तांब्याच्या तारा चोरणारी आंतरराज्यीय टोळी ५ प्रकरणांचा उलगडा ०५ आरोपी अटकेत लातूर - लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील पोलीस ठाणे वाढवणा (बु.) हद्दीत घडलेल्या कॉपर वायर चोरीच्या सलग घटनांचा उलगडा करण्यात पोलीसाना यश प्राप्त झाले आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या पाणबुडी मोटारींना जोडलेले कॉपर वायर चोरी करून मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान करून चोरी करणाऱ्या आंतरराजीय टोळीचा पर्दाफाश झाला असून या प्रकरणात एकूण पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. सदर प्रकरणी पोलीस ठाणे वाढवणा (बु.) येथे गुन्हे दाखल करण्यात आले होते. फिर्यादी बालाजी धनराज तरवडे (रा. वाढवणा बु.) व इतर शेतकऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दिनांक २६ आणि २७ मार्च दरम्यान मौजे एकुर्का रोड परिसरातील साठवण तलावाजवळील डी.पी.वरून सुमारे १०५० मीटर कॉपर वायर (किंमत ८४०००/-) अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले होते. तसेच दुसऱ्या घटनेत डांगेवाडी परिसरातील साठवण तलावावरील डी.पी.वरून ४६१ मीटर कॉपर वायर (किंमत ३६८८०/-) चोरीस गेले होते. अशा प्रकारे एकूण १ लाख२० हजार ८८०रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीस गेला होता. या घटनांचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या निर्देशानुसार तसेच अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण व उपविभागीय पोलीस अधिकारी अहमदपूर अरविंद रायबोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे वाढवणा (बु.) येथे विशेष तपास पथक गठीत करण्यात आले. तपासादरम्यान घटनास्थळांचे बारकाईने निरीक्षण, तांत्रिक विश्लेषण, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचा अभ्यास, तसेच गोपनीय माहितीदार सक्रिय करून आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू करण्यात आले होते. तपासादरम्यान मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे पोलीस पथकाने वाढवणा पाटी परिसरात सापळा रचून संशयितांना ताब्यात घेतले. सखोल चौकशीअंती आरोपींनी गुन्हा केल्याची कबुली दिली. अटक आरोपींची नावे रिहाईस जिवराज पवार (वय २४ वर्ष)सुजेश नवाब पवार (वय २६ वर्ष)दुकीस मलबकस पवार (वय ३५ वर्ष)सासन सार्जन पवार (वय २४ वर्ष)बबू जिवराज पवार (वय २६ वर्ष) सर्व रा. सुगवा ललतपुर, ता. रिटी, जि. कटनी, राज्य मध्यप्रदेशमधील असून आरोपींनी वाढवणा, अहमदपूर, जळकोट, उदगीर व कमलनगर (कर्नाटक राज्य) परिसरात अशाच प्रकारच्या चोरीच्या घटना केल्याची कबुली दिली आहे. चोरी केलेले वायर जाळून त्यातून तांबे वेगळे करून ते विक्रीसाठी वापरण्याची त्यांची पद्धत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.अधिक तपासात असे निष्पन्न झाले आहे की सदरचे आरोपी हे गावाजवळील मोकळ्या जागेत वास्तव्य करून किंवा शेतात कामाच्या बहाण्याने येऊन रेकी करून अशा प्रकारच्या चोऱ्या करत होते. अटक आरोपींपैकी रिहाईस जिवराज पवार याच्याकडून सुमारे २३ किलो कॉपर वायर जप्त करण्यात आले आहे. तसेच आरोपींकडून रेडमी, विवो व आयक्यू कंपनीचे एकूण ४मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहे. याशिवाय आरोपींकडे सोन्यासारखे दिसणारे “प्युअर गोल्ड ९९९” असा ठसा असलेले बनावट धातूचे बिस्कीट स्वरूपातील साहित्यही आढळून आले असून ते पितळ असल्याचे निष्पन्न झाले आहे. या माध्यमातून फसवणुकीचा गुन्हा झाला आहे का याचाही तपास सुरू आहे. तपासादरम्यान आरोपींनी चोरी केलेले तांबे काही भंगार विक्रेत्यांना विक्री केल्याची माहिती समोर आली असून त्याबाबत पुढील तपास सुरू आहे. तसेच आरोपींच्या इतर साथीदारांचा शोध व इतर गुन्ह्यांतील सहभागाबाबत सखोल तपास सुरू आहे. ही संपूर्ण कारवाई पोलीस ठाणे वाढवणा (बु.) चे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांच्या नेतृत्वातील पथकामधील तसेच तपासी अधिकारी तुकाराम बडदे, शिवप्रताप रंगव्हाड, संजय दळवी, बालाजी आकेमोड, शिवाजी केंद्रे , कसबे, राजेश कंचे यांच्या पथकाने अत्यंत कौशल्याने पार पाडली आहे. पोलीस अधिकारी व अंमलदारांनी दाखविलेल्या तत्परता, समन्वय व व्यावसायिकतेमुळे अल्पावधीत गुन्ह्याचा उलगडा होणे शक्य झाले. तसेच पोलिसांना आरोपी धरण्यासाठी पोलीस मित्र आकाश नागपूरने, सिद्धेश्वर गुडडे यांनी सहकार्य केले आह. नागरिकांना आवाहन आपले गावात, गावाशेजारी वास्तव्यास किंवा शेतात काम करण्याच्या बहाण्याने कोणीही अनोळखी व्यक्ती अथवा टोळी निदर्शनास येत असेल व आपणास त्यांच्याबद्दल वाजवी संशय येत असेल तर आपण नजीकच्या पोलीस स्टेशनची संपर्क साधून तात्काळ माहिती देण्यात यावी.

- लातूरच्या विवेकानंद चौकातील अर्धवट बांधलेल्या पाण्याच्या टाकीवर चढून दारुड्याचा धिंगाणा; पोलिसांनी समजूत काढून उतरवले खाली. गुरुवार दि. 02 एप्रिल 2026. लातूर शहरातील विवेकानंद चौक येथे लातूर शहर महानगरपालिकेच्या ताब्यातील पाण्याच्या टाकीचे गुत्तेदाराने बांधकाम अर्धवट अवस्थेत सोडण्यात आल्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. संबंधित गुत्तेदाराने काम अपूर्ण ठेवून माघार घेतल्याने ही टाकी सध्या उघडी पडली असून, त्या ठिकाणी कोणतेही संरक्षणात्मक कंपाउंड नसल्यामुळे कोणीही सहजपणे टाकीवर चढू शकत आहे. पूर्व भागातील नागरिकांना पाणीटंचाई भासत असल्याने नवीन पाण्याची टाकी उभारण्याचे काम महानगरपालिकेने एका गुत्तेदाराला दिले होते. मात्र, काम अर्धवट सोडल्याने ही टाकी धोकादायक ठरत आहे. या ठिकाणी तरुण मंडळी तसेच इतर नागरिक विनाकारण वर-खाली करत असल्याने हा प्रकार उघडकीस आला. दरम्यान, आज एका अज्ञात तरुणाने दारूच्या नशेत या अर्धवट टाकीवर चढून गोंधळ घातला. परिस्थिती गंभीर होत असल्याचे लक्षात येताच विवेकानंद पोलीस ठाण्याच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत दारुड्या इसमाची समजूत काढून संबंधित तरुणाला सुरक्षितपणे खाली उतरवले. या घटनेमुळे अर्धवट बांधकामामुळे निर्माण झालेला धोका पुन्हा एकदा समोर आला असून, महानगरपालिकेने तातडीने या ठिकाणी सुरक्षा उपाययोजना कराव्यात तसेच अपूर्ण काम पूर्ण करून नागरिकांचा जीवित धोका टाळावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.1
- मल्हार योद्धा अनिल गोयकर यांच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यातील धनगर समाजातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत निवडून आलेल्या एकूण 26 लोकप्रतिनिधींचा सत्काराचा अभूतपूर्व सोहळा लातूरात संपन्न1
- Post by Balaji Vedpathak1
- केंद्र सरकारच्या गॅस दरवाढ विरोधात एप्रिल फुलचे औचित्य साधून मुखेड काँग्रेस कडून 'कहा गये अच्छे दिन' म्हणत व नालीतून गॅस काढून चहा करत फेकू दिन साजरा करण्यात आला. केंद्राच्या नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने आज सुमारे दोनशे रुपयाची व्यावसायिक गॅस दरवाढ जाहीर केली. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेश सरचिटणीस डॉ.श्रावण रॅपनवाड यांच्या नेतृत्वात, तालुका कार्याध्यक्ष संभाजी पाटील उंद्रीकर आणि शहराध्यक्ष हणमंत नारनाळीकर यांच्या उपस्थितीत एप्रिल फुल चे औचित्य साधून मुखेड तहसिल कार्यालयासमोर मुख्य रस्त्यावरील नाल्यावर कार्यकर्त्यांनी आंदोलन केले.यावेळी मोदींनी म्हटल्याप्रमाणे नालीतून गॅस काढून प्रतिकात्मक चहा करण्यात आला.तर नागरिकांना आवाहन करून चहा वाटप करण्यात आले.यावेळी चालू असलेल्या इराण इस्त्राईल आणि अमेरिका यांच्या युद्धाबद्दल पागल मित्र ट्रम्प यांना मोदींनी युद्ध थांबवण्यास सांगावे असे सांगत बॅनर लावण्यात आले.बॅनर वर सांगा आपल्या पागल मित्राला (ट्रम्पला ) 'युद्ध नको बुद्ध हवा,अस्त्र क्रांती नको,विश्वशांती हवी' असा मथळा काँग्रेसकडून ठळक लिहिण्यात आला होता.या आंदोलनातून नालीच्या गॅसवर चहा करणे हे मोदींचे किती मूर्खपणाचे विधान होते हे काँग्रेसने दाखवले आहे. यावेळी जगातील युद्ध आणि देशातील महागाई या विरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.युद्धामुळे भारतात महागाई वाढवून जनतेला प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.युद्ध पेटवणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे मोदीचे मित्र असून त्यांनी आपल्या मित्र असणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना युद्ध थांबवावे असा सल्ला द्यावा असा सल्ला यावेळी तालुका कार्याध्यक्ष संभाजी पाटील उंद्रीकर यांनी दिला.या आंदोलनात डॉ.श्रावण रॅपनवाड,संभाजी पाटील,हणमंत नारनाळीकर सह युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस सुनील आरगिळे,भाई असद बल्की,ओबीसी विभाग शहराध्यक्ष प्रकाश निमलवाड, शिवाजी चैनपुरे,राजुभाऊ बनसोडे,हाफिज पठाण,एम.आर.गोपनर,बालाजी वाडेकर,शिवाजी कांबळे,शिवाजी गायकवाड,वाहनचालक ईमामभाई, सुर्यकांत पांचाळ सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.प्रतिकात्मक आंदोलनास नागरीकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद देऊन आंदोलन कर्त्यांचा चहा पिऊन गॅसदरवाढीचा तिव्र निषेध केला.1
- धावत्या ऑटोने घेतला पेट परभणीच्या वसमत रोडवरील घटना...1
- परभणी शहरातील वसमत रोडवर पेट घेतलेला ऑटो आगीत जळून खाक1
- ___ जिल्हाधिकारी श्री.विवेक जॉन्सन यांच्या हस्ते बीड जिल्ह्यातील उसतोड कामगारांना ओळखपत्रांचे वितरण करण्यात आले. मा.उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार उसतोड कामगारांचे सर्वेक्षण व नोंदणी सुरू असून, आतापर्यंत ५८४५ कामगारांची नोंदणी करण्यात आली आहे. या पैकी प्रतिनिधिक स्वरूपात १० कामगारांना ओळखपत्रांचे वाटप करण्यात आले. जिल्हा प्रशासनाच्या समन्वयातून पुढील तीन महिन्यांत सर्व उसतोड कामगारांचे सर्वेक्षण व नोंदणी पूर्ण करण्यात येणार आहे.बीड जिल्ह्यातील सर्व उसतोड कामगारांनी स्थानिक स्तरावर संबंधित संस्थेशी संपर्क साधून नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.1
- कर वसुलीत महापालिकेची धडाकेबाज कामगिरी एका दिवसात ४ कोटींचा रेकॉर्ड; लातूर महापालिकेची ७५ कोटींची ऐतिहासिक झेप...! व्यापाऱ्यांनी कर भरूना, सहकार्याचे आवाहन. शूरू ॲप, मराठी न्यूज. बुधवार दि. 01 एप्रिल 2026. लातूर महानगरपालिकेकडून एका दिवसात तब्बल ४ कोटी रुपयांचा कर संकलन करण्यात आला असून, एकूण वसुलीचा आकडा ७५ कोटींहून अधिक पार करण्यात यश आले आहे. या यशामागे महापालिकेचे कर्मचारी आणि सर्व संबंधितांनी घेतलेली अथक मेहनत कारणीभूत ठरली असल्याचे उपायुक्त डॉ. पंजाब खानसोळे यांनी सांगितले. महानगरपालिका प्रशासनाने ठेवलेले कर वसुलीचे उद्दिष्ट यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आले असून, आगामी काळातही कर वसुलीची मोहीम अधिक गतीने सुरू ठेवली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, शहरातील व्यापाऱ्यांनी स्वखुशीने कर भरून महानगरपालिकेला सहकार्य करावे आणि अनावश्यक कारवाई टाळावी, असे आवाहनही उपायुक्त डॉ. पंजाब खानसोळे यांनी केले.1