही बस शाळेच्या विद्यार्थ्यांकरिता नेहमी सुरू असते. परंतू शाळेच्या विद्यार्थ्यांसोबत नेहमी लपंडाव खेळत आहे दोन दोन विषयांचे तास निघून जातात परंतु एस टी महामंडळाचा लपंडाव मात्र सुरू 
उमरी वाघ येथील पालकांनी निवेदन देऊन सुद्धा प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचे आरोप गावकरी आणि विद्यार्थी करीत आहे.
    user_Ramrao Gaurkhede
    Ramrao Gaurkhede
    Grocery delivery service हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • वर्ध्याच्या भुगाव येथील कंपनीतून लोखंड चोरी; सावंगी पोलिसांनी अवघ्या दोन तासांत उलगडला गुन्हा वर्धा : भुगाव येथील पर्ल इंजिनिअरिंग कंपनीतून कच्चे लोखंड व सळईचे तुकडे चोरी करणाऱ्या चौघांना सावंगी पोलिसांनी अवघ्या दोन तासांत जेरबंद करत गुन्ह्याचा पर्दाफाश केला. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित ऑटोची तपासणी केली असता चोरीचा माल आढळून आला. चौकशीत तीन महिलांसह ऑटोचालकाने चोरीची कबुली दिली. आरोपींकडून चोरीस गेलेले लोखंड, सळईचे तुकडे आणि गुन्ह्यात वापरलेला ऑटो असा एकूण १.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
    1
    वर्ध्याच्या भुगाव येथील कंपनीतून लोखंड चोरी; सावंगी पोलिसांनी अवघ्या दोन तासांत उलगडला गुन्हा
वर्धा
: भुगाव येथील पर्ल इंजिनिअरिंग कंपनीतून कच्चे लोखंड व सळईचे तुकडे चोरी करणाऱ्या चौघांना सावंगी पोलिसांनी अवघ्या दोन तासांत जेरबंद करत गुन्ह्याचा पर्दाफाश केला. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित ऑटोची तपासणी केली असता चोरीचा माल आढळून आला. चौकशीत तीन महिलांसह ऑटोचालकाने चोरीची कबुली दिली. आरोपींकडून चोरीस गेलेले लोखंड, सळईचे तुकडे आणि गुन्ह्यात वापरलेला ऑटो असा एकूण १.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
    user_Ravi yenorkar PRESS -IN BCN NEWS
    Ravi yenorkar PRESS -IN BCN NEWS
    हिंगणघाट, वर्धा, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • *भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी युवा पिढी विद्यार्थी ना नवीन मार्गदर्शन केले..*मला तर शिव्या दिल्या पण माझ्या आई ला सुद्धा हिच आपली संस्कृती,संस्कार आहे का? मूल मुलींनो..? असे ते म्हणाले...* शिवीगाळीने कधीच काहीही साध्य होत नाही. चला, भरकटलेल्यांना मार्गदर्शन करूया. चला, एकत्र काम करूया. चला, भारतासाठी काम करूया
    1
    *भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी युवा पिढी विद्यार्थी ना नवीन मार्गदर्शन केले..*मला तर शिव्या दिल्या पण माझ्या आई ला सुद्धा हिच आपली संस्कृती,संस्कार आहे का? मूल मुलींनो..? असे ते म्हणाले...*
शिवीगाळीने कधीच काहीही साध्य होत नाही.
चला, भरकटलेल्यांना मार्गदर्शन करूया.
चला, एकत्र काम करूया.
चला, भारतासाठी काम करूया
    user_Harshal kukadkar
    Harshal kukadkar
    Security Guard सावनेर, नागपूर, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • वर्धा जिल्हा पोलीस दलात वाहन हस्तांतरण सोहळा वृक्षारोपण सोहळा कार्यक्रमाचे आयोजन वर्धा जिल्हा पोलीस दलात वाहन हस्तांतरण सोहळा वृक्षारोपण सोहळा कार्यक्रम माननीय पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांच्या हस्ते वर्धा जिल्हा पोलीस अधीक्षक येथे नाही म्हणता बारा तेरा महिंद्रा स्कार्पियो एन हाय स्पीड गाड्या चे उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री व गृहराज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांच्या हस्ते करण्यात आले तसेच वृक्षारोपण करण्यात आले या कार्यक्रमाला सुधीर पांगुळ नगराध्यक्ष वर्धा जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे व अन्य मान्यवर मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित होते डॉक्टर पंकज भाऊ यांनी म्हटले की जलद गतीने तपास व्हावा म्हणून या गाड्या पोलीस दलात देण्यात आलेले आहे वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे मध्ये विविध प्रकारचे गुन्हेगारी वाढत असल्याकारणाने त्या तपासासाठी जलद गतीने तपास व्हावा यासाठी या गाड्या वर्धा येथे पोलीस दलात देण्यात आल्या डॉक्टर पंकज भोयर बोलताना हे पण सुखदा सांगितले की रस्त्यावरील गुरढोरांचे खूप प्रकार वाढलेला आहे याच्या मध्ये स्थानिक स्वराज्य आणि वाहतूक शाखेने लक्ष घालून लवकरात लवकर याच्यावर लक्ष द्यावे हे जिल्ह्याच पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी सांगितले
    1
    वर्धा जिल्हा पोलीस दलात वाहन हस्तांतरण सोहळा वृक्षारोपण सोहळा कार्यक्रमाचे आयोजन
वर्धा जिल्हा पोलीस दलात वाहन हस्तांतरण सोहळा
वृक्षारोपण सोहळा कार्यक्रम
माननीय पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांच्या हस्ते 
वर्धा जिल्हा पोलीस अधीक्षक येथे नाही म्हणता बारा तेरा महिंद्रा स्कार्पियो एन हाय स्पीड गाड्या चे उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री व गृहराज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांच्या हस्ते करण्यात आले तसेच वृक्षारोपण करण्यात आले या कार्यक्रमाला सुधीर पांगुळ नगराध्यक्ष वर्धा जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे व अन्य मान्यवर मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित होते डॉक्टर पंकज भाऊ यांनी म्हटले की जलद गतीने तपास व्हावा म्हणून या गाड्या पोलीस दलात देण्यात आलेले आहे वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे मध्ये विविध प्रकारचे गुन्हेगारी वाढत असल्याकारणाने त्या तपासासाठी जलद गतीने तपास व्हावा यासाठी या गाड्या वर्धा येथे पोलीस दलात देण्यात आल्या डॉक्टर पंकज भोयर बोलताना हे पण सुखदा सांगितले की रस्त्यावरील गुरढोरांचे खूप प्रकार वाढलेला आहे याच्या मध्ये स्थानिक स्वराज्य आणि वाहतूक शाखेने लक्ष घालून लवकरात लवकर याच्यावर लक्ष द्यावे हे जिल्ह्याच पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी सांगितले
    user_Satish Kale
    Satish Kale
    वर्धा, वर्धा, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • एशियाटिक बिग कॅट सोसायटीच्या वतीने व्याघ्र संवर्धनासह इतर प्रजातींचे संरक्षण, बचाव व जागृतीसाठी एशियाटिक बिग कॅट सोसायटीच्या वतीने व्याघ्र संवर्धनासह इतर प्रजातींचे संरक्षण, बचाव व जागृतीसाठी
    1
    एशियाटिक बिग कॅट सोसायटीच्या वतीने व्याघ्र संवर्धनासह इतर प्रजातींचे संरक्षण, बचाव व जागृतीसाठी 
एशियाटिक बिग कॅट सोसायटीच्या वतीने व्याघ्र संवर्धनासह इतर प्रजातींचे संरक्षण, बचाव व जागृतीसाठी
    user_SATISH BHALERAO
    SATISH BHALERAO
    नागपूर (ग्रामीण), नागपूर, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • डिसेंबर 2027 पूर्वी स्वतंत्र विदर्भ राज्य मिळवणार; विदर्भ राज्य आंदोलन समितीची मिशन 2027 घोषणा वर्धा स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीला पुन्हा वेग देत विदर्भ राज्य आंदोलन समितीने 'मिशन 2027'ची घोषणा केली आहे. डिसेंबर 2027 पूर्वी स्वतंत्र विदर्भ राज्य मिळवण्याचा निर्धार समितीने वर्ध्यात पत्रकार परिषदेत व्यक्त केला आहे. या अभियानांतर्गत विदर्भातील 11 जिल्हे आणि 120 तालुक्यांमध्ये जनजागृती मेळावे आयोजित करण्यात येणार आहेत. तसेच 9 ऑगस्ट 2026 रोजी नागपुरातील दीक्षाभूमी ते संविधान चौक असा भव्य लॉंगमार्च काढण्यात येणार असून त्यानंतर जनसंकल्प जाहीरसभा होणार आहे. समितीच्या मते, विदर्भाच्या विकासासाठी स्वतंत्र राज्य आवश्यक असून सिंचन, रोजगार, उद्योग, आरोग्य आणि पायाभूत सुविधांतील अनुशेष दूर करण्यासाठी केंद्र सरकारने विदर्भ राज्य निर्मितीची प्रक्रिया तातडीने सुरू करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
    1
    डिसेंबर 2027 पूर्वी स्वतंत्र विदर्भ राज्य मिळवणार; विदर्भ राज्य आंदोलन समितीची मिशन 2027 घोषणा
वर्धा
स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीला पुन्हा वेग देत विदर्भ राज्य आंदोलन समितीने 'मिशन 2027'ची घोषणा केली आहे. डिसेंबर 2027 पूर्वी स्वतंत्र विदर्भ राज्य मिळवण्याचा निर्धार समितीने वर्ध्यात पत्रकार परिषदेत व्यक्त केला आहे. या अभियानांतर्गत विदर्भातील 11 जिल्हे आणि 120 तालुक्यांमध्ये जनजागृती मेळावे आयोजित करण्यात येणार आहेत. तसेच 9 ऑगस्ट 2026 रोजी नागपुरातील दीक्षाभूमी ते संविधान चौक असा भव्य लॉंगमार्च काढण्यात येणार असून त्यानंतर जनसंकल्प जाहीरसभा होणार आहे. समितीच्या मते, विदर्भाच्या विकासासाठी स्वतंत्र राज्य आवश्यक असून सिंचन, रोजगार, उद्योग, आरोग्य आणि पायाभूत सुविधांतील अनुशेष दूर करण्यासाठी केंद्र सरकारने विदर्भ राज्य निर्मितीची प्रक्रिया तातडीने सुरू करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
    user_Ravi yenorkar PRESS -IN BCN NEWS
    Ravi yenorkar PRESS -IN BCN NEWS
    हिंगणघाट, वर्धा, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • *रस्त्यावर मोकाट गायी मुळे अपघाताचा धोका...* *सावनेर पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक ऋतुजा जाधव रस्त्यावर उतरून स्वतः पुढाकार घेत नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तत्पर* सावनेर:-वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या मोकाट गायींमुळे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली होती. याची गंभीर दखल घेत पोलीस निरीक्षक ऋतुजा जाधव यांनी नगरपरिषद सावनेरच्या संबंधित पथकाला तात्काळ पाचारण केले. नगरपरिषद सावनेरच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून मोकाट गायी पकडून त्यांचा ताबा घेतला. त्यामुळे रस्त्यावरील वाहतूक सुरळीत झाली आणि संभाव्य अपघाताचा धोका टळला. यानंतर पोलीस निरीक्षक ऋतुजा जाधव यांनी नगरपरिषद सावनेर येथे जाऊन मुख्याधिकारी तसेच नगराध्यक्ष यांची भेट घेतली. शहरातील मोकाट जनावरांची समस्या, त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना, शहरातील पार्किंग व्यवस्था आणि वाढते अतिक्रमण याबाबत सविस्तर चर्चा केली. नागरिकांची सुरक्षितता, वाहतुकीची शिस्त आणि शहर सुस्थितीत राहण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली. रस्त्यावर मोकाट जनावरे ही केवळ वाहतुकीची समस्या नसून अनेक गंभीर अपघातांचे कारण ठरू शकतात. त्यामुळे अशा समस्यांवर तातडीने आणि कायमस्वरूपी उपाययोजना होणे ही काळाची गरज आहे.नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तत्परतेने कार्य करणाऱ्या पोलीस निरीक्षक ऋतुजा जाधव, सावनेर पोलीस स्टेशनचे अधिकारी-कर्मचारी तसेच नगरपरिषद सावनेरच्या पथकाचे मनःपूर्वक अभिनंदन व हार्दिक कौतुक.पोलीस प्रशासनाकडून सातत्याने पुढाकार घेतला जात असला, तरी नगरपरिषदेकडून अपेक्षित प्रमाणात आणि सातत्यपूर्ण कार्यवाही होताना दिसत नाही. मोकाट जनावरे, अतिक्रमण आणि पार्किंगसारख्या समस्यांवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी नगरपरिषद प्रशासनाने अधिक प्रभावी आणि नियमित कारवाई करणे आवश्यक आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. :हितेश बनसोड सामाजिक कार्यकर्ते सावनेर
    1
    *रस्त्यावर मोकाट गायी मुळे अपघाताचा धोका...*  *सावनेर पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक ऋतुजा जाधव रस्त्यावर उतरून स्वतः पुढाकार घेत नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तत्पर*
सावनेर:-वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या मोकाट गायींमुळे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली होती. याची गंभीर दखल घेत पोलीस निरीक्षक ऋतुजा जाधव यांनी नगरपरिषद सावनेरच्या संबंधित पथकाला तात्काळ पाचारण केले.
नगरपरिषद सावनेरच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून मोकाट गायी पकडून त्यांचा ताबा घेतला. त्यामुळे रस्त्यावरील वाहतूक सुरळीत झाली आणि संभाव्य अपघाताचा धोका टळला.
यानंतर पोलीस निरीक्षक ऋतुजा जाधव यांनी नगरपरिषद सावनेर येथे जाऊन मुख्याधिकारी तसेच नगराध्यक्ष यांची भेट घेतली. शहरातील मोकाट जनावरांची समस्या, त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना, शहरातील पार्किंग व्यवस्था आणि वाढते अतिक्रमण याबाबत सविस्तर चर्चा केली. नागरिकांची सुरक्षितता, वाहतुकीची शिस्त आणि शहर सुस्थितीत राहण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली.
रस्त्यावर मोकाट जनावरे ही केवळ वाहतुकीची समस्या नसून अनेक गंभीर अपघातांचे कारण ठरू शकतात. त्यामुळे अशा समस्यांवर तातडीने आणि कायमस्वरूपी उपाययोजना होणे ही काळाची गरज आहे.नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तत्परतेने कार्य करणाऱ्या पोलीस निरीक्षक ऋतुजा जाधव, सावनेर पोलीस स्टेशनचे अधिकारी-कर्मचारी तसेच नगरपरिषद सावनेरच्या पथकाचे मनःपूर्वक अभिनंदन व हार्दिक कौतुक.पोलीस प्रशासनाकडून सातत्याने पुढाकार घेतला जात असला, तरी नगरपरिषदेकडून अपेक्षित प्रमाणात आणि सातत्यपूर्ण कार्यवाही होताना दिसत नाही. मोकाट जनावरे, अतिक्रमण आणि पार्किंगसारख्या समस्यांवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी नगरपरिषद प्रशासनाने अधिक प्रभावी आणि नियमित कारवाई करणे आवश्यक आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.
:हितेश बनसोड सामाजिक कार्यकर्ते सावनेर
    user_Harshal kukadkar
    Harshal kukadkar
    Security Guard सावनेर, नागपूर, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • पिपरी (देशमुख) परिसरात पाणीच पाण,कोच्ची–मुरसा मार्ग पुरामुळे बंद चंद्रपूर : वर्धा नदीला ३१ जुलै रोजी आलेल्या पुरामुळे भद्रावती तालुक्यातील पिपरी (देशमुख) परिसर जलमय झाला असून पिपरी–कोच्ची–मुरसा मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. पिपरी (देशमुख) गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पुराचे पाणी आल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पिपरी येथून कोच्ची–मुरसा मार्गावर दोन्ही नाल्यांना आलेल्या पूरामुळे पुलावर सुमारे पाच फूट पाणी आल्याने हा मार्ग शुक्रवारी सायंकाळी सुमारे ७ वाजल्यापासून बंद करण्यात आला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. पूराच्या पाण्यामुळे नाल्यालगतच्या शेतांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचले असून सोयाबीन व कापूस पिके पूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत. तसेच कोच्ची–घोनाड परिसरातील नाल्यालाही पूर आल्याने त्या भागातील शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून त्यांच्या हंगामी पिकांवर पाणी फिरल्याने मोठी चिंता व्यक्त केली जात आहे.
    1
    पिपरी (देशमुख) परिसरात पाणीच पाण,कोच्ची–मुरसा मार्ग पुरामुळे बंद
चंद्रपूर : वर्धा नदीला ३१ जुलै रोजी आलेल्या पुरामुळे भद्रावती तालुक्यातील पिपरी (देशमुख) परिसर जलमय झाला असून पिपरी–कोच्ची–मुरसा मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. पिपरी (देशमुख) गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पुराचे पाणी आल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
पिपरी येथून कोच्ची–मुरसा मार्गावर दोन्ही नाल्यांना आलेल्या पूरामुळे पुलावर सुमारे पाच फूट पाणी आल्याने हा मार्ग शुक्रवारी सायंकाळी सुमारे ७ वाजल्यापासून बंद करण्यात आला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.
पूराच्या पाण्यामुळे नाल्यालगतच्या शेतांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचले असून सोयाबीन व कापूस पिके पूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत. तसेच कोच्ची–घोनाड परिसरातील नाल्यालाही पूर आल्याने त्या भागातील शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून त्यांच्या हंगामी पिकांवर पाणी फिरल्याने मोठी चिंता व्यक्त केली जात आहे.
    user_Disha News
    Disha News
    Media house चंद्रपूर, चंद्रपूर, महाराष्ट्र•
    6 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.