Shuru
Apke Nagar Ki App…
RuihGuiat RauihGuiat RuihGuiat
RauihGuiat
RuihGuiat RauihGuiat RuihGuiat
More news from महाराष्ट्र and nearby areas
- नाशिकच्या सिडको परिसरात शिवसेनेचे विभागप्रमुख सुयश पाटील यांच्यावर सहा ते सात जणांच्या टोळीने जीवघेणा हल्ला केला. हल्लेखोरांनी कोयत्याने सपासप वार करत त्यांना गंभीर जखमी केले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांकडून हल्लेखोरांचा शोध सुरू आहे.1
- करण्यात आले आहे. एम.आय.टी. महाविद्यालय आणि कुणाल दराडे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने १६ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ९ वाजता धानोरे येथे हा मेळावा होईल. तरुणांना करिअरची नवी दिशा आणि रोजगाराची सुवर्णसंधी उपलब्ध करून देणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या लिंकवर किंवा संपर्क क्रमांकावर नाव नोंदणी करून या संधीचा लाभ घ्यावा.1
- ठाणे :मिरवणुका, डीजेचा आवाज आणि अनावश्यक खर्च टाळून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त 'भूमीपुत्र एल्गार संघटनेने' एक अत्यंत अभिनव आणि डोळस उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील दुर्गम भागातील तब्बल १३५ अनाथ, निराधार आणि मजूर कुटुंबातील मुलांचे 'शैक्षणिक पालकत्व' स्वीकारून संघटनेने महामानवाला खऱ्या अर्थाने कृतिशील आदरांजली वाहिली आहे. आज १४ एप्रिल रोजी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. प्रमोद पवार यांनी या उपक्रमाची अधिकृत घोषणा करताना सांगितले की, केवळ जयघोष करून विचार जपले जात नाहीत, तर ते जगले पाहिजेत. बाबासाहेबांनी दिलेला शिक्षणाचा मंत्र प्रत्यक्ष अमलात आणण्यासाठीच आम्ही या १३५ कोवळ्या फुलांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. हा 'शैक्षणिक एल्गार' यशस्वी करण्यासाठी गेल्या आठवडाभरापासून संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रात्रंदिवस एक करून दुर्गम पाड्यांचा दौरा केला. यामध्ये अत्यंत पारदर्शक पद्धतीने विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली असून मोखाडा तालुक्यातील ३८, जव्हारमधील १८, डहाणूतील २३, तलासरीमधील १५, पालघरमधील १५, भिवंडीतील १०, वाड्यातील १० आणि विक्रमगड तालुक्यातील ६ विद्यार्थ्यांचा यामध्ये समावेश आहे. संघटनेचे कार्याध्यक्ष सुनील लोणे, सरचिटणीस नवनाथ भोये, आदिम शक्ती प्रमुख स्वप्नील वाघ यांनी आपल्या टीमने प्रत्यक्ष गावागावात जाऊन या पाल्यांच्या परिस्थितीची पाहणी केली. निवडलेल्या मुलांमध्ये प्रामुख्याने ज्यांना आई-वडील नाहीत, ज्यांचे पालक गंभीर आजाराने ग्रस्त किंवा दिव्यांग आहेत अशा मुलांचा प्राधान्याने विचार करण्यात आला आहे. आर्थिक अभावामुळे ही मुले शाळा सोडू शकतात किंवा स्थलांतरामुळे शिक्षणापासून वंचित राहू शकतात, हे ओळखून संघटनेने त्यांच्या शैक्षणिक साहित्यापासून ते आवश्यक कागदपत्रे मिळवून देण्यापर्यंतची सर्व जबाबदारी उचलली आहे. या मोहिमेत युवा शक्ती प्रमुख रूपेश जाधव, नाशिक जिल्हा प्रमुख मुरलीधर कनोजे, राज्य उपाध्यक्ष कल्पेश जाधव, असगर पटेल, भूषण घोडविंदे, ॲड. सोनाली मनोरे-पवार, उपकार्याध्यक्ष दूषांत घायवट, विजय राऊत, प्रमिला तरसे आणि सुनीता वळवी यांच्यासह सर्व तालुका अध्यक्ष मनोज पारधी, अनिल करबट, गणेश माळी, रामा होला, विजय नडगे,विकास धोडी, प्रसाद भालेराव, मनोज धर्ममेहर, भावेश पढेर इत्यादी पदाधिकारी हिरिरीने सहभागी झाले आहेत. बडेजाव टाळून समाजाचे देणे लागते या भावनेतून राबवलेल्या या उपक्रमाचे सर्वच स्तरांतून कौतुक होत असून, १३५ मुलांची ही फक्त सुरुवात असून येत्या काळात वंचितांच्या शिक्षणासाठी संघटना सदैव कटिबद्ध राहील, अशी ग्वाही प्रमोद पवार यांनी दिली आहे.1
- Post by GBK news1
- 🚨 महत्त्वाचे आवाहन: वाढत्या तापमानापासून स्वतःचे संरक्षण करा! 🚨 जिल्ह्यामध्ये तापमानात सातत्याने वाढ होत असून, भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस ही वाढ कायम राहण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी सर्व नागरिकांना सतर्क राहून योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. ✅ नागरिकांनी काय काळजी घ्यावी? 🧢 उन्हात घराबाहेर पडताना डोक्यावर रुमाल बांधा किंवा टोपीचा आवर्जून वापर करा. 💧 शरीरातील पाण्याची पातळी योग्य राखण्यासाठी भरपूर पाणी, ताक किंवा इतर द्रवपदार्थांचे जास्तीत जास्त सेवन करा. 👨🌾 विशेष लक्ष द्या: गरोदर माता, शेतकरी, कामगार आणि आजारी व्यक्तींनी वाढत्या उन्हाची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. 🏥 प्रशासनाची तयारी: नागरिकांच्या सुरक्षेसाठी जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे (PHC), ग्रामीण रुग्णालये (RH) आणि उपजिल्हा रुग्णालयांमध्ये (SDH) 'कूल रूम्स' (Cool Rooms) तयार करण्याच्या स्पष्ट सूचना जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आल्या आहेत. ⚠️ लक्षात ठेवा : उष्णतेच्या लाटेमुळे (Heatwave) कोणताही त्रास किंवा लक्षणे जाणवल्यास अंगावर न काढता त्वरित जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधा आणि वैद्यकीय सल्ला नक्की घ्या. स्वतःची आणि आपल्या कुटुंबीयांची काळजी घ्या! ही महत्त्वाची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ही पोस्ट नक्की शेअर करा. #Ahilyanagar #HeatwaveAlert #SummerSafety #CollectorAppeal #StayHydrated #Maharashtra #DrPankajAshiya #PublicHealth #StayCool1
- पत्नीचे गावात झंगाट प्रियकरांच्या मुलांच्या मदतीने पतीला संपविले, कवठेमहांकाळ पोलिसांनी पत्नी मुलै प्रियकरावर केला गुन्हा दाखल!1
- नासिक मे लवजिहाद 6 आरोपी गिरफ्तार 2 महिलाएं फरार महिलाओं को रख्या गया रोजा नासिक की मल्टीनेशनल कंपनी में लवजिहाद1
- Post by GBK news1
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे आचरण प्रत्येकाने आपल्या आयुष्यात करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी केले. सामाजिक समता सप्ताह समारोप कार्यक्रमात त्यांनी समता, न्याय व बंधुतेच्या मूल्यांचे महत्त्व अधोरेखित केले. #डॉ_बाबासाहेब_आंबेडकर #सामाजिक_समता #अहिल्यानगर #समता_सप्ताह #प्रेरणादायी_विचार1