राजमाता जिजामाता’च्या एम. ए. शिक्षण शास्त्र विभागाच्या विद्यार्थिनीला सुवर्णपदक.. लातूर (एल पी उगीले) येथील राजमाता जिजामाता अध्यापक महाविद्यालयाची विद्यार्थिनी आरती पांडुरंग कोल्ले यांनी एम.ए. शिक्षण शास्त्र विषयाची मार्च २०२५ परीक्षेत नाशिकच्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात प्रथम क्रमांक पटकावत सुवर्णपदकाच्या मानकरी ठरल्या आहेत. यामुळे ‘लातूर पॅटर्न’च्या यशात मानाचा तुरा रोवला गेला आहे. याबद्दल राजमाता जिजामाता अध्यापक महाविद्यालयातर्फे संस्थेचे सचिव प्राचार्य डी. एन. केंद्रे यांच्या हस्ते फेटा, शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे कौतुक करण्यात आले. नाशिकच्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ अंतर्गत लातूरच्या राजमाता जिजामाता अध्यापक महाविद्यालयात २०२२ पासून एम.ए. एज्युकेशन केंद्र सुरू आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या शिक्षकांना २४ वर्षांची वेतनश्रेणी मिळते. मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून राजमाता जिजामाता अध्यापक महाविद्यालयाची विद्यार्थिनी आरती पांडुरंग कोल्ले यांनी विद्यापीठात प्रथम क्रमांक पटकावत त्या सुवर्णपदकाच्या मानकरी ठरल्या आहेत. या यशाबद्दल विद्यापीठात कुलगुरू डॉ. सोनवणे, प्र. कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, लेखाधिकारी कटलाकुटे व विभाग प्रमुख डॉ. संजीवनी महाले यांच्या उपस्थितीत दीक्षांत समारंभात सुवर्णपदक देऊन गौरविण्यात आले. या परीक्षेचा महाविद्यालयाचा शंभर टक्के निकाल लागला आहे. या यशाबद्दल महाविद्यालयातर्फे आरती कोल्ले यांचे कौतुक करण्यात आले. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा के. ए. जायेभाये, एम.ए. एज्युकेशन केंद्राच्या समन्वयक स्वाती केंद्रे, प्रा. अश्विनी केंद्रे, प्राचार्य जी. आर. मुंडे, प्रा. विजयकुमार लोहारे, परमेश्वर गित्ते, शिवकांत वाडीकर, विष्णू कराड आदी उपस्थित होते. या यशाबद्दल शिक्षक आमदार विक्रम काळे, उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. बाबासाहेब भोसले,शिक्षण उपसंचालक डॉ. दत्तात्रय मठपती, शिक्षण सहसंचालक संजय पंचगल्ले, विद्यापीठातील बी. एड.चे डीन डॉ. चंद्रकांत बाविस्कर, डॉ. वैजयंता पाटील, शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे आदींनी कौतुक केले आहे.

- खून प्रकरणातील चारही आरोपीची धिंड काढून आरोपींना घटनास्थळाकडे नेण्यात आले. लातूर (एल पी उगीले) लातूर जिल्ह्यात हातरून टाकणारी विद्यार्थ्यांतील हाणामारी आणि किरकोळ कारणावरून झालेल्या खून खटल्यातील चारही विद्यार्थी असलेल्या आरोपींना पोलिसांनी लवकरच अटक करून त्यांची धिंड काढून घटनास्थळावर घेऊन गेले. या परिसरात या परिसरात दादागिरी करण्याच्या उद्देशाने किंवा दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने त्यांनी हाणामारी केली असेल तर ती त्यांची दहशत मोडीत काढली जावी. तसेच अशा पद्धतीने जर कोणी कायदा हातात घेतला तर पोलीस प्रशासन त्याची खैर करत नाही हा मेसेज समाजामध्ये जावा या उद्देशाने त्या आरोपींची धिंड काढली गेली आहे. असे आता लोक बोलू लागले आहेत.1
- लातूर -पुरणमल लाहोटी वस्तीगृहासमोरील किरकोळ वादातून तरुणाचा खून –आरोपींची लातूर पोलिसांकडून धिंड काढण्यात आली1
- औसा रोड वरील खुनाच्या वार्तांकनासाठी गेलेल्या पत्रकाराला पोलिसांकडून आरोग्य भाषेत अपमान कारक वागणूक. लातूर आतील समस्त पत्रकार बांधवांकडून त्या मुजोर पोलीस अधिकाऱ्याचा जाहीर निषेध.1
- *शहीद संतोष जगदाळे यांच्या कन्येला पुणे महानगरपालिकेत शासकीय सेवा; डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या पाठपुराव्याला यश* २२ एप्रिल २०२५ रोजी पहलगम (जम्मू-काश्मीर) येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात वीरमरण आलेले शहीद संतोष जगदाळे यांच्या कुटुंबाला आज मोठा दिलासा मिळाला आहे. जगदाळे कुटुंबातील एकमेव कमावत्या व्यक्तीचे छत्र हरपल्याने निर्माण झालेल्या संकटाच्या काळात, त्यांच्या कन्या आसावरी जगदाळे यांना पुणे महानगरपालिकेत शासकीय सेवेत सामावून घेण्याचा मार्ग आता मोकळा झाला असून, त्यांना नियुक्ती देण्याचे आदेश निर्गमित होत आहेत. शहीद संतोष जगदाळे यांच्या निधनानंतर जगदाळे कुटुंब उघड्यावर पडले होते. या घटनेची गांभीर्याने दखल घेत विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी २५ मे २०२५ रोजी जगदाळे कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतली होती. कुटुंबाची हलाखीची परिस्थिती आणि व्यथा जाणून घेतल्यानंतर, डॉ. गोऱ्हे यांनी २७ मे २०२५ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे यांना पत्र लिहून आसावरी जगदाळे यांना विशेष बाब म्हणून शासकीय सेवेत सामावून घेण्याची विनंती केली होती. डॉ. गोऱ्हे यांच्या पत्राच्या अनुषंगाने १९ जून २०२५ रोजी नगरविकास विभागाने पुणे महानगरपालिकेला प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, या प्रक्रियेत अनेक तांत्रिक आणि प्रशासकीय अडचणी निर्माण झाल्या होत्या. या अडचणींमुळे नियुक्ती लांबणीवर पडत असताना डॉ. गोऱ्हे यांनी खचून न जाता सातत्याने पाठपुरावा केला. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांच्या वारंवार बैठका घेतल्या आणि सकारात्मक प्रस्ताव तयार करण्यासाठी प्रशासनावर दबाव निर्माण केला. सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री ना. श्री. एकनाथजी शिंदे यांनी या प्रकरणात संवेदनशीलतेने लक्ष घातले. तांत्रिक अडचणी असूनही एका शहीद कुटुंबाच्या पाठीशी उभे राहण्याची भूमिका त्यांनी घेतली. डॉ. गोऱ्हे यांच्या सततच्या पाठपुराव्याला आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्या सकारात्मक निर्णयाला आज यश आले असून आसावरी यांना नोकरी प्राप्त होत आहे. "संतोष जगदाळे यांनी देशासाठी बलिदान दिले, त्यांचे जाणे ही न भरून निघणारी हानी आहे. त्यांच्या बलिदानाची परतफेड आपण करू शकत नाही, मात्र त्यांच्या कुटुंबाला वाऱ्यावर सोडणे ही आपली संस्कृती नाही. आसावरीला नोकरी मिळवून देण्यासाठी तांत्रिक अडचणींमुळे थोडा विलंब झाला, त्याबद्दल आम्ही जगदाळे कुटुंबाच्या भावनेशी सहमत आहोत. मात्र, आज तिला नियुक्ती मिळत असल्याचा समाधान आहे. उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की, ते केवळ राज्याचे प्रमुख नसून खऱ्या अर्थाने 'लाडक्या बहिणीचे राखणदार' आहेत." या निर्णयामुळे जगदाळे कुटुंबाला आर्थिक स्थैर्य लाभणार असून, एका वीरपुत्राच्या बलिदानाचा सन्मान शासनाकडून करण्यात आला आहे.1
- Post by EKMAT DIGITAL1
- मुखेड तालुक्यातील जाहूर येथे महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर जाहूर येथील सिद्धेश्वर महादेव मंदिर परिसरात मंगळवारी दिनांक 17 फेब्रुवारी 2026 रोजी भव्य कुस्त्यांच्या हंगाव्याचे आयोजन करण्यात आले होते दुपारी ३ वाजता सुरू झालेल्या या जंगी कुस्त्यांमध्ये महाराष्ट्रभरातील नामांकित पैलवानांनी आपला इंगा दाखवला यावेळी माजी आमदार अविनाशजी घाटे यांच्या हस्ते ११,००० रुपये इनामाची मानाची कुस्ती लावण्यात आली यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून रंजीतजी घाटे गोविंदराव पाटील रमाकांत पाटील हिवराळ कृष्णा पाटील ज्ञानेश्वर गोणगोपले देविदास पाटील बोडके मारोती पाटील वडजे उंद्रीकर परमेश्वर पाटील बोडके छत्रु पाटील बोडके यांची उपस्थिती होती7
- Post by Today One Live1
- ऊस मजुराचा मुलगा मंगेश ढेपे झाला सी.ए. लातूर (प्रतिनिधी) जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील केवळ शे दीडशे लोकवस्तीच्या छोट्याशा 'आनंदवाडी' या गावाने अभिमानाने मान उंचावली आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत, एका ऊस मजुराच्या मुलाने, मंगेश व्यंकटराव ढेपे याने सी.ए. परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. मंगेशच्या या यशाने संपूर्ण तालुक्यात त्याचे कौतुक होत असून गावात एखाद्या उत्सवा सारखा आनंद साजरा केला जात आहे. मजुरी करून वडिलांनी लेकाला शिकवलं मंगेशची घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. वडील व्यंकटराव ढेपे हे अल्पशिक्षित असून कोरडवाहू शेती आणि ऊसाच्या गुऱ्हाळावर मजुरी करून संसाराचा गाडा ओढतात. आई दुग्धव्यवसाय करून घरखर्चाला हातभार लावते. मंगेशने त्याचे प्राथमिक शिक्षण गावातच पूर्ण केले, तर माध्यमिक शिक्षणासाठी त्याला दररोज ५ ते ६ किलोमीटरची पायपीट करावी लागली.लातूरच्या दयानंद कॉलेजमधून बी.कॉम पूर्ण केल्यानंतर, २०१५ मध्ये त्याने पुणे गाठले. अडीच हजारांच्या नोकरीपासून सी.ए. पर्यंतचा प्रवास सी.ए. चा अभ्यासक्रम अत्यंत खर्चिक आणि कठीण असताना मंगेश डगमगला नाही. पुण्यात सुरुवातीला त्याने अवघ्या अडीच हजार रुपये पगारावर खासगी नोकरी करत स्वतःच्या खर्चाला जोड दिली. वडिलांनी रात्रंदिवस कष्ट करून मंगेशच्या शिक्षणाची ओढ कायम ठेवली. २०१६ पासून सुरू झालेला हा खडतर प्रवास अखेर यशात परावर्तित झाला. मंगेशच्या या यशाने पूर्ण गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. एखादा सण साजरा करावा त्या पद्धतीने गावकरी आनंद उत्सव साजरा करत आहेत. मंगेश ढेपे यांच्यावर अभिनंदनाचा अक्षरशः वर्षाव होतो आहे. मंगेश ढेपे यांचे आवाहन तरुणांनो जिद्द ठेवा, मी मदतीला तयार! "माझ्या यशाचे पूर्ण श्रेय माझ्या वडिलांच्या कष्टाला आहे. ग्रामीण भागातील तरुण पिढीने व्यसनांच्या आहारी न जाता मोठी स्वप्ने पाहिली पाहिजेत. मनात जिद्द असेल तर यश नक्की मिळते. कोणत्याही गरीब विद्यार्थ्याला शिक्षणासाठी मार्गदर्शनाची गरज असल्यास मी मदतीसाठी सदैव तत्पर असेन." — मंगेश ढेपे,1