पाचोरा तालुका पत्रकार बांधवांची बहुउद्देशीय सहकारी संस्था . किंवा औद्योगिक कंपनी स्थापन करण्याचा ऐतिहासिक निर्णय एकमताने मंजूर पत्रकारांच्या हितासाठी ऐतिहासिक निर्णयाला एकमताने मंजुरी पाचोरा तालुका पत्रकार बांधवांची बहुउद्देशीय सहकारी संस्था . किंवा औद्योगिक कंपनी स्थापन करण्याचा ऐतिहासिक निर्णय एकमताने मंजूर पत्रकारांच्या हितासाठी ऐतिहासिक निर्णयाला एकमताने मंजुरी पाचोरा : शहर व तालुक्यातील पत्रकारांच्या सर्वांगीण विकासासाठी पाचोरा येथे झालेल्या बैठकीत औद्योगिक कंपनी स्थापन करण्याचा ऐतिहासिक व दूरदृष्टीपूर्ण निर्णय घेण्यात आला. व्यापारी भवन येथे पार पडलेल्या या बैठकीस सुमारे ३० ते ३५ पत्रकार उपस्थित होते. बैठकीच्या प्रारंभी पत्रकारांच्या दैनंदिन समस्या, आर्थिक अस्थैर्य, तसेच उद्योग-व्यवसायाच्या संधी यावर सखोल चर्चा करण्यात आली. यावेळी तालुका माझा न्यूजचे संपादक तथा जनसेवक बंडूभाऊ केशव सोनार यांनी बैठकीचे उद्दिष्ट स्पष्ट करताना पत्रकारांनी केवळ बातम्यांपुरते मर्यादित न राहता आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज अधोरेखित केली. याच अनुषंगाने पाचोरा शहर व तालुक्यातील पत्रकारांसाठी बहुउद्देशीय संस्था स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण प्रस्ताव मांडण्यात आला. या प्रस्तावाला उपस्थित सर्व पत्रकारांनी एकमताने मंजुरी देत सकारात्मक प्रतिसाद दिला. या निर्णयामुळे पत्रकारांसाठी रोजगारनिर्मिती व आर्थिक स्वावलंबनाचा नवा मार्ग खुला होणार असल्याची भावना व्यक्त करण्यात आली. तसेच, जळगाव जिल्ह्यातील पत्रकारांसाठी लवकरच एक विशेष उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. बैठकीत सुनील भाऊ पाटील ज्येष्ठ पत्रकार सी.एन. दादा चौधरी, सचिन दादा सोमवंशी, डॉ. योगेश पाटील, यांनी मार्गदर्शन करताना पत्रकारांनी संघटित होऊन आपल्या हक्कांसाठी लढा देण्याची गरज व्यक्त केली. “एकजुटीनेच पत्रकारांच्या समस्या सोडविता येतील,” असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. या बैठकीस सी.एन. दादा चौधरी, सचिन दादा सूर्यवंशी,सुनील भाऊ पाटील दिलीप दादा जैन, डॉ. योगेश दादा पाटील, अनिल आबा येवले, राजू दादा धनराळे, किशोर दादा रायसागडा, नरसिंग दादा भुरे, बंडूभाऊ सोनार, संदीप भाऊ परदेशी, दिलीप भाऊ पाटील, प्रवीण भाऊ मिस्तरी, ईसा मुसा तडवी, कुंदन भाऊ बेलदार, गौतम भाऊ सोनवणे, राजेंद्र भाऊ खैरनार, सुनील भाऊ कोळी, प्रवीण भाऊ बोरसे, गजानन भाऊ गिरी, राकेश दादा सुतार, मनोहर भाऊ पाटील, राहुल भाऊ महाजन, भालचंद्र भाऊ राजपूत, चिंतामण आबा पाटील, भिकन भाऊ पाटील, नंदकुमार दादा शेलगर, गजानन भाऊ लोंढे, फकीरचंद दादा पाटील, भुनेश भाऊ दुसाने स्वप्निल दादा कुमावत आदी पत्रकार उपस्थित होते. बैठकीतून पत्रकारांच्या एकजुटीचा ठोस संदेश देत भविष्यातील वाटचालीसाठी दिशा निश्चित करण्यात आल्याचे समाधान व्यक्त करण्यात आले.

- दिंडोरीत भीषण अपघात: उघड्या विहिरीत कार कोसळून ९ जणांचा मृत्यू; प्रशासनावर गंभीर प्रश्नचिन्ह 🗞️ सविस्तर बातमी: नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुका येथे शिवाजीनगर (इंदोरे भाग) परिसरात शुक्रवारी रात्री (३ एप्रिल २०२६) सुमारे १० वाजण्याच्या सुमारास अत्यंत भीषण आणि हृदयद्रावक अपघात घडला. सुनील दरगोडे यांच्या कुटुंबातील एकूण ९ जण कारने (MH15 JS 1053) स्नेहसंमेलन आटोपून घरी परतत असताना रस्त्यालगत असलेल्या उघड्या विहिरीत कार कोसळली. रात्रीचा अंधार आणि विहिरीभोवती कोणतीही सुरक्षितता व्यवस्था नसल्याने चालकाला विहीर दिसली नाही आणि हा भीषण अपघात घडला. या दुर्घटनेत ६ लहान शालेय मुले, २ महिला आणि १ चालक अशा सर्व ९ जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. विहीर पाण्याने पूर्ण भरलेली असल्यामुळे बचावकार्य अत्यंत कठीण झाले. स्थानिक नागरिक आणि बचाव पथकांनी रात्री उशिरापर्यंत रेस्क्यू ऑपरेशन राबवले. घटनेची माहिती मिळताच राज्याचे मंत्री गिरीश महाजन घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी या अपघाताला “अधिकाऱ्यांची मोठी चूक” ठरवत संताप व्यक्त केला. “रस्त्याच्या मध्यभागी विहीर कशी असू शकते?” असा सवाल उपस्थित करत त्यांनी सखोल चौकशीचे आदेश दिले. तसेच मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनीही या घटनेची गंभीर दखल घेतली. त्यांनी अपघाताला “अत्यंत दुर्दैवी” संबोधत मृतांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत जाहीर केली आणि रस्ता सुरक्षा ऑडिट करण्याचे निर्देश दिले. या प्रकरणी विहिरीचे मालक राजेंद्र राजे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातानंतर प्रशासनाने विहिरीभोवती तातडीने बॅरिकेडिंग केले आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून, स्थानिक नागरिकांनी प्रशासनाच्या निष्काळजीपणावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. रस्ता सुरक्षेबाबत आणि उघड्या विहिरींसारख्या धोकादायक ठिकाणांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे.1
- Post by अब तक न्यूज महाराष्ट्र1
- धुळे जिल्ह्यात पाकिस्तान निर्मित सौंदर्यप्रसाधनांची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या दोन व्यापाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत एकूण 61 हजार 474 रुपयांचा प्रतिबंधित मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.1
- Post by Shaha News Marathi1
- Post by AKBAR SHAHA REPORTER1
- अल्पवयीन मुलीला बलात्कार करून गरोदर करणाऱ्या आरोपीला अजिंठा पोलीस यांनी अटक केल्याची माहिती आज रोजी माध्यमांना देण्यात आली असून मोहोळ येथील एका तरुणीला आरोपीने बळजबरीने बलात्कार करून तिला गरोदर करून पाहून गेला होता सदरील आरोपीला आज रोजी अजिंठा पोलिसांनी अटक केली आहे अशी माहिती आज रोजी माध्यमांना देण्यात आली आहे.1
- Post by Santosh Bahekar PRESS1
- साक्री तालुक्यातील तामसवाडी परिसरात वऱ्हाडींना घेऊन जाणाऱ्या क्रुझर वाहनाचा भीषण अपघात झाला असून या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला तर 12 हून अधिक जण जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.1