अत्यंत हृदयद्रावक घटना ! उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या चार जणांचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू अत्यंत हृदयद्रावक घटना ! उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या चार जणांचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू सख्ख्या बहीण-भावासह चार जणांचा अंत; गावावर शोककळा उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या चार जणांचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक वअतिशय दुर्दैवी घटना अमरावती जिल्ह्यात आज रविवारी घडली आहे. अमरावतीतील घातखेडा तलावात ही दुर्घटना घडली असून, मृतांमध्ये सख्ख्या बहीण-भावाचाही समावेश आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून गावावर शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी काही मुले आणि तरुण तलावावर पोहण्यासाठी गेले होते. मात्र तलावातील खोल पाण्याचा अंदाज न आल्याने चौघेही पाण्यात बुडाले. सोबत असलेल्या नागरिकांनी आरडाओरड केल्यानंतर परिसरातील ग्रामस्थ आणि प्रशासनाला घटनेची माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आणि जिल्हा प्रशासनाच्या बचाव पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने शोधमोहीम राबवण्यात आली. अखेर चौघांचेही मृतदेह तलावातून बाहेर काढण्यात आले. या दुर्घटनेत सोनाली नरेंद्र जोशी (वय १६), आदित्य नरेंद्र जोशी (वय १२), पायल बबलू पंडीत (वय २१) आणि यश गजानन काकणे (वय १३) यांचा मृत्यू झाला. सोनाली आणि आदित्य हे सख्खे बहीण-भाऊ असल्याने जोशी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. दरम्यान, तलाव परिसरात मोठी गर्दी झाली होती. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

- डिझेलसाठी जीव धोक्यात; टँकर पलटल्यानंतर नागरिकांची कॅन-बाटल्या घेऊन एकच झुंबड डिझेलसाठी जीव धोक्यात; टँकर पलटल्यानंतर नागरिकांची कॅन-बाटल्या घेऊन एकच झुंबड बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात कल्याण ते विशाखापट्टणम महामार्गावरील तालखेड फाटा परिसरात डिझेल वाहतूक करणारा टँकर पलटल्याची घटना घडली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र टँकरमधून डिझेल गळती सुरू होताच परिसरातील नागरिकांनी जीवाची पर्वा न करता डिझेल मिळवण्यासाठी घटनास्थळी धाव घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.1
- जालना जिल्ह्यातील मामादेवी मस्तागडावर जागेच्या वादातून एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. तक्रारदाराची जागा इतरांना विकल्याच्या कारणावरून हा वाद पेटला होता. या प्रकरणी कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.1
- कीर्तनकार आणि संतांविरोधातील आरोपांनंतर पंढरपूर, आळंदीसह अनेक ठिकाणी निषेध; जाहीर माफी व अटकेची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे प्रवक्ते विकास लवांडे यांनी वारकरी संप्रदायात कथित “प्रतिगामी विचारांची घुसखोरी” झाल्याचा आरोप करत काही कीर्तनकार आणि संत-महंतांची नावे सार्वजनिक केल्याने राज्यभर मोठा वाद निर्माण झाला आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे वारकरी संप्रदाय, हिंदू संघटना आणि विविध राजकीय पक्षांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. वारकरी परंपरा ही महाराष्ट्राच्या अध्यात्मिक आणि सांस्कृतिक ओळखीचा महत्त्वाचा भाग असून, लवांडे यांच्या विधानाने संत परंपरेचा अपमान झाल्याचा आरोप केला जात आहे. पंढरपूर, आळंदी यांसह अनेक ठिकाणी निषेध आंदोलने करण्यात आली. आंदोलकांनी लवांडे यांच्या विरोधात घोषणाबाजी करत तात्काळ अटकेची मागणी केली. दरम्यान, संबंधित संत आणि वारकरी समाजाची जाहीर माफी मागावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही विविध संघटनांनी दिला आहे. या प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले असून, पुढील काही दिवसांत हा वाद आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.1
- न्यू मुंबई चायनीज बिडकीन बस स्टॅन्ड समोर आहे. मुंबई चायनीज दुसरी शाखा फारोळा. मुंबई चायनीज मालक इमरान शहा यांच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा .1
- १२६२ किलो कांदा विकूनही शेतकऱ्याच्या हातात कवडी नाही; उलट अडत्यालाच द्यावा लागला १ रुपया छत्रपती संभाजीनगर पैठण: लाखो रुपये खर्च करून, उसनेवारी आणि कर्ज काढून पिकवलेल्या कांद्याला बाजारात कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी पूर्णपणे हतबल झाला आहे. पैठण तालुक्यातील वरुडी गावातील कांदा उत्पादक शेतकरी प्रकाश गलधर यांनी तब्बल तीन महिने मेहनत घेऊन तयार केलेला १२६२ किलो कांदा बाजारात विक्रीसाठी नेला. मात्र बाजारात कांद्याला मिळालेल्या अत्यल्प दरामुळे हमाली, तोलाई आणि गोणी खर्च वजा जाता त्यांच्या हातात एकही रुपया उरला नाही. उलट अडत्याला १ रुपया द्यावा लागल्याची धक्कादायक परिस्थिती समोर आली आहे. कांदा उत्पादनासाठी शेतकऱ्यांनी सातबारावर कर्ज काढले, तर काहींनी उसनेवारी करून पैसे उभे केले होते. मात्र बाजारातील पडलेल्या दरामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. सरकारी अधिकारी पंचनामे करून फोटो काढून गेले, पण प्रत्यक्ष मदत कधी मिळणार याकडे शेतकऱ्यांचे डोळे लागले आहेत. कांद्याला हमीभाव द्यावा आणि शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.1
- महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण ('अ ब क ड') च्या मागणीसाठी मातंग समाजाने छत्रपती संभाजीनगर येथे भव्य मोर्चा काढला. हजारो समाजबांधव रस्त्यावर उतरले होते, त्यांनी आपल्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवल्या.1
- जालना येथे अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी काळी शाई आणि ऑइल फेकले. या घटनेमुळे छत्रपती संभाजीनगर चौफुली परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मनसे कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत हा निषेध नोंदवला.1
- धाराशिव-उजनी राज्यमार्गावर झालेल्या भीषण अपघातात बीएलओचे काम पूर्ण करून परतणाऱ्या एका शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे जिल्ह्यात शोककळा पसरली असून, राज्यमार्गावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.1