logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

औंढा नागनाथ येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मेंढपाळ बांधवांकडून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. १ जून रोजी आठवे ज्योतिर्लिंग श्री नागनाथ मंदिराच्या पश्चिम मुख्य द्वारासमोर असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास ११ लिटर दुधाचा दुग्धाभिषेक करत अभिवादन करण्यात आले. धनगर समाज युवा मल्हार सेना मराठवाडा अध्यक्ष वैजनाथ पावडे यांच्या मार्गदर्शनाखाली विदर्भ आणि मराठवाड्यातील मेंढपाळ समाज बांधवांनी फेटे बांधून आणि घोंगडी काठी घेऊन या सोहळ्यात सहभाग घेतला. यावेळी सर्व मेंढपाळ बांधवांनी पुतळ्यास ११ लिटर दुधाचा दुग्धाभिषेक केल्यानंतर गुलाब पुष्पहार अर्पण करून आदराने अभिवादन केले. या कार्यक्रमाला धनगर समाज मराठवाडा अध्यक्ष वैजनाथ पावडे, माजी पंचायत समिती सदस्य नंदूभाऊ रवंदळे, भानुदास कुरवाडे, बाळू पिसाळ, किसन टेळे, समाधान शिंदे, नवनाथ हाडगे, समाधान करणे, रोहिदास कुराडे, लहानु शिंदे, अनिल येळे, लहू बूचकुले, विलास येळे, रामा येळे, सुधाकर सातपुते, गजानन करनर, गुलाबी येळे, पिंटू येळे, रामा पिसाळ यांच्यासह विदर्भ-मराठवाड्यातील मोठ्या संख्येने मेंढपाळ बांधव उपस्थित होते.

7 hrs ago
user_वैजनाथ पावडे
वैजनाथ पावडे
Building society हिंगोली, हिंगोली, महाराष्ट्र•
7 hrs ago

औंढा नागनाथ येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मेंढपाळ बांधवांकडून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. १ जून रोजी आठवे ज्योतिर्लिंग श्री नागनाथ मंदिराच्या पश्चिम मुख्य द्वारासमोर असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास ११ लिटर दुधाचा दुग्धाभिषेक करत अभिवादन करण्यात आले. धनगर समाज युवा मल्हार सेना मराठवाडा अध्यक्ष वैजनाथ पावडे यांच्या मार्गदर्शनाखाली विदर्भ आणि मराठवाड्यातील मेंढपाळ समाज बांधवांनी फेटे बांधून आणि घोंगडी काठी घेऊन या सोहळ्यात सहभाग घेतला. यावेळी सर्व मेंढपाळ बांधवांनी पुतळ्यास ११ लिटर दुधाचा दुग्धाभिषेक केल्यानंतर गुलाब पुष्पहार अर्पण करून आदराने अभिवादन केले. या कार्यक्रमाला धनगर समाज मराठवाडा अध्यक्ष वैजनाथ पावडे, माजी पंचायत समिती सदस्य नंदूभाऊ रवंदळे, भानुदास कुरवाडे, बाळू पिसाळ, किसन टेळे, समाधान शिंदे, नवनाथ हाडगे, समाधान करणे, रोहिदास कुराडे, लहानु शिंदे, अनिल येळे, लहू बूचकुले, विलास येळे, रामा येळे, सुधाकर सातपुते, गजानन करनर, गुलाबी येळे, पिंटू येळे, रामा पिसाळ यांच्यासह विदर्भ-मराठवाड्यातील मोठ्या संख्येने मेंढपाळ बांधव उपस्थित होते.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • औंढा नागनाथ येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मेंढपाळ बांधवांकडून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. १ जून रोजी आठवे ज्योतिर्लिंग श्री नागनाथ मंदिराच्या पश्चिम मुख्य द्वारासमोर असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास ११ लिटर दुधाचा दुग्धाभिषेक करत अभिवादन करण्यात आले. धनगर समाज युवा मल्हार सेना मराठवाडा अध्यक्ष वैजनाथ पावडे यांच्या मार्गदर्शनाखाली विदर्भ आणि मराठवाड्यातील मेंढपाळ समाज बांधवांनी फेटे बांधून आणि घोंगडी काठी घेऊन या सोहळ्यात सहभाग घेतला. यावेळी सर्व मेंढपाळ बांधवांनी पुतळ्यास ११ लिटर दुधाचा दुग्धाभिषेक केल्यानंतर गुलाब पुष्पहार अर्पण करून आदराने अभिवादन केले. या कार्यक्रमाला धनगर समाज मराठवाडा अध्यक्ष वैजनाथ पावडे, माजी पंचायत समिती सदस्य नंदूभाऊ रवंदळे, भानुदास कुरवाडे, बाळू पिसाळ, किसन टेळे, समाधान शिंदे, नवनाथ हाडगे, समाधान करणे, रोहिदास कुराडे, लहानु शिंदे, अनिल येळे, लहू बूचकुले, विलास येळे, रामा येळे, सुधाकर सातपुते, गजानन करनर, गुलाबी येळे, पिंटू येळे, रामा पिसाळ यांच्यासह विदर्भ-मराठवाड्यातील मोठ्या संख्येने मेंढपाळ बांधव उपस्थित होते.
    1
    औंढा नागनाथ येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मेंढपाळ बांधवांकडून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. १ जून रोजी आठवे ज्योतिर्लिंग श्री नागनाथ मंदिराच्या पश्चिम मुख्य द्वारासमोर असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास ११ लिटर दुधाचा दुग्धाभिषेक करत अभिवादन करण्यात आले.

धनगर समाज युवा मल्हार सेना मराठवाडा अध्यक्ष वैजनाथ पावडे यांच्या मार्गदर्शनाखाली विदर्भ आणि मराठवाड्यातील मेंढपाळ समाज बांधवांनी फेटे बांधून आणि घोंगडी काठी घेऊन या सोहळ्यात सहभाग घेतला. यावेळी सर्व मेंढपाळ बांधवांनी पुतळ्यास ११ लिटर दुधाचा दुग्धाभिषेक केल्यानंतर गुलाब पुष्पहार अर्पण करून आदराने अभिवादन केले.

या कार्यक्रमाला धनगर समाज मराठवाडा अध्यक्ष वैजनाथ पावडे, माजी पंचायत समिती सदस्य नंदूभाऊ रवंदळे, भानुदास कुरवाडे, बाळू पिसाळ, किसन टेळे, समाधान शिंदे, नवनाथ हाडगे, समाधान करणे, रोहिदास कुराडे, लहानु शिंदे, अनिल येळे, लहू बूचकुले, विलास येळे, रामा येळे, सुधाकर सातपुते, गजानन करनर, गुलाबी येळे, पिंटू येळे, रामा पिसाळ यांच्यासह विदर्भ-मराठवाड्यातील मोठ्या संख्येने मेंढपाळ बांधव उपस्थित होते.
    user_वैजनाथ पावडे
    वैजनाथ पावडे
    Building society हिंगोली, हिंगोली, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • Post by Gajanan babusing ade
    1
    Post by Gajanan babusing ade
    user_Gajanan babusing ade
    Gajanan babusing ade
    पुसद, यवतमाळ, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • श्री छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
    1
    श्री छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
    user_माधव गायकवाड
    माधव गायकवाड
    माहूर, नांदेड, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • वाशिम जिल्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेने अवैध गावठी हातभट्टी दारू निर्मिती आणि विक्रीविरोधात धडक कारवाई केली आहे. या कारवाईत तब्बल ६ लाख ३३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून नष्ट करण्यात आला, ज्यामुळे अवैध दारू व्यवसाय करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यात अवैध दारू, जुगार, गुटखा आणि शस्त्र अधिनियमांतर्गत कठोर कारवाई सुरू आहे. या मोहिमेअंतर्गत, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी यांना अनसिंग पोलीस ठाणे हद्दीतील मोहगव्हाण येथील धरण परिसरात गावठी हातभट्टी दारू गाळली जात असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे १ जून रोजी पहाटे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोहगव्हाण परिसरात छापा टाकला. पोलिसांची चाहूल लागताच आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. मात्र, पोलिसांनी झाडाझुडपात आणि जमिनीत लपवून ठेवलेले २०० लिटर क्षमतेचे २७ ड्रम आणि १५ लिटर क्षमतेची २१ पिपे शोधून काढली. यामध्ये एकूण ५,४०० लिटर सडवा मोहामाच आणि ३० लिटर गावठी हातभट्टी दारू आढळून आली, ज्याची किंमत सुमारे ५ लाख ७४ हजार ५०० रुपये आहे. याप्रकरणी फरार आरोपी आमिर मोहम्मद नौरंगाबादी (रा. मोहगव्हाण) याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत अनसिंग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच दरम्यान, मानोरा पोलीस ठाणे हद्दीतील कार्ली येथेही स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई केली. येथे अमर दादाराव राऊत याला ताब्यात घेण्यात आले आणि त्याच्याकडून ३५० लिटर सडवा मोहामाच तसेच ३० लिटर गावठी हातभट्टी दारू असा एकूण ५८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी मानोरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेने एकाच दिवशी एकूण ६ लाख ३३ हजार रुपयांचा अवैध दारूसाठा नष्ट केला असून, जिल्ह्यातील अवैध हातभट्टी व्यवसाय पूर्णपणे नष्ट करण्यासाठी आगामी काळातही विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील, अपर पोलीस अधीक्षक लता फड, उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी, सपोनि जगदीश बांगर, पोउपनि शेखर मास्कर आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीपणे केली.
    2
    वाशिम जिल्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेने अवैध गावठी हातभट्टी दारू निर्मिती आणि विक्रीविरोधात धडक कारवाई केली आहे. या कारवाईत तब्बल ६ लाख ३३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून नष्ट करण्यात आला, ज्यामुळे अवैध दारू व्यवसाय करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यात अवैध दारू, जुगार, गुटखा आणि शस्त्र अधिनियमांतर्गत कठोर कारवाई सुरू आहे.

या मोहिमेअंतर्गत, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी यांना अनसिंग पोलीस ठाणे हद्दीतील मोहगव्हाण येथील धरण परिसरात गावठी हातभट्टी दारू गाळली जात असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे १ जून रोजी पहाटे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोहगव्हाण परिसरात छापा टाकला. पोलिसांची चाहूल लागताच आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. मात्र, पोलिसांनी झाडाझुडपात आणि जमिनीत लपवून ठेवलेले २०० लिटर क्षमतेचे २७ ड्रम आणि १५ लिटर क्षमतेची २१ पिपे शोधून काढली. यामध्ये एकूण ५,४०० लिटर सडवा मोहामाच आणि ३० लिटर गावठी हातभट्टी दारू आढळून आली, ज्याची किंमत सुमारे ५ लाख ७४ हजार ५०० रुपये आहे. याप्रकरणी फरार आरोपी आमिर मोहम्मद नौरंगाबादी (रा. मोहगव्हाण) याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत अनसिंग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याच दरम्यान, मानोरा पोलीस ठाणे हद्दीतील कार्ली येथेही स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई केली. येथे अमर दादाराव राऊत याला ताब्यात घेण्यात आले आणि त्याच्याकडून ३५० लिटर सडवा मोहामाच तसेच ३० लिटर गावठी हातभट्टी दारू असा एकूण ५८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी मानोरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

स्थानिक गुन्हे शाखेने एकाच दिवशी एकूण ६ लाख ३३ हजार रुपयांचा अवैध दारूसाठा नष्ट केला असून, जिल्ह्यातील अवैध हातभट्टी व्यवसाय पूर्णपणे नष्ट करण्यासाठी आगामी काळातही विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील, अपर पोलीस अधीक्षक लता फड, उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी, सपोनि जगदीश बांगर, पोउपनि शेखर मास्कर आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीपणे केली.
    user_न्युज मराठी 24x7 वाशिम
    न्युज मराठी 24x7 वाशिम
    Local News Reporter मंगरूळपीर, वाशिम, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • नांदेड जिल्ह्यामध्ये उष्णतेमुळे हैराण झालेल्या नागरिकांना पावसाने मोठा दिलासा दिला आहे. या पावसामुळे तापमानात घट होऊन लोकांना थंडावा जाणवला. मात्र, दुसरीकडे वीजपुरवठ्याच्या समस्येने नागरिक त्रस्त झाले आहेत. वीज वारंवार खंडित होण्याच्या प्रकारामुळे लोकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
    1
    नांदेड जिल्ह्यामध्ये उष्णतेमुळे हैराण झालेल्या नागरिकांना पावसाने मोठा दिलासा दिला आहे. या पावसामुळे तापमानात घट होऊन लोकांना थंडावा जाणवला. मात्र, दुसरीकडे वीजपुरवठ्याच्या समस्येने नागरिक त्रस्त झाले आहेत. वीज वारंवार खंडित होण्याच्या प्रकारामुळे लोकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
    user_Today One Live
    Today One Live
    Journalist Nanded, Maharashtra•
    5 hrs ago
  • परभणी-हिंगोली विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. विवेक नावंदर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
    1
    परभणी-हिंगोली विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. विवेक नावंदर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    5 hrs ago
  • परभणी-हिंगोली विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेना शिंदे गटाकडून सईद खान यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या प्रसंगी मंत्री संजय शिरसाट, मंत्री मेघना बोर्डीकर, आमदार संतोष बांगर आणि उदय सावंत यांच्यासह अनेक आमदारांची उपस्थिती होती.
    1
    परभणी-हिंगोली विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेना शिंदे गटाकडून सईद खान यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या प्रसंगी मंत्री संजय शिरसाट, मंत्री मेघना बोर्डीकर, आमदार संतोष बांगर आणि उदय सावंत यांच्यासह अनेक आमदारांची उपस्थिती होती.
    user_Abn news
    Abn news
    Media company Parbhani, Maharashtra•
    6 hrs ago
  • परभणी-हिंगोली विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी सुशील देशमुख यांनी अपक्ष उमेदवार म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. हा अर्ज विधान परिषदेसाठी भरण्यात आला आहे.
    1
    परभणी-हिंगोली विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी सुशील देशमुख यांनी अपक्ष उमेदवार म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. हा अर्ज विधान परिषदेसाठी भरण्यात आला आहे.
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    5 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.