विश्वशांतीसाठी शिरूरमध्ये ‘विश्वप्रार्थना’ जपयज्ञ; नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग शिरूर{ डेली न्यूज पोस्ट टीम 24}जागतिक स्तरावर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर विश्वशांती आणि मानवकल्याणासाठी शिरूरमध्ये ‘विश्वप्रार्थना’ जपयज्ञाचे आयोजन करण्यात आले. जीवनविद्या मिशनच्या शिरूर ज्ञानसाधना केंद्रामार्फत शिवसेवा मंडळ महादेव मंदिर येथे हा उपक्रम उत्साहात पार पडला. विश्वसंत सदगुरू श्री वामनराव पै यांच्या प्रेरणेने ‘हे जग सुखी व्हावे व हिंदुस्तान राष्ट्र सर्वार्थाने प्रगत व्हावे’ या उदात्त ध्येयातून या प्रार्थना जपयज्ञाचे आयोजन करण्यात आले होते. “सर्वांना चांगली बुद्धी, आरोग्य, सुख आणि कल्याण लाभावे” अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली. या जपयज्ञात शिरूर शाखेतील नामधारकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. अहिल्यानगर येथील शंकरदादा गणगे, महेश रासने, शामकांत वर्पे यांच्यासह आशिष जावळे परिवार, संजय बढे व परिवार, अनारसे सर, महेश कोकरे, शितोळे सर, इंद्रभान गायकवाड, सुभाष चोरडिया आदींसह अनेक महिला-पुरुष उपस्थित होते. शिरूर शाखेचे अध्यक्ष रोहिदास काळे, खजिनदार बाळासाहेब गुंजाळ आणि चंदना लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. भक्तीमय वातावरणात पार पडलेल्या या जपयज्ञामुळे परिसरात सकारात्मक ऊर्जा निर्माण झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

- hajaron logon ka nuksan ho gaya hai please kripya kisanon ka madad Karen aap log kisanon ka khet mein Aag lag Gaya Bhari bharkar nuksan ho gaya hai nuksan ke Karan Kisan log pareshan hai unki madad karne ke liye yah news Dala gaya hai2
- शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम- 24} तालुक्यातील पूर्व भागात पिंपळसुटी येथे दोन पिंजऱ्यात दोन बिबटे जे्रबंद झाले आहेत. शिरूर तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्यांच्या हल्ल्यांत काही नागरिकांना प्राण गमवावे लागल्याच्या घटनांमुळे परिस्थिती गंभीर बनली होती. मानव व पाळीव जनावरांवरील हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर वन विभागाने शिरूर तालुक्यातील बिबट्यांच्या प्रभावक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पिंजरे लावण्याची मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत आतापर्यंत ३५ हून अधिक बिबट्यांना जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले असून, सर्व बिबट्यांची रवानगी जुन्नर तालुक्यातील माणिकडोह बिबट्या निवारा केंद्रात करण्यात आली आहे. या कारवाईमुळे काही प्रमाणात नागरिकांना दिलासा मिळाला असला, तरी वन विभागाची सतर्कता अद्याप कायम आहे. दरम्यान, काल पिंपळसुटी येथे लावलेल्या दोन पिंजऱ्यात दोन बिबट जेरबंद झाले .नर बिबटया व मादी बिबट्या दीड वर्षाचे असून दोन्ही बिबटे माणिकडोह या ठिकाणी पाठवण्यात आले आहेत.ही दोन्ही बिबटे एकाच मादीचे पिल्ले असून त्यांना वेगवेगळ्या पिंजऱ्यात जे्रबंद करण्यात आले होते नंतर यादोन्ही बिबट्याना एकाच पिंजऱ्यात ठेवण्यात आले. या दोन्ही बिबटयाना माणिकडोह बिबट्या निवारा केंद्रात दाखल करण्यात आले असल्याची माहिती तालुका वनाधिकारी निळकंठ गव्हाणे यांनी दिली. बिबट्यांची वाढती संख्या आणि त्यातून निर्माण होणारा मानवी संघर्ष लक्षात घेता, नागरिकांनी रात्रीच्या वेळी शेतात किंवा मोकळ्या परिसरात जाताना विशेष खबरदारी घ्यावी.4
- Post by क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज1
- आयपीओ गुंतवणुकीच्या नावाखाली २ कोटींची सायबर फसवणूक,बँकॉक-म्यानमार कनेक्शन उघड, नवी मुंबईत कॉल सेंटर सुरू करण्याचा कट उधळला..1
- अहमदनगर : राहुरी, पाथर्डी आणि नगर या विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी अहमदनगर जिल्हा कार्यकारिणीने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. नगर दक्षिण व उत्तर जिल्ह्यांची संयुक्त बैठक घेऊन अनिल भिकाजी जाधव या आदिवासी तरुण कार्यकर्त्याला उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. या बैठकीत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी एकमुखाने हा निर्णय घेतला. अनिल जाधव हे गोरगरीब, कष्टकरी आणि शोषित घटकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढा देणारे, तडफदार व अनुभवी कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना विधानसभेत पाठवण्यासाठी उमेदवारी देण्यात आल्याचे पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले. याबाबत माहिती देताना राज्य प्रवक्ते ॲड. डॉ. अरुण जाधव यांनी सांगितले की, “आजपर्यंत या मतदारसंघात प्रस्थापितांना उमेदवारी देण्याची परंपरा राहिली आहे. मात्र संविधान जिवंत ठेवण्यासाठी आणि जातीवादी मानसिकतेला पराभूत करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने एका संघर्षशील कार्यकर्त्याला संधी दिली आहे.” तसेच, मतदारसंघातील जनतेने एकदिलाने काम करून अनिल जाधव यांना प्रचंड बहुमताने विजयी करावे, असे आवाहनही त्यांनी केले. दरम्यान, या निर्णयामुळे स्थानिक राजकारणात नवी समीकरणे तयार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.1
- Post by Sachin Waghe1
- पिंपरी चिंचवड : - अशोक खरात प्रकरणावरही उदय सामंत स्पष्ट; गैरवापर थांबवण्याचा इशारा... एमएनजीएल गॅस पुरवठ्यावरून राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी कडक इशारा दिलाय. हॉटेल आणि उद्योजकांना गॅस पुरवठा जाणीवपूर्वक थांबवला जात असेल, तर संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असं त्यांनी स्पष्ट केलं.मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतरही गॅस पुरवठ्यात दिरंगाई होत असल्याची तक्रार समोर येत आहे. कृत्रिम तुटवडा निर्माण केल्यास सरकार कठोर पावलं उचलेल, असंही त्यांनी सांगितलं.दरम्यान, अशोक खरात प्रकरणावर बोलताना सामंत म्हणाले, काही नेत्यांशी फोनवर बोलणं झालं असलं तरी कुणीही त्यांच्या कृत्याचं समर्थन केलेलं नाही. या प्रकरणात गैरफायदा घेण्याची प्रवृत्ती थांबवण्याची भूमिका शिवसेनेची असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.... #पिंपरीचिंचवड #एमएनजीएल #गॅसपुरवठा #उदयसामंत #हॉटेलव्यवसाय #उद्योजक #गॅसतुटवडा #सरकारइशारा #कारवाई #शिवसेना #अशोकखरात #PimpriChinchwad #MNGL #GasSupply #UdaySamant #HotelBusiness #Entrepreneurs #GasShortage #GovernmentWarning #StrictAction #ShivSena #AshokKharat1
- गावठी पिस्टलचा (अग्रिशस्त्राचा) वापर करून खूनाचा प्रयत्न करणा-या फरार आरोपीला अटक करून त्याचेकडून ०२ पिस्टल (अग्नीशस्त्र) जप्त करून त्याला जेरबंद करण्यात आले.1