क्रांति ज्योंती सावित्री बाई फुले बालसंगोपन योजनेचा गरजू बालकांनी लाभ घ्यावा चांदवड : अनाथ, निराधार, एकल पालकांची तसेच विविध कारणांमुळे संगोपनाची गरज असलेल्या बालकांना आधार देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागामार्फत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना राबविण्यात येत आहे. आज आमदार डॉ. राहुल दादा आहेर यांच्या हस्ते चांदवड तालुक्यातील पात्र लाभार्थी बालकांना या योजनेचा लाभ देण्यात आला तसेच लाभार्थींना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. या योजनेंतर्गत अनाथ व निराधार बालके, आई किंवा वडील गमावलेली बालके, एकल पालकांची बालके, दोन्ही पालक दिव्यांग असलेली बालके तसेच विशेष कौटुंबिक किंवा आपत्तीजन्य परिस्थितीतील पात्र बालकांचा समावेश होऊ शकतो. पात्र बालकांना दरमहा ₹2,250 आर्थिक सहाय्य देण्यात येते. या आर्थिक सहाय्यामुळे बालकांच्या शिक्षण, आरोग्य आणि दैनंदिन संगोपनासाठी कुटुंबाला मोठी मदत मिळणार आहे. आर्थिक अडचणींमुळे बालकांच्या शिक्षणावर किंवा संगोपनावर परिणाम होऊ नये, तसेच त्यांना सुरक्षित आणि कौटुंबिक वातावरणात वाढण्याची संधी मिळावी, हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे. यावेळी आमदार डॉ. राहुल दादा आहेर यांनी या योजनेमुळे गरजू व सर्वसामान्य कुटुंबातील बालकांना मोठा आधार मिळणार असून, पात्र लाभार्थींनी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. तसेच शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभही गरजू नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. चांदवड तालुक्यातील योजनेच्या निकषांनुसार पात्र असलेल्या अनाथ, निराधार व एकल पालकांच्या बालकांच्या पालकांनी किंवा पालकत्वाची जबाबदारी घेणाऱ्या व्यक्तींनी आवश्यक कागदपत्रांसह संबंधित महिला व बाल विकास विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले. या कार्यक्रमास भाजप तालुका अध्यक्ष मनोज शिंदे, गटविकास अधिकारी मच्छिंद्र साबळे, बालविकास अधिकारी सचिन शिंदे, नगराध्यक्ष वैभव बागुल, भाजप ज्येष्ठ नेते अशोक भोसले, भाजप ज्येष्ठ नेते अशोक काका व्यवहारे, महिला मोर्चा तालुका अध्यक्ष गीताताई झाल्टे, महिला मोर्चा शहर अध्यक्ष कल्याणी कुलकर्णी, शांताराम भवर, योगेश ढोमसे, डॉ. स्वातीताई देवरे, नगरसेविका सरला अग्रवाल, नगरसेविका मंगल मोरे, नगरसेविका नयना वाघ, नगरसेविका जयश्री प्रजापत, नगरसेविका पूनम बांगरे, सुरेश पाटील, रघुनाथ काळे, बाजीराव वानखेडे, विजय धाकराव, देविदास आहेर, अमोल देवरे, पिंटू भोईटे, मिलिंद खरे, राहुल कोतवाल, वर्धमान पांडे, बापू शिंदे, मुन्ना गांधी, अरुण देवढे, जीवन देशमुख, संभाजी गुंजाळ, राहुल केदारे, दीपक उशीर, गणेश ठाकरे, कसिफ खान, आत्माराम खताळ तसेच सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, नगरसेवक, पंचायत समितीचे अधिकारी-कर्मचारी आणि लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
क्रांति ज्योंती सावित्री बाई फुले बालसंगोपन योजनेचा गरजू बालकांनी लाभ घ्यावा चांदवड : अनाथ, निराधार, एकल पालकांची तसेच विविध कारणांमुळे संगोपनाची गरज असलेल्या बालकांना आधार देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागामार्फत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना राबविण्यात येत आहे. आज आमदार डॉ. राहुल दादा आहेर यांच्या हस्ते चांदवड तालुक्यातील पात्र लाभार्थी बालकांना या योजनेचा लाभ देण्यात आला तसेच लाभार्थींना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. या योजनेंतर्गत अनाथ व निराधार बालके, आई किंवा वडील गमावलेली बालके, एकल पालकांची बालके, दोन्ही पालक दिव्यांग असलेली बालके तसेच
विशेष कौटुंबिक किंवा आपत्तीजन्य परिस्थितीतील पात्र बालकांचा समावेश होऊ शकतो. पात्र बालकांना दरमहा ₹2,250 आर्थिक सहाय्य देण्यात येते. या आर्थिक सहाय्यामुळे बालकांच्या शिक्षण, आरोग्य आणि दैनंदिन संगोपनासाठी कुटुंबाला मोठी मदत मिळणार आहे. आर्थिक अडचणींमुळे बालकांच्या शिक्षणावर किंवा संगोपनावर परिणाम होऊ नये, तसेच त्यांना सुरक्षित आणि कौटुंबिक वातावरणात वाढण्याची संधी मिळावी, हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे. यावेळी आमदार डॉ. राहुल दादा आहेर यांनी या योजनेमुळे गरजू व सर्वसामान्य कुटुंबातील बालकांना मोठा आधार मिळणार असून, पात्र लाभार्थींनी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. तसेच शासनाच्या
विविध कल्याणकारी योजनांचा लाभही गरजू नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. चांदवड तालुक्यातील योजनेच्या निकषांनुसार पात्र असलेल्या अनाथ, निराधार व एकल पालकांच्या बालकांच्या पालकांनी किंवा पालकत्वाची जबाबदारी घेणाऱ्या व्यक्तींनी आवश्यक कागदपत्रांसह संबंधित महिला व बाल विकास विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले. या कार्यक्रमास भाजप तालुका अध्यक्ष मनोज शिंदे, गटविकास अधिकारी मच्छिंद्र साबळे, बालविकास अधिकारी सचिन शिंदे, नगराध्यक्ष वैभव बागुल, भाजप ज्येष्ठ नेते अशोक भोसले, भाजप ज्येष्ठ नेते अशोक काका व्यवहारे, महिला मोर्चा तालुका अध्यक्ष गीताताई झाल्टे, महिला मोर्चा
शहर अध्यक्ष कल्याणी कुलकर्णी, शांताराम भवर, योगेश ढोमसे, डॉ. स्वातीताई देवरे, नगरसेविका सरला अग्रवाल, नगरसेविका मंगल मोरे, नगरसेविका नयना वाघ, नगरसेविका जयश्री प्रजापत, नगरसेविका पूनम बांगरे, सुरेश पाटील, रघुनाथ काळे, बाजीराव वानखेडे, विजय धाकराव, देविदास आहेर, अमोल देवरे, पिंटू भोईटे, मिलिंद खरे, राहुल कोतवाल, वर्धमान पांडे, बापू शिंदे, मुन्ना गांधी, अरुण देवढे, जीवन देशमुख, संभाजी गुंजाळ, राहुल केदारे, दीपक उशीर, गणेश ठाकरे, कसिफ खान, आत्माराम खताळ तसेच सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, नगरसेवक, पंचायत समितीचे अधिकारी-कर्मचारी आणि लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- टिपू सुलतान फोटोवरून पुन्हा वाद ! फोटो काढायला लावणार - दादा भुसे मालेगाव महापालिकेच्या उपमहापौर दालनात पुन्हा एकदा लागला टिपू सुलतान यांचा फोटो लागल्याचं पाहायला मिळालं. आता, या फोटोवरुन पुन्हा नवा वाद सुरू झाल्याचं दिसून येत आहे. विशेष म्हणजे, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह अनेक महापुरुषांच्या फोटो समवेत लागला टिपू सुलतान यांचा फोटो झळकला. कार्यालयाच्या नूतनीकरणानंतर टिपू सुलतान यांचा फोटो कार्यालयात लावणार असल्याचे शान ए हिंद यांनी यापूर्वी म्हटले होते. त्यामुळे, आता टिपू सुलतान यांचा फोटो लावल्यावरून मालेगावात पुन्हा वादंग उठले असून यापूर्वी देखील वाद झाल्याचं पाहायला मिळालं. आता, पुन्हा फोटो लावल्याने वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उपमहापौर शान ए हिंद यांनी आज नूतनीकरण केलेल्या दालनात प्रवेश केला. त्यावेळी, टिपू सुलतान यांनी देशासाठी बलिदान दिल्याने त्यांचा फोटो कार्यालयात लावल्याचा पुनरुच्चार उपमहापौर शान-ए-हिंद यांनी केला. त्यामुळे, आता मालेगाव महापालिकेतील उपमहापौरांच्या या भूमिकेवर इतर विरोधी पक्षातील सदस्य काय भूमिका घेतात हे महत्त्वाचे आहे. त्यात, शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी याबाबत मला माहिती नाही, पण फोटो असेल तर काढायला लावणार असे स्पष्ट केले. नाशिक जिल्ह्यातील मालेगावच्या महापालिकेत टिपू सुलतानचा फोटो लावला आहे का, याची माहिती घेईल आणि तसे असेल तर फोटो काढण्यासाठी सूचना करणार असल्याचं मंत्री दादा भुसे यांनी म्हटलं. त्यामुळे, आता टिपू सुलतान यांच्या फोटोवरुन नवा वाद निर्माण झाल्याचं दिसून येत आहे.1
- दिंडोरी तालुक्यातील उमराणे बुद्रुक येथील पशुवैद्यकीय दवाखान्याची दुरावस्था, कर्मचारी दवाखान्यात येतात की नाही प्रश्नचिन्ह1
- दिंडोरी तालुक्यातील कृष्ण गाव येथील अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता दिंडोरी तालुक्यातील कृष्ण गाव येथील हनुमंत रायाच्या पटांगणात सुरू असलेल्यांना भेटण्याची आज सांगता करण्यात आली या नाम्यामध्ये सात दिवस हे भजन कीर्तन हरिपाठ गाथा भजन व प्रवचन असे भरगच्च कार्यक्रम राहून आज महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळेस परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित राहून शोभा वाढवले त्यानंतर अन्नदानातून उरलेला शिधा हा ज्ञानराज वारकरी संस्थेला ग्रामस्थांनी दान म्हणून दिला आहे या ज्ञानराज वारकरी संस्थेमध्ये आज 40 ते 45 विद्यार्थी हे गीता भागवत व पखवाज याचे शिक्षण घेत आहे ह्या वारकरी शिक्षण संस्थेत पाचवीपासून ते दहावी पर्यंत विद्यार्थी ज्ञानदान घेत आहेत .1
- पुस्तकांचा तुटवडा निफाड तालुक्यात मोफत पाठ्यपुस्तकांच्या १,५२७ संचांची कमतरता; तातडीने पुस्तके द्या, अन्यथा शिक्षण विभागाला टाळे ठोकू : शैक्षणिक वर्ष सुरू होऊन अडीच महिन्यांहून अधिक कालावधी उलटूनही निफाड तालुक्यातील विद्यार्थ्यांना शासनाकडून देण्यात येणारी मोफत पाठ्यपुस्तके पूर्णपणे उपलब्ध झालेली नाहीत. तालुक्यात तब्बल १,५२७ संचांचा तुटवडा असून, पुस्तकांअभावी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. हा तुटवडा तातडीने दूर करून विद्यार्थ्यांना पुस्तके उपलब्ध करून द्यावीत; अन्यथा शिक्षण विभागाच्या दालनास टाळे ठोकण्यात येईल, असा इशारा माजी पंचायत समिती सदस्य प्रकाश पाटील यांनी दिला. महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागामार्फत दरवर्षी इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके दिली जातात. शाळा सुरू होण्यापूर्वी आवश्यक पुस्तकांची मागणी नोंदवून ती जिल्हा, तालुका व केंद्रस्तरावर वितरित करण्याची व्यवस्था असते. मात्र, यंदा शाळा सुरू होऊन अडीच महिन्यांहून अधिक काळ लोटला तरी अनेक विद्यार्थ्यांच्या हातात अद्याप पुस्तके पोहोचलेली नाहीत. निफाड तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी इयत्ता दुसरी, चौथी, पाचवी, सहावी व सातवीच्या पुस्तकांचा तुटवडा असल्याचे समोर आले आहे. विशेषतः दुसरी, चौथी आणि सहावीच्या अभ्यासक्रमात बदल झाल्याने जुन्या पाठ्यपुस्तकांचा वापर करणे शक्य नसल्याने विद्यार्थ्यांची अडचण वाढली आहे. काही शाळांमध्ये शिक्षकांनी जुनी पुस्तके जमा करून तात्पुरती व्यवस्था केली असली तरी नवीन पुस्तके उपलब्ध नसल्याने अध्यापनात अडथळे येत आहेत. या प्रश्नाबाबत प्रकाश पाटील यांनी निफाड पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी नम्रता जगताप व सहाय्यक गटविकास अधिकारी सुनील पाटील यांच्याकडे जाब विचारला. तालुक्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात पाठ्यपुस्तकांचा तुटवडा असताना संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे त्याबाबत पुरेशी माहिती नसल्याचे चर्चेतून समोर आल्याने उपस्थितांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी लासलगाव शिवसेना शहरप्रमुख प्रमोद पाटील, लासलगाव शहर विकास समितीचे राजेंद्र कराड, संदीप उगले यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. वर्गनिहाय तुटवडा इयत्ता २ री — ७ संच इयत्ता ४ थी — २७ संच इयत्ता ५ वी — ७६८ संच इयत्ता ६ वी — ६१४ संच इयत्ता ७ वी — १११ संच एकूण — १,५२७ संच “विद्यार्थ्यांना शासनाकडून मिळणारी मोफत पुस्तके वेळेत मिळणे हा त्यांचा हक्क आहे. पुस्तकांचा तुटवडा तातडीने दूर करून सर्व विद्यार्थ्यांना पूर्ण संच उपलब्ध करून द्यावेत.” — प्रकाश पाटील, माजी पंचायत समिती सदस्य1
- आंबोडेत अंगणवाडी बालकांना निकृष्ट अंड्यांचा पुरवठा सरपंचांच्या चौकशीत उडवाउडवीची उत्तरे आंबोडेत अंगणवाडी बालकांना निकृष्ट अंड्यांचा पुरवठा सरपंचांच्या चौकशीत उडवाउडवीची उत्तरे सुरगाणा तालुक्यातील आंबोडे येथील अंगणवाडीत बालकांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहारातील अंडी निकृष्ट दर्जाची असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकारामुळे पालकांत नाराजी व्यक्त होत आहे. बालकांच्या आरोग्याशी खेळ होत असल्याचा आरोप केला जात आहे. नित्कृष्ठ प्रकाराची अंडी बालकांना दिली जात असल्याचे समजताच सरपंच राजेंद्र निकुळे यांनी अंगणवाडीत जात प्रत्यक्ष चौकशी केली. मात्र, यावेळी संबंधितांकडून समाधानकारक माहिती न देता उडवाउडवीची उत्तरे दिल्याचे सरपंचांनी सांगितले. त्यामुळे पोषण आहाराच्या गुणवत्तेबाबत संशय अधिकच बळावला आहे. शासनाकडून बालकांना सकस व पौष्टिक आहार मिळावा, यासाठी पोषण आहाराची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, जर निकृष्ट दर्जाची अंडी बालकांना दिली जात असतील तर हा गंभीर प्रकार असून संबंधित विभागाने याची तातडीने चौकशी करणे गरजेचे आहे. अंगणवाडीतील अंड्यांचा दर्जा, पुरवठ्याचे स्रोत तसेच वितरणाची प्रक्रिया यांची संबंधित अधिकाऱ्यांनी तपासणी करावी. दोष आढळल्यास जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी पालक व ग्रामस्थांकडून होत आहे. बालकांच्या पोषण आहारात हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, अशी भूमिका सरपंच राजेंद्र निकुळे यांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणाच्या चौकशीकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. -- --1
- सार्वजनिक ठिकाण पे गंदगी करने के लिए कौन दिया परवानगी पुच्छी है जनता सार्वजनिक ठिकाण प्रति नाशिक रोड देवदली कॅम्प प्लास्टिक से कितनी बडी गंदगी होती है और बिमारी उपयोग पर रोक लगाने के लिए सरकार ने पुरा कितना प्रार्थना किया पर लोगों को समझ में आना चाहिये लोगों की राय है की सार्वजनिक स्थान पर गंडगी ना करे जब सरकार है पर कार्रवाई लेती है टैब लोगों को समझ में आता है एक सार्वजनिक स्थान पर गंदगी ना करे, यह किसी धर्म किसी मजहब के लिए नहीं हर लोग हर वर्ग के लिए है गंडगी ना करे1
- Dhule Crime News | धुळे: दहिवेल येथे टायर पंक्चरच्या संधीचा फायदा, चहातून गुंगीचे औषध; कंटेनर चालक झोपेत असताना लाखोंचा माल लुटला... पिंपळनेर (साक्री): दहिवेल-पिंपळनेर मार्गावर चोरीची धक्कादायक घटना समोर आली आहे. अहमदाबादहून बंगळुरूकडे बाथरूम लिक्विड आणि कपड्यांचा माल घेऊन जाणाऱ्या कंटेनर चालकाला गुंगीचे औषध देऊन लाखो रुपयांचा माल लंपास करण्यात आला. चालक अजय सिंग हे कंटेनर घेऊन जात असताना दहिवेल येथे टायर पंक्चर झाल्याने त्यांनी वाहन थांबवले होते. याच संधीचा फायदा घेत अज्ञातांनी त्यांना चहा आणि चिवड्यामधून गुंगीचे औषध दिले. गुंगी आल्याने चालकाने कसाबसा कंटेनर पतरा फॅक्टरी परिसरापर्यंत नेला आणि स्टेअरिंगवरच झोपले. सकाळी जाग आल्यावर कंटेनर तपासला असता त्यातील लाखो रुपयांचा माल गायब असल्याचे आढळले. घटनेची माहिती मिळताच पिंपळनेर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. #DhuleNews #PimpalnerCrime #DhulePolice #LootCase #SakriNews1
- मालेगावी पुन्हा टिपू सुलतानचा फोटो, उपमहापौर शाने हिंद यांच्या कार्यालयात पुन्हा लावला फोटो मालेगावी पुन्हा टिपू सुलतानचा फोटो, मालेगाव महानगरपालिकेच्या उपमहापौर शाने हिंद यांनी त्यांच्या कार्यालयात पुन्हा टिपू सुलतानचा फ़ोटो लावला. त्यामुळे टिपू सुलतानच्या फोटो वरून वादळ उठण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उपमहापौर शाने ए हिंद यांनी त्यांच्या कार्यालयात पुन्हा लावला टिपू सुलतानचा फोटो..1