केआयटी (KIT) विनयभंग प्रकरण: पीडित विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी महिला पोलीस अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करा! केआयटी (KIT) विनयभंग प्रकरण: पीडित विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी महिला पोलीस अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करा! हिंदू एकता आंदोलनतर्फे कोल्हापूर पोलीस अधीक्षकांना निवेदन; एस.पी. योगेश कुमार यांनी दिले कारवाईचे आश्वासन. कोल्हापूर (प्रतिनिधी): केआयटी (KIT) कॉलेजमधील एका विभागप्रमुख प्राध्यापकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग झाल्याच्या प्रकरणाने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची व्याप्ती मोठी असण्याची शक्यता असून, कॉलेजमधील इतर विद्यार्थिनींना विश्वासात घेण्यासाठी महिला पोलीस अधिकाऱ्यांमार्फत सखोल चौकशी करावी, अशी मागणी 'हिंदू एकता आंदोलन'तर्फे करण्यात आली आहे. आज, मंगळवारी दुपारी १२:३० वाजता हिंदू एकता आंदोलनचे जिल्हाध्यक्ष दिपक सुरेशराव देसाई यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक (SP) योगेश कुमार यांना यासंदर्भात सविस्तर निवेदन दिले. यावेळी बोलताना दिपक देसाई म्हणाले की, "या प्रकरणात पीडित मुलींनी आमच्याशी संपर्क साधल्यानंतर आम्ही ६ मार्च रोजी स्वतः पोलीस स्टेशनमध्ये हजर राहून गुन्हा (FIR) दाखल केला आहे. मात्र, संबंधित प्राध्यापकाची वर्तणूक पाहता पीडित मुलींची संख्या अधिक असू शकते. कॉलेज प्रशासनाने पीडितेची बाजू समजून घेण्याऐवजी तिलाच पुराव्यांची मागणी करून मानसिक त्रास दिला आहे, ही बाब अत्यंत गंभीर आहे. तसेच, या प्रकरणाचा गैरफायदा घेऊन काही राजकीय कार्यकर्ते खंडणी गोळा करत असल्याचे समजत असून, याची शहानिशा करून अशा प्रवृत्तींवरही पोलिसांनी कठोर कारवाई करावी." पोलीस अधीक्षकांचे आश्वासन: निवेदन स्वीकारल्यानंतर पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी शिष्टमंडळाच्या भावना जाणून घेतल्या. त्यांनी या विषयात जातीने लक्ष घालण्याचे आश्वासन दिले असून, पीडित मुलींना न्याय मिळावा आणि शैक्षणिक संस्थांमध्ये सुरक्षित वातावरण राहील, या दृष्टीने पोलीस प्रशासन तातडीने पुढील पावले उचलले, असे स्पष्ट केले. याप्रसंगी हिंदू एकता आंदोलनचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने विलास मोहीते, बाबु साखळकर, प्रतिक डिसले, ऍड. आसावरी कुलकर्णी, ऐश्वर्या मुनिश्वर, ऍड. शुभांगी निंबाळकर, सुधाकर वडगांवकर, आनंदा कवडे, नागेश ऊगार, सुनिक ठाकुर, राहुल गोंदील, अंजली जाधव, ऍड. अनुप कुलकर्णी, राजेंद्र करंबे, शिवाजी चिले, हिंदूराव शेळके, अनिकेत पोवार व इतर कार्यकर्त्यांचा समावेश होता.

- कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील शिरढोण गावामध्ये दुपारी सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास धक्कादायक चोरीची घटना घडली. घरात कोणी नसल्याची संधी साधत अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम बॅगेमध्ये भरली. मात्र घराशेजारील युवकाच्या सतर्कतेमुळे चोराला दारातच अडवण्यात आले. गल्लीतील नागरिक जमा झाल्यानंतर चोराने चोरीची कबुली देत चोरलेले साहित्य परत केले. घटनेची माहिती मिळताच कुरुंदवाड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन चोराला ताब्यात घेतले. या घटनेमुळे शिरढोण गावात मोठी खळबळ उडाली आहे.1
- पुणे जिल्ह्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या बारामती पंचायत समितीच्या सभापतीपदी किरण रावसाहेब तावरे यांची निवड करण्यात आली आहे. तर उपसभापतीपदी गुणवडी गणातील शुभांगी सुनील आगवणे यांची निवड झाली आहे. पणदरे गटातून निवडून आलेल्या किरण तावरे यांच्यावर संघटन कौशल्य आणि कामाच्या अनुभवाच्या जोरावर सभापतीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. दरम्यान, ही निवड उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या सूचनेनुसार झाल्याची माहिती समोर येत आहे. निवडीनंतर किरण तावरे यांनी बारामती तालुक्यातील ग्रामीण विकास, शेतकरी, महिला आणि युवकांसाठीच्या योजनांना प्राधान्य देणार असल्याचे सांगितले आहे. पंचायत समितीच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली.1
- Post by समर्थ न्युज आवाज महाराष्ट्राचा1
- सध्या संपूर्ण देशात रमजानच्या पवित्र महिना चालू आहे या महिन्यात मुस्लिम समुदायाने रोजे व नमाज पाटण करत आहेत याच म्हणजे सोलापुरात सोशल मीडियावर काही असामाजिक तत्वांकडून इस्लाम धर्म आणि मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावणारी आक्षेपार्ह पोस्ट टाकण्यात आली आहे. अशा प्रकारच्या पोस्टमुळे समाजात द्वेष, आपसी वैमनस्य आणि तणाव निर्माण होतो, जे कोणत्याही परिस्थितीत स्वीकारार्ह नाही. या गंभीर प्रकरणाची दखल घेत आम्ही सोलापूरचे पोलीस आयुक्त यांना लेखी तक्रार दिली असून संबंधित इंस्टाग्राम अकाउंटची तात्काळ चौकशी करून त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. भारत हा लोकशाही देश असून येथे सर्व धर्मांचा सन्मान केला जातो. त्यामुळे कोणत्याही धर्म, मजहब किंवा समाजाच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई होणे आवश्यक आहे, जेणेकरून भविष्यात कोणीही अशी कृती करण्याचे धाडस करणार नाही. यावेळी पार्टीचे सर्व नगरसेवक व पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते1
- पिंपरी चिंचवड : - पिंपरी-चिंचवडमधील डांगे चौक परिसरात वीज पुरवठा करणाऱ्या ट्रान्सफॉर्मरला अचानक आग लागल्याची घटना घडली. घटनेमुळे परिसरात काही काळ घबराटीचे वातावरण निर्माण झाले. स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे आणि तत्काळ केलेल्या प्रयत्नांमुळे आग आटोक्यात आणण्यात आली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र काही काळ परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला होता... #पिंपरीचिंचवड #डांगेचौक #ट्रान्सफॉर्मरआग #आगघटना #वीजपुरवठा #पिंपरीचिंचवडबातम्या #स्थानिकबातमी #आगनियंत्रण #वीजखंडित #PimpriChinchwad #DangeChowk #TransformerFire #FireIncident #PowerSupply #LocalNews #PimpriChinchwadNew #ElectricTransformer #PowerCut1
- मांजरी बुद्रुक ब्रिजखालील बोगद्यात कचऱ्याचा खच मांजरी बुद्रुक येथील ब्रिजखालील बोगद्यात मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात असल्याने परिसर अस्वच्छ झाला आहे. काही बेफिकीर नागरिकांमुळे दुर्गंधी पसरत असून स्थानिकांनी संताप व्यक्त केला आहे. कचरा टाकणाऱ्यांवर महानगरपालिकेने कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.1
- पिंपरीतून एका व्यापाऱ्याचा अपहरण 'खंडणी विरुद्ध पथक 'काळेवाडी पोलीस स्टेशन 'संगमनेर पोलीस यांच्या मदतीने व्यापाऱ्याची झाली सुटका .1
- Post by NEWS 24 MAHARASHTRA1
- ५० लाखांच्या खंडणीसाठी व्यापाऱ्याचे अपहरण; पोलिसांचा थरारक पाठलाग करून ५ आरोपी अटकेत पिंपरी : प्रतिनिधी, पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक, गुंडा विरोधी पथक आणि काळेवाडी पोलिसांच्या संयुक्त कारवाईत ५० लाख रुपयांच्या खंडणीसाठी एका व्यापाऱ्याचे अपहरण करणाऱ्या ५ आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी थरारक पाठलाग करून अपहृत व्यक्तीची सुखरूप सुटका केली. ९ मार्च रोजी रहाटणी येथील शिवराजनगर परिसरातून एका व्यापाऱ्याचे स्विफ्ट कारमधून अपहरण करून आरोपींनी ५० लाख रुपयांची खंडणी मागितली होती. पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली होती. याप्रकरणी काळेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हे शाखेच्या पथकांनी तांत्रिक विश्लेषण व सीसीटीव्हीच्या मदतीने तपास सुरू केला. आरोपी अपहृत व्यक्तीला उत्तरप्रदेशकडे घेऊन जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर संगमनेर टोल नाक्यावर सापळा रचण्यात आला. या कारवाईत पाच आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून दोन देशी पिस्तुल, सहा जिवंत काडतुसे, मोबाईल फोन, रोख रक्कम व स्विफ्ट कारसह एकूण १८.२८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दरम्यान आरोपींनी अपहृत व्यक्तीला चंदनापुरी घाट परिसरात सोडून दिले होते. पोलिसांनी शोध घेऊन त्या व्यक्तीला सुखरूप ताब्यात घेतले. ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा व काळेवाडी पोलिसांच्या पथकाने केली असून पुढील तपास सुरू आहे.1