कुडाळ तालुक्यात दिनांक ९ मे रोजी सायंकाळी विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने भीषण रूप धारण केले. शहरासह ग्रामीण भागात वादळी वाऱ्यासह झालेल्या या पावसाने सर्वत्र दाणादाण उडवून दिली. या पावसामुळे वाढत्या उकाड्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला असला, तरी आंबा, काजू आणि कोकम या कोकणी मेव्याचे मात्र अतोनात नुकसान झाले आहे. शनिवारी ९ तारखेला झालेल्या या वादळात सरंबळ दुर्गावाड धनगरवाडी येथील रामा बापू वरक यांच्या घरावर आणि माडाच्या झाडावर वीज कोसळली. या दुर्घटनेत घराचे पत्रे फुटून घरातील संपूर्ण इलेक्ट्रॉनिक वायरिंग जळाले आहे. या घटनेची माहिती मिळताच जिल्हा परिषद सदस्य रूपेश पावसकर यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन वरक कुटुंबाला वैयक्तिक स्तरावर आर्थिक मदत केली. यावेळी माजी उपसरपंच समद मुजावर, सरपंच रावजी कदम, उपसरपंच सागर परब, ग्राम महसूल अधिकारी संतोष हिंदक, स्नेहल सागरे, शैलेश परब, मंदार परब, फिरोज फतीब आदी उपस्थित होते. भडगाव व पावशी येथे झाडे कोसळून मोठे नुकसान ९ तारखेच्या या वादळी वाऱ्याचा तडाखा भडगाव आणि पावशी परिसरालाही बसला. भडगाव बुद्रुक येथे अनिल कदम यांच्या घरावर माड कोसळल्याने छप्पर व मंडपाचे मोठे नुकसान झाले. तसेच पावशी धरणवाडी येथील शेतकरी बबन तोटकेकर यांच्या गुरांच्या गोठ्यावर मोठे आंब्याचे झाड कोसळल्याने दीड लाखांहून अधिक रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने घटनेच्या वेळी गुरे गोठ्याबाहेर असल्याने मोठी जीवितहानी टळली. या नुकसानीची पाहणी पावशीचे माजी सरपंच बाळा कोरगावकर, उपसरपंच लक्ष्मीकांत तेली, पोलीस पाटील अरविंद बिले यांनी करून पंचनामा करण्याची विनंती केली आहे. ९ मे रोजी झालेल्या या अवकाळी सत्रामुळे तालुक्यातील आंबा आणि काजू बागायतदारांचे कंबरडे मोडले आहे. हातातोंडाशी आलेले पीक वादळामुळे उद्ध्वस्त झाल्याने शेतकरी वर्ग चिंतेत असून, प्रशासनाने तातडीने नुकसानीचे पंचनामे करावेत, अशी मागणी होत आहे.

- रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील बेनगी गावात सुरू असलेल्या क्रिकेट सामन्यादरम्यान चक्रीवादळामुळे मोठा मंच उडून गेला. या अचानक झालेल्या घटनेमुळे मैदानात एकच खळबळ उडाली, मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.1
- कोल्हापूर महानगरपालिकेने पावसाळ्यापूर्वी पुराची समस्या टाळण्यासाठी नालेसफाई मोहीम युद्धपातळीवर सुरू केली आहे. २३ मार्चपासून सुरू झालेल्या या मोहिमेत मनुष्यबळ आणि आधुनिक यंत्रांचा वापर करून शहरातील गाळ, कचरा व अडथळे दूर केले जात आहेत. मनपा प्रशासनाने वेळेत काम पूर्ण करण्याचे नियोजन केले असून, नागरिकांनाही नाल्यात कचरा न टाकण्याचे आवाहन केले आहे.1
- आजच्या राशीभविष्यात प्रत्येक राशीसाठीचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या. प्रेम, आरोग्य, आर्थिक स्थिती आणि करिअरसंबंधी महत्त्वाची माहिती मिळेल.1
- महाराष्ट्रातील प्रसिद्ध स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक विठ्ठल कांगणे यांचा अंधश्रद्धेवर बोलणारा एक व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे. यात त्यांनी लोकांना अंधश्रद्धा सोडून छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार अंगी बाणवण्याचा सल्ला दिला आहे. त्यांची विनोदी आणि शैलीदार मांडणी सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे.1
- जीवन निरगुडे यांना त्यांच्या 19 वर्षांच्या उत्कृष्ट पोलीस सेवेसाठी 'पोलीस महासंचालक सन्मान चिन्ह' देऊन गौरवण्यात आले. त्यांच्या या दैदिप्यमान यशाबद्दल पश्चिम बंगाल मराठी व्यापारी असोसिएशनने अभिनंदन केले आहे. हा सन्मान त्यांच्या समर्पित सेवेचे प्रतीक आहे.1
- आई ती असते जी संघर्षांमध्येही कधी हार मानत नाही. परमेश्वराने आपल्याला जगातील सर्वात प्रेमळ आणि शक्तिशाली माता दिल्याबद्दल त्याचे मनापासून आभार मानूया.4
- सांगली जिल्ह्यात एका महावितरण कर्मचाऱ्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून हत्येमागचे कारण अद्याप गूढ आहे. पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.1
- आमदार सुहास बाबर यांनी खानापूर-आटपाडी मतदारसंघात 'ट्री आर्मी'च्या मदतीने मोठ्या वृक्षारोपण मोहिमेची घोषणा केली आहे. पिंपळाची व इतर झाडे लावून मतदारसंघाचा कायापालट करण्याचा त्यांचा संकल्प असून, यात वन विभागाचीही मदत घेतली जाईल.1