वाशिम जिल्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेने अवैध गावठी हातभट्टी दारू निर्मिती आणि विक्रीविरोधात धडक कारवाई केली आहे. या कारवाईत तब्बल ६ लाख ३३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून नष्ट करण्यात आला, ज्यामुळे अवैध दारू व्यवसाय करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यात अवैध दारू, जुगार, गुटखा आणि शस्त्र अधिनियमांतर्गत कठोर कारवाई सुरू आहे. या मोहिमेअंतर्गत, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी यांना अनसिंग पोलीस ठाणे हद्दीतील मोहगव्हाण येथील धरण परिसरात गावठी हातभट्टी दारू गाळली जात असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे १ जून रोजी पहाटे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोहगव्हाण परिसरात छापा टाकला. पोलिसांची चाहूल लागताच आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. मात्र, पोलिसांनी झाडाझुडपात आणि जमिनीत लपवून ठेवलेले २०० लिटर क्षमतेचे २७ ड्रम आणि १५ लिटर क्षमतेची २१ पिपे शोधून काढली. यामध्ये एकूण ५,४०० लिटर सडवा मोहामाच आणि ३० लिटर गावठी हातभट्टी दारू आढळून आली, ज्याची किंमत सुमारे ५ लाख ७४ हजार ५०० रुपये आहे. याप्रकरणी फरार आरोपी आमिर मोहम्मद नौरंगाबादी (रा. मोहगव्हाण) याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत अनसिंग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच दरम्यान, मानोरा पोलीस ठाणे हद्दीतील कार्ली येथेही स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई केली. येथे अमर दादाराव राऊत याला ताब्यात घेण्यात आले आणि त्याच्याकडून ३५० लिटर सडवा मोहामाच तसेच ३० लिटर गावठी हातभट्टी दारू असा एकूण ५८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी मानोरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेने एकाच दिवशी एकूण ६ लाख ३३ हजार रुपयांचा अवैध दारूसाठा नष्ट केला असून, जिल्ह्यातील अवैध हातभट्टी व्यवसाय पूर्णपणे नष्ट करण्यासाठी आगामी काळातही विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील, अपर पोलीस अधीक्षक लता फड, उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी, सपोनि जगदीश बांगर, पोउपनि शेखर मास्कर आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीपणे केली.
वाशिम जिल्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेने अवैध गावठी हातभट्टी दारू निर्मिती आणि विक्रीविरोधात धडक कारवाई केली आहे. या कारवाईत तब्बल ६ लाख ३३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून नष्ट करण्यात आला, ज्यामुळे अवैध दारू व्यवसाय करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यात अवैध दारू, जुगार, गुटखा आणि शस्त्र अधिनियमांतर्गत कठोर कारवाई सुरू आहे. या मोहिमेअंतर्गत, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी यांना अनसिंग पोलीस ठाणे हद्दीतील मोहगव्हाण येथील धरण परिसरात गावठी हातभट्टी दारू गाळली जात असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे १ जून रोजी पहाटे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोहगव्हाण परिसरात छापा टाकला. पोलिसांची चाहूल लागताच आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. मात्र, पोलिसांनी झाडाझुडपात आणि जमिनीत लपवून ठेवलेले २०० लिटर क्षमतेचे २७ ड्रम आणि १५ लिटर क्षमतेची २१ पिपे शोधून काढली. यामध्ये एकूण ५,४०० लिटर सडवा मोहामाच आणि ३० लिटर गावठी हातभट्टी दारू आढळून आली, ज्याची किंमत सुमारे ५ लाख
७४ हजार ५०० रुपये आहे. याप्रकरणी फरार आरोपी आमिर मोहम्मद नौरंगाबादी (रा. मोहगव्हाण) याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत अनसिंग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच दरम्यान, मानोरा पोलीस ठाणे हद्दीतील कार्ली येथेही स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई केली. येथे अमर दादाराव राऊत याला ताब्यात घेण्यात आले आणि त्याच्याकडून ३५० लिटर सडवा मोहामाच तसेच ३० लिटर गावठी हातभट्टी दारू असा एकूण ५८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी मानोरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेने एकाच दिवशी एकूण ६ लाख ३३ हजार रुपयांचा अवैध दारूसाठा नष्ट केला असून, जिल्ह्यातील अवैध हातभट्टी व्यवसाय पूर्णपणे नष्ट करण्यासाठी आगामी काळातही विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील, अपर पोलीस अधीक्षक लता फड, उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी, सपोनि जगदीश बांगर, पोउपनि शेखर मास्कर आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीपणे केली.
- वाशिम जिल्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेने अवैध गावठी हातभट्टी दारू निर्मिती आणि विक्रीविरोधात धडक कारवाई केली आहे. या कारवाईत तब्बल ६ लाख ३३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून नष्ट करण्यात आला, ज्यामुळे अवैध दारू व्यवसाय करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यात अवैध दारू, जुगार, गुटखा आणि शस्त्र अधिनियमांतर्गत कठोर कारवाई सुरू आहे. या मोहिमेअंतर्गत, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी यांना अनसिंग पोलीस ठाणे हद्दीतील मोहगव्हाण येथील धरण परिसरात गावठी हातभट्टी दारू गाळली जात असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे १ जून रोजी पहाटे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोहगव्हाण परिसरात छापा टाकला. पोलिसांची चाहूल लागताच आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. मात्र, पोलिसांनी झाडाझुडपात आणि जमिनीत लपवून ठेवलेले २०० लिटर क्षमतेचे २७ ड्रम आणि १५ लिटर क्षमतेची २१ पिपे शोधून काढली. यामध्ये एकूण ५,४०० लिटर सडवा मोहामाच आणि ३० लिटर गावठी हातभट्टी दारू आढळून आली, ज्याची किंमत सुमारे ५ लाख ७४ हजार ५०० रुपये आहे. याप्रकरणी फरार आरोपी आमिर मोहम्मद नौरंगाबादी (रा. मोहगव्हाण) याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत अनसिंग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच दरम्यान, मानोरा पोलीस ठाणे हद्दीतील कार्ली येथेही स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई केली. येथे अमर दादाराव राऊत याला ताब्यात घेण्यात आले आणि त्याच्याकडून ३५० लिटर सडवा मोहामाच तसेच ३० लिटर गावठी हातभट्टी दारू असा एकूण ५८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी मानोरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेने एकाच दिवशी एकूण ६ लाख ३३ हजार रुपयांचा अवैध दारूसाठा नष्ट केला असून, जिल्ह्यातील अवैध हातभट्टी व्यवसाय पूर्णपणे नष्ट करण्यासाठी आगामी काळातही विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील, अपर पोलीस अधीक्षक लता फड, उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी, सपोनि जगदीश बांगर, पोउपनि शेखर मास्कर आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीपणे केली.2
- अकोल्यात रेल्वेच्या जागेवर बांधलेली घरे रेल्वे प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने मोठ्या बंदोबस्तात हटवली आहेत.1
- Post by Gajanan babusing ade1
- औंढा नागनाथ येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मेंढपाळ बांधवांकडून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. १ जून रोजी आठवे ज्योतिर्लिंग श्री नागनाथ मंदिराच्या पश्चिम मुख्य द्वारासमोर असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास ११ लिटर दुधाचा दुग्धाभिषेक करत अभिवादन करण्यात आले. धनगर समाज युवा मल्हार सेना मराठवाडा अध्यक्ष वैजनाथ पावडे यांच्या मार्गदर्शनाखाली विदर्भ आणि मराठवाड्यातील मेंढपाळ समाज बांधवांनी फेटे बांधून आणि घोंगडी काठी घेऊन या सोहळ्यात सहभाग घेतला. यावेळी सर्व मेंढपाळ बांधवांनी पुतळ्यास ११ लिटर दुधाचा दुग्धाभिषेक केल्यानंतर गुलाब पुष्पहार अर्पण करून आदराने अभिवादन केले. या कार्यक्रमाला धनगर समाज मराठवाडा अध्यक्ष वैजनाथ पावडे, माजी पंचायत समिती सदस्य नंदूभाऊ रवंदळे, भानुदास कुरवाडे, बाळू पिसाळ, किसन टेळे, समाधान शिंदे, नवनाथ हाडगे, समाधान करणे, रोहिदास कुराडे, लहानु शिंदे, अनिल येळे, लहू बूचकुले, विलास येळे, रामा येळे, सुधाकर सातपुते, गजानन करनर, गुलाबी येळे, पिंटू येळे, रामा पिसाळ यांच्यासह विदर्भ-मराठवाड्यातील मोठ्या संख्येने मेंढपाळ बांधव उपस्थित होते.1
- माहूर शहर आणि तालुक्यात लोकमाता, न्यायप्रिय तसेच जनकल्याणकारी राज्यकर्त्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या जयंतीनिमित्त शहरासह संपूर्ण तालुक्यात विविध ठिकाणी समाजप्रबोधन, महिला सक्षमीकरण, लोककल्याण आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देणारे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकासह श्री दत्तकृपा प्रतिष्ठान येथेही जयंतीचे कार्यक्रम पार पडले. या कार्यक्रमांमध्ये उपस्थित मान्यवरांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जीवनकार्य, त्यांची न्यायव्यवस्था, महिला सक्षमीकरणातील योगदान आणि धर्मकार्यातील विचार तसेच लोककल्याणकारी दृष्टिकोन यावर आपले विचार व्यक्त केले. यावेळी माजी नगराध्यक्ष प्रा. राजेंद्र केशवे, ॲड. रमण जायभाये, नीलकंठ मस्के, डॉ. निरंजन केशवे, संजय भाऊ राठोड, ज्ञानेश्वर लाड, गोपू महामुने, अविनाश भोयर, सौ. राधा उपलेचवार, राजू सौंदलकर, विलास गावंडे, तानाजी मनभे, अनिल वाघमारे, विनोद सूर्यवंशी, नंदकुमार जोशी सर, इलियास बावाणी, योगेश परसवाळे, पुरुषोत्तम लांडगे, कैलास महल्ले, संतोष महल्ले, सौ. स्वाती आडे, रामकृष्ण केंद्रे, कैलास फड, पवन पांढरे, नवल वानखेडे, बळीराम डुरके, संतोष गंधे, संजय गुरनुले, परमेश्वर कानडे, आनंद हिंगाडे, संतोष हिंगाडे, बालाजी गेंटलवार, लव गावंडे आणि दत्तकृपा प्रतिष्ठानचे विजय कांबळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच, तालुक्यातील मनीरामथड येथे पिंटू पाटील वायफनीकर यांच्यासह अन्य मान्यवरांनीही अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी केली.2
- श्री संत गजानन महाराज संस्थान, शेगांव यांच्या वतीने श्री क्षेत्र पंढरपूर येथे आयोजित करण्यात येणाऱ्या पायी वारीच्या ५७ व्या पालखी सोहळ्याची २०२६ ची वेळपत्रिका जाहीर करण्यात आली आहे.1
- चांदूर रेल्वे पोलिसांनी गावठी दारूची निर्मिती करणाऱ्या एका हातभट्टीवर धडक कारवाई केली आहे. या कारवाईदरम्यान, पोलिसांनी सुमारे ९ लाख ८८ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, हा सर्व जप्त केलेला मुद्देमाल जागेवरच नष्ट करण्यात आला.1
- वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर तालुक्यातील तऱ्हाळा-पांगरी महादेव रस्त्याचे काम रखडल्याने ग्रामस्थांनी तीव्र आक्रमक भूमिका घेतली आहे. या रखडलेल्या कामाविरोधात समृद्धी महामार्ग रोखण्याचा इशारा दिल्यानंतर प्रशासनात खळबळ उडाली आहे. यापूर्वीही ग्रामस्थांनी तहसीलदारांना सविस्तर निवेदन देत आंदोलनाचा इशारा दिला होता. रविवारी (३१ मे) सकाळी १०.३० ते दुपारी १२ वाजेदरम्यान ग्रामस्थ समृद्धी महामार्गावर आंदोलनासाठी एकत्र आले होते. मात्र, पोलीस प्रशासनाच्या हस्तक्षेपानंतर आणि सोमवारी संबंधित विभागाची बैठक घेऊन काम तातडीने सुरू करण्याचे आश्वासन मिळाल्याने ग्रामस्थांनी हे आंदोलन तात्पुरते पुढे ढकलले. यानंतर उपअभियंता आणि ठाणेदार यांना पुन्हा निवेदन देत पावसाळ्यापूर्वी रस्त्याचे काम पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली. यामध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजू व्यवस्थित भरणे, कामादरम्यान नागरिकांसाठी पर्यायी मार्गाची व्यवस्था करणे तसेच मंजूर अंदाजपत्रक व तांत्रिक निकषांनुसार दर्जेदार काम करण्याची मागणी प्रामुख्याने नमूद करण्यात आली. रस्त्याच्या निकृष्ट स्थितीमुळे अपघात झाल्यास जखमींच्या उपचाराचा खर्च संबंधित ठेकेदाराकडून वसूल करण्यात यावा, अशीही मागणी ग्रामस्थांनी केली आहे. कामाच्या गुणवत्तेची गुणनियंत्रण विभागामार्फत चौकशी व्हावी आणि काम पूर्ण होईपर्यंत प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचे अधिकारी घटनास्थळी उपस्थित राहून देखरेख करावीत, अशीही त्यांची मागणी आहे. याशिवाय, संपूर्ण टेंडर प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, एका ठेकेदाराला एकाचवेळी अनेक कामे कोणत्या निकषांवर देण्यात आली, याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. टेंडर प्रक्रियेत आर्थिक अनियमितता झाल्याचा संशय व्यक्त करत, या प्रकरणाची आर्थिक गुन्हे शाखेमार्फत चौकशी करून संबंधित अधिकारी व ठेकेदारांच्या भूमिकेची सखोल तपासणी करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. या आंदोलनात महिला, ज्येष्ठ नागरिक आणि युवकांचा मोठ्या संख्येने सहभाग होता. रस्त्याच्या प्रश्नासाठी सतत पाठपुरावा करणारे किशोर देशमुख यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून काम पूर्ण करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. आंदोलनादरम्यान तहसीलदार अनासाने, पोलीस अधिकारी विशाल क्षीरसागर व किशोर शेळके यांनी ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. दरम्यान, खासदार संजय देशमुख यांनीही ग्रामस्थांच्या मागणीची दखल घेत प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या कार्यकारी अभियंत्यांशी संपर्क साधून रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. प्रशासनाने तातडीने योग्य ती कारवाई न केल्यास स्थगित केलेले आंदोलन पुन्हा तीव्र करण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. सोमवारी होणाऱ्या बैठकीत कोणता निर्णय घेतला जातो, याकडे आता संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.4