logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

येवल्यात श्रीराम आंजनेय स्वामी मूर्ती प्राणप्रतिष्ठा व श्रीराम कथेचा जयघोष; भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण शहरातील देसाई ड्रीम सिटी, विठ्ठल नगर भागात नवनिर्मित श्रीराम आंजनेय स्वामी मंदिराचा भव्य प्राणप्रतिष्ठापना सोहळा आणि श्रीराम कथा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या धार्मिक कार्यक्रमाची माहिती नगरसेवकडॉक्टर संकेत शिंदे यांनी दिली असून, या सोहळ्यानिमित्त परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. ​येत्या २२ एप्रिल रोजी अंजनेरी पर्वत ते येवला अशी 'मशाल यात्रा' काढून उत्सवाचा प्रारंभ होईल. २४ एप्रिल रोजी भव्य शोभायात्रा काढण्यात येणार असून, २५ ते २९ एप्रिल दरम्यान दररोज सायंकाळी ७ ते ११ या वेळेत अयोध्या येथील प्रसिद्ध कथाकार पूज्या लक्ष्मी प्रिया जी यांच्या सुश्राव्य वाणीतून 'श्रीराम कथा' साकारली जाणार आहे. ​या सोहळ्याचे मुख्य आकर्षण २९ एप्रिल रोजी होणारा मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण विधी असेल. हा विधी शिवगिरी जी महाराज, जनेश्वरानंद गिरीजी महाराज आणि संदीप गिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे. ३० एप्रिल रोजी ह.भ.प. सुवर्णामाई जमधडे यांचे कीर्तन व महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होईल. ​नगरसेवक डॉक्टर संकेत शिंदे यांनी सांगितले की, या सोहळ्यासाठी भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित असून तयारी जोमाने सुरू आहे. या मंगलप्रसंगी परिसरातील सर्व भाविकांनी श्रीराम कथेचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक श्रीराम आंजनेय स्वामी मंदिर समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

on 13 April
user_Sachin Dilip Wakhare
Sachin Dilip Wakhare
Reporter येवला, नाशिक, महाराष्ट्र•
on 13 April

येवल्यात श्रीराम आंजनेय स्वामी मूर्ती प्राणप्रतिष्ठा व श्रीराम कथेचा जयघोष; भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण शहरातील देसाई ड्रीम सिटी, विठ्ठल नगर भागात नवनिर्मित श्रीराम आंजनेय स्वामी मंदिराचा भव्य प्राणप्रतिष्ठापना सोहळा आणि श्रीराम कथा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या धार्मिक कार्यक्रमाची माहिती नगरसेवकडॉक्टर संकेत शिंदे यांनी दिली असून, या सोहळ्यानिमित्त परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. ​येत्या २२ एप्रिल रोजी अंजनेरी पर्वत ते येवला अशी 'मशाल यात्रा' काढून उत्सवाचा प्रारंभ होईल. २४ एप्रिल रोजी भव्य शोभायात्रा काढण्यात येणार असून, २५ ते २९ एप्रिल दरम्यान दररोज सायंकाळी ७ ते ११ या वेळेत अयोध्या येथील प्रसिद्ध कथाकार पूज्या लक्ष्मी प्रिया जी यांच्या सुश्राव्य वाणीतून 'श्रीराम कथा' साकारली जाणार आहे. ​या सोहळ्याचे मुख्य आकर्षण २९ एप्रिल रोजी होणारा मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण विधी असेल. हा विधी शिवगिरी जी महाराज, जनेश्वरानंद गिरीजी महाराज आणि संदीप गिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे. ३० एप्रिल रोजी ह.भ.प. सुवर्णामाई जमधडे यांचे कीर्तन व महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होईल. ​नगरसेवक डॉक्टर संकेत शिंदे यांनी सांगितले की, या सोहळ्यासाठी भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित असून तयारी जोमाने सुरू आहे. या मंगलप्रसंगी परिसरातील सर्व भाविकांनी श्रीराम कथेचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक श्रीराम आंजनेय स्वामी मंदिर समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • ​नाशिकच्या येवला येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजवंदन सोहळा सुरू असताना एका आंदोलकाने आत्मदहनाचा प्रयत्न केला. येवला तालुक्यातील वडगाव येथील अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या रस्त्याच्या मागणीकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे टोकाचे पाऊल उचलण्यात आले. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला, मात्र या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला
    2
    ​नाशिकच्या येवला येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजवंदन सोहळा सुरू असताना एका आंदोलकाने आत्मदहनाचा प्रयत्न केला. येवला तालुक्यातील वडगाव येथील अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या रस्त्याच्या मागणीकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे टोकाचे पाऊल उचलण्यात आले. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला, मात्र या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला
    user_Sachin Dilip Wakhare
    Sachin Dilip Wakhare
    Reporter येवला, नाशिक, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • 📍तळेगाव दाभाडे | संविधान भूमी एक मे महाराष्ट्र दिन, आंतरराष्ट्रीय कामगार दिन आणि बुद्ध पौर्णिमेच्या पावन निमित्ताने गिरीश दादा गेडाम यांनी तळेगाव दाभाडे येथील संविधान भूमीला भावपूर्ण भेट दिली. ज्या भूमीतून सामाजिक आणि राजकीय कार्याची प्रेरणा मिळाली, त्या संविधान भूमीला भेट देत त्यांनी आपल्या संघर्षमय प्रवासाच्या आठवणींना उजाळा दिला. संविधान मूल्ये, सामाजिक न्याय आणि परिवर्तनाच्या विचारांना समर्पित असलेल्या या प्रेरणास्थळी उपस्थित कार्यकर्त्यांनीही संविधान जपण्याचा आणि समाजहितासाठी कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला. #GirishDadaGedam #संविधानभूमी #MaharashtraDay #कामगारदिन #BuddhaPurnima #Samvidhan #SocialJustice #TalegaonDabhade #महाराष्ट्रदिन #संविधान #BabasahebAmbedkar #जयभीम #PoliticalNews #SocialWork #ViralNews #TrendingNews #YouTubeNews #MaharashtraPolitics
    1
    📍तळेगाव दाभाडे | संविधान भूमी
एक मे महाराष्ट्र दिन, आंतरराष्ट्रीय कामगार दिन आणि बुद्ध पौर्णिमेच्या पावन निमित्ताने गिरीश दादा गेडाम यांनी तळेगाव दाभाडे येथील संविधान भूमीला भावपूर्ण भेट दिली. ज्या भूमीतून सामाजिक आणि राजकीय कार्याची प्रेरणा मिळाली, त्या संविधान भूमीला भेट देत त्यांनी आपल्या संघर्षमय प्रवासाच्या आठवणींना उजाळा दिला.
संविधान मूल्ये, सामाजिक न्याय आणि परिवर्तनाच्या विचारांना समर्पित असलेल्या या प्रेरणास्थळी उपस्थित कार्यकर्त्यांनीही संविधान जपण्याचा आणि समाजहितासाठी कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला.
#GirishDadaGedam #संविधानभूमी #MaharashtraDay #कामगारदिन #BuddhaPurnima #Samvidhan #SocialJustice #TalegaonDabhade #महाराष्ट्रदिन #संविधान #BabasahebAmbedkar #जयभीम #PoliticalNews #SocialWork #ViralNews #TrendingNews #YouTubeNews #MaharashtraPolitics
    user_डिजिटल शिवस्वराज्य न्यूज
    डिजिटल शिवस्वराज्य न्यूज
    Local News Reporter Niphad, Nashik•
    7 hrs ago
  • Post by Gani Bhai
    1
    Post by Gani Bhai
    user_Gani Bhai
    Gani Bhai
    मालेगाव, नाशिक, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • 📍 स्थान – नवापुर नंदुरबार जिले के नवापुर तालुका में बर्ड फ्लू यानी एच5एन1 संक्रमण की गंभीर पुष्टि होने के बाद प्रशासन पूरी तरह अलर्ट मोड पर आ गया है। डायमंड, डॉन और तसरीन नाम के तीन पोल्ट्री फार्म में संक्रमण मिलने के बाद तुरंत आपात प्रतिबंधात्मक कार्रवाई शुरू कर दी गई है। प्रशासन ने कानून के तहत सख्त कदम उठाते हुए प्रभावित क्षेत्र को 1 किलोमीटर संक्रमित क्षेत्र और 10 किलोमीटर निगरानी क्षेत्र घोषित कर दिया है। इन आदेशों का उल्लंघन करने वालों पर आपदा प्रबंधन अधिनियम और पशु रोग नियंत्रण कानून के तहत कठोर कार्रवाई की चेतावनी दी गई है। संक्रमण फैलाव रोकने के लिए प्रभावित क्षेत्र में सभी पोल्ट्री पक्षियों का कुलिंग ऑपरेशन (निर्मूलन) जारी है और पशुपालन विभाग द्वारा बड़े स्तर पर सैनिटाइजेशन और जांच अभियान चलाया जा रहा है। स्थिति की गंभीरता को देखते हुए प्रशासन ने मुर्गी और अन्य पोल्ट्री पक्षियों की खरीद-फरोख्त, परिवहन और बाजारों को अस्थायी रूप से बंद करने के आदेश जारी किए हैं। यह निर्णय सार्वजनिक स्वास्थ्य और संक्रमण नियंत्रण के लिए अनिवार्य बताया गया है। नागरिकों के लिए स्पष्ट चेतावनी जारी की गई है: • अफवाहें फैलाने से बचें • संक्रमित क्षेत्र में अनावश्यक आवाजाही न करें • बीमार या मृत पक्षी दिखने पर तुरंत प्रशासन को सूचना दें प्रशासन ने जनता से सतर्क रहने और सरकारी निर्देशों का सख्ती से पालन करने की अपील की है। नियमों का उल्लंघन करने पर कानूनी कार्रवाई तय है।
    4
    📍 स्थान – नवापुर
नंदुरबार जिले के नवापुर तालुका में बर्ड फ्लू यानी एच5एन1 संक्रमण की गंभीर पुष्टि होने के बाद प्रशासन पूरी तरह अलर्ट मोड पर आ गया है। डायमंड, डॉन और तसरीन नाम के तीन पोल्ट्री फार्म में संक्रमण मिलने के बाद तुरंत आपात प्रतिबंधात्मक कार्रवाई शुरू कर दी गई है।
प्रशासन ने कानून के तहत सख्त कदम उठाते हुए प्रभावित क्षेत्र को 1 किलोमीटर संक्रमित क्षेत्र और 10 किलोमीटर निगरानी क्षेत्र घोषित कर दिया है। इन आदेशों का उल्लंघन करने वालों पर आपदा प्रबंधन अधिनियम और पशु रोग नियंत्रण कानून के तहत कठोर कार्रवाई की चेतावनी दी गई है।
संक्रमण फैलाव रोकने के लिए प्रभावित क्षेत्र में सभी पोल्ट्री पक्षियों का कुलिंग ऑपरेशन (निर्मूलन) जारी है और पशुपालन विभाग द्वारा बड़े स्तर पर सैनिटाइजेशन और जांच अभियान चलाया जा रहा है।
स्थिति की गंभीरता को देखते हुए प्रशासन ने मुर्गी और अन्य पोल्ट्री पक्षियों की खरीद-फरोख्त, परिवहन और बाजारों को अस्थायी रूप से बंद करने के आदेश जारी किए हैं। यह निर्णय सार्वजनिक स्वास्थ्य और संक्रमण नियंत्रण के लिए अनिवार्य बताया गया है।
नागरिकों के लिए स्पष्ट चेतावनी जारी की गई है:
• अफवाहें फैलाने से बचें
• संक्रमित क्षेत्र में अनावश्यक आवाजाही न करें
• बीमार या मृत पक्षी दिखने पर तुरंत प्रशासन को सूचना दें
प्रशासन ने जनता से सतर्क रहने और सरकारी निर्देशों का सख्ती से पालन करने की अपील की है।
नियमों का उल्लंघन करने पर कानूनी कार्रवाई तय है।
    user_Abhijeet KOLHE
    Abhijeet KOLHE
    Mill Owner नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • नाशिक येथे महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते ध्वज फडकावण्यात आला, तर पोलिस दलाने मानवंदना दिली. यावेळी अपर जिल्हाधिकारी हेमांगी पाटील, विविध उपविभागीय अधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार तसेच इतर विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वांना महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. पोलीस बॅन्डने वंदे मातरम्, राष्ट्रगीत व राज्यगीताच्या धून सादर केल्या.
    1
    नाशिक येथे महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते ध्वज फडकावण्यात आला, तर पोलिस दलाने मानवंदना दिली. यावेळी अपर जिल्हाधिकारी हेमांगी पाटील, विविध उपविभागीय अधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार तसेच इतर विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वांना महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. पोलीस बॅन्डने वंदे मातरम्, राष्ट्रगीत व राज्यगीताच्या धून सादर केल्या.
    user_Kapil Katyare
    Kapil Katyare
    Photographer नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • सम्यागढ़ में एक शादी समारोह के दौरान अचानक माहौल बिगड़ गया जब छेड़खानी को लेकर विवाद शुरू हो गया। देखते ही देखते यह विवाद इतना बढ़ गया कि मौके पर अफरा-तफरी मच गई और फायरिंग की खबर सामने आई। इस वीडियो में जानिए पूरा मामला, क्या हुआ शादी में और कैसे एक खुशी का माहौल अचानक तनाव में बदल गया। 👉 वीडियो को अंत तक देखें और अपनी राय कमेंट में जरूर बताएं।
    1
    सम्यागढ़ में एक शादी समारोह के दौरान अचानक माहौल बिगड़ गया जब छेड़खानी को लेकर विवाद शुरू हो गया। देखते ही देखते यह विवाद इतना बढ़ गया कि मौके पर अफरा-तफरी मच गई और फायरिंग की खबर सामने आई।
इस वीडियो में जानिए पूरा मामला, क्या हुआ शादी में और कैसे एक खुशी का माहौल अचानक तनाव में बदल गया।
👉 वीडियो को अंत तक देखें और अपनी राय कमेंट में जरूर बताएं।
    user_शीतल कुमार सिंह
    शीतल कुमार सिंह
    Local News Reporter नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • मुंबई - पुणे मिसिंग लिंक आजपासून जनतेच्या सेवेत ...
    1
    मुंबई - पुणे मिसिंग लिंक आजपासून जनतेच्या सेवेत ...
    user_अरबाज शेख.सावरगाव कर
    अरबाज शेख.सावरगाव कर
    Voice of people उंबेरखेडा तांडा•
    16 hrs ago
  • महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून कुणाल दराडे फाउंडेशनच्या वतीने येवला शहरात आयोजित करण्यात आलेला 'झांज-ढोल' पथकाचा विराट सोहळा अत्यंत दिमाखात संपन्न झाला. डॉ. कविता कुणाल दराडे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या सोहळ्याचा समारोप शिवसृष्टी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून व अभिवादन करून करण्यात आला. ​शुक्रवारी सकाळी 8 वाजता टिळक मैदान येथून या भव्य मिरवणुकीचा प्रारंभ झाला. यावेळी मराठी अभिनेत्री मानसी नाईक यांची प्रमुख उपस्थिती नागरिकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरली. पारंपारिक नऊवारी साड्या आणि फेटे परिधान केलेल्या शेकडो महिलांनी झांज पथकाच्या तालावर सादर केलेले कसब पाहून येवलेकर मंत्रमुग्ध झाले. ढोल-ताशांच्या कडकडाटाने आणि 'जय भवानी, जय शिवाजी'च्या जयघोषाने अवघे शहर शिवमय झाले होते. ​ही मिरवणूक आझाद चौक, राणाप्रताप पुतळा आणि मेनरोड मार्गे विंचूर चौफुलीवरून शिवसृष्टी येथे पोहोचली. या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. "महाराष्ट्राची संस्कृती आणि अस्मिता जतन करण्यासाठी अशा उपक्रमांची गरज आहे," अशी भावना आयोजक कुणाल दराडे यांनी व्यक्त केली. या सोहळ्यासाठी येवल्यातील नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी केली होती.
    4
    महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून कुणाल दराडे फाउंडेशनच्या वतीने येवला शहरात आयोजित करण्यात आलेला 'झांज-ढोल' पथकाचा विराट सोहळा अत्यंत दिमाखात संपन्न झाला. डॉ. कविता कुणाल दराडे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या सोहळ्याचा समारोप शिवसृष्टी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून व अभिवादन करून करण्यात आला.
​शुक्रवारी सकाळी 8 वाजता टिळक मैदान येथून या भव्य मिरवणुकीचा प्रारंभ झाला. यावेळी मराठी अभिनेत्री मानसी नाईक यांची प्रमुख उपस्थिती नागरिकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरली. पारंपारिक नऊवारी साड्या आणि फेटे परिधान केलेल्या शेकडो महिलांनी झांज पथकाच्या तालावर सादर केलेले कसब पाहून येवलेकर मंत्रमुग्ध झाले. ढोल-ताशांच्या कडकडाटाने आणि 'जय भवानी, जय शिवाजी'च्या जयघोषाने अवघे शहर शिवमय झाले होते.
​ही मिरवणूक आझाद चौक, राणाप्रताप पुतळा आणि मेनरोड मार्गे विंचूर चौफुलीवरून शिवसृष्टी येथे पोहोचली. या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. "महाराष्ट्राची संस्कृती आणि अस्मिता जतन करण्यासाठी अशा उपक्रमांची गरज आहे," अशी भावना आयोजक कुणाल दराडे यांनी व्यक्त केली. या सोहळ्यासाठी येवल्यातील नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी केली होती.
    user_Sachin Dilip Wakhare
    Sachin Dilip Wakhare
    Reporter येवला, नाशिक, महाराष्ट्र•
    20 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.