logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

यावल शहरात वीज वितरण कंपनीकडून थकबाकी वसुली आणि मीटर तपासणी करून नवीन मीटर बदलविण्याची मोहीम धडाक्यात सुरू.

3 hrs ago
user_सुरेश जगन्नाथ पाटील.
सुरेश जगन्नाथ पाटील.
यावल, जळगाव, महाराष्ट्र•
3 hrs ago
2d41f969-22b3-40fb-89c4-611156185bc9

यावल शहरात वीज वितरण कंपनीकडून थकबाकी वसुली आणि मीटर तपासणी करून नवीन मीटर बदलविण्याची मोहीम धडाक्यात सुरू.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • सोयगाव पंचायत समिती सभापतीपदी उत्तम चव्हाण; उपसभापतीपदी गयाबाई घोडे सोयगाव प्रतिनिधी : सोयगाव पंचायत समितीच्या सभापतीपदी भारतीय जनता पक्षाचे उत्तम महारू चव्हाण यांची तर उपसभापतीपदी शिवसेना (शिंदे गट) च्या गयाबाई गोविंदा घोडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीमुळे सोयगाव पंचायत समितीवर भाजप-शिवसेना (शिंदे) युतीची सत्ता प्रस्थापित झाली आहे. मंगळवारी (दि. १० मार्च) पंचायत समिती सभागृहात ही निवड प्रक्रिया पार पडली. पीठासीन अधिकारी एकनाथ बांबळे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक घेण्यात आली. सभापती पदासाठी उत्तम चव्हाण यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता, तर उपसभापती पदासाठी गयाबाई गोविंदा घोडे यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने दोघांचीही बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. निवड जाहीर होताच कार्यकर्त्यांनी जल्लोष करत एकमेकांचे अभिनंदन केले. यावेळी ईदरीस मुलतानी, पुष्पाताई काळे नारायण कोलते, शिवाजी बुढाळ, प्रदीप चव्हाण, दारासिंग शेषमल चव्हाण, रहीम पठाण, गुलाबराव कोलते, जयप्रकाश चव्हाण, गणेश लोखंडे, युसुफ पठाण, शेख निसार, मोहम्मद नूर, अजित खान, अजीज खान, हरी भांबरे, प्रभाकर सूर्यवंशी व भाजपा तालुका अध्यक्ष उपाध्यक्ष व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
    1
    सोयगाव पंचायत समिती सभापतीपदी उत्तम चव्हाण; उपसभापतीपदी गयाबाई घोडे
सोयगाव प्रतिनिधी :
सोयगाव पंचायत समितीच्या सभापतीपदी भारतीय जनता पक्षाचे उत्तम महारू चव्हाण यांची तर उपसभापतीपदी शिवसेना (शिंदे गट) च्या गयाबाई गोविंदा घोडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीमुळे सोयगाव पंचायत समितीवर भाजप-शिवसेना (शिंदे) युतीची सत्ता प्रस्थापित झाली आहे.
मंगळवारी (दि. १० मार्च) पंचायत समिती सभागृहात ही निवड प्रक्रिया पार पडली. पीठासीन अधिकारी एकनाथ बांबळे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक घेण्यात आली. सभापती पदासाठी उत्तम चव्हाण यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता, तर उपसभापती पदासाठी गयाबाई गोविंदा घोडे यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने दोघांचीही बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.
निवड जाहीर होताच कार्यकर्त्यांनी जल्लोष करत एकमेकांचे अभिनंदन केले. यावेळी ईदरीस मुलतानी, पुष्पाताई काळे  नारायण कोलते, शिवाजी बुढाळ, प्रदीप चव्हाण, दारासिंग शेषमल चव्हाण, रहीम पठाण, गुलाबराव कोलते, जयप्रकाश चव्हाण, गणेश लोखंडे, युसुफ पठाण, शेख निसार, मोहम्मद नूर, अजित खान, अजीज खान, हरी भांबरे, प्रभाकर सूर्यवंशी व भाजपा तालुका अध्यक्ष उपाध्यक्ष व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
    user_RahimKhan Pathan
    RahimKhan Pathan
    Voice of people सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • प्रतिनिधि.... दिलीप मोरे  छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्याच्या सीमेवर आणि बुलढाणा जिल्ह्याच्या हद्दीलगत असलेल्या गिरडा घाटात दि १० रोजी मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास रेती वाहतूक करणाऱ्या टिप्परचा अपघात झाला. घाट उतरत असताना टिप्परचे अचानक ब्रेक निकामी झाले. परिस्थितीची गंभीरता लक्षात येताच चालकाने प्रसंगावधान राखत टिप्पर टेकडीकडे वळवून धडक दिली. त्यामुळे टिप्पर जागीच पलटी झाला. या अपघातात चालकाला किरकोळ दुखापत झाली असून तो सुदैवाने बचावला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चालकाने वेळीच निर्णय घेतला नसता तर टिप्पर अंदाजे २०० ते २५० फूट खोल दरीत कोसळण्याची शक्यता होती. त्यामुळे मोठी जीवितहानी टळल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान, या दहा टायरी टिप्परमध्ये साधारण पाच ते सहा ब्रास रेती असल्याची माहिती मिळाली आहे. अपघातानंतर टिप्पर रस्त्यावर पलटी झाल्याने काही काळासाठी गिरडा घाटातील वाहतूक पूर्णपणे बंद पडली. त्यामुळे वाहनधारकांना बराच वेळ अडचणीचा सामना करावा लागनार आहे गिरडा घाट हा अवैधरित्या रेती वाहतूक करणाऱ्या टिप्परचा प्रमुख मार्ग बनल्याची चर्चा परिसरात आहे. अरुंद घाटमार्गावरून मोठ्या वेगाने धावणाऱ्या टिप्परमुळे परिसरातील दुचाकीस्वार आणि नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
    2
    प्रतिनिधि....
दिलीप मोरे 
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्याच्या सीमेवर आणि बुलढाणा जिल्ह्याच्या हद्दीलगत असलेल्या गिरडा घाटात दि १० रोजी मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास रेती वाहतूक करणाऱ्या टिप्परचा अपघात झाला. घाट उतरत असताना टिप्परचे अचानक ब्रेक निकामी झाले. परिस्थितीची गंभीरता लक्षात येताच चालकाने प्रसंगावधान राखत टिप्पर टेकडीकडे वळवून धडक दिली. त्यामुळे टिप्पर जागीच पलटी झाला.
या अपघातात चालकाला किरकोळ दुखापत झाली असून तो सुदैवाने बचावला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चालकाने वेळीच निर्णय घेतला नसता तर टिप्पर अंदाजे २०० ते २५० फूट खोल दरीत कोसळण्याची शक्यता होती. त्यामुळे मोठी जीवितहानी टळल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे.
दरम्यान, या दहा टायरी टिप्परमध्ये साधारण पाच ते सहा ब्रास रेती असल्याची माहिती मिळाली आहे. अपघातानंतर टिप्पर रस्त्यावर पलटी झाल्याने काही काळासाठी गिरडा घाटातील वाहतूक पूर्णपणे बंद पडली. त्यामुळे वाहनधारकांना बराच वेळ अडचणीचा सामना करावा लागनार आहे 
गिरडा घाट हा अवैधरित्या रेती वाहतूक करणाऱ्या टिप्परचा प्रमुख मार्ग बनल्याची चर्चा परिसरात आहे. अरुंद घाटमार्गावरून मोठ्या वेगाने धावणाऱ्या टिप्परमुळे परिसरातील दुचाकीस्वार आणि नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
    user_DILIP DESHMUKH
    DILIP DESHMUKH
    Farmer सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • बुलढाण्यात उद्यापासून 'भारतीय समता संघटने'चे आमरण उपोषण; प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक.... बुलढाणा :-शासकीय जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांना मालकी हक्काची सनद मिळावी आणि वनहक्क कायद्यांतर्गत प्रलंबित असलेले प्रश्न मार्गी लागावेत, या प्रमुख मागण्यांसाठी भारतीय समता संघटनेच्या वतीने उद्या, १२ मार्च २०२६ पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा पवित्रा घेण्यात आला आहे. वारंवार निवेदने देऊनही प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली जात नसल्याने संघटनेने हे आक्रमक पाऊल उचलले आहे. भारतीय समता संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, सन १९९० पूर्वीपासून शासकीय जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनी नियमानुकूल करण्यासंदर्भात अनेकवेळा निवेदने देण्यात आली. मात्र, जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अद्याप कोणताही ठोस निर्णय किंवा मार्गदर्शन प्राप्त झालेले नाही. तलाठी व मंडळ अधिकारी यांच्या चुकीच्या अहवालांमुळे अनेक शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काच्या जमिनीपासून वंचित राहावे लागत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. काय आहेत मुख्य मागण्या? निवेदनात एकूण ७ प्रमुख मागण्यांचा समावेश आहे, त्यापैकी महत्त्वाच्या मागण्या खालीलप्रमाणे आहेतः जमीन नियमितीकरणः सन १९७८ ते १९९१ च्या शासन निर्णयानुसार जमिनी नियमानुकूल करण्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी. ७/१२ वर नोंदः शासकीय जमिनीवर उपजीविका करणाऱ्या आदिवासी व इतर पारंपारिक रहिवाशांना जमिनीचे कायमस्वरूपी पट्टे देऊन ७/१२ वर नोंद घ्यावी. वनहक्क दावेः ७५ वर्षांचे पुरावे असूनही तांत्रिक कारणास्तव (जीपीएस सर्व्हेक्षण) नाकारलेले वनहक्क दावे मंजूर करावेत.निवासी सनदः अंढेरा येथील पारधी समाज बांधवांना त्यांच्या निवासी जागेची मालकी सनद देण्यात यावी. शिक्षणः मोताळा तालुक्यातील माळेगाव येथील आदिवासी मुलांची शाळा पूर्ववत सुरू करण्यात यावी. आम्ही २७ फेब्रुवारी रोजीच या संदर्भात निवेदन दिले होते, मात्र प्रशासनाने त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. आता १२ मार्चपासून आम्ही संपूर्ण कार्यकर्त्यांसह आमरण उपोषणाला बसणार आहोत. उपोषणादरम्यान आंदोलकांच्या आरोग्यास किंवा जीवितास काही धोका निर्माण झाल्यास, त्याची सर्वस्वी जबाबदारी जिल्हा प्रशासन आणि शासनाची राहील," असा इशारा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आम्रपालभाऊ वाघमारे व अन्य पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
    1
    बुलढाण्यात उद्यापासून 'भारतीय समता संघटने'चे आमरण उपोषण; प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक....
बुलढाणा :-शासकीय जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांना मालकी हक्काची सनद मिळावी आणि वनहक्क कायद्यांतर्गत प्रलंबित असलेले प्रश्न मार्गी लागावेत, या प्रमुख मागण्यांसाठी भारतीय समता संघटनेच्या वतीने उद्या, १२ मार्च २०२६ पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा पवित्रा घेण्यात आला आहे. वारंवार निवेदने देऊनही प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली जात नसल्याने संघटनेने हे आक्रमक पाऊल उचलले आहे.
भारतीय समता संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, सन १९९० पूर्वीपासून शासकीय जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनी नियमानुकूल करण्यासंदर्भात अनेकवेळा निवेदने देण्यात आली. मात्र, जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अद्याप कोणताही ठोस निर्णय किंवा मार्गदर्शन प्राप्त झालेले नाही. तलाठी व मंडळ अधिकारी यांच्या चुकीच्या अहवालांमुळे अनेक शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काच्या जमिनीपासून वंचित राहावे लागत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.
काय आहेत मुख्य मागण्या?
निवेदनात एकूण ७ प्रमुख मागण्यांचा समावेश आहे, त्यापैकी महत्त्वाच्या मागण्या खालीलप्रमाणे आहेतः
जमीन नियमितीकरणः सन १९७८ ते १९९१ च्या शासन निर्णयानुसार जमिनी नियमानुकूल करण्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी.
७/१२ वर नोंदः शासकीय जमिनीवर उपजीविका करणाऱ्या आदिवासी व इतर पारंपारिक रहिवाशांना जमिनीचे कायमस्वरूपी पट्टे देऊन ७/१२ वर नोंद घ्यावी.
वनहक्क दावेः ७५ वर्षांचे पुरावे असूनही तांत्रिक कारणास्तव (जीपीएस सर्व्हेक्षण) नाकारलेले वनहक्क दावे मंजूर करावेत.निवासी सनदः अंढेरा येथील पारधी समाज बांधवांना त्यांच्या निवासी जागेची मालकी सनद देण्यात यावी.
शिक्षणः मोताळा तालुक्यातील माळेगाव येथील आदिवासी मुलांची शाळा पूर्ववत सुरू करण्यात यावी.
आम्ही २७ फेब्रुवारी रोजीच या संदर्भात निवेदन दिले होते, मात्र प्रशासनाने त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. आता १२ मार्चपासून आम्ही संपूर्ण कार्यकर्त्यांसह आमरण उपोषणाला बसणार आहोत. उपोषणादरम्यान आंदोलकांच्या आरोग्यास किंवा जीवितास काही धोका निर्माण झाल्यास, त्याची सर्वस्वी जबाबदारी जिल्हा प्रशासन आणि शासनाची राहील," असा इशारा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आम्रपालभाऊ वाघमारे व अन्य पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
    user_बुलढाणा माझा न्युज
    बुलढाणा माझा न्युज
    बुलढाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • स्वामी ग्रुपतर्फे सुलतानपूर येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा – शाहीन पटेल यांचा सन्मान”
    1
    स्वामी ग्रुपतर्फे सुलतानपूर येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा –  शाहीन पटेल यांचा सन्मान”
    user_जिजाऊ एक्सप्रेस २८ न्यूज
    जिजाऊ एक्सप्रेस २८ न्यूज
    News Anchor बुलढाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • छत्रपती शिवाजी महाराज यांचे जेष्ठ चिरंजीव असलेल्या संभाजी महाराजांनी स्वराज्यासाठी आणि धर्मासाठी प्राणाची आहुती दिली. मुघल बादशहा औरंगजेब याने धर्मांतराचा दबाव टाकला, पण संभाजी महाराजांनी तो ठामपणे नाकारला आणि स्वाभिमानासाठी बलिदान दिले. म्हणूनच त्यांना “धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज” म्हणून ओळखले जाते. या महान योद्ध्याला आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन.
    1
    छत्रपती शिवाजी महाराज यांचे जेष्ठ चिरंजीव असलेल्या संभाजी महाराजांनी स्वराज्यासाठी आणि धर्मासाठी प्राणाची आहुती दिली.
मुघल बादशहा औरंगजेब याने धर्मांतराचा दबाव टाकला, पण संभाजी महाराजांनी तो ठामपणे नाकारला आणि स्वाभिमानासाठी बलिदान दिले.
म्हणूनच त्यांना “धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज” म्हणून ओळखले जाते.
या महान योद्ध्याला आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन.
    user_SHEGAONlive
    SHEGAONlive
    Local News Reporter Buldana, Buldhana•
    4 hrs ago
  • सिल्लोड पंचायत समिती सभापती पदी भाजप च्या अनिता सुरेश बनकर तर उपसभापती भगवान आहेर यांची निवड... या निवडीने भाजपात आनंदाचे वातावरण.निवडी बद्दल भाजप कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून आनंद साजरा केला..
    1
    सिल्लोड पंचायत समिती सभापती पदी  भाजप च्या अनिता सुरेश बनकर तर उपसभापती भगवान आहेर यांची निवड...
या निवडीने भाजपात आनंदाचे वातावरण.निवडी बद्दल भाजप कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून आनंद साजरा केला..
    user_Vishal Chavan
    Vishal Chavan
    Photographer सिल्लोड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • आज दिनांक 10 मार्च दुपारी चार वाजून 30 मिनिटांनी माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सिल्लोड पंचायत समिती येथे विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेमध्ये सिल्लोड पंचायत समिती सभापती व उपसभापतींची निवड करण्यात आली यामध्ये अनिता सुरेश बनकर यांना बहुमत मिळाल्याने त्यांना पंचायत समिती सिल्लोड सभापती पद देण्यात आले तर उपसभापती भगवान आहे यांची निवड करण्यात आली सदरील काम निवडणूक अधिकारी निलेश अपार यांच्या मार्गदर्शनाखाली निवड करण्यात आली
    1
    आज दिनांक 10 मार्च दुपारी चार वाजून 30 मिनिटांनी माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सिल्लोड पंचायत समिती येथे विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेमध्ये सिल्लोड पंचायत समिती सभापती व उपसभापतींची निवड करण्यात आली यामध्ये अनिता सुरेश बनकर यांना बहुमत मिळाल्याने त्यांना पंचायत समिती सिल्लोड सभापती पद देण्यात आले तर उपसभापती भगवान आहे यांची निवड करण्यात आली सदरील काम निवडणूक अधिकारी निलेश अपार यांच्या मार्गदर्शनाखाली निवड करण्यात आली
    user_Sham Thakur
    Sham Thakur
    सिल्लोड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • गिरडा घाटात 10 टायर हायवा अपघातग्रस्त; नागरिकांच्या मदतीने परिस्थिती नियंत्रणात बातमी : सोयगाव तालुक्यातील गिरडा घाट येथे 10 टायर हायवा वाहनाचा अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात काही जण किरकोळ जखमी झाले असल्याची माहिती मिळाली आहे. अपघातामुळे काही काळ घाटातील वाहतूक थांबवण्यात आली होती. मात्र सध्या घाटातील रस्ता पुन्हा सुरू करण्यात आला असून वाहतूक सुरळीत सुरू आहे. स्थानिक नागरिक आणि प्रशासनाच्या मदतीने परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली.
    2
    गिरडा घाटात 10 टायर हायवा अपघातग्रस्त; नागरिकांच्या मदतीने परिस्थिती नियंत्रणात
बातमी :
सोयगाव तालुक्यातील गिरडा घाट येथे 10 टायर हायवा वाहनाचा अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात काही जण किरकोळ जखमी झाले असल्याची माहिती मिळाली आहे.
अपघातामुळे काही काळ घाटातील वाहतूक थांबवण्यात आली होती. मात्र सध्या घाटातील रस्ता पुन्हा सुरू करण्यात आला असून वाहतूक सुरळीत सुरू आहे. स्थानिक नागरिक आणि प्रशासनाच्या मदतीने परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली.
    user_RahimKhan Pathan
    RahimKhan Pathan
    Voice of people सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    21 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.