सुरू ॲपवरील प्रेक्षकांचा विश्वास हीच माझी खरी ताकद एका महिन्यात १०० सबस्क्राइबर्सचा टप्पा पूर्ण; प्रत्येक बातमीला हजारो प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद नांदेड प्रतिनिधी :- डिजिटल पत्रकारितेच्या क्षेत्रात सातत्याने दर्जेदार आणि विश्वासार्ह बातम्या देत असलेल्या साप्ताहिक महिमा खादीचाचे मुख्य संपादक तथा Purrogami Patrakar Sangh (Bharat) तेलंगणा राज्याध्यक्ष गजानन गंगाधरराव बिडकर यांना सुरू ॲपवर अल्पावधीतच प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. अवघ्या एका महिन्याच्या कालावधीत त्यांच्या सुरू ॲप चॅनेलने १०० सबस्क्राइबर्सचा महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. विशेष म्हणजे त्यांच्या प्रत्येक बातमीला सरासरी १,००० पेक्षा अधिक व्ह्यूज मिळत असून काही विशेष बातम्यांनी तर २,००० ते ३,००० व्ह्यूजचा टप्पा गाठला आहे. यामुळे त्यांच्या बातम्यांना प्रेक्षकांचा वाढता विश्वास आणि लोकप्रियता मिळत असल्याचे स्पष्ट झाले आहे. गजानन बिडकर यांनी या यशाचे संपूर्ण श्रेय आपल्या प्रेक्षकांना दिले आहे. त्यांनी भावना व्यक्त करताना सांगितले की, “माझ्या बातम्यांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकामुळेच हा प्रवास शक्य झाला आहे. त्यांनी दाखविलेला विश्वास, दिलेले प्रोत्साहन आणि सातत्याने केलेले समर्थन यामुळे मला अधिक जबाबदारीने काम करण्याची प्रेरणा मिळते.” त्यांनी पुढे सांगितले की, त्यांच्या जवळपास प्रत्येक बातमीला सुरू ॲपवर उत्तम प्रतिसाद मिळतो आणि अनेक बातम्या ट्रेंडिंगमध्ये देखील झळकतात. याबद्दल त्यांनी सुरू ॲपच्या व्यवस्थापनाचेही विशेष आभार मानले. गजानन बिडकर यांचे मनोगत “माझ्या सर्व सबस्क्राइबर्स, व्ह्यूअर्स आणि हितचिंतकांचे मी मनःपूर्वक आभार मानतो. आपल्या प्रेम, विश्वास आणि पाठिंब्यामुळेच हे यश मिळाले आहे. यापुढेही अधिक दर्जेदार, सत्य आणि जनहिताच्या बातम्या देण्यासाठी मी कटिबद्ध आहे.” डिजिटल माध्यमातील त्यांच्या या यशाबद्दल विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, भविष्यात त्यांच्या चॅनेलला आणखी मोठे यश मिळावे अशा शुभेच्छा दिल्या जात आहेत.

- लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे शेतीच्या वादातून झालेल्या दुहेरी हत्याप्रकरणी न्यायालयाने तीन दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या निकालामुळे पीडित कुटुंबाला उशिरा का होईना न्याय मिळाला आहे.1
- 📍उदगीर च्या बामणी पाटी जवळ ट्रक आणि कार चा भीषण अपघात. अपघातात कारमधील एका व्यक्तीचा जागीच मृत्यू. 📍उदगीर च्या बामणी पाटी जवळ ट्रक आणि कार चा भीषण अपघात. अपघातात कारमधील एका व्यक्तीचा जागीच मृत्यू. मृत्यू झालेला तरुण हैद्राबाद येथील असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न1
- राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्याने वारकरी संप्रदायातील संतांवर कथित 'प्रतिगामी विचारांच्या घुसखोरी'चा आरोप केल्याने राज्यात मोठा वाद निर्माण झाला आहे. या वक्तव्यामुळे वारकरी संघटना आणि हिंदू संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त करत राज्यभर निषेध आंदोलने केली आहेत. आंदोलकांनी प्रवक्त्याची जाहीर माफी आणि तात्काळ अटकेची मागणी केली असून, प्रकरणामुळे राज्यातील राजकारण तापले आहे.1
- चित्रपट कलावंत विजय थलपतिया यांनी तामिळनाडूच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी त्यांना लाखोंच्या जनतेसमोर पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.1
- लातूर जिल्ह्यातील जवळगा वाडीत पाणी असूनही हँडपंप गेल्या दोन वर्षांपासून बंद आहे. दुरुस्ती न झाल्याने गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे.2
- बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात एक डिझेल टँकर पलटी झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, टँकरमधून डिझेल गळती सुरू होताच परिसरातील नागरिकांनी जीव धोक्यात घालून, कॅन-बाटल्या घेऊन डिझेल जमा करण्यासाठी घटनास्थळी गर्दी केली.1
- लातूर जिल्ह्यातील अहमदपूर आंबेजोगाई रोडवर कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.1
- यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजीमध्ये २ ते ९ मे दरम्यान धम्म बालसंस्कार शिबिर घेण्यात आले. या शिबिरात ४० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. शिबिराच्या समारोपाप्रसंगी विद्यार्थ्यांनी धम्म शांतता रॅली काढली.1
- जालना जिल्ह्यातील मामादेवी मस्तागडावर जागेच्या वादातून एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. तक्रारदाराची जागा इतरांना विकल्याच्या कारणावरून हा वाद पेटला होता. या प्रकरणी कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.1