logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

रिंगरोड बाधित शेतकऱ्यांच्या आंदोलनाला मोठे यश; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीपर्यंत कामे स्थगितपालकमंत्री गिरीश महाजन यांचा जिल्हाधिकाऱ्यांना स्पष्ट आदेश; २–३ दिवसांत मंत्रालयात मुख्यमंत्र्यांसोबत सविस्तर बैठक नाशिक, दि.२७ ऑगस्ट २०२६ : नाशिक परिक्रमा मार्ग (रिंगरोड),हायवे क्र.२९ चिंचखेड ते जोपुळ दिंडोरी तसेच पाथर्डी कचरा डेपो बाधित शेतकऱ्यांच्या गेल्या दोन दिवसांपासून करण गायकर यांच्या नेतृत्वाखाली इंदिरानगर पोलीस स्टेशनच्या आवारात सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनाला आज महत्त्वपूर्ण वळण मिळाले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आंदोलनस्थळी भेट देत शेतकऱ्यांशी सविस्तर चर्चा केली.यावेळी सुमारे ५०० ते ६०० शेतकरी उपस्थित होते. २५ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना रक्षाबंधनानिमित्त राखी बांधून आपल्या घरदार,शेती आणि संसाराचे रक्षण करण्याचे साकडे घालण्यासाठी शेतकरी मुंबईकडे पायी निघाले होते. मात्र पोलिसांनी मोर्चाला पुढे जाण्यास मज्जाव केल्यानंतर करण गायकर यांना इंदिरानगर पोलीस स्टेशन येथे स्थानबद्ध करण्यात आले.त्यानंतर बाधित शेतकरी सहकुटुंब पोलीस स्टेशनच्या आवारात ठिय्या देऊन बसले.मुख्यमंत्री किंवा त्यांच्या प्रतिनिधींकडून ठोस आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन मागे न घेण्याची भूमिका शेतकऱ्यांनी घेतली होती. आंदोलनस्थळी शेतकऱ्यांनी पालकमंत्री महाजन यांच्यासमोर भूसंपादनाच्या मोबदल्यातील तफावत,ग्रामीण भागासाठी गुणांक दोन लागू करणे,फळझाडांच्या मोबदल्याचे कमी दर,एकाच गावात वेगवेगळे दर,रिंगरोडच्या अलाइनमेंटबाबतचे आक्षेप व पुरावे,तसेच प्रकल्पामुळे होणारे सामाजिक व आर्थिक नुकसान याबाबत सविस्तर भूमिका मांडली.हायवे क्र.२९ साठी कोणतेही विना मोबदला भूसंपादन होऊ देणार नसल्याची भूमिकाही शेतकऱ्यांनी स्पष्ट केली. मुख्यमंत्र्यांच्या बैठकीपर्यंत रिंगरोडची कामे स्थगित आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी जोपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सविस्तर बैठक होत नाही आणि प्रश्नांवर अंतिम निर्णय होत नाही,तोपर्यंत रिंगरोडसंदर्भातील मोजणी, भूसंपादन,जमीन खरेदी,नोटिसा अथवा शेतकऱ्यांवर परिणाम करणारी कोणतीही पुढील प्रशासकीय कारवाई करू नये,अशी मागणी केली.त्याची दखल घेत पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आंदोलनस्थळावरूनच जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला आणि मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होऊन अंतिम तोडगा निघेपर्यंत रिंगरोडसंदर्भातील पुढील कामे स्थगित ठेवण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या.तसेच शेतकऱ्यांना विनाकारण त्रास देऊ नये आणि बैठकीपूर्वी कोणतीही घाईघाईची कारवाई करू नये,असेही त्यांनी सांगितले. पालकमंत्री महाजन यांनी सांगितले की,४ऑगस्ट रोजी मुख्यमंत्र्यांसोबत शेतकऱ्यांची बैठक झाली होती.त्यानंतर सविस्तर बैठक होणे अपेक्षित होते;मात्र जिल्हा प्रशासनाकडून मुख्यमंत्र्यांना अलाइनमेंट व शेतकऱ्यांचे प्रश्न सुटल्याचे ब्रीफिंग गेल्याने शासन आणि शेतकऱ्यांमध्ये गैरसमज निर्माण झाले.शासन शेतकऱ्यांच्या सोबत आहे. कोणत्याही शेतकऱ्यावर अन्याय होऊ दिला जाणार नाही,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. २–३ दिवसांत मंत्रालयात मुख्यमंत्र्यांसोबत बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी आपण स्वतःचर्चा केली असून,२८ऑगस्ट रोजी मुख्यमंत्र्यांचा नाशिकमध्ये भरगच्च कार्यक्रम असल्याने त्यादिवशी बैठक शक्य नसली तरी पुढील दोन ते तीन दिवसांत मंत्रालयात सुमारे एक तासाची सविस्तर बैठक घेण्यात येईल,असे महाजन यांनी स्पष्ट केले.या बैठकीस रिंगरोड बाधित शेतकरी प्रतिनिधी,MSIDCचे वरिष्ठ अधिकारी,जिल्हा प्रशासनाचे अधिकारी आणि पालकमंत्री स्वतःउपस्थित राहणार असून अलाइनमेंट,भूसंपादनाचा मोबदला,गुणांक,फळझाडांचे दर आणि इतर सर्व प्रश्नांवर चर्चा करून तोडगा काढण्याचे आश्वासन देण्यात आले. दरम्यान,मुख्यमंत्री फडणवीस यांना राखी बांधता न आल्याची खंत व्यक्त करणाऱ्या महिला शेतकऱ्यांनी पालकमंत्री गिरीश महाजन यांनाच रक्षाबंधनानिमित्त राख्या बांधल्या.प्रतिनिधी स्वरूपात चार ते पाच महिला शेतकऱ्यांना मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेण्यासाठी वेळ उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही महाजन यांनी दिले.या महिला मुख्यमंत्र्यांना राखी बांधून “आमचे घरदार,शेती आणि संसार वाचवा,आमच्या मागण्यांवर न्याय्य निर्णय घ्या,असे साकडे घालणार आहेत. पालकमंत्र्यांच्या भेटीनंतर आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले असले तरी मंत्रालयातील बैठकीत सर्व प्रश्नांवर ठोस व न्याय्य निर्णय होणे आवश्यक असल्याची भूमिका शेतकऱ्यांनी स्पष्ट केली.आंदोलनाला सहकार्य करणारे पोलीस प्रशासन,पत्रकार बांधव,किसान सभा,मनसे,विविध संघटना यांचे किसान सभेचे सरचिटणीस राजू देसले यांनी आभार मानले यावेळी या आंदोलनासाठी शेतकरी नेते नाना बच्छाव छावा क्रांतिवीर सेनेचे शिवा तेलंग नवनाथ शिंदे आशिष हिरे प्रवीण पाटील वैभव दळवी शुभम देशमुख आधी उपस्थित होते. कोट - “मुख्यमंत्र्यांसोबत सविस्तर बैठक,प्रश्नांवर ठोस तोडगा आणि शेतकऱ्यांना न्याय हाच आता पुढील मार्ग आहे नाशिक जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि संबंधित अधिकारी शेतकऱ्यांची दिशाभूल करत हिटलर शाही प्रमाणे जे काम करत आहेत हे काम त्यांनी करू नये मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस व पालकमंत्री गिरीश महाजन यांनी पुढील बैठकीमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर योग्य निर्णय घेत न्याय द्यावा हीच अपेक्षा आहे. अधिकाऱ्यांच्या नादी न लागता शेतकरी हिताचा निर्णय घेणे विकासाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा असेल. करण गायकर -संस्थापक अध्यक्ष छावा क्रांतिवीर सेना महाराष्ट्र राज्य

2 hrs ago
user_Kapil Katyare
Kapil Katyare
Photographer नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
2 hrs ago
874387bf-9698-49b4-8e5d-e68ac267c5e5

रिंगरोड बाधित शेतकऱ्यांच्या आंदोलनाला मोठे यश; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीपर्यंत कामे स्थगितपालकमंत्री गिरीश महाजन यांचा जिल्हाधिकाऱ्यांना स्पष्ट आदेश; २–३ दिवसांत मंत्रालयात मुख्यमंत्र्यांसोबत सविस्तर बैठक नाशिक, दि.२७ ऑगस्ट २०२६ : नाशिक परिक्रमा मार्ग (रिंगरोड),हायवे क्र.२९ चिंचखेड ते जोपुळ दिंडोरी तसेच पाथर्डी कचरा डेपो बाधित शेतकऱ्यांच्या गेल्या दोन दिवसांपासून करण गायकर यांच्या नेतृत्वाखाली इंदिरानगर पोलीस स्टेशनच्या आवारात सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनाला आज महत्त्वपूर्ण वळण मिळाले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आंदोलनस्थळी भेट देत शेतकऱ्यांशी सविस्तर चर्चा केली.यावेळी सुमारे ५०० ते ६०० शेतकरी उपस्थित होते. २५ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना रक्षाबंधनानिमित्त राखी बांधून आपल्या घरदार,शेती आणि संसाराचे रक्षण करण्याचे साकडे घालण्यासाठी शेतकरी मुंबईकडे पायी निघाले होते. मात्र पोलिसांनी मोर्चाला पुढे जाण्यास मज्जाव केल्यानंतर करण गायकर यांना इंदिरानगर पोलीस स्टेशन येथे स्थानबद्ध करण्यात आले.त्यानंतर बाधित शेतकरी सहकुटुंब पोलीस स्टेशनच्या आवारात ठिय्या देऊन बसले.मुख्यमंत्री किंवा त्यांच्या प्रतिनिधींकडून ठोस आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन मागे न घेण्याची भूमिका शेतकऱ्यांनी घेतली होती. आंदोलनस्थळी शेतकऱ्यांनी पालकमंत्री महाजन यांच्यासमोर भूसंपादनाच्या मोबदल्यातील तफावत,ग्रामीण भागासाठी गुणांक दोन लागू करणे,फळझाडांच्या मोबदल्याचे कमी दर,एकाच गावात वेगवेगळे दर,रिंगरोडच्या अलाइनमेंटबाबतचे आक्षेप व पुरावे,तसेच प्रकल्पामुळे होणारे सामाजिक व आर्थिक नुकसान याबाबत सविस्तर भूमिका मांडली.हायवे क्र.२९ साठी कोणतेही विना मोबदला भूसंपादन होऊ देणार नसल्याची भूमिकाही शेतकऱ्यांनी स्पष्ट केली. मुख्यमंत्र्यांच्या बैठकीपर्यंत रिंगरोडची कामे स्थगित आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी जोपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सविस्तर बैठक होत नाही आणि प्रश्नांवर अंतिम निर्णय होत नाही,तोपर्यंत रिंगरोडसंदर्भातील मोजणी, भूसंपादन,जमीन खरेदी,नोटिसा अथवा शेतकऱ्यांवर परिणाम करणारी कोणतीही पुढील प्रशासकीय कारवाई करू नये,अशी मागणी केली.त्याची दखल घेत पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आंदोलनस्थळावरूनच जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला आणि मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होऊन अंतिम तोडगा निघेपर्यंत रिंगरोडसंदर्भातील पुढील कामे स्थगित ठेवण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या.तसेच शेतकऱ्यांना विनाकारण त्रास देऊ नये आणि बैठकीपूर्वी कोणतीही घाईघाईची कारवाई करू नये,असेही त्यांनी सांगितले. पालकमंत्री महाजन यांनी सांगितले की,४ऑगस्ट रोजी मुख्यमंत्र्यांसोबत शेतकऱ्यांची बैठक झाली होती.त्यानंतर सविस्तर बैठक होणे अपेक्षित होते;मात्र जिल्हा प्रशासनाकडून मुख्यमंत्र्यांना

2dd34f5e-125e-4195-bfe7-573db822a2d5

अलाइनमेंट व शेतकऱ्यांचे प्रश्न सुटल्याचे ब्रीफिंग गेल्याने शासन आणि शेतकऱ्यांमध्ये गैरसमज निर्माण झाले.शासन शेतकऱ्यांच्या सोबत आहे. कोणत्याही शेतकऱ्यावर अन्याय होऊ दिला जाणार नाही,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. २–३ दिवसांत मंत्रालयात मुख्यमंत्र्यांसोबत बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी आपण स्वतःचर्चा केली असून,२८ऑगस्ट रोजी मुख्यमंत्र्यांचा नाशिकमध्ये भरगच्च कार्यक्रम असल्याने त्यादिवशी बैठक शक्य नसली तरी पुढील दोन ते तीन दिवसांत मंत्रालयात सुमारे एक तासाची सविस्तर बैठक घेण्यात येईल,असे महाजन यांनी स्पष्ट केले.या बैठकीस रिंगरोड बाधित शेतकरी प्रतिनिधी,MSIDCचे वरिष्ठ अधिकारी,जिल्हा प्रशासनाचे अधिकारी आणि पालकमंत्री स्वतःउपस्थित राहणार असून अलाइनमेंट,भूसंपादनाचा मोबदला,गुणांक,फळझाडांचे दर आणि इतर सर्व प्रश्नांवर चर्चा करून तोडगा काढण्याचे आश्वासन देण्यात आले. दरम्यान,मुख्यमंत्री फडणवीस यांना राखी बांधता न आल्याची खंत व्यक्त करणाऱ्या महिला शेतकऱ्यांनी पालकमंत्री गिरीश महाजन यांनाच रक्षाबंधनानिमित्त राख्या बांधल्या.प्रतिनिधी स्वरूपात चार ते पाच महिला शेतकऱ्यांना मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेण्यासाठी वेळ उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही महाजन यांनी दिले.या महिला मुख्यमंत्र्यांना राखी बांधून “आमचे घरदार,शेती आणि संसार वाचवा,आमच्या मागण्यांवर न्याय्य निर्णय घ्या,असे साकडे घालणार आहेत. पालकमंत्र्यांच्या भेटीनंतर आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले असले तरी मंत्रालयातील बैठकीत सर्व प्रश्नांवर ठोस व न्याय्य निर्णय होणे आवश्यक असल्याची भूमिका शेतकऱ्यांनी स्पष्ट केली.आंदोलनाला सहकार्य करणारे पोलीस प्रशासन,पत्रकार बांधव,किसान सभा,मनसे,विविध संघटना यांचे किसान सभेचे सरचिटणीस राजू देसले यांनी आभार मानले यावेळी या आंदोलनासाठी शेतकरी नेते नाना बच्छाव छावा क्रांतिवीर सेनेचे शिवा तेलंग नवनाथ शिंदे आशिष हिरे प्रवीण पाटील वैभव दळवी शुभम देशमुख आधी उपस्थित होते. कोट - “मुख्यमंत्र्यांसोबत सविस्तर बैठक,प्रश्नांवर ठोस तोडगा आणि शेतकऱ्यांना न्याय हाच आता पुढील मार्ग आहे नाशिक जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि संबंधित अधिकारी शेतकऱ्यांची दिशाभूल करत हिटलर शाही प्रमाणे जे काम करत आहेत हे काम त्यांनी करू नये मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस व पालकमंत्री गिरीश महाजन यांनी पुढील बैठकीमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर योग्य निर्णय घेत न्याय द्यावा हीच अपेक्षा आहे. अधिकाऱ्यांच्या नादी न लागता शेतकरी हिताचा निर्णय घेणे विकासाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा असेल. करण गायकर -संस्थापक अध्यक्ष छावा क्रांतिवीर सेना महाराष्ट्र राज्य

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • नेपाळमध्ये अडकलेल्या राज्यातील पर्यटकांच्या शोधासाठी सरकार सक्रिय नेपाळमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील पर्यटकांचा शोध घेण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत. याबाबत नेपाळ सरकारच्या संपर्कात असून, महाराष्ट्रातील नागरिकांची माहिती मिळवण्याचे काम सुरू असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. नेपाळमध्ये गेलेल्या पर्यटकांच्या सुरक्षिततेबाबत राज्य सरकारकडून सतत माहिती घेतली जात आहे. संबंधित नागरिकांशी संपर्क साधून त्यांची सद्यस्थिती जाणून घेण्यासह आवश्यक मदत उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचे महाजन यांनी सांगितले.
    1
    नेपाळमध्ये अडकलेल्या राज्यातील पर्यटकांच्या शोधासाठी सरकार सक्रिय
नेपाळमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील पर्यटकांचा शोध घेण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत. याबाबत नेपाळ सरकारच्या संपर्कात असून, महाराष्ट्रातील नागरिकांची माहिती मिळवण्याचे काम सुरू असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. नेपाळमध्ये गेलेल्या पर्यटकांच्या सुरक्षिततेबाबत राज्य सरकारकडून सतत माहिती घेतली जात आहे. संबंधित नागरिकांशी संपर्क साधून त्यांची सद्यस्थिती जाणून घेण्यासह आवश्यक मदत उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचे महाजन यांनी सांगितले.
    user_Kapil Katyare
    Kapil Katyare
    Photographer नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • पटना से बड़ी खबर सामने आ रही है। आदित्य पटना हाईकोर्ट पहुंचा है और FIR की कॉपी लेकर न्याय की मांग कर रहा है। मामले में वरीय पुलिस अधिकारियों पर गंभीर आरोप लगाए गए हैं। आखिर पूरा मामला क्या है? पुलिस पर क्या आरोप हैं और हाईकोर्ट में क्या हुआ? जानिए इस वीडियो में पूरी जानकारी वीडियो पसंद आए तो Like 👍, Share 🔄 और Channel को Subscribe 🔔 जरूर करें। पटना से बड़ी खबर सामने आ रही है। आदित्य पटना हाईकोर्ट पहुंचा है और FIR की कॉपी लेकर न्याय की मांग कर रहा है। मामले में वरीय पुलिस अधिकारियों पर गंभीर आरोप लगाए गए हैं। आखिर पूरा मामला क्या है? पुलिस पर क्या आरोप हैं और हाईकोर्ट में क्या हुआ? जानिए इस वीडियो में पूरी जानकारी वीडियो पसंद आए तो Like 👍, Share 🔄 और Channel को Subscribe 🔔 जरूर करें।
    1
    पटना से बड़ी खबर सामने आ रही है। आदित्य पटना हाईकोर्ट पहुंचा है और FIR की कॉपी लेकर न्याय की मांग कर रहा है। मामले में वरीय पुलिस अधिकारियों पर गंभीर आरोप लगाए गए हैं। आखिर पूरा मामला क्या है? पुलिस पर क्या आरोप हैं और हाईकोर्ट में क्या हुआ? जानिए इस वीडियो में पूरी जानकारी
वीडियो पसंद आए तो Like 👍, Share 🔄 और Channel को Subscribe 🔔 जरूर करें।
पटना से बड़ी खबर सामने आ रही है। आदित्य पटना हाईकोर्ट पहुंचा है और FIR की कॉपी लेकर न्याय की मांग कर रहा है। मामले में वरीय पुलिस अधिकारियों पर गंभीर आरोप लगाए गए हैं। आखिर पूरा मामला क्या है? पुलिस पर क्या आरोप हैं और हाईकोर्ट में क्या हुआ? जानिए इस वीडियो में पूरी जानकारी
वीडियो पसंद आए तो Like 👍, Share 🔄 और Channel को Subscribe 🔔 जरूर करें।
    user_शीतल कुमार सिंह
    शीतल कुमार सिंह
    Local News Reporter नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • मविप्र कृषी महाविद्यालयाच्या नूतन वास्तूचे दिनांक 28 ऑगस्ट ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन चाचडगाव येथे १४ एकरांच्या प्रशस्त कॅम्पसमध्ये अत्याधुनिक सुविधा; १०९ एकरांवर विद्यार्थ्यांसाठी प्रात्यक्षिक शेती क्षेत्र मविप्र कृषी महाविद्यालयाच्या नूतन वास्तूचे दिनांक 28 ऑगस्ट ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन चाचडगाव येथे १४ एकरांच्या प्रशस्त कॅम्पसमध्ये अत्याधुनिक सुविधा; १०९ एकरांवर विद्यार्थ्यांसाठी प्रात्यक्षिक शेती क्षेत्र दिव्य भारत बीएसएम न्यूज दिनांक २६ ऑगस्ट २०२६ | नाशिक, (प्रतिनिधी : निलेश शेकोकार):- मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक संस्थेच्या ‘कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषी महाविद्यालया’च्या नूतन वास्तूचा उद्घाटन सोहळा शुक्रवार, दिनांक . २८ ऑगस्ट २०२६ रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते चाचडगाव, तालुका दिंडोरी येथे होणार आहे. महाविद्यालयाची मुख्य इमारत मुलांचे आणि मुलींचे सुसज्ज वसतीगृह या तीन भव्य इमारतींचे उद्घाटन या वेळी करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाची माहिती मविप्र संस्थेचे सरचिटणीस ॲडव्हॅकेट नितीन ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. मविप्र संस्थेच्या मध्यवर्ती कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेस संस्थेचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपाध्यक्ष विश्वासराव मोरे, शिक्षणाधिकारी आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन राहणार आहेत. अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांच्यासह नाशिक जिल्ह्यातील खासदार राजाराम वाजे, खासदार भास्कर भगरे, आमदार उपस्थित राहणार आहेत. नाशिक महापालिकेच्या महापौर श्रीमती हिमगिरी आहेर-आडके व उपमहापौर विलास शिंदे यांचीही प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमास मविप्र संस्थेचे सरचिटणीस ॲडव्होकेट . नितीन ठाकरे, अध्यक्ष डॉक्टर सुनील ढिकले, सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपाध्यक्ष विश्वासराव मोरे, उपसभापती डी. बी. मोगल, चिटणीस दिलीप दळवी, दिंडोरी तालुका संचालक प्रवीण जाधव यांच्यासह संस्थेचे कार्यकारी मंडळ, शिक्षणाधिकारी, सभासद, सेवक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. २००३ पासून कृषी शिक्षणाची वाटचाल नाशिक जिल्हा हा फळे, फुले आणि भाजीपाला उत्पादनासाठी महाराष्ट्रात अग्रगण्य मानला जातो. जिल्ह्यातील कृषी क्षेत्राची गरज लक्षात घेऊन मराठा विद्या प्रसारक समाजाने दिनांक १ नोव्हेंबर २००३ रोजी नाशिक शहरात महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी मान्यताप्राप्त व संलग्नित कृषी महाविद्यालयाची सुरुवात केली. पुढे या महाविद्यालयाचे ‘कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषी महाविद्यालय’ असे नामकरण करण्यात आले. कृषी शिक्षण केवळ वर्गखोल्यांपुरते मर्यादित न राहता विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शेतीचा अनुभव मिळावा आणि ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा लाभ मिळावा, या उद्देशाने महाविद्यालयाचे नाशिक शहरातून दिंडोरी तालुक्यातील नाशिक-पेठ महामार्गावरील मौजे चाचडगाव येथे स्थलांतर करण्यात आले. १४ एकरांचा अत्याधुनिक कॅम्पस चाचडगाव येथे तब्बल १४ एकर जागेवर महाविद्यालयाचा प्रशस्त व आधुनिक कॅम्पस उभारण्यात आला आहे. या परिसरात प्रशासकीय इमारत, मुलांचे व मुलींचे स्वतंत्र वसतीगृह, भव्य ग्रंथालय, ई-लायब्ररी, स्पर्धा परीक्षा मंच, संगणक प्रयोगशाळा तसेच विविध शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. महाविद्यालयातील सर्व दहा विभागांसाठी अद्ययावत प्रयोगशाळा, आधुनिक शिक्षण साहित्याने सुसज्ज व्याख्यान कक्ष, वाय-फाय आणि इंटरनेट सुविधा उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक सुविधांसोबतच निवास आणि अभ्यासासाठी आवश्यक वातावरण निर्माण करण्यात आले आहे. १०९ एकरांवर प्रात्यक्षिक शेती कृषी शिक्षणातील सर्वांत महत्त्वाचा भाग म्हणजे प्रत्यक्ष शेतीचा अनुभव. ही गरज लक्षात घेऊन विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिकांसाठी तब्बल १०९ एकर जमीन क्षेत्र तयार करण्यात आले आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध पिकांचे उत्पादन, आधुनिक शेती तंत्रज्ञान, पीक व्यवस्थापन, कृषी प्रयोग, संशोधन आणि शेतकरी मार्गदर्शन यांचा प्रत्यक्ष अनुभव मिळणार आहे. महाविद्यालयात चार वर्षांचा बी.एस्सी. कृषी पदवी अभ्यासक्रम असून दरवर्षी १२० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. त्याच कॅम्पसमध्ये मराठी माध्यमाचे कृषी विद्यालय आणि इंग्रजी माध्यमाचे कृषी तंत्रनिकेतन विद्यालयही सुरू आहे. त्यामुळे कृषी शिक्षणाची साखळी अधिक सक्षम झाली आहे. ‘अ’ दर्जासह विविध पुरस्कारांनी गौरव महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांनी महाविद्यालयातील शैक्षणिक सुविधा, पायाभूत सुविधा आणि शैक्षणिक गुणवत्तेचा आढावा घेत सन २०२२-२३ मध्ये महाविद्यालयास ‘अ’ दर्जा प्रदान केला. तसेच सन २०२४ मध्ये ‘कृषीभूषण महाराष्ट्र एफपीओ फेडरेशन’तर्फे महाविद्यालयाला ‘कृषीभूषण-२०२४’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ‘KRUSHITHON 2024’मध्ये महाविद्यालयाला ‘प्रयोगशील कृषी महाविद्यालय’ हा पुरस्कार मिळाला. या पुरस्कारांमुळे महाविद्यालयाच्या कृषी शिक्षण, प्रयोगशीलता आणि संशोधनाच्या कार्याला विशेष अधोरेखित करण्यात आले आहे. संशोधन आणि शेतकरी सेवेला प्राधान्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बापूसाहेब भाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली दहा विभागांचे प्रमुख, २८ शिक्षक आणि ४४ शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत आहेत. कृषी क्षेत्रातील बदलत्या तंत्रज्ञानाचा विद्यार्थ्यांना लाभ मिळावा, तसेच संशोधनाला चालना मिळावी, यासाठी महाविद्यालयाकडून विविध उपक्रम राबविले जात आहेत. आधुनिक कृषी तंत्रज्ञान, प्रयोगशील शेती, संशोधन आणि शेतकरी सेवा यांचा समन्वय साधत नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे. शिक्षण, संशोधन आणि शेतकरी सेवा यांच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यातील गावांचा कृषी व आर्थिक विकास साधणे हेच महाविद्यालयाचे प्रमुख ध्येय असल्याचे ॲडव्होकेट नितीन ठाकरे यांनी स्पष्ट केले. मविप्र संस्थेच्या कृषी शिक्षणाच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे ग्रामीण विद्यार्थ्यांना आधुनिक कृषी शिक्षणाच्या अधिक चांगल्या संधी उपलब्ध होणार असून, शेतकरी आणि कृषी क्षेत्राशी संबंधित घटकांनाही त्याचा मोठा लाभ होण्याची अपेक्षा आहे. दिव्य भारत बीएसएम न्यूज नाशिक प्रतिनिधी : निलेश शेकोकार, नाशिक दिव्य भारत बीएसएम न्यूज मुख्य संपादक : प्रा. डॉक्टर भागवत महाले
    2
    मविप्र कृषी महाविद्यालयाच्या नूतन वास्तूचे  दिनांक 28 ऑगस्ट ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन
चाचडगाव येथे १४ एकरांच्या प्रशस्त कॅम्पसमध्ये अत्याधुनिक सुविधा; १०९ एकरांवर विद्यार्थ्यांसाठी प्रात्यक्षिक शेती क्षेत्र
मविप्र कृषी महाविद्यालयाच्या नूतन वास्तूचे  दिनांक 28 ऑगस्ट ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन
चाचडगाव येथे १४ एकरांच्या प्रशस्त कॅम्पसमध्ये अत्याधुनिक सुविधा; १०९ एकरांवर विद्यार्थ्यांसाठी प्रात्यक्षिक शेती क्षेत्र
दिव्य भारत बीएसएम न्यूज 
दिनांक २६ ऑगस्ट २०२६ |
नाशिक, (प्रतिनिधी : निलेश शेकोकार):-
मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक संस्थेच्या ‘कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषी महाविद्यालया’च्या नूतन वास्तूचा उद्घाटन सोहळा शुक्रवार, दिनांक . २८ ऑगस्ट २०२६ रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री  देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते चाचडगाव, तालुका दिंडोरी येथे होणार आहे. महाविद्यालयाची मुख्य इमारत  मुलांचे आणि मुलींचे सुसज्ज वसतीगृह या तीन भव्य इमारतींचे उद्घाटन या वेळी करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाची माहिती मविप्र संस्थेचे सरचिटणीस ॲडव्हॅकेट नितीन ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मविप्र संस्थेच्या मध्यवर्ती कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेस संस्थेचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपाध्यक्ष विश्वासराव मोरे, शिक्षणाधिकारी आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री  गिरीश महाजन राहणार आहेत. अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, शालेय शिक्षणमंत्री  दादाजी भुसे, अन्न व औषध प्रशासन मंत्री  नरहरी झिरवाळ, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे,  राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांच्यासह नाशिक जिल्ह्यातील खासदार  राजाराम वाजे,  खासदार भास्कर भगरे, आमदार उपस्थित राहणार आहेत.
नाशिक महापालिकेच्या महापौर श्रीमती हिमगिरी आहेर-आडके व उपमहापौर  विलास शिंदे यांचीही प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या कार्यक्रमास मविप्र संस्थेचे सरचिटणीस ॲडव्होकेट . नितीन ठाकरे, अध्यक्ष डॉक्टर सुनील ढिकले, सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपाध्यक्ष विश्वासराव मोरे, उपसभापती डी. बी. मोगल, चिटणीस दिलीप दळवी, दिंडोरी तालुका संचालक प्रवीण जाधव यांच्यासह संस्थेचे कार्यकारी मंडळ, शिक्षणाधिकारी, सभासद, सेवक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
२००३ पासून कृषी शिक्षणाची वाटचाल नाशिक जिल्हा हा फळे, फुले आणि भाजीपाला उत्पादनासाठी महाराष्ट्रात अग्रगण्य मानला जातो. जिल्ह्यातील कृषी क्षेत्राची गरज लक्षात घेऊन मराठा विद्या प्रसारक समाजाने दिनांक १ नोव्हेंबर २००३ रोजी नाशिक शहरात महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी मान्यताप्राप्त व संलग्नित कृषी महाविद्यालयाची सुरुवात केली. पुढे या महाविद्यालयाचे ‘कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषी महाविद्यालय’ असे नामकरण करण्यात आले.
कृषी शिक्षण केवळ वर्गखोल्यांपुरते मर्यादित न राहता विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शेतीचा अनुभव मिळावा आणि ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा लाभ मिळावा, या उद्देशाने महाविद्यालयाचे नाशिक शहरातून दिंडोरी तालुक्यातील नाशिक-पेठ महामार्गावरील मौजे चाचडगाव येथे स्थलांतर करण्यात आले.
१४ एकरांचा अत्याधुनिक कॅम्पस
चाचडगाव येथे तब्बल १४ एकर जागेवर महाविद्यालयाचा प्रशस्त व आधुनिक कॅम्पस उभारण्यात आला आहे. या परिसरात प्रशासकीय इमारत, मुलांचे व मुलींचे स्वतंत्र वसतीगृह, भव्य ग्रंथालय, ई-लायब्ररी, स्पर्धा परीक्षा मंच, संगणक प्रयोगशाळा तसेच विविध शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
महाविद्यालयातील सर्व दहा विभागांसाठी अद्ययावत प्रयोगशाळा, आधुनिक शिक्षण साहित्याने सुसज्ज व्याख्यान कक्ष, वाय-फाय आणि इंटरनेट सुविधा उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक सुविधांसोबतच निवास आणि अभ्यासासाठी आवश्यक वातावरण निर्माण करण्यात आले आहे.
१०९ एकरांवर प्रात्यक्षिक शेती
कृषी शिक्षणातील सर्वांत महत्त्वाचा भाग म्हणजे प्रत्यक्ष शेतीचा अनुभव. ही गरज लक्षात घेऊन विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिकांसाठी तब्बल १०९ एकर जमीन क्षेत्र तयार करण्यात आले आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध पिकांचे उत्पादन, आधुनिक शेती तंत्रज्ञान, पीक व्यवस्थापन, कृषी प्रयोग, संशोधन आणि शेतकरी मार्गदर्शन यांचा प्रत्यक्ष अनुभव मिळणार आहे.
महाविद्यालयात चार वर्षांचा बी.एस्सी. कृषी पदवी अभ्यासक्रम असून दरवर्षी १२० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. त्याच कॅम्पसमध्ये मराठी माध्यमाचे कृषी विद्यालय आणि इंग्रजी माध्यमाचे कृषी तंत्रनिकेतन विद्यालयही सुरू आहे. त्यामुळे कृषी शिक्षणाची साखळी अधिक सक्षम झाली आहे.
‘अ’ दर्जासह विविध पुरस्कारांनी गौरव
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांनी महाविद्यालयातील शैक्षणिक सुविधा, पायाभूत सुविधा आणि शैक्षणिक गुणवत्तेचा आढावा घेत सन २०२२-२३ मध्ये महाविद्यालयास ‘अ’ दर्जा प्रदान केला. तसेच सन २०२४ मध्ये ‘कृषीभूषण महाराष्ट्र एफपीओ फेडरेशन’तर्फे महाविद्यालयाला ‘कृषीभूषण-२०२४’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
‘KRUSHITHON 2024’मध्ये महाविद्यालयाला ‘प्रयोगशील कृषी महाविद्यालय’ हा पुरस्कार मिळाला. या पुरस्कारांमुळे महाविद्यालयाच्या कृषी शिक्षण, प्रयोगशीलता आणि संशोधनाच्या कार्याला विशेष अधोरेखित करण्यात आले आहे.
संशोधन आणि शेतकरी सेवेला प्राधान्य
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बापूसाहेब भाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली दहा विभागांचे प्रमुख, २८ शिक्षक आणि ४४ शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत आहेत. कृषी क्षेत्रातील बदलत्या तंत्रज्ञानाचा विद्यार्थ्यांना लाभ मिळावा, तसेच संशोधनाला चालना मिळावी, यासाठी महाविद्यालयाकडून विविध उपक्रम राबविले जात आहेत.
आधुनिक कृषी तंत्रज्ञान, प्रयोगशील शेती, संशोधन आणि शेतकरी सेवा यांचा समन्वय साधत नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे. शिक्षण, संशोधन आणि शेतकरी सेवा यांच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यातील गावांचा कृषी व आर्थिक विकास साधणे हेच महाविद्यालयाचे प्रमुख ध्येय असल्याचे ॲडव्होकेट नितीन ठाकरे यांनी स्पष्ट केले.
मविप्र संस्थेच्या कृषी शिक्षणाच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे ग्रामीण विद्यार्थ्यांना आधुनिक कृषी शिक्षणाच्या अधिक चांगल्या संधी उपलब्ध होणार असून, शेतकरी आणि कृषी क्षेत्राशी संबंधित घटकांनाही त्याचा मोठा लाभ होण्याची अपेक्षा आहे.
दिव्य भारत बीएसएम न्यूज 
नाशिक प्रतिनिधी : निलेश शेकोकार, नाशिक
दिव्य भारत बीएसएम न्यूज
मुख्य संपादक : प्रा. डॉक्टर भागवत महाले
    user_दिव्य भारत बीएसएम न्यूज
    दिव्य भारत बीएसएम न्यूज
    Tour Guide नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • १६० कामगारांच्या पुनर्नियुक्तीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण आमदार हिरामण खोसकरांचा पाठिंबा इगतपुरी तालुक्यातील वाडीवरे येथील रुठे यार्ड इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतील सुमारे १६० कामगारांना पुन्हा कामावर घ्यावे, तसेच अनेक वर्षांपासून नियमित उत्पादनाचे काम करणाऱ्या या कामगारांना कायम कामगारांप्रमाणे वेतन व अन्य लाभ द्यावेत, या प्रमुख मागणीसाठी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे. या आंदोलनाला इगतपुरी मतदार संघाचे आमदार हिरामण खोसकर यांनी पाठिंबा दर्शवला असून कंपनीतील हे सुमारे १६० कामगार गेल्या अनेक वर्षांपासून उत्पादन विभागात मशीन ऑपरेशनसह विविध नियमित स्वरूपाची कामे सातत्याने करत असल्याचा दावा कामगार संघटनेने केला आहे. मात्र, एवढ्या काळापासून कंपनीच्या उत्पादन प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावूनही त्यांच्या प्रश्नांकडे व्यवस्थापनाकडून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. कामगारांच्या मागण्यांसंदर्भात नाशिक वर्कर्स युनियन सिटी संलग्न संघटनेने १३ मे २०२६ रोजी कामगार आयुक्त, नाशिक विभाग यांच्याकडे निवेदन सादर केले होते. संबंधित कामगारांना पुन्हा कामावर घेऊन कायम कामगारांप्रमाणे वेतन, सेवा-सुविधा आणि अन्य लाभ देण्यात यावेत, अशी मागणी त्यामध्ये करण्यात आली होती. दरम्यान, कंत्राटी पद्धतीचे निर्मूलन करण्याबाबतचा प्रस्ताव कामगार विभागाने राज्य सरकारकडे सादर केला असल्याचे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले. त्यामुळे कंपनीतील कामगारांच्या रोजगाराच्या स्वरूपाबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात येत असून, नियमित स्वरूपाचे काम करणाऱ्या कामगारांना योग्य सेवा-सुरक्षा आणि लाभ मिळावेत, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. या प्रश्नावर कंपनी व्यवस्थापनासोबत वेळोवेळी चर्चा करून तोडगा काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, व्यवस्थापनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नसल्याचा आरोप आमदार हिरामण खोसकर यांनी केला असून कामगारांच्या मागण्यांवर ठोस निर्णय होऊन त्यांना न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार, असा इशाराही त्यांनी दिला दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू झालेल्या या बेमुदत उपोषणामुळे १६० कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, कंपनी व्यवस्थापन आणि प्रशासन या आंदोलनाची कशी दखल घेते, याकडे कामगारांचे लक्ष लागले आहे.
    4
    १६० कामगारांच्या पुनर्नियुक्तीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण

आमदार हिरामण खोसकरांचा पाठिंबा
इगतपुरी तालुक्यातील वाडीवरे येथील रुठे यार्ड इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतील सुमारे १६० कामगारांना पुन्हा कामावर घ्यावे, तसेच अनेक वर्षांपासून नियमित उत्पादनाचे काम करणाऱ्या या कामगारांना कायम कामगारांप्रमाणे वेतन व अन्य लाभ द्यावेत, या प्रमुख मागणीसाठी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे. या आंदोलनाला इगतपुरी मतदार संघाचे आमदार हिरामण खोसकर यांनी पाठिंबा  दर्शवला असून 
कंपनीतील हे सुमारे १६० कामगार गेल्या अनेक वर्षांपासून उत्पादन विभागात मशीन ऑपरेशनसह विविध नियमित स्वरूपाची कामे सातत्याने करत असल्याचा दावा कामगार संघटनेने केला आहे. मात्र, एवढ्या काळापासून कंपनीच्या उत्पादन प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावूनही त्यांच्या प्रश्नांकडे व्यवस्थापनाकडून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.
कामगारांच्या मागण्यांसंदर्भात नाशिक वर्कर्स युनियन सिटी संलग्न संघटनेने १३ मे २०२६ रोजी कामगार आयुक्त, नाशिक विभाग यांच्याकडे निवेदन सादर केले होते. संबंधित कामगारांना पुन्हा कामावर घेऊन कायम कामगारांप्रमाणे वेतन, सेवा-सुविधा आणि अन्य लाभ देण्यात यावेत, अशी मागणी त्यामध्ये करण्यात आली होती.
दरम्यान, कंत्राटी पद्धतीचे निर्मूलन करण्याबाबतचा प्रस्ताव कामगार विभागाने राज्य सरकारकडे सादर केला असल्याचे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले. त्यामुळे कंपनीतील कामगारांच्या रोजगाराच्या स्वरूपाबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात येत असून, नियमित स्वरूपाचे काम करणाऱ्या कामगारांना योग्य सेवा-सुरक्षा आणि लाभ मिळावेत, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे.
या प्रश्नावर कंपनी व्यवस्थापनासोबत वेळोवेळी चर्चा करून तोडगा काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, व्यवस्थापनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नसल्याचा आरोप आमदार हिरामण खोसकर यांनी केला असून कामगारांच्या मागण्यांवर ठोस निर्णय होऊन त्यांना न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार, असा इशाराही त्यांनी दिला 
दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू झालेल्या या बेमुदत उपोषणामुळे १६० कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, कंपनी व्यवस्थापन आणि प्रशासन या आंदोलनाची कशी दखल घेते, याकडे कामगारांचे लक्ष लागले आहे.
    user_Anil GUNJAL
    Anil GUNJAL
    नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • मोठामाळ–श्रीभुवन परिसर पर्यटनस्थळ म्हणून विकसित करा; ग्रामस्थांची मागणी मोठामाळ–श्रीभुवन परिसर पर्यटनस्थळ म्हणून विकसित करा; ग्रामस्थांची मागणी प्रतिनिधी बोरगाव. जय गांगुर्डे गुजरात-महाराष्ट्र सीमेवरील मोठामाळ, श्रीभुवन परिसरात निसर्गसौंदर्याची मोठी देणगी असून, या भागाचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. गुजरात राज्यातील सापुतारा पर्यटनस्थळाचा मोठ्या प्रमाणावर विकास करण्यात आला आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्र हद्दीतील वनविभागाच्या जागेचा योग्य नियोजनातून पर्यटनासाठी विकास केल्यास या परिसराला नवी ओळख मिळू शकते, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली. मोठामाळ–श्रीभुवन परिसरात नैसर्गिक सौंदर्य, डोंगररांगा आणि हिरवाई असल्याने पर्यटकांना आकर्षित करण्याची क्षमता आहे. वनविभागाने या परिसराची पाहणी करून पर्यटनाच्या दृष्टीने आवश्यक नियोजन करावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे. परिसराचा पर्यटनस्थळ म्हणून विकास झाल्यास स्थानिक युवकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होऊ शकतात. तसेच हॉटेल, खाद्यपदार्थ, स्थानिक उत्पादने, वाहतूक व इतर पूरक व्यवसायांना चालना मिळून स्थानिक अर्थव्यवस्थेलाही मोठा फायदा होईल. त्यामुळे वनविभाग व संबंधित प्रशासनाने या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन मोठामाळ–श्रीभुवन परिसराच्या पर्यटन विकासासाठी ठोस प्रयत्न करावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    4
    मोठामाळ–श्रीभुवन परिसर पर्यटनस्थळ म्हणून विकसित करा; ग्रामस्थांची मागणी

मोठामाळ–श्रीभुवन परिसर पर्यटनस्थळ म्हणून विकसित करा; ग्रामस्थांची मागणी
प्रतिनिधी बोरगाव. जय गांगुर्डे 
गुजरात-महाराष्ट्र सीमेवरील मोठामाळ, श्रीभुवन परिसरात निसर्गसौंदर्याची मोठी देणगी असून, या भागाचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. गुजरात राज्यातील सापुतारा पर्यटनस्थळाचा मोठ्या प्रमाणावर विकास करण्यात आला आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्र हद्दीतील वनविभागाच्या जागेचा योग्य नियोजनातून पर्यटनासाठी विकास केल्यास या परिसराला नवी ओळख मिळू शकते, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली.
मोठामाळ–श्रीभुवन परिसरात नैसर्गिक सौंदर्य, डोंगररांगा आणि हिरवाई असल्याने पर्यटकांना आकर्षित करण्याची क्षमता आहे. वनविभागाने या परिसराची पाहणी करून पर्यटनाच्या दृष्टीने आवश्यक नियोजन करावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.
परिसराचा पर्यटनस्थळ म्हणून विकास झाल्यास स्थानिक युवकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होऊ शकतात. तसेच हॉटेल, खाद्यपदार्थ, स्थानिक उत्पादने, वाहतूक व इतर पूरक व्यवसायांना चालना मिळून स्थानिक अर्थव्यवस्थेलाही मोठा फायदा होईल. त्यामुळे वनविभाग व संबंधित प्रशासनाने या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन मोठामाळ–श्रीभुवन परिसराच्या पर्यटन विकासासाठी ठोस प्रयत्न करावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    user_जय राजू गांगुर्डे
    जय राजू गांगुर्डे
    सुरगाणा, नाशिक, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • खुपरीत केमिकलची गळती! दुर्गंधीमुळे कामगारांना त्रास; काहींना रुग्णालयात दाखल | वाडा वाडा तालुक्यातील खुपरी परिसरातून एक गंभीर घटना समोर आली आहे. इको ग्रीन कंपनीत केमिकल घेऊन जाणाऱ्या वाहनाला गळती लागल्याने रस्त्यावर केमिकल सांडल्याची घटना घडली. या केमिकलमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली. त्याचा परिणाम आजूबाजूच्या कंपन्यांमधील कामगार तसेच स्थानिक नागरिकांवर झाल्याचे सांगण्यात येत आहे. दुर्गंधीचा त्रास वाढल्याने जवळील कंपनीतील काही कामगारांना कल्याणी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच वाडा पोलीस ठाण्याचे नवनियुक्त सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश कदम यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. त्यांनी परिस्थितीची पाहणी करून घटनेचा पंचनामा करण्याची कार्यवाही केली. तसेच संबंधित कंपनीविरोधात नियमाप्रमाणे आवश्यक ती कारवाई लवकरच करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आल्याचे समजते. या घटनेनंतर खुपरी परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, वाडा तालुक्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिक कंपन्या आणि केमिकलशी संबंधित उद्योग आहेत. त्यामुळे अशा घटनांमध्ये कामगार आणि स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. केमिकल हाताळताना आणि वाहतूक करताना संबंधित कंपन्यांकडून सर्व सुरक्षा नियमांचे पालन केले जाते का? गळती किंवा अपघात झाल्यास तातडीच्या उपाययोजनांची व्यवस्था कंपन्यांकडे आहे का? आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे, नियमांचे उल्लंघन होत असल्यास संबंधित विभाग आणि पोलीस प्रशासन अशा कंपन्यांवर कठोर कारवाई करणार का? याकडे आता स्थानिक नागरिकांचे
    4
    खुपरीत केमिकलची गळती! दुर्गंधीमुळे कामगारांना त्रास; काहींना रुग्णालयात दाखल | वाडा
वाडा तालुक्यातील खुपरी परिसरातून एक गंभीर घटना समोर आली आहे. इको ग्रीन कंपनीत केमिकल घेऊन जाणाऱ्या वाहनाला गळती लागल्याने रस्त्यावर केमिकल सांडल्याची घटना घडली.
या केमिकलमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली. त्याचा परिणाम आजूबाजूच्या कंपन्यांमधील कामगार तसेच स्थानिक नागरिकांवर झाल्याचे सांगण्यात येत आहे.
दुर्गंधीचा त्रास वाढल्याने जवळील कंपनीतील काही कामगारांना कल्याणी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
घटनेची माहिती मिळताच वाडा पोलीस ठाण्याचे नवनियुक्त सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश कदम यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. त्यांनी परिस्थितीची पाहणी करून घटनेचा पंचनामा करण्याची कार्यवाही केली.
तसेच संबंधित कंपनीविरोधात नियमाप्रमाणे आवश्यक ती कारवाई लवकरच करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आल्याचे समजते.
या घटनेनंतर खुपरी परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
दरम्यान, वाडा तालुक्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिक कंपन्या आणि केमिकलशी संबंधित उद्योग आहेत. त्यामुळे अशा घटनांमध्ये कामगार आणि स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
केमिकल हाताळताना आणि वाहतूक करताना संबंधित कंपन्यांकडून सर्व सुरक्षा नियमांचे पालन केले जाते का?
गळती किंवा अपघात झाल्यास तातडीच्या उपाययोजनांची व्यवस्था कंपन्यांकडे आहे का?
आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे, नियमांचे उल्लंघन होत असल्यास संबंधित विभाग आणि पोलीस प्रशासन अशा कंपन्यांवर कठोर कारवाई करणार का?
याकडे आता स्थानिक नागरिकांचे
    user_Sanvad Maharashtra News
    Sanvad Maharashtra News
    वाडा, पालघर, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आमरण उपोषण पाचव्या दिवशी; खासदार भास्कर भगरे यांचा पाठिंबा विविध प्रलंबित मागण्यांसाठी सकल आदिवासी विद्यार्थी आंदोलन कृती समिती, महाराष्ट्र राज्याच्या वतीने नाशिकच्या गोल्फ क्लब मैदानावर सुरू असलेल्या आमरण उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे. विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सुरू असलेल्या या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने पाठिंबा दिला आहे. खासदार भास्कर भगरे यांनी उपोषणस्थळी भेट देत आंदोलक विद्यार्थ्यांची विचारपूस केली. अनुदानित आश्रमशाळा, शासकीय आश्रमशाळा तसेच वसतिगृहांमध्ये विद्यार्थ्यांच्या मृत्यूच्या आणि घडलेल्या इतर गंभीर घटनांच्या पार्श्वभूमीवर उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी प्रमुख मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, या घटनांची जबाबदारी निश्चित करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणीही आंदोलकांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, निष्पाप मृत्यू झालेल्या तीन विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक कोटी रुपये नुकसानभरपाई द्यावी, तर सध्या उपचार सुरू असलेल्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी ५० लाख रुपये नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. याशिवाय ५ ऑगस्ट २०२० आणि सुधारित १४ ऑगस्ट २०१९ चे शासन निर्णय रद्द करावेत, अशीही मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. या विविध मागण्यांसाठी विद्यार्थी आमरण उपोषणावर ठाम असून, शासनाने तातडीने दखल घेऊन सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी खासदार भास्कर भगरे यांनी गोल्फ क्लब मैदानावरील उपोषणस्थळी भेट दिली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या समस्या आणि मागण्या जाणून घेतल्या. विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी तसेच त्यांच्या मागण्यांवर ठोस कारवाई व्हावी यासाठी आगामी काळात शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे खासदार भगरे यांनी सांगितले. पाचव्या दिवशीही विद्यार्थी आमरण उपोषणावर ठाम असल्याने आता शासन या आंदोलनाची कितपत दखल घेते आणि मागण्यांवर काय निर्णय घेतला जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
    4
    आदिवासी विद्यार्थ्यांचे आमरण उपोषण पाचव्या दिवशी; 

खासदार भास्कर भगरे यांचा पाठिंबा
विविध प्रलंबित मागण्यांसाठी सकल आदिवासी विद्यार्थी आंदोलन कृती समिती, महाराष्ट्र राज्याच्या वतीने नाशिकच्या गोल्फ क्लब मैदानावर सुरू असलेल्या आमरण उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे. विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सुरू असलेल्या या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने पाठिंबा दिला आहे. खासदार भास्कर भगरे यांनी उपोषणस्थळी भेट देत आंदोलक विद्यार्थ्यांची विचारपूस केली.
अनुदानित आश्रमशाळा, शासकीय आश्रमशाळा तसेच वसतिगृहांमध्ये विद्यार्थ्यांच्या मृत्यूच्या आणि घडलेल्या इतर गंभीर घटनांच्या पार्श्वभूमीवर उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी प्रमुख मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, या घटनांची जबाबदारी निश्चित करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणीही आंदोलकांकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, निष्पाप मृत्यू झालेल्या तीन विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक कोटी रुपये नुकसानभरपाई द्यावी, तर सध्या उपचार सुरू असलेल्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी ५० लाख रुपये नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय ५ ऑगस्ट २०२० आणि सुधारित १४ ऑगस्ट २०१९ चे शासन निर्णय रद्द करावेत, अशीही मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. या विविध मागण्यांसाठी विद्यार्थी आमरण उपोषणावर ठाम असून, शासनाने तातडीने दखल घेऊन सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी खासदार भास्कर भगरे यांनी गोल्फ क्लब मैदानावरील उपोषणस्थळी भेट दिली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या समस्या आणि मागण्या जाणून घेतल्या. विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी तसेच त्यांच्या मागण्यांवर ठोस कारवाई व्हावी यासाठी आगामी काळात शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे खासदार भगरे यांनी सांगितले.
पाचव्या दिवशीही विद्यार्थी आमरण उपोषणावर ठाम असल्याने आता शासन या आंदोलनाची कितपत दखल घेते आणि मागण्यांवर काय निर्णय घेतला जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
    user_Anil GUNJAL
    Anil GUNJAL
    नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • मित्रांमध्ये झालेली किरकोळ बोलाचाली पाहता पाहता उग्र वादात रूपांतरित झाली. या वादातून २७ वर्षीय हेमंत विलास सूर्यवंशी याच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला. घटनेची माहिती मिळताच सापुतारा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला.
    1
    मित्रांमध्ये झालेली किरकोळ बोलाचाली पाहता पाहता उग्र वादात रूपांतरित झाली. या वादातून २७ वर्षीय हेमंत विलास सूर्यवंशी याच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला. घटनेची माहिती मिळताच सापुतारा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला.
    user_Laxman Kisan bagul
    Laxman Kisan bagul
    Advertising agency सुरगाणा, नाशिक, महाराष्ट्र•
    7 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.