मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण मराठवाड्यात 'देवेंद्र जन्मोत्सव हरित महोत्सव' अंतर्गत हरित सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेचा अधिकृत शुभारंभ छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते करण्यात आला. आषाढी एकादशीच्या पावन मुहूर्तावर विठ्ठल-रुक्मिणीच्या प्रतिमेचे पूजन करून वृक्षारोपणाला सुरुवात करण्यात आली आहे. या उपक्रमांतर्गत संपूर्ण मराठवाड्यात तब्बल ५ लाख वृक्षांची लागवड केली जाणार आहे. यामध्ये विशेष बाब म्हणजे यातील १ लाख वृक्षांची लागवड ही एकट्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात होणार आहे. हा हरित सप्ताह संजय केणेकर यांच्या संकल्पनेतून राबविला जात आहे. गुरुपौर्णिमेपर्यंत चालणारा हा उपक्रम म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाची हरित भेट असेल, अशी माहिती संजय केणेकर यांनी दिली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण मराठवाड्यात 'देवेंद्र जन्मोत्सव हरित महोत्सव' अंतर्गत हरित सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेचा अधिकृत शुभारंभ छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते करण्यात आला. आषाढी एकादशीच्या पावन मुहूर्तावर विठ्ठल-रुक्मिणीच्या प्रतिमेचे पूजन करून वृक्षारोपणाला सुरुवात करण्यात आली आहे. या उपक्रमांतर्गत संपूर्ण मराठवाड्यात तब्बल ५ लाख वृक्षांची लागवड केली जाणार आहे. यामध्ये विशेष बाब म्हणजे यातील १ लाख वृक्षांची लागवड ही एकट्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात होणार आहे. हा हरित सप्ताह संजय केणेकर यांच्या संकल्पनेतून राबविला जात आहे. गुरुपौर्णिमेपर्यंत चालणारा हा उपक्रम म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाची हरित भेट असेल, अशी माहिती संजय केणेकर यांनी दिली आहे.
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण मराठवाड्यात 'देवेंद्र जन्मोत्सव हरित महोत्सव' अंतर्गत हरित सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेचा अधिकृत शुभारंभ छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते करण्यात आला. आषाढी एकादशीच्या पावन मुहूर्तावर विठ्ठल-रुक्मिणीच्या प्रतिमेचे पूजन करून वृक्षारोपणाला सुरुवात करण्यात आली आहे. या उपक्रमांतर्गत संपूर्ण मराठवाड्यात तब्बल ५ लाख वृक्षांची लागवड केली जाणार आहे. यामध्ये विशेष बाब म्हणजे यातील १ लाख वृक्षांची लागवड ही एकट्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात होणार आहे. हा हरित सप्ताह संजय केणेकर यांच्या संकल्पनेतून राबविला जात आहे. गुरुपौर्णिमेपर्यंत चालणारा हा उपक्रम म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाची हरित भेट असेल, अशी माहिती संजय केणेकर यांनी दिली आहे.2
- मनोज जरांगे पाटील यांनी 'ज्यांनी निवडून दिले त्यांच्या पोरांना मारताय' असे म्हणत जोरदार निशाणा साधला आहे.1
- दिल्लीमध्ये सुरू असलेले आंदोलन म्हणजे विरोधकांचा बेनामी आंदोलन करण्याचा प्रयत्न असल्याचा थेट आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. दिल्लीतील या आंदोलनाच्या स्वरूपावर बोट ठेवत त्यांनी विरोधी पक्षांवर निशाणा साधला आहे.1
- दिल्लीतील जंतर-मंतर येथील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जालन्यात भाजप आणि काँग्रेसमधील राजकीय संघर्ष कमालीचा तीव्र झाला आहे. बुधवारी भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेस खासदार डॉ. कल्याण काळे यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर राहुल गांधी आणि काँग्रेसविरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध आंदोलन केले. भाजपचे आंदोलन संपताच काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कार्यालयासमोर मोठ्या संख्येने जमा होत आंदोलनस्थळी गोमूत्र शिंपडून परिसर 'शुद्ध' केल्याचा दावा केला आणि भाजपला जोरदार प्रतीकात्मक प्रत्युत्तर दिले. यावेळी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी भाजपच्या या आंदोलनावर तीव्र शब्दांत हल्लाबोल केला. राहुल गांधी यांनी देशातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर योग्य भूमिका मांडल्याचे सांगत, "चोरी करणाऱ्या आणि दरोडा टाकणाऱ्या भाजपने आमच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा नैतिक अधिकार गमावला आहे," अशी खरमरीत टीका काँग्रेसने केली. राम मंदिरातील कथित चोरीच्या प्रकरणाविरोधात भाजपने आंदोलन केले असते तर आम्हीही त्यात सहभागी झालो असतो, परंतु जनतेच्या खऱ्या प्रश्नांपासून लक्ष विचलित करण्यासाठी भाजप आंदोलनाचे राजकारण करत असल्याचा थेट आरोप काँग्रेसने केला. या दोन्ही पक्षांच्या आंदोलनामुळे आणि कार्यकर्त्यांकडून एकमेकांविरोधात दिलेल्या जोरदार घोषणाबाजीमुळे परिसरात काही काळ राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी संपूर्ण परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले.1
- छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील सिल्लोड येथील केळगाव मुर्डेश्वर डोंगरात अमरकंद या फळाची तस्करी होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. या संदर्भातील माहिती डॉक्टर संतोष पाटील यांनी वन विभागाला दिली होती. माहिती मिळताच वन विभागाने कारवाई करत तीन तरुणांना अटक केली आणि त्यांच्याकडून अमरकंद जप्त केले. यानंतर सिल्लोड वनविभागाच्या वतीने जप्त करण्यात आलेल्या या अमरकंद फळाचे पुनर्वसन करण्यात आले आहे.1
- खुलताबाद येथील जागतिक वारसा स्थळ असलेल्या वेरूळ लेणी परिसरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे लेणी क्रमांक २९ मधील प्रसिद्ध 'सीता न्हाणी' धबधबा ओसंडून वाहू लागला आहे. धबधब्याच्या प्रवाही जलधारेमुळे संपूर्ण परिसर अत्यंत नयनरम्य बनला असून येथे पर्यटकांना मनमोहक दृश्य अनुभवायला मिळत आहे. हिरवागार निसर्ग, दगडी लेणी आणि कोसळणारा धबधबा यामुळे वेरूळचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत आहे. पावसाळ्यातील हे रमणीय दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.1
- केंद्र शासनाच्या निर्देशानुसार राज्यातील सहकार चळवळ तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवून अधिक बळकट करण्यासाठी जालना जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा सहकार विकास समितीची बैठक पार पडली. या बैठकीत जिल्ह्यातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या संगणकीकरणाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. या संस्थांमार्फत नागरिकांना सीएससी (Common Service Centre) सेवा उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा झाली असून, सीएससी केंद्र चालविण्यास उत्सुक नसलेल्या व निष्क्रिय असलेल्या संस्था तात्काळ सक्रिय करण्याच्या स्पष्ट सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. सहकारी संस्थांनी पूरक व्यवसाय हाती घेऊन आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे, यादृष्टीने बैठकीत प्रोत्साहन देण्यात आले. विकेंद्रीत धान्य साठवणूक योजनेअंतर्गत गोदाम उभारणीसाठी जालना जिल्ह्यातील दहा संस्थांची प्राथमिक निवड करण्यात आली असून, संबंधित संस्थांना शासनाची जमीन उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. बैठकीच्या सुरुवातीस जिल्हा उपनिबंधक विष्णु रोडगे यांनी योजनेबाबत माहिती दिली. या बैठकीस पशुसंवर्धन विभाग, अन्न व औषध प्रशासन, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, दुग्ध सहकारी संस्था, कृषी विभाग, मत्स्य व्यवसाय विभाग तसेच जिल्ह्यातील सर्व सहायक निबंधक उपस्थित होते. जिल्हाधिकारी मित्तल यांनी सर्व संबंधित विभागांना आवश्यक ती कार्यवाही करून पुढील बैठकीत प्रगती अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.1
- आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर मारहाण झाल्यास किंवा त्यांना मारल्यास महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाच्या (भाजपा) एकाही नेत्याला फिरू दिले जाणार नाही, असा कडक आणि थेट इशारा जरांगे यांनी सरकारला दिला आहे. आंदोलक विद्यार्थ्यांविरोधात कोणतीही कारवाई खपवून घेतली जाणार नाही असे स्पष्ट करत जरांगे यांनी भाजप नेत्यांना संपूर्ण राज्यात फिरण्यापासून रोखण्याचा इशारा दिला आहे.1